Aadhar card - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sat, 22 Jul 2023 06:28:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 आधारशी लिंक झालं चुकीचं PAN कार्ड? असं करा डीलिंक https://www.91mobiles.com/marathi/how-to-delink-pan-aadhaar/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-delink-pan-aadhaar/#respond Sat, 22 Jul 2023 06:11:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21225 जर तुमच्या Aadhaar शी चुकीचं PAN लिंक झालं तर असेल तर आता अजूनही ही चूक सुधारण्याची वेळ तुमच्याकडे आहे. आयकर विभागानुसार, पॅन कार्ड 30 जून, 2023 पर्यंत आधारशी लिंक करता येईल. जर आधारशी चुकीचा पॅन लिंक असेल, तर आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाईल करताना अडचण येऊ शकते. चला जाणून घेऊया डिलिंक करण्याची प्रोसेस. PAN-Aadhaar कार्ड […]

The post आधारशी लिंक झालं चुकीचं PAN कार्ड? असं करा डीलिंक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुमच्या Aadhaar शी चुकीचं PAN लिंक झालं तर असेल तर आता अजूनही ही चूक सुधारण्याची वेळ तुमच्याकडे आहे. आयकर विभागानुसार, पॅन कार्ड 30 जून, 2023 पर्यंत आधारशी लिंक करता येईल. जर आधारशी चुकीचा पॅन लिंक असेल, तर आयटीआर (इनकम टॅक्स रिटर्न) फाईल करताना अडचण येऊ शकते. चला जाणून घेऊया डिलिंक करण्याची प्रोसेस.

PAN-Aadhaar कार्ड डीलिंक करण्याची पद्धत

वेगवेगळ्या परिस्थितीनुसार पॅन-आधार डीलिंक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करू शकता :

जर पॅन कार्ड दुसऱ्याचा आधारशी लिंक असेल

स्टेप 1 : जर पॅन कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या आधारशी जोडलं गेलं असेल तर पॅन सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पॅन कार्ड प्रोसेसिंग डिटेल मिळवा.

स्टेप 2 : त्यानंतर आयटीबीए (Income Tax Business Application)च्या माध्यमातून आरसीसी (Regional Computer Center) कडून ऑडिट लॉग मिळत.

स्टेप 3 : त्यानंतर चुकीच्या लिंकिंगची कारणे शोधा. त्यानंतर डीलिंकिंग आवश्यक आहे की नाही ते ठरवा. जर डीलिंकिंग आवश्यक असेल तर, आयकर विभागाकडे आवश्यक कागदपत्र जमा करा.

एकाच व्यक्तीकडे दोन पॅन

स्टेप 1 : जर तुमच्याकडे दोन पॅन कार्ड असतील पॅन स्टेटसकी तपासणी आयकर विभागाच्या मोबाइल अ‍ॅपवर CBN क्वेरीचा वापर करा.

स्टेप 2 : जर दोन्ही पॅन कार्ड सक्रिय असतील तर ते डी-डुप्लीकेशनमध्ये आहेत का ते पाहा. जर असतील तर इनकम टॅक्स असेसिंग ऑफिसरशी संपर्क करा.

स्टेप 3 : हे ठीक करण्यासाठी आयकर विभागाकडे आवश्यक कागदपत्र जमा करावे लागतील.

एकच नंबरचे अनेक पॅन

स्टेप 1 : सर्वप्रथम पॅन सर्व्हिस प्रोव्हायडरकडून पॅन कार्ड प्रोसेसिंगची माहिती मिळवा. स्टेप 2 : त्यानंतर पॅन कार्ड कोणाला देण्यात आला आहे, त्याच्या ओळखीसाठी अर्ज करत.

स्टेप 3 : ह्यासाठी आयकर विभागाकडे आवश्यक कागदपत्र जमा करा.

स्टेप 4 : प्रोसेसिंग नंतर एक नवीन पॅन कार्ड मिळेल.

डीलिंकसाठी ह्या डॉक्यूमेंटची गरज पडेल

  • पॅन कार्डची प्रत
  • आधारकार्डची प्रत
  • तक्रार केलेल्या पात्राची प्रत
  • पत्त्याचा पुरावा
  • ईमेल आयडी >

पॅन-आधार डीलिंक रिक्वेस्ट कशी सबमिट करायची

ई-फिलिंग पोर्टलनुसार, जर तुमचं आधार चुकीच्या पॅन नंबरशी लिंक झालं असेल किंवा पॅन-आधार डीलिंकिंग करण्यासाठी JAO (Jurisdictional Assessing Officer) कडे अर्ज करावा लागेल. डीलिंक केल्यानंतर तुम्ही पुन्हा पॅन-आधार लिंक करण्यासाठी अर्ज करू शकता. ह्यासाठी तुम्हाला शुल्क द्यावे लागेल.

ह्यासाठी तुम्हाला तुमचा जेएओ कोण आहे ते शोधावं लागेल. ह्यासाठी eportal.incometax.gov.in/iec/foservices/#/pre-login/knowYourAO वर जा. इथे तुम्हाला तुमचं पॅन आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. व्हेरिफिकेशन नंतर जेएओची संपूर्ण माहिती दिसेल.

तसेच, ई-फाईलिंग पोर्टलवर लॉगइन करून जेएओची माहिती मिळवता येईल. ह्यासाठी माय प्रोफाईल > Jurisdictional डिटेलवर क्लिक करा. तुम्हाला जेएओची माहिती मिळेल.

त्यानंतर तुम्ही ई-पोर्टलच्या माध्यमावरील ईमेल आयडीच्या माध्यमातून जेएओ अधिकाऱ्याशी संपर्क करू शकता.

पॅन-आधार लिंक करणे का आवश्यक आहे?

इन्कम टॅक्स अ‍ॅक्टच्या 139एए कलमानुसार, प्रत्येक व्यक्ती ज्याला पर्मानेंट अकाऊंट नंबर (PAN) देण्यात आला आहे आणि जो आधार क्रमांक मिळवण्यास पात्र आहे, त्यांना आपलं आधार पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे. खासकरून ज्या लोकांना 1 जुलै, 2017 किंवा त्यापूर्वी पॅन जारी करण्यात आला आहे, त्यांनी 30 जून, 2023 पूर्वी आधार पॅनशी लिंक करणं आवश्यक आहे. सध्या पॅन आधारशी लिंक करण्यासाठी तुम्हाला 1000 रुपये दंड भरावा लागेल.

पॅन-आधार डीलिंक करण्याची कारणे

डुप्लीकेट पॅन : जर एकाच नंबरनं एकापेक्षा जास्त पॅन कार्ड जारी करण्यात आले असतील तर ते डीलिंक करता येतात.

एकापेक्षा जास्त पॅन : आधार-पॅन डीलिंक करण्याचे एक कारण मल्टीपल पॅन जारी होणे देखील असू शकते. पॅन जारी करण्याच्या प्रक्रियेत गडबड झाल्यामुळे किंवा फसवणुकीमुळे असे घडू शकते. त्यामुळे एकापेक्षा जास्त पॅन बाळगण्यासाठी दंडापासून वाचण्यासाठी डुप्लीकेट पॅन-आधार डीलिंक करावं लागेल.

चुकीचं लिंकिंग : कधी कधी लिंक करण्याची प्रक्रिया चुकू शकते. एका व्यक्तीचं पॅन कार्ड दुसऱ्या व्यक्तीच्या आधार कार्डशी लिंक होऊ शकतं. अशावेळी टॅक्स फाईलिंग दरम्यान गडबड होऊ नये म्हणून डीलिंक करणे आवश्यक आहे.

बनावट पॅन : काही वेळा एखाद्या व्यक्तीनं बनावट पॅन कार्ड आपल्या आधारशी लिंक केलं असू शकतं. अशावेळी कायद्याच्या गुंत्यात न अडकण्याची आधारपासून पॅन वेगळा करण आवश्यक आहे.

आधार पॅन कार्ड लिंक स्टेटस

तुम्ही ऑनलाइन चेक करू शकता की तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक आहे की नाही. ह्यासाठी तुम्हाला आयकर ई-फाईलिंग पोर्टल (https://www.incometax.gov.in/iec/foportal/) वर जावं लागेल आणि लिंक आधारावर क्लिक करावं लागेल. आधार-पॅन लिंक आहे की नाही, हे जाणून घेण्यासाठी पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड नंबर नोंदवा. लिंक आहे की नाही ह्याची माहिती मिळेल.

The post आधारशी लिंक झालं चुकीचं PAN कार्ड? असं करा डीलिंक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-delink-pan-aadhaar/feed/ 0
Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डवर सहज अपडेट करा मोबाइल नंबर, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-mobile-number-in-aadhaar-card/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-mobile-number-in-aadhaar-card/#respond Sun, 25 Dec 2022 03:37:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15441 Aadhaar Card Mobile Number Update: भारतात आधार कार्ड (Aadhaar card) एक आवश्यक डॉक्यूमेंट आहे, ज्याचा वापर सरकारी कामांसाठी आणि ओळखपत्र म्हणून केला जातो. सध्या अनेक सुविधा ऑनलाइन आल्या आहेत, ज्यासाठी आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर OTP ची गरज पडते. त्यामुळे तुमच्या आधार कार्डवर तोच मोबाइल नंबर लिंक असणं आवश्यक आहे जो तुमच्याकडे चालू आहे. जर […]

The post Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डवर सहज अपडेट करा मोबाइल नंबर, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Aadhaar Card Mobile Number Update: भारतात आधार कार्ड (Aadhaar card) एक आवश्यक डॉक्यूमेंट आहे, ज्याचा वापर सरकारी कामांसाठी आणि ओळखपत्र म्हणून केला जातो. सध्या अनेक सुविधा ऑनलाइन आल्या आहेत, ज्यासाठी आधारशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवर OTP ची गरज पडते. त्यामुळे तुमच्या आधार कार्डवर तोच मोबाइल नंबर लिंक असणं आवश्यक आहे जो तुमच्याकडे चालू आहे. जर तुमचा आधार कार्डशी लिंक असलेला मोबाइल नंबर डिअ‍ॅक्टिव्हेट झाला असेल तर तुम्ही अनेक सेवा वापरू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला आधार कार्डवरील मोबाइल नंबर अपडेट करण्याची पद्धत सांगणार आहोत.

आधार कार्डशी लिंक मोबाइल नंबर कसा बदलायचा

जर तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेला नंबर डिअ‍ॅक्टिव्हेट झाला तसे किंवा तुमच्याकडे तो नंबर नसेल तर तुम्ही UIDAI च्या डेटाबेसमध्ये तुमचा नवा नंबर अपडेट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेंटरवर जावं लागेल. आधार कार्डवरील फोन नंबर चेंज करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

स्टेप 1: तुमच्या जवळच्या आधार इनरोलमेंट सेंटरवर जा.
स्टेप 2: आधार अपडेट/करेक्शन फॉर्म भरा.
स्टेप 3: आधार कार्ड इग्जेक्यटिव्हला को फॉर्म द्या आणि बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशननं तुमचा नंबर अपडेट केला जाईल.
स्टेप 4: आधार कार्डवर फोन नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला 50 रुपये फी द्यावी लागेल.
स्टेप 5: तुम्हाला आधार कार्ड सेंटरवरून एक एक्नॉलेजमेंट स्लिप मिळेल. यात तुमचा अपडेट रिक्वेस्ट नंबर (URN) असेल. या नंबरच्या माध्यमातून तुम्ही तुमची अपडेट रिक्वेस्ट चेक करू शकता.

आधार अपॉइंटमेंट अशी करा बुक

आधार कार्डवर मोबाइल नंबर अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या नजीकच्या आधार सेंटरवर जावं लागेल. आधार सेंटरवर जाण्याआधी तुम्ही ऑनलाइन अपॉइंटमेंट देखील बुक करू शकता. त्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

स्टेप 1: मोबाइल नंबर चेंज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला UIDAI चं वेब पोर्टल ओपन करा.
स्टेप 2: तुमचं शहर/लोकेशन सिलेक्ट करून प्रोसीड बटनवर क्लिक करा.
स्टेप 3: तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाकू शकता.
स्टेप 4 : आता तुम्हाला मोबाइल नंबर वर OTP येईल. तो सबमिट करा आणि तुमचे आधार डिटेल्स टाका. तिथे तुम्हाला तुमची पर्सनल इंफॉर्मेंश टाकावी लागेल तसेच अपॉइंटमेंटची वेळ आणि तारखा निवडावी लागेल.

ऑनलाइन आधार मोबाइल नबंर कसा व्हेरिफाय करायचा

आधार कार्डवर लिंक मोबाइल नंबर व्हेरिफाय करण्याच्या अनेक पद्धती आहेत. इथे तुम्ही URN वरून इमेल किंवा मोबाइल नंबर व्हेरिफाय करू शकता.

1. URN किंवा अपडेट रिक्वेस्ट नंबरच्या माध्यमातून

आधार सेंटरवरून मिळालेल्या एक्नॉलेजमेंट स्लिपमधील URN नंबर वरून तुम्ही अपडेट स्टेटस चेक करू शकता. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या पद्धतीनं शोध घ्यावा लागेल.

आधार कार्ड सेल्फ सर्व्हिस पोर्टवर तुम्ही My Aadhaar ऑप्शनमध्ये जाऊन ‘Check Aadhaar Status’ चेक करू शकता.

तिथे तुमचा आधार कार्ड नंबर आणि यूआरएन नंबर टाका. त्यानंतर कॅप्चा कोड टाकून ‘Check Status’ वर क्लिक करा.

2. व्हेरिफाय इमेल/ मोबाइल नंबर ऑप्शन

आधार कार्ड अपडेट स्टेटस चेक करण्याचा दुसरा ऑप्शन व्हेरिफाय इमेल/ मोबाइल नंबर आहे.

Aadhaar च्या ऑफिशियल वेबसाइटवर आधार सर्व्हिस (Aadhaar Services) ऑप्शनमध्ये माय आधार (My Aadhaar) सेक्शनवर जा.

इथे तुमचा 12 डिजिट आधार नंबर, मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड सबमिट करा.

आता तुम्हाला मोबाइल नंबरवर ओटीपी मिळेल आणि ओटीपी सबमिट करा तसेच व्हेरिफाय इमेल / मोबाइल नंबर बटनवर क्लिक करा.

जर तुमचा नंबर व्हेरिफाय झाला असे तर तुम्हाला वेबसाइटवर मेसेज दिसेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Aadhaar Card Mobile Number Update: आधार कार्डवर सहज अपडेट करा मोबाइल नंबर, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-change-mobile-number-in-aadhaar-card/feed/ 0
Aadhaar Card: सरकारनं जारी केला नवा नियम, लवकरच सर्वांना अपडेट करावं लागणार आधार कार्ड https://www.91mobiles.com/marathi/aadhaar-card-new-rules-govt-advises-to-update-details-once-in-10-years/ https://www.91mobiles.com/marathi/aadhaar-card-new-rules-govt-advises-to-update-details-once-in-10-years/#respond Sat, 12 Nov 2022 11:42:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14891 भारतीयांसाठी Aadhaar Card एक मोठं आणि महत्वाचं ओळखपत्र आहे. याबाबत भारत सरकारनं एक नवा नियम लागू केला आहे. ज्यामुळे आधार कार्ड धारकांना आपली माहिती अपडेट करावी लागेल. या नव्या नियमानुसार दर 10 वर्षांनी युजर्सना आधारमधील आपली माहिती अपडेट करावी लागेल. Central Identities Data Repository (CIDR) कडे नेहमी युजर्सची ताजी माहिती असावी असा या नव्या नियमाचा […]

The post Aadhaar Card: सरकारनं जारी केला नवा नियम, लवकरच सर्वांना अपडेट करावं लागणार आधार कार्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतीयांसाठी Aadhaar Card एक मोठं आणि महत्वाचं ओळखपत्र आहे. याबाबत भारत सरकारनं एक नवा नियम लागू केला आहे. ज्यामुळे आधार कार्ड धारकांना आपली माहिती अपडेट करावी लागेल. या नव्या नियमानुसार दर 10 वर्षांनी युजर्सना आधारमधील आपली माहिती अपडेट करावी लागेल. Central Identities Data Repository (CIDR) कडे नेहमी युजर्सची ताजी माहिती असावी असा या नव्या नियमाचा हेतू आहे. पुढे आम्ही तुम्हाला या नियमाचे पालन कसे करायचे हे सांगणार आहोत तसेच हा नियम अनिवार्य आहे का हे देखील जाणून घेऊया.

New Aadhar Rules

मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी (Ministry of electronics and IT) नं जी नवीन नोटिफिकेशन जारी केली आहे त्यात सांगण्यात आलं आहे की आधार कार्ड धारकांना आपल्या एनरोलमेंटपासून 10 वर्षांच्या कालावधीनंतर माहिती अपडेट करावी लागेल, हे दर दहा वर्षांनी करावं लागेल. या माहितीमध्ये ओळखीचा पुरावा (Proof of Identity) (POI) किंवा प्रूफ ऑफ अ‍ॅड्रेस (Proof of Address) (POA) चा समावेश असेल. या प्रक्रियेच्या मदतीनं (CIDR) ला युजर्सची अप टू डेट माहिती मिळत राहील. हे देखील वाचा: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर जबरदस्त सूट; स्वस्तात मिळवा 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा

हा नियम अनिवार्य आहे का?

सध्यातरी आधारचा हा नवा नियम सक्तीचा करण्यात आला नाही. परंतु सरकारनं सर्व आधार युजर्सना आपले डाक्यूमेंट्स अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. ही (Aadhaar Regulations) आधार इनरोलमेंट आणि अपडेट रेगुलेशन 10 वर्षात युजर्सच्या माहितीत झालेला बदल मिळवण्यासाठी केली जात आहे. कारण अनेकदा युजर्स काही बदल करतात, ज्याची माहिती आधारमध्ये अपडेट होत नाही.

आधारमधील माहिती अपडेट कशी करायची

तुम्हाला आधारवरील माहिती अपडेट करायची असेल तर (Uidai) युआयडीएआय तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी स्वीकारेल. ज्यात युजरचं नाव आणि फोटोची माहिती असेल. या आयडेंटिफिकेशन डॉक्यूमेंटमध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर आयडी सारख्या डॉक्यूमेंटचा समावेश असेल. डॉक्यूमेंट अपडेट करण्यासाठी माय आधार पोर्टल (myAadhaar portal) आणि माय आधार अ‍ॅप (myAadhaar app) चा वापर करता येईल. तसेच तुम्ही बदल करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आधार एनरोलमेंट सेंटर (Aadhaar enrolment center) वर देखील जाऊ शकता. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये 14GB रॅम असलेला 5G Phone; 50MP कॅमेऱ्यासह Realme 10 5G लाँच

तुमच्या आधार कार्डवर पत्ता ऑनलाइन बदलण्यासाठी सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (Self Service Update Portal) (SSUP) ची मदत घेता येईल. जर तुम्हाला आधारवरील नाव, पत्ता, डेट ऑफ बर्थ, जेंडर किंवा मोबाइल नंबर बदलायचा असेल किंवा फिंगरप्रिंट बायोमेट्रिकमध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला यासाठी आधारच्या पर्मनंट एनरोलमेंट सेंटरवर जावं लागेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Aadhaar Card: सरकारनं जारी केला नवा नियम, लवकरच सर्वांना अपडेट करावं लागणार आधार कार्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aadhaar-card-new-rules-govt-advises-to-update-details-once-in-10-years/feed/ 0
या 5 स्टेप्स मध्ये जाणून घ्या तुमचा Aadhaar card खरा आहे की खोटा https://www.91mobiles.com/marathi/fake-aadhaar-card-find-out-online-simple-steps/ https://www.91mobiles.com/marathi/fake-aadhaar-card-find-out-online-simple-steps/#respond Fri, 08 Jan 2021 12:44:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9597 खर्या-खोट्या आधारची शहानिशा करणे खूप सोप्पे झाले आहे. काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही घर बसल्या हे चेक करु शकता.

The post या 5 स्टेप्स मध्ये जाणून घ्या तुमचा Aadhaar card खरा आहे की खोटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधार कार्ड (Aadhaar card) सध्या देशातील प्रत्येक नागरिकांसाठी सर्वात महत्वाचा ओळखपत्र बनला आहे. जर तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर तुमची सर्व सरकारी व गैरसरकारी कामे सहज होतात. अश्या वेळी जर तुम्हाला समजले की तुमच्याकडे असलेला आधार कार्ड (UIDAI) नकली असेल तर अडचणी वाढतात. त्यामुळे तुमचा आधार नंबर खरा आहे का हे जाणून घेणे आवश्यक आहे. खर्या-खोट्या आधारची शहानिशा करणे खूप सोप्पे झाले आहे. काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही घर बसल्या हे चेक करु शकता.

असली-नकली आधारची ओळख करण्याची पद्धत सांगण्याआधी सांगू इच्छितो की आधारसंबंधित ऑनलाइन माहितीसाठी रजिस्टर मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. जर असे तुम्ही अजून केले नसेल तर इथे क्लिक करून तुम्ही आधार कार्ड मध्ये नाव, एड्रेस सह इतर बदलांची माहिती घेऊ शकता.

अशाप्रकारे चेक करा आधार कार्ड असली आहे की नकली

-सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in/aadhaarverification वर जावे लागेल.

-या वेबसाइट वर आधार वेरिफिकेशन पेज ओपन होईल, इथे तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स दिसेल तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करावा लागेल.

-तुमचा 12 डिजिट आधार नंबर एंटर केल्यानंतर डिस्प्ले मध्ये दिसत असलेला कॅप्‍चा एंटर करावा लागेल.

-त्यानंतर वेरिफाई बटन वर क्लिक करा. जर तुमचा आधार नंबर योग्य असेल तर एक नवीन पेज ओपन होईल ज्यात तुमचा आधार नंबर दिसेल.

-आधार नंबर व्यतिरिक्त खाली तुमची संपूर्ण माहिती दिली असेल. तसेच जर नबंर नकली असेल तर इनवॅलिड आधार नंबर असे लिहून येईल.

नोट: तुम्हाला आधार संबंधित एखादी तक्रार नोंदवायची असेल तर यासाठी टोल फ्री नंबर 1947 देण्यात आला आहे.

The post या 5 स्टेप्स मध्ये जाणून घ्या तुमचा Aadhaar card खरा आहे की खोटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/fake-aadhaar-card-find-out-online-simple-steps/feed/ 0
कशाप्रकारे करावा आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट आणि जाणून घ्या शुल्क https://www.91mobiles.com/marathi/how-to-update-mobile-number-in-aadhar-online/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-update-mobile-number-in-aadhar-online/#respond Thu, 28 Mar 2019 12:14:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3956 आधार कार्ड मध्ये तुम्ही नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी सहित इतर गोष्टी स्वतःहून अपडेट करू शकत नाही.

The post कशाप्रकारे करावा आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट आणि जाणून घ्या शुल्क first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओळखपत्र दाखवायचे असेल किंवा पुरावा म्हणून वापरायचा असेल तर जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तुम्ही सहज हि कामे करू शकता. परंतु सर्वात जास्त त्रास लोकांना आधार कार्डच्या डेटा पासूनच होतो. तसे पाहता लोकांना आधीच सरकारी कामात चुका होतील याची अपेक्षा असते आणि त्या नंतर सुधारव्या लागतील. परंतु अनेकदा पत्ता बदलणे, मोबाईल नंबर बदलणे आणि लग्नानंतर नाव बदलताना त्रास होतोच. पण महत्वाची बाब अशी कि अनेक गोष्टी तुम्ही घर बसल्या बदलू शकता. आज मी तुम्हाला आधार कार्ड संबंधित अशाच समस्यांची उत्तरे देणार.

प्रश्न 1. आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करावा?
आधार कार्ड मध्ये आधी मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट करण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु आता काढून टाकण्यात आला आहे. जर तुमच्या आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर जोडलेला नसेल किंवा तुम्ही आपला मोबाईल नंबर बदलू इच्छित असाल तर यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्र वरच जावे लागेल. ऑनलाइन हि सुविधा उपलब्ध नाही.

प्रश्न 2. आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याचे शुल्क किती?
आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्हाला 25 रुपये शुल्क द्यावे लागेल.

प्रश्न 3. किती वेळात मोबाईल नंबर होईल अपडेट?
मोबाईल नंबर अपडेट होण्यास 90 दिवसांचा वेळ लागू शकतो.

प्रश्न 4. आधार कार्ड मध्ये ऑनलाइन एड्रेस अपडेट कसा करावा?
तुमच्या आधार कार्ड मध्ये तुम्ही एड्रेस ऑनलाइन अपडेट करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. पण एड्रेस अपडेट करण्यासाठी तुमच्या आधार नंबर सोबत मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर अपडेट नसेल तर मग अपडेट होऊ शकणर नाही. एड्रेस अपडेट करण्यासाठी

1. सर्वात आधी आधार सेल्फ सर्विस पोर्टल वर जा.

2. तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील परंतु पत्ता बदलण्यासाठी अपडेट एड्रेस वर क्लिक करा.

3. असे करताच एक नवीन विंडो उघडेल. तुम्ही https://ssup.uidai.gov.in/web/guest/aadhaar-home ने थेट एड्रेस अपडेट वर जाऊ शकता.

4. तिथे खाली तुम्हाला एड्रेस अपडेटचा पर्याय मिळेल. तो क्लिक करा. तिथून नवीन विंडो उघडेल आणि सर्वात आधी 12 डिजिट वाला आधार नंबर टाकावा लागेल.

5. त्याखाली कॅपचा येईल तो टाकून सेंट ओटीपी ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फोन वर एक ओटीपी येईल.

6. ओटीपी टाकताच तुम्ही एड्रेस सुधार पोर्टल वर पोहचाल. तिथे तुमच्या समोर दोन पर्याय असतील. पहिला एड्रेस अपडेट करण्यासाठी आणि दुसरा एड्रेस वॅलिडेशन लेटर साठी तुम्हाला पहिल्या पर्याय वर क्लिक करायची आहे आणि खाली सबमिट करायचे आहे.

7. असे करताच नवीन एड्रेस टाकण्याचा पर्याय तुमच्या समोर येईल. तुमची संपूर्ण माहिती सविस्तर भरा. नंतर पडताळणी करून सबमिट करा.

8. त्यानंतर तुम्हाला कोणता डाक्यूमेंट तुम्ही एड्रेस प्रूफ मध्ये देणार आहात ते निवडावे लागेल. जसे कि- पासपोर्ट, वोटर कार्ड आणि राशन कार्ड इत्यादी. निवड केल्यानंतर तुमचा डॉक्यूमेंट सबमिट करा.

9. सबमिट करताच तुमच्या समोर ऑप्शन येईल कि बीपीओ सर्विस प्रोवाइडर डाक्यूमेंटची तपासणी करेल आणि तिथे पण तुम्हाला सबमिट करायचे आहे. असे करताच प्रक्रिया पूर्ण होईल.

10. आता तुम्हाला एक यूआरएन नंबर दिला जाईल. हा यूआरएन नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ज्याने तुम्ही तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकाल आणि एड्रेस अपडेट बघू शकला.

प्रश्न 5. आधार कार्ड मध्ये काय करता येईल ऑनलाइन अपडेट?
आधार कार्ड मध्ये तुम्ही फक्त एड्रेस अपडेट करू शकता आणि एड्रेस वॅलिडेशन लेटर अपडेट करू शकता. याव्यतिरिक्त काही नाही.

प्रश्न 6. आधार कार्ड मध्ये ऑनलाइन काय नाही करता येत अपडेट?
आधार कार्ड मध्ये तुम्ही नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी सहित इतर गोष्टी स्वतःहून अपडेट करू शकत नाही.

The post कशाप्रकारे करावा आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट आणि जाणून घ्या शुल्क first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-update-mobile-number-in-aadhar-online/feed/ 0
आईबॉल ने लॉन्च केला अनोखा टॅबलेट, हातात घेताच सांगेल तुमच्या आधार कार्ड ची माहिती https://www.91mobiles.com/marathi/iball-slide-imprint-4g-tablet-aadhaar-authentication-fingerprint-sensor-india-price-specifications-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/iball-slide-imprint-4g-tablet-aadhaar-authentication-fingerprint-sensor-india-price-specifications-in-marathi/#respond Tue, 26 Jun 2018 08:08:44 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=1054 आईबॉल स्लाईड इम्प्रिंट 4जी टॅबलेट 22 भारतीय भाषा समजण्यास सक्षम आहे.

The post आईबॉल ने लॉन्च केला अनोखा टॅबलेट, हातात घेताच सांगेल तुमच्या आधार कार्ड ची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आईबॉल ने भारतीय बाजारात आपली टॅबलेट सीरीज पुढे नेत अजून एक नवीन डिवाईस लॉन्च केला आहे. कपंनी ने स्लाईड इम्प्रिंट 4जी टॅबलेट बाजार आणला आहे. या टॅबलेट ची अनोखी बाब म्हणजे यातील आधार सर्टि​फाइड फिंगरप्रिंट स्कॅनर. हा स्कॅनर कोणत्याही यूजर चे फिंगरप्रिंट स्कॅन करून त्याच्या आधार कार्ड शी संबंधी माहिती देण्याची क्षमता यात आहे.

आईबॉल स्लाईड इम्प्रिंट 4जी टॅबलेट एक स्टँर्डडाइजेशन टेस्टिंग अ‍ॅण्ड क्वॉलिटी सर्टिफिकेशन (STQC) सर्टि​फाइड डिवाईस आहे जो आधार डाटा रिड करण्यासह त्याचे वेरिफिकेशन पण करतो. या टॅबलेट चा वापर बँक, सरकारी ऑफिस, महाविद्यालय, सेल्स ऑटोमेशन सारख्या त्या जागी करता येईल, जिथे आधार ऑथेंटिकेशन ची गरज पडते.

टॅबलेट चे अन्य फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 1024 X 600 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 7-इंचाच्या मोठया डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. हा टॅबलेट एंडरॉयड 7.0 नुगट आधारित आहे तसेच 64बिट 1.3गीगाहर्ट्ज क्वॉड-कोर कोर्टेक्स ए53 चिपसेट प्रोसेसर वर चालतो. कंपनी ने या डिवाईस मध्ये 2जीबी रॅम मेमरी दिली आहे. हा टॅबलेट 8जीबी आणि 16जीबी इंटरनल स्टोरेज वाल्या दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे तसेच दोन्ही वेरिंएट ची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 32जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी साठी स्लाईड इम्प्रिंट 4जी टॅबलेट मध्ये बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर 5-मेगापिक्सल चे कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. चांगल्या फोटो साठी कंपनी ने दोन्ही पॅनल्स वर एलईडी फ्लॅश दिला आहे. आईबॉल ने आपला नवीन डिवाईस डुअल सिम तसेच 4जी एलटीई सपोर्ट सह लॉन्च केला आहे. तसेच ब्लूटू​थ, वाईफाई व ओटीजी सपोर्ट सह यात पावर बॅकअप साठी 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

आईबॉल स्लाईड इम्प्रिंट 4जी टॅबलेट 22 भारतीय भाषा समजण्यास सक्षम आहे. हा ​स्मार्ट डिवाईस ब्लॅक कलर मध्ये लॉन्च झाला आहे जो 18,999 रुपयांमध्ये आॅनलाईन प्लॅटफार्म सह आॅफलाईन बाजारातून विकत घेता येईल.

The post आईबॉल ने लॉन्च केला अनोखा टॅबलेट, हातात घेताच सांगेल तुमच्या आधार कार्ड ची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iball-slide-imprint-4g-tablet-aadhaar-authentication-fingerprint-sensor-india-price-specifications-in-marathi/feed/ 0