Jio ने सादर केला Coronovirus चेक करण्याचे टूल, अशाप्रकारे करा चेक

चीन मधील वुहान मध्ये नोव्हेंबर 2019 पासून कोरोना संक्रमणाची सुरवात झाली होती. आज या वायरसच्या विळख्यात चीन समवेत संपूर्ण जग आहे. या खतरनाक वायरसमुळे मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संपूर्ण भारतात 21 दिवसांच्या बंदची घोषणा केली आहे. या महामारी विळखा पाहता टेलिकॉम ऑपरेटर Jio ने MyJio App मध्ये एक नवीन फीचर जोडले आहे.

या नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स कोरोना संबंधित सर्व माहिती मिळवू शकतात. जियो ऍप मध्ये मिळणाऱ्या या फीचरला कंपनीने ‘कोरोना वायरस इन्फो अँड टूल’ असे नाव दिले आहे. फोन मधील माए जियो ऍपच्या हॅम्बर्गर मेन्यू वर टॅप करून हा वापरता येईल. या ऑप्शन वर क्लिक केल्यावर एक मेसेज यूजर्सना दिसेल.

यात लिहिण्यात आले आहे की, ‘कोरोना वायरस (COVID-19) एक संक्रामक आजार आहे, जो अश्या नवीन वायरसमुळे होत आहे जो याआधी कधीच माणसांमध्ये सापडला नाही. कृपया खाली दिलेल्या ऑप्शंसच्या मदतीने याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आणि अपडेटेड रहा.’

यूजर्सना या ऍप वर कोणती लक्षणे असल्यावर कोरोना संक्रमण होऊ शकते आणि कोणती लक्षणे सामान्य तापाची आहेत याची माहिती मिळते. पुढील फोटोजच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता कि कोणत्या प्रश्नांची उत्तरे देऊन तुम्ही जाणून घेऊ शकता कि तुम्हाला कोरोना वायरस झाला आहे कि नाही.

कोरोना वायरस टेस्ट मध्ये तुम्हाला काही साधे प्रश्न विचारले जातील, जसे कि तुमचे वय किती आहे, तुम्ही परदेश यात्रा केली आहे कि नाही, तुम्हाला सर्दी किंवा खोकला आहे का. शेवटी तुम्हाला उत्तर मिळेल कि तुम्हाला Covid-19 ची जोखीम किती आहे.

टेस्ट सेंटर वर टॅप केल्यावर जियो यूजर्सना देशातील सर्व टेस्ट सेंटर्सची राज्यवार लिस्ट संपूर्ण पत्त्यासह देण्यात आली आहे. या फीचर मध्ये कोरोना वायरस चेक करण्याव्यतिरिक्त टेस्ट सेंटर्स ची लिस्ट, आकडे , हेल्पलाइन आणि FAQ सारख्या ऑप्शनचा समावेश आहे.

नोट: जर तुमच्याकडे माए जियो ऍप नसेल तर तुम्ही लिंक वर क्लिक करून कोरोना वायरसची लक्षणे चेक करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here