लाॅन्चच्या आधी समोर आला Samsung Galaxy A52, 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह असेल 90हर्ट्ज डिस्प्ले

Samsung आपल्या गॅलेक्सी ‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोन्सवर काम करत आहे जे Samsung Galaxy A52 आणि Samsung Galaxy A72 नावाने बाजारात येतील. हे दोन्ही स्मार्टफोन्स वेगवेगळ्या लीक्स मध्ये समोर येत होते ज्यात वेगवेगळ्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्सची माहिती मिळाली आहे. आता एका ताज्या लीक मध्ये लाॅन्चच्या आधी सॅमसंग गॅलेक्सी ए52 स्मार्टफोनची किंमत पण समोर आली आहे त्याचबरोबर फोनच्या फुल स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

किंमत आली समोर

Samsung Galaxy A52 संबंधित नवीन लीक मध्ये सांगण्यात आले आहे कि सॅमसंग या स्मार्टफोनचे दोन मॉडेल बाजारात आणेल यातील एक 4G ला सपोर्ट करेल तसेच दुसरा 5G वर काम करेल. सॅमसंग गॅलेक्सी ए52 च्या 4जी मॉडेलची किंमत या लीक मध्ये सांगण्यात आली आहे जी भारतीय करंसीनुसार 29,000 रुपयांच्या आसपास आहे. लीकनुसार फोन 5जी मॉडेल मध्ये लाॅन्च केला जाईल ज्याची किंमत इंडियन करंसीनुसार 34,900 रुपयांच्या आसपास असेल. लीकनुसार हा फोन मार्च मध्ये वियतनाम मध्ये लाॅन्च होईल.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A52 बद्दल सांगण्यात आले आहे कि कंपनी हा फोन 6.5 इंचाच्या सुपर एमोलेड डिस्प्लेवर लाॅन्च करेल जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. लीकनुसार फोनचा 4G मॉडेल क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेटवर लाॅन्च केला जाईल तर 5G मॉडेल मध्ये क्वाॅलकाॅमचा स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट मिळेल. हे दोन्ही मॉडेल अँड्रॉइड 11 वर लाॅन्च होतील जो वन युआय 3.1 सह काम करेल.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M62 कंपनीच्या इंडियन साइटवर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च

फोटोग्राफीसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए52 मध्ये क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप असल्याचे समोर आले आहे. लीकनुसार हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरला सपोर्ट करेल तसेच 12 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर असेल त्याचबरोबर इतर दोन सेंसर 5 मेगापिक्सलचे दिले जातील. सेल्फी आणि व्हिडीओ काॅलिंगसाठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याची माहिती समोर आली आहे.

Samsung Galaxy A52 आय67 रेटेड असल्याचे सांगण्यात आले आहे, त्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून वाचेल. लीकनुसार हा फोन 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅमवर लाॅन्च होईल ज्यात 128 जीबी इंटरनल मेमरी आणि 256 जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी ए52 मध्ये 25वाॅट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 4,500एमएएचची बॅटरी असल्याची माहिती समोर आली आहे. लीकनुसार हा फोन black, blue, lavender आणि white कलर मध्ये बाजारात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here