फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला Samsung Galaxy M01, Xiaomi – Realme ला मिळेल टक्कर

Samsung ने आज अनेक दिवसांच्या चर्चेनंतर भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीने एक साथ दोन फोन Samsung Galaxy M01 आणि Samsung Galaxy M11 भारतात लॉन्च केले आहेत. गॅलेक्सी एम11 याआधीच आंतरराष्ट्रीय बाजारात आला आहे तर गॅलेक्सी एम01 टेक विश्वासाठी अगदी नवीन फोन आहे, जगात पहिल्यांदा भारतातच हा फोन लॉन्च झाला आहे. Samsung Galaxy M01 फक्त 8,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो ऑनलाईन शॉपिंग साइट्स सोबतच ऑफलाईन रिटेल स्टोर्स वर पण विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy M01 च्या लुक व डिजाईन बद्दल बोलायचे तर हा फोन वॉटरड्रॉप नॉच वर लॉन्च केला गेला आहे. स्क्रीनच्या वरच्या भागात ‘वी’ शेप नॉच देण्यात आली आहे आणि यात फोनचा सेल्फी कॅमेरा आहे. स्क्रीनच्या दोन्ही बाजूंना बारीकी बेजल्स आहेत तसेच डिस्प्लेच्या खाली रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोनचे डायमेंशन 146.4 x 70.86 x 9.8एमएम आहे.

तसेच सॅमसंग गॅलेक्सी एम01 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये दोन कॅमेरा सेंसर्स व फ्लॅश लाईट एकाच रांगेत आहेत . फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आलेला नाही तसेच इथे Samsung ची ब्रँडिंग आहे. फोनच्या उजव्या पॅनल वर पावर बटण आणि डाव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे.

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M01 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 5.7 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-वी डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला आहे जो वनयूआई वर चालतो. त्याचप्रमाणे प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 1.95गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट देण्यात आला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे झाले तर Samsung Galaxy M01 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी एम01 एफ/2.2 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy M01 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी हा फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो तसेच पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम01 मध्ये 4,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंगने आपला फोन डॉल्बी एटमॉस टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर सॅमसंग हेल्थ ऍप पण फोन मध्ये प्री-इंस्टाल्ड आहे.

सॅमसंगने गॅलेक्सी एम01 3 जीबी रॅम लॉन्च केला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 512 जीबी पर्यंत वाढवता येते. भारतात हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलर मध्ये लॉन्च केला गेला आहे तसेच Samsung Galaxy M01 आज पासून फक्त 8,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here