‘हे’ स्मार्टफोन्स हँडसेट येत आहेत या महिन्यात, पाहा यादी

स्मार्टफोन्सची मागणी कायम असते ती पूर्ण करण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोबाइल निर्माता कंपन्या नवनवीन हँडसेट सादर करत असतात. कंपन्या वेगवेगळ्या प्राइस रेंज आणि नवनवीन दमदार फीचर्ससह स्मार्टफोन लाँच करतात. दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये देखील कंपन्या भन्नाट स्मार्टफोन लाँच करणार आहेत. वनप्लस, शाओमी, रियलमी आणि अन्य कंपन्या नोव्हेंबरमध्ये आपले स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहेत. इथे आम्ही तुम्हाला नोव्हेंबरमध्ये लाँचसाठी तयार असलेल्या स्मार्टफोन्सची माहिती देत आहोत.

नोव्हेंबर 2022 मध्ये येणारे स्मार्टफोन

  • Xiaomi 12T सीरीज
  • Redmi Note 12 सीरीज
  • OnePlus Nord 3
  • Realme 10 सीरीज
  • iQOO Neo 7

अपकमिंग स्मार्टफोन नोव्हेंबर 2022

Xiaomi 12T Series

Xiaomi नोव्हेंबरमध्ये आपली नवीन फ्लॅगशिप Xiaomi 12T Series लाँच करू शकते. या सीरीजचा प्रीमियम स्मार्टफोन Xiaomi 12T Pro क्वॉलकॉमच्या नव्या Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. या फोनमध्ये 200MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W ची फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: OPPO A58 5G: येत आहे नवीन 5जी ओप्पो मोबाइल फोन, असे असतील स्पेसिफिकेशन्स

Redmi Note 12 सीरीज

Xiaomi Redmi Note 12 Explorer Edition launched in india check price and specifications

शाओमीनं काही दिवसांपूर्वीच Redmi Note 12 सीरीज चीन चीनमध्ये लाँच केली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये कंपनी ही भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. या सीरीजमध्ये Redmi Note 12, Note 12 Pro आणि Redmi Note 12 Pro+ सह कंपनीनं Redmi Note 12 Discovery Edition लाँच केला आहे. आशा आहे की यातील काही स्मार्टफोन भारतात लाँच होऊ शकतात.

OnePlus Nord 3

OnePlus चा बजेट प्रीमियम स्मार्टफोन Nord सीरीजचा आगामी स्मार्टफोन OnePlus Nord 3 नोव्हेंबरमध्ये लाँच होऊ शकतो. वनप्लसचा हा फोन 30 हजार रुपयांच्या बजेटमध्ये सादर केला जाऊ शकतो. वनप्लसच्या या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7 इंचाचा FHD+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो. वनप्लसचा हा फोन 150W फ़ास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकतो.

Realme 10 सीरीज

Realme ची लोकप्रिय नंबर सीरीज Realme 10 सीरीज नोव्हेंबरमध्ये लाँच केली जाऊ शकते. सुरुवातीला या सीरीजचे दोन स्मार्टफोन Realme 10 आणि Realme 10 Pro+ लाँच केले जाऊ शकतात. रियलमीच्या आगामी स्मार्टफोन MediaTek च्या प्रोसेसरसह सादर केले जाऊ शकतात. हा रियलमी स्मार्टफोन 5000mAh च्या बॅटरीसह सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Battlegrounds Mobile India Download: लेटेस्ट BGMI APK फाईल डाउनलोड करा, लवकरच बॅन होणार रद्द!

iQOO Neo 7

iQOO चा आगामी मिड रेंज स्मार्टफोन iQOO Neo 7 भारतात नोव्हेंबरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. विवोचा हा फोन चीनमध्ये लाँच केला गेला आहे. चीनमध्ये लाँच झालेल्या iQOO Neo 7 मध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.78-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 9000+ चिपसेट देण्यात आला आहे. आयकूच्या या फोनमध्ये 50MP चा Sony IMX766V सेन्सर मिळतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here