Aadhaar Card: सरकारनं जारी केला नवा नियम, लवकरच सर्वांना अपडेट करावं लागणार आधार कार्ड

भारतीयांसाठी Aadhaar Card एक मोठं आणि महत्वाचं ओळखपत्र आहे. याबाबत भारत सरकारनं एक नवा नियम लागू केला आहे. ज्यामुळे आधार कार्ड धारकांना आपली माहिती अपडेट करावी लागेल. या नव्या नियमानुसार दर 10 वर्षांनी युजर्सना आधारमधील आपली माहिती अपडेट करावी लागेल. Central Identities Data Repository (CIDR) कडे नेहमी युजर्सची ताजी माहिती असावी असा या नव्या नियमाचा हेतू आहे. पुढे आम्ही तुम्हाला या नियमाचे पालन कसे करायचे हे सांगणार आहोत तसेच हा नियम अनिवार्य आहे का हे देखील जाणून घेऊया.

New Aadhar Rules

मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी (Ministry of electronics and IT) नं जी नवीन नोटिफिकेशन जारी केली आहे त्यात सांगण्यात आलं आहे की आधार कार्ड धारकांना आपल्या एनरोलमेंटपासून 10 वर्षांच्या कालावधीनंतर माहिती अपडेट करावी लागेल, हे दर दहा वर्षांनी करावं लागेल. या माहितीमध्ये ओळखीचा पुरावा (Proof of Identity) (POI) किंवा प्रूफ ऑफ अ‍ॅड्रेस (Proof of Address) (POA) चा समावेश असेल. या प्रक्रियेच्या मदतीनं (CIDR) ला युजर्सची अप टू डेट माहिती मिळत राहील. हे देखील वाचा: Vivo च्या 5G स्मार्टफोनवर जबरदस्त सूट; स्वस्तात मिळवा 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा

हा नियम अनिवार्य आहे का?

सध्यातरी आधारचा हा नवा नियम सक्तीचा करण्यात आला नाही. परंतु सरकारनं सर्व आधार युजर्सना आपले डाक्यूमेंट्स अपडेट करण्याचा सल्ला दिला आहे. ही (Aadhaar Regulations) आधार इनरोलमेंट आणि अपडेट रेगुलेशन 10 वर्षात युजर्सच्या माहितीत झालेला बदल मिळवण्यासाठी केली जात आहे. कारण अनेकदा युजर्स काही बदल करतात, ज्याची माहिती आधारमध्ये अपडेट होत नाही.

आधारमधील माहिती अपडेट कशी करायची

तुम्हाला आधारवरील माहिती अपडेट करायची असेल तर (Uidai) युआयडीएआय तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी स्वीकारेल. ज्यात युजरचं नाव आणि फोटोची माहिती असेल. या आयडेंटिफिकेशन डॉक्यूमेंटमध्ये पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर आयडी सारख्या डॉक्यूमेंटचा समावेश असेल. डॉक्यूमेंट अपडेट करण्यासाठी माय आधार पोर्टल (myAadhaar portal) आणि माय आधार अ‍ॅप (myAadhaar app) चा वापर करता येईल. तसेच तुम्ही बदल करण्यासाठी किंवा अपडेट करण्यासाठी आधार एनरोलमेंट सेंटर (Aadhaar enrolment center) वर देखील जाऊ शकता. हे देखील वाचा: 15 हजारांच्या बजेटमध्ये 14GB रॅम असलेला 5G Phone; 50MP कॅमेऱ्यासह Realme 10 5G लाँच

तुमच्या आधार कार्डवर पत्ता ऑनलाइन बदलण्यासाठी सेल्फ सर्व्हिस अपडेट पोर्टल (Self Service Update Portal) (SSUP) ची मदत घेता येईल. जर तुम्हाला आधारवरील नाव, पत्ता, डेट ऑफ बर्थ, जेंडर किंवा मोबाइल नंबर बदलायचा असेल किंवा फिंगरप्रिंट बायोमेट्रिकमध्ये बदल करायचा असेल तर तुम्हाला यासाठी आधारच्या पर्मनंट एनरोलमेंट सेंटरवर जावं लागेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here