या 5 स्टेप्स मध्ये जाणून घ्या तुमचा Aadhaar card खरा आहे की खोटा

आधार कार्ड (Aadhaar card) सध्या देशातील प्रत्येक नागरिकांसाठी सर्वात महत्वाचा ओळखपत्र बनला आहे. जर तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर तुमची सर्व सरकारी व गैरसरकारी कामे सहज होतात. अश्या वेळी जर तुम्हाला समजले की तुमच्याकडे असलेला आधार कार्ड (UIDAI) नकली असेल तर अडचणी वाढतात. त्यामुळे तुमचा आधार नंबर खरा आहे का हे जाणून घेणे आवश्यक आहे. खर्या-खोट्या आधारची शहानिशा करणे खूप सोप्पे झाले आहे. काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही घर बसल्या हे चेक करु शकता.

असली-नकली आधारची ओळख करण्याची पद्धत सांगण्याआधी सांगू इच्छितो की आधारसंबंधित ऑनलाइन माहितीसाठी रजिस्टर मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे. जर असे तुम्ही अजून केले नसेल तर इथे क्लिक करून तुम्ही आधार कार्ड मध्ये नाव, एड्रेस सह इतर बदलांची माहिती घेऊ शकता.

अशाप्रकारे चेक करा आधार कार्ड असली आहे की नकली

-सर्वात आधी तुम्हाला अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in/aadhaarverification वर जावे लागेल.

-या वेबसाइट वर आधार वेरिफिकेशन पेज ओपन होईल, इथे तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स दिसेल तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करावा लागेल.

-तुमचा 12 डिजिट आधार नंबर एंटर केल्यानंतर डिस्प्ले मध्ये दिसत असलेला कॅप्‍चा एंटर करावा लागेल.

-त्यानंतर वेरिफाई बटन वर क्लिक करा. जर तुमचा आधार नंबर योग्य असेल तर एक नवीन पेज ओपन होईल ज्यात तुमचा आधार नंबर दिसेल.

-आधार नंबर व्यतिरिक्त खाली तुमची संपूर्ण माहिती दिली असेल. तसेच जर नबंर नकली असेल तर इनवॅलिड आधार नंबर असे लिहून येईल.

नोट: तुम्हाला आधार संबंधित एखादी तक्रार नोंदवायची असेल तर यासाठी टोल फ्री नंबर 1947 देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here