18 सेप्टेंबरला भारतात लॉन्च होईल 6000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Samsung Galaxy M30s

Samsung Galaxy M30s बद्दल कालच आम्ही एक बातमी दिली होती ज्यात सांगितले होते कि सॅमसंगचा आगामी स्मार्टफोन Google च्या अधिकृत वेबसाइट एंडरॉयड इंटरप्राईज वर लिस्ट केला गेला आहे, जिथे फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. आतापर्यंत Galaxy M30s बद्दल लीक्स समोर येत होते पण आता सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजच्या या नवीन फोनची लॉन्च डेट पण समोर आली आहे. Samsung Galaxy M30s येत्या 18 सेप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाईल.

Samsung Galaxy M30s च्या लॉन्च डेटचा खुलासा ई-कॉमर्स साइट अमेझॉन इंडिया ने केला आहे. अमेझॉन वर Galaxy M30s चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे जिथे फोनच्या लॉन्च डेट सोबतच याच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे. या प्रोडक्ट पेज वरून समजले आहे कि सॅमसंग गॅलेक्सी एम सीरीजचा हा आगामी स्मार्टफोन 18 सेप्टेंबरला भारतीय बाजारात येईल त्याचबरोबर सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे Galaxy M30s पण अमेझॉन वरच सेल साठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्सचा खुलासा

Galaxy M30s च्या प्रोडक्ट पेज वर असे स्पष्ट करण्यात आले आहे कि Samsung आपला हा डिवाईस 6,000एमएएच च्या पावरफुल बॅटरी सह लॉन्च करेल. विशेष म्हणजे हा पहिला सॅमसंग एंडरॉयड स्मार्टफोन असेल जो इतक्या पावरच्या बॅटरीला सपोर्ट करेल. Galaxy M30s सह कंपनीने #GoMonster हॅशटॅग वापरला आहे. अमेझॉन वर सांगण्यात आला आहे कि हा फोन सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह दाखवण्यात आला आहे. अमेझॉन इंडिया ने म्हणून ‘_8 MP Triple camera’ लिहिले आहे. हि हिंट पाहून बोलले जात आहे कि गॅलेक्सी एम30एस मध्ये 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर दिला जाऊ शकतो. अमेझॉन वर Galaxy M30s इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M30s

Samsung Galaxy M30s चे स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्ट नुसार हा डिवाईस पण वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर सादर केला जाईल. या फोन मध्ये 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.4-इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळू शकते. बोलले जात आहे कि सॅमसंग हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर करेल ज्या सोबत प्रोसेसिंग साठी Galaxy M30s मध्ये कंपनीचा एक्सनॉस 9610 चिपसेट दिला जाईल.

भारतात Samsung Galaxy M30s दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. रिपोर्ट नुसार फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम मेमरी सह 128जीबी ची इंटरनल मेमरी दिली जाईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Galaxy M30s ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. रिपोर्ट नुसार फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा सेंसर मिळेल जो एफ/2.0 अपर्चरला सपोर्ट करेल.

Samsung Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर वाला 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड सेंसर मिळेल. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. Galaxy M30s चा रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅश सह येईल.

Galaxy M30s च्या बॅक पॅनल वर सिक्योरिटी साठी रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी मिळेल जी 25वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. अजूनतरी फोनची किंमत किती असेल आणि हा भारतात कधी सेल साठी येईल यासाठी 18 सेप्टेंबरला फोन लॉन्चची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here