ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Samsung Galaxy M11, जाणून घ्या याचे दमदार फीचर्स

Samsung ने या महिन्यात भारतात आपल्या ‘गॅलेक्सी एम’ सीरीज अंतर्गत नवीन फोन Galaxy M21 लॉन्च केला होता. गॅलेक्सी एम मध्ये कंपनीच्या अपकमिंग फोन Galaxy M11 बद्दल अनेक दिवसांपासून माहिती समोर येत होती, ज्यावर आता पूर्णविराम लागला आहे. कंपनीने हा डिवाइस अधिकृतपणे लॉन्च केला आहे.

Samsung ने आपला नवीन स्मार्टफोन Galaxy M11 चुपचाप सादर केला आहे. कंपनीने कोणत्याही प्रेस रिलीज विना UAE च्या वेबसाइट वर डिवाइस लिस्ट केला आहे. वेबसाइट वर फोनची सर्व माहिती समोर आली आहे. फोन तीन कलर ऑप्शन ब्लॅक, ब्लू आणि वॉयलेट मध्ये सादर केला गेला आहे.

अधिकृत लिस्टिंगनुसार फोनची मागील पॅनल पॉलीकार्बोनेटने बनलेला असेल. तसेच मागे एक एलईडी सह ट्रिपल रियर कॅमेरा व फिंगरप्रिंट सेंसर असेल. त्याचबरोबर डिवाइस मध्ये डावीकडे एक पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर ऑन-ऑफ बटण असेल. डिवाइसच्या खालच्या बाजूला चार्जिंग पोर्ट आणि स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता सॅमसंग गॅलेक्सी एम11 मध्ये 6.4-इंचाचा एलसीडी एचडी+ रिजोल्यूशन पंच होल डिस्प्ले असेल. फोन मधील चिपसेट बद्दल कंपनीने अधिकृत माहिती दिली नाही. पण असे सांगितले आहे कि Galaxy M11 मध्ये ऑक्टा-कोर सीपीयू असेल, ज्याचा क्लॉक स्पीड 1.8GHz असेल. लीकनुसार यात स्नॅपड्रॅगॉन 450 चिपसेट असेल. त्याचबरोबर फोन मध्ये 3GB व 4GB रॅम सह 32GB व 64GB स्टोरेजचा ऑप्शन असेल. डिवाइसची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने वाढत येते.

फोटोग्राफीसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये अपर्चर एफ/1.8 सह 13 मेगापिक्सल प्राइमरी, अपर्चर एफ/2.2 सह 5 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड सेंसर आणि अपर्चर एफ/2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर असेल. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी 8MP f/2.0 अपर्चर असलेला कॅमेरा असेल.

पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच स्मार्टफोन अँड्रॉइड 10 बेस्ड वन यूआई 2.0 वर चालेल. इतकेच नव्हे तर या स्मार्टफोन मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक, जीपीएस, ब्लूटूथ आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स असतील. फोनची किंमत आणि विक्रीची माहिती समोर आलेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here