कमी किंमतीत Samsung Galaxy A05 लवकरच येऊ शकतो बाजारात; पाहा कसे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • बजेट रेंज मध्ये हा चांगला ऑप्शन ठरू शकतो.
  • ह्यात परफॉर्मन्ससाठी ऑक्टा कोर चिपसेट मिळू शकतो.
  • फोन लवकरच बाजारात एंट्री करेल.

सॅमसंगचा एक स्वस्त ए सीरीज स्मार्टफोन Samsung Galaxy A05 लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. ह्या डिवाइसची एंट्री खूप कमी किंमतीत केली जाऊ शकते. म्हणजे की बजेट रेंजमध्ये फोन खरेदी करणाऱ्या युजर्ससाठी हा चांगला ऑप्शन ठरू शकतो. आता हा मोबाइल वाय-फाय एलायंस सर्टिफिकेशन वेबसाइटवर देखील दिसला आहे, जिथून ह्याची काही माहिती समोर आली आहे. पुढे लीक स्पेसिफिकेशन, किंमत आणि लिस्टिंगची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A05 लिस्टिंग आणि लीक लाँच डिटेल

  • सध्या कंपनीनं ह्या डिवाइसच्या लाँच डेटबद्दल माहिती दिली नाही. परंतु लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की हा फोन लवकरच बाजारात येऊ शकतो.
  • डिवाइस SM-A055F-DS मॉडेल नंबरसह वाय-फाय एलायंस सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला आहे.
  • लिस्टिंगनुसार डिवाइसमध्ये अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टम असेल.
  • डिवाइस वायफाय 2.4 गीगाहर्ट्झ आणि 5 गीगाहर्ट्झ फ्रीक्वेंसी बँडला सपोर्ट करेल.
  • इतर माहितीसाठी कंपनीच्या घोषणेची वाट पाहावी लागेल.

Samsung Galaxy A05 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले : Galaxy A05 मध्ये 6.6 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. त्यात सामान्य रिफ्रेश रेट आणि हाय रिजॉल्यूशनचा समावेश केला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये परफॉर्मन्ससाठी ऑक्टा कोर चिपसेट मिळू शकतो.
  • स्टोरेज : डिवाइस 4GB रॅम + 64GB स्टोरेजसह येऊ शकतो. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील मिळू शकतो.
  • कॅमेरा : मोबाइल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येण्याची शक्यता आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या अन्य कॅमेरा लेन्स दिल्या जाऊ शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळू शकते.
  • बॅटरी : डिवाइस 6000mAh बॅटरीसह येऊ शकतो. फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीची पावर मात्र समजली नाही.
  • अन्य : हा फोन 4G कनेक्टिव्हिटी डुएल सिम, फिंगरप्रिंट सेन्सर, वायफाय, ब्लूटूथ सारख्या बेसिक फीचर्ससह येईल.

संभाव्य किंमत

Samsung Galaxy A05 ची संभाव्य किंमत 10 ते 12 हजार रुपयांच्या आत असू शकते. आता कंपनी हा डिवाइस कोणत्या बजेट रेंजमध्ये घेऊन येते हे पाहावं लागेल. ज्या पद्धतीनं ए सीरीजचे स्मार्टफोन सादर केला जात आहेत त्यानुसार ह्याची किंमत देखील जास्त असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here