Huawei - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:28:11 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7,000mAh battery असलेला फोन! पाहा कोणती कंपनी घेऊन आली आहे हा पावरहाउस https://www.91mobiles.com/marathi/7000-mah-battery-phone-huawei-nova-y91-features-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/7000-mah-battery-phone-huawei-nova-y91-features-and-specifications/#respond Mon, 22 May 2023 09:33:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21070 Huawei ब्रँड आता भारतीय मोबाइल बाजारात सक्रिय नाही परंतु ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीचे प्रीमियम फोन लोकप्रिय आहेत. ह्या कंपनीनं एक नवीन स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये लाँच केला आहे जो 7,000mAh battery सह आला आहे. ज्याचे नाव Huawei Nova Y91 आहे आणि मोठ्या बॅटरीमुळे टेक विश्वात हा चर्चेचा विषय ठरला आहे. पुढे तुम्ही हुवावे नोवा वाय91 ची माहिती […]

The post 7,000mAh battery असलेला फोन! पाहा कोणती कंपनी घेऊन आली आहे हा पावरहाउस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फुल चार्जवर 29 तास व्हिडीओ बघता येतील.
  • फोनचं नाव Huawei Nova Y91 आहे.
  • हा इंटरनॅशनल मार्केटमध्ये विकला जाईल.

Huawei ब्रँड आता भारतीय मोबाइल बाजारात सक्रिय नाही परंतु ग्लोबल मार्केटमध्ये कंपनीचे प्रीमियम फोन लोकप्रिय आहेत. ह्या कंपनीनं एक नवीन स्मार्टफोन इंटरनॅशनल मार्केटमध्ये लाँच केला आहे जो 7,000mAh battery सह आला आहे. ज्याचे नाव Huawei Nova Y91 आहे आणि मोठ्या बॅटरीमुळे टेक विश्वात हा चर्चेचा विषय ठरला आहे. पुढे तुम्ही हुवावे नोवा वाय91 ची माहिती वाचू शकता.

7,000एमएएच बॅटरी

Huawei Nova Y91 स्मार्टफोनची मुख्य खासियत यातील पावरफुल बॅटरी आहे. कंपनीचा दावा आहे की एकदा फुल चार्ज केल्यावर फोनवर सतत 29 तास व्हिडीओ बघता येतील, म्हणजे एका दिवसापेक्षा जास्त. कंपनीनं हा सेफ आणि सिक्योर असल्याचं म्हटलं आहे. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा फोन 22.5W HUAWEI SuperCharge टेक्नॉलॉजीसह आला आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले – Huawei Nova Y91 मध्ये 2376 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.95 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेट तर 270हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालते.

प्रोसेसर – हुवावे नोवा वाय91 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. ह्या फोनमध्ये 8जीबी रॅम देण्यात आला आहे जोडीला 128जीबी स्टोरेज व 256जीबी स्टोरेज मिळते.

कॅमेरा – फोनच्या बॅक पॅनलवर दोन कॅमेरा सेन्सर आहेत ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी लेन्स तर 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. हुवावे फोनच्या फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.

कनेक्टिव्हिटी – हा एक 4जी फोन आहे ज्यात ड्युअल सिम, वायफाय, ब्लूटूथ 5.0 आणि जीपीएससह यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

सिक्योरिटी – Huawei Nova Y91 च्या साइड पॅनलवरील पावर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे. तसेच हा मोबाइल फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो.

फोन प्राइस

Huawei Nova Y91 कंपनीनं ऑफिशियल केलं आहे परंतु सध्या ह्याची किंमत समोर आली नाही. किंमत वगळता इतर सर्व माहिती ब्रँड वेबसाइटवर सार्वजनिक करण्यात आली आहे. हा मोबाइल वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या किंमतीती उपलब्ध होईल. आम्ही सांगितल्याप्रमाणे हुवावे फोन भारतात विकले जाणार नाहीत.

The post 7,000mAh battery असलेला फोन! पाहा कोणती कंपनी घेऊन आली आहे हा पावरहाउस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/7000-mah-battery-phone-huawei-nova-y91-features-and-specifications/feed/ 0
Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-huawei-pocket-s-launched-price-features-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-huawei-pocket-s-launched-price-features-specifications/#respond Fri, 04 Nov 2022 09:47:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14611 Foldable Smartphone चा जेव्हा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम Samsung चं समोर येतं. सॅमसंग कंपनीनं फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये आपल्या Galaxy Fold आणि Galaxy Z Flip स्मार्टफोन्सच्या माध्यमातून धुमाकूळ घालत आहे. हे फोन चांगले वाटत परंतु जेव्हा विकत घेण्याची वेळ येते तेव्हा महागडी किंमत पाहून काढता पाय घ्यावा लागतो. परंतु आज घडी होणारा मोबाइल फोन म्हणजे फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या […]

The post Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Foldable Smartphone चा जेव्हा विषय निघतो तेव्हा सर्वप्रथम Samsung चं समोर येतं. सॅमसंग कंपनीनं फ्लॅगशिप सेग्मेंटमध्ये आपल्या Galaxy Fold आणि Galaxy Z Flip स्मार्टफोन्सच्या माध्यमातून धुमाकूळ घालत आहे. हे फोन चांगले वाटत परंतु जेव्हा विकत घेण्याची वेळ येते तेव्हा महागडी किंमत पाहून काढता पाय घ्यावा लागतो. परंतु आज घडी होणारा मोबाइल फोन म्हणजे फोल्डेबल स्मार्टफोन्सच्या बाजारात सॅमसंगला आव्हान देत हुवावेना आपला नवीन मोबाइल फोन Huawei Pocket S लाँच केला आहे. याला cheapest foldable Smartphone असं म्हटलं जातंय ज्याची किंमत जवळपास 60,000 रुपयांच्या बजेटमध्ये आहे.

Huawei Pocket S Display

हुवावे पॉकेट एस मध्ये 2790 x 1188 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.9 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर 1.04 इंचाचा सेकंडरी डिस्प्ले आहे. हे देखील वाचा: स्मार्टफोन्सचा स्टॉक संपवण्यासाठी Redmi चा क्लीयरेंस सेल, फक्त 3,999 रुपयांमध्ये मिळवा रेडमी फोन

foldable smartphone huawei pocket s launched price features specifications

Huawei Pocket S Design

हुवावेनं लुक आणि डिजाईनच्या बाबतीत सॅमसंगला चांगलीच टक्कर दिली आहे. Huawei Pocket S Foldable Smartphone पाच रंगात लाँच करण्यात आला आहे ज्यात Mint Green, Gold Yellow, Rose Pink, Ice Crystal Blue आणि Black कलरचा समावेश आहे.

Huawei Pocket S Processor

हुवावे पॉकेट एसमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेट देण्यात आला आहे जो हॉरमनी ओएस 3 वर चालतो. हा स्मार्टफोन 8 जीबी रॅमवर लाँच झाला आहे जो 512 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

Huawei Pocket S Camera

फोटोग्राफीसाठी हा फोल्डेबल स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बॅक पॅनलवर 40 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 13 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह येतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Huawei Pocket S 10.7 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Huawei Pocket S Battery

पावर बॅकअपसाठी या छोट्याश्या स्मार्टफोनमध्ये 4,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 40वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह काम करते जी कमी वेळात फुल चार्ज होते. हे देखील वाचा: देशातील सर्वात स्वस्त 5G फोन 7 नोव्हेंबरला होईल लाँच; 50MP कॅमेऱ्यासह मिळणार 7GB रॅम, जाणून घ्या किंमत

Huawei Pocket S Price

हुवावे पॉकेट एस 8 जीबी रॅमसह तीन स्टोरेज व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत RMB 5,988 (जवळपास 68,000 रुपये) आहे. तर फोनचा 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंट RMB 6,488 (जवळपास 73,700 रुपये) तर सर्वात मोठा 512 जीबी स्टोरेज व्हेरिएंट RMB 7,488 म्हणजे जवळपास 85,000 रुपयांमध्ये लाँच झाला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/foldable-smartphone-huawei-pocket-s-launched-price-features-specifications/feed/ 0
4 कॅमेऱ्यांसह आला भन्नाट स्मार्टफोन; 6GB रॅमसह 5000mAh ची दमदार बॅटरी https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-huawei-nova-y61-launched-check-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-huawei-nova-y61-launched-check-price-specifications-details/#respond Tue, 01 Nov 2022 04:15:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14487 Huawei कंपनीनं ग्लोबल मार्केटमध्ये एक नवीन मोबाइल फोन Huawei Nova Y61 लाँच केला आहे. नोवा वाय61 कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आला आहे जिथे फोनचे फोटोज, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती शेयर करण्यात आली आहे. हुवावे नोवा वाय61 स्मार्टफोन 50MP Camera, 6GB RAM, 22.5W fast charging आणि 5,000mAh battery ला सपोर्ट करतो. Huawei Nova Y61 […]

The post 4 कॅमेऱ्यांसह आला भन्नाट स्मार्टफोन; 6GB रॅमसह 5000mAh ची दमदार बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei कंपनीनं ग्लोबल मार्केटमध्ये एक नवीन मोबाइल फोन Huawei Nova Y61 लाँच केला आहे. नोवा वाय61 कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लाइव्ह करण्यात आला आहे जिथे फोनचे फोटोज, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची संपूर्ण माहिती शेयर करण्यात आली आहे. हुवावे नोवा वाय61 स्मार्टफोन 50MP Camera, 6GB RAM, 22.5W fast charging आणि 5,000mAh battery ला सपोर्ट करतो. Huawei Nova Y61 ची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Huawei Nova Y61 Specifications

हुवावे नोवा वाय61 चे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 60हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. या स्मार्टफोनचे डायमेंशन 164.28×75.8×8.94एमएम तसेच वजन 188ग्राम आहे. हे देखील वाचा: 5G च्या गर्दीत 4G स्मार्टफोन! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Realme 10 4G ‘या’ दिवशी होणार लाँच

50 mp camera phone huawei nova y61 launched check price specifications details

Huawei Nova Y61 स्मार्टफोन Huawei Mobile Services (HMS) वर लाँच झाला आहे जी ईएमयुआय 12 सह चालते. या स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे परंतु चिपसेटचा खुलासा मात्र अजून झाला नाही. फक्त हुवावे नोवा वाय61 एक 4जी स्मार्टफोन असेल त्यामुळे यात 5जी कनेक्टिव्हिटी सपोर्ट मिळणार नाही हे निश्चित आहे.

फोटोग्राफीसाठी Huawei Nova Y61 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.4 अपर्चर असलेली मॅक्रो लेन्स तसेच तेवढ्याच अपर्चरचा असलेला डेप्थ सेन्सर मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या हुवावे स्मार्टफोनमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 5 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Huawei Nova Y61 ड्युअल सिमला सपोर्ट करतो ज्यात 3.5एमएम जॅक सोबतच अन्य बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देखील देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी स्मार्टफोनच्या साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन मिळतो. पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 22.5वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: 5G Supported Smartphones: या स्मार्टफोन्सवर वापरता येईल Airtel आणि Jio चं 5G; नवी यादी आली समोर

Huawei Nova Y61 Price

हुवावेनं सध्या Huawei Nova Y61 च्या किंमतीचा खुलासा केला नाही परंतु वेबसाइट लिस्टिंगनुसार हा फोन युरोपियन बाजारात 4 जीबी रॅमसह लाँच होईल. तर आशिया पॅसिफिकमध्ये 6 जीबी रॅमसह उपलब्ध होईल. फोनचे सर्व मॉडेल 64 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतील. Huawei Nova Y61 स्मार्टफोन Sapphire Blue, Mint Green आणि Midnight Black कलरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post 4 कॅमेऱ्यांसह आला भन्नाट स्मार्टफोन; 6GB रॅमसह 5000mAh ची दमदार बॅटरी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/50-mp-camera-phone-huawei-nova-y61-launched-check-price-specifications-details/feed/ 0
50MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला पुस्तकाप्रमाणे घडी होणारा Huawei Mate X2 फोन, बदलेल का फोल्डेबल फोन्सची दुनिया https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-x2-launch-price-sale-specification/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-x2-launch-price-sale-specification/#respond Wed, 24 Feb 2021 14:33:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10153 Huawei Mate X2 मध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एनएफसी आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे.

The post 50MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला पुस्तकाप्रमाणे घडी होणारा Huawei Mate X2 फोन, बदलेल का फोल्डेबल फोन्सची दुनिया first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने साल 2019 मध्ये लॉन्च केलेल्या फोल्डेबल फोन Mate X चा अपग्रेडेड वर्जन Mate X2 लॉन्च केला आहे. मेट एक्स2 जुन्या वर्जनपेक्षा वेगळ्या फोल्डिंग मॅकॅनिज्मसह आला आहे. हा फोन कंपनीने आपल्या गृह मार्केट चीनमध्ये सादर केला आहे जो डिजाइनच्या बाबतीत Galaxy Fold सारखा आहे. Huawei ने मेट एक्स2 च्या अंतरराष्ट्रीय उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती दिली नाही. (Huawei Mate X2 launch price sale specification)

डिजाइन

डिजाइन पाहता फोन एका नवीन फोल्डिंग मॅकॅनिज्मसह आला आहे, त्यामुळे फोन पुस्तकाप्रमाणे उघडतो आणि बंद होतो. या फोनमध्ये मेन स्क्रीन बाहेरच्या ऐवजी Samsung Galaxy Fold मॉडेल प्रमाणे आतल्या बाजूस घडी होतो. तसेच फोनमध्ये दोन स्क्रीन देण्यात आल्या आहेत. फोनची सर्वात वरच्या स्क्रीनवर पिल-शेप पंच होल डिजाइन सिंगल सेल्फी कॅमेरा आहे. डिवाइसच्या मागे रेकटेंगुलर कॅमेरा मॉड्यूल आहे जो कि क्वाड लेंससह आला आहे.

शानदार स्क्रीन

या फोनमध्ये 6.5 इंच ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1,160×2,700 पिक्सल सह 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 456पीपीआई पिक्सल डेंसिटी आहे. अनफोल्ड केल्यावर यात तुम्हाला 8 इंच ओलेड डिस्प्ले मिळतो, ज्याचा रिजोल्यूशन 2,200×2,480 पिक्सल आहे. सोबत 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट, 180 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट मिळतो.

हा फोन ऑक्टा-कोर किरिन 9000 प्रोसेसर सह येतो, त्यासोबत Mali-G78 जीपीयू मिळतो. हुवावे मेट एक्स2 स्मार्टफोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 512 जीबी स्टोरेज आहे, जी मेमरी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी अधिक वाढवता येते.

दमदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये मागे f/1.9 लेंस आणि ऑप्टिकल इमेज स्टेब्लाइजेशन (OIS) सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा आहे, त्याचबरोबर अल्ट्रा-वाइड-अँगल f/2.2 लेंससह 16 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा, f/2.4 अपर्चरसह 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो कॅमेरा आणि OIS सपोर्ट आणि f/4.4 अपर्चरसह 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी यात फ्रंटला f/2.2 लेंससह 16 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

Huawei Mate X2 मध्ये कनेक्टिविटी ऑप्शनसाठी 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, जीपीएस, एनएफसी आणि चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट देण्यात आला आहे. डुअल-सिम (नॅनो) हुवावे मेट एक्स2 स्मार्टफोन अँड्रॉइड 10 आधारित EMUI 11.0 वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, सोबत 55 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.

किंमत

Huawei Mate X2 च्या 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 17,999 (जवळपास 201,600 रुपये) आणि 8 जीबी रॅम + 512 स्टोरेज वेरिएंटची किंमत RMB 18,999 (जवळपास 213,000 रुपये) आहे. फोन Black, White, Crystal Blue आणि Crystal Pink कलर मध्ये 25 फेब्रुवारीपासून विकला जाईल.

The post 50MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला पुस्तकाप्रमाणे घडी होणारा Huawei Mate X2 फोन, बदलेल का फोल्डेबल फोन्सची दुनिया first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-x2-launch-price-sale-specification/feed/ 0
Huawei ने लॉन्च केले दोन दमदार 5G स्मार्टफोन्स Nova 8 आणि Nova 8 Pro, येत आहेत जबरदस्त फीचर्ससह https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-8-pro-launched-with-kirin-985-soc-8gb-ram-price/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-8-pro-launched-with-kirin-985-soc-8gb-ram-price/#respond Thu, 24 Dec 2020 12:47:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9437 Huawei ने 5जी सेगमेंट मध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स Huawei Nova 8 आणि Huawei Nova 8 Pro लॉन्च केले आहेत. Huawei Nova 8 आणि Nova 8 Pro मध्ये कंपनीचा 2.58GHz Kirin 985 प्रोसेसर आहे. दोन्ही फोन अँड्रॉइड 10 वर चालतात.

The post Huawei ने लॉन्च केले दोन दमदार 5G स्मार्टफोन्स Nova 8 आणि Nova 8 Pro, येत आहेत जबरदस्त फीचर्ससह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन कंपनी Huawei ने बुधवारी 5जी सेगमेंट मध्ये दोन नवीन स्मार्टफोन्स Huawei Nova 8 आणि Huawei Nova 8 Pro लॉन्च केले आहेत. हे दोन्ही मोबाईल अनेक दमदार फीचर्स सह आले आहेत. तसेच, दुसरीकडे कंपनीने Huawei Enjoy 20 SE पण सादर केला आहे. हुआवईने हे दोन्ही स्मार्टफोन सध्या चीन मध्ये लॉन्च केले आहेत आणि पुढल्या वर्षीच्या सुरवातीला हे भारतासह इतर देशांमध्ये पण लॉन्च केले जातील. स्मार्टफोन्स Black, Green, Purple आणि Gradient White कलर ऑप्शन मध्ये आले आहेत.

डिस्प्ले आणि डिजाइन

हुआवईच्या या दोन्ही फोन्सचा डिस्प्ले पाहता नोवा 8 मध्ये 6.57 इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1080×2340 पिक्सल आहे. या फोनचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आहे. तसेच, नोवा 8 प्रो मध्ये 6.72 इंचाचा OLED डिस्प्ले आहे, ज्याचे स्क्रीन रिजोल्यूशन 1236×2676 पिक्सल आहे. 8 प्रो चा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज आहे. दोन्ही फोनचा डिस्प्ले कर्व एज सह येतो.

हे देखील वाचा : 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये

हार्डवेयर

Huawei Nova 8 आणि Nova 8 Pro मध्ये कंपनीचा 2.58GHz Kirin 985 प्रोसेसर आहे, जो चांगला स्पीड आणि परफॉर्मन्स देतो. तसेच फोन मध्ये ग्राफिक्ससाठी Mali-G77 GPU देण्यात आला आहे. सोबतच फोन मध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे.

दमदार कॅमेरा

या दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी सेंसर असलेला क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात सेकेंडरी कॅमेरा 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आहे. तसेच 2-2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि डेप्थ सेंसर पण आहेत. सेल्फी कॅमेरा पाहता Nova 8 मध्ये 32 मेगापिक्सलचा सिंगल सेल्फी सेन्सर आहे, तसेच Nova 8 Pro मध्ये डुअल सेल्फी कॅमेरा आहे, ज्यात प्राइमरी सेंसर 32 मेगापिक्सलचा आणि सेकेंडरी सेंसर 16 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेंस आहे.

बॅटरी

Nova 8 मध्ये 3,800mAh आणि Nova 8 Pro मध्ये 4,000mAh ची बॅटरी आहे आणि दोन्ही 66 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतात. दोन्ही स्मार्टफोन्स Black, Green, Purple आणि Gradient White कलर ऑप्शन मध्ये येतात.

हे देखील वाचा : 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा बजेट फोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती

ओएस आणि कनेक्टिविटी फीचर्स

दोन्ही फोन अँड्रॉइड 10 वर चालतात. तसेच कनेक्टिविटी फीचर्स म्हणून फोन मध्ये 5G, 4G LTE, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, GPS आणि USB टाइप- C पोर्ट चा समवेश आहे. दोन्ही फोन मध्ये सुरक्षेसाठी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

किंमत पाहता हुआवई नोवा 8 चा 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरियंट 3,299 युआन (जवळपास 37,200 रुपये), 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत 3,699 युआन (जवळपास 41,700 रुपये) आहे. तसेच, Huawei Nova 8 Pro च्या 8GB RAM + 128GB स्टोरेज वेरियंटची किंमत 3,999 युआन (जवळपास 45,100 रुपये), 8GB RAM + 256GB स्टोरेज वेरियंटची किंमत 4,399 युआन (जवळपास 49,600 रुपये) आहे.

The post Huawei ने लॉन्च केले दोन दमदार 5G स्मार्टफोन्स Nova 8 आणि Nova 8 Pro, येत आहेत जबरदस्त फीचर्ससह first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-8-pro-launched-with-kirin-985-soc-8gb-ram-price/feed/ 0
8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा बजेट फोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-20-launch-with-8gb-ram-5000mah-battery-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-20-launch-with-8gb-ram-5000mah-battery-know-price/#respond Thu, 24 Dec 2020 12:30:03 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9434 Huawei ने बुधवारी आपला नवीन दमदार फोन Huawei Enjoy 20 SE बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च केला आहे. फोन मध्ये कंपनीने आपला octa-core Kirin 710A प्रोसेसर दिला आहे.

The post 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा बजेट फोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने बुधवारी आपला नवीन दमदार फोन Huawei Enjoy 20 SE बजेट सेगमेंट मध्ये लॉन्च केला आहे. हुआवईने हा फोन Magic Night Black, Qijing Forest आणि Dawn Gold सारख्या कलर ऑप्शन मध्ये लॉन्च केला आहे. हुवावेने बजेट स्मार्टफोन सेगमेंटच्या हुवावे एन्जॉय 20 एसई सोबतच 5जी सेगमेंट मध्ये Huawei Nova 8 आणि Huawei Nova 8 Pro सारखे स्मार्टफोन पण लॉन्च केले आहेत. चला जाणून घेऊया Huawei Enjoy 20 SE बाबत सर्वकाही.

दमदार आहे कॅमेरा

Huawei Enjoy 20 SE चा कॅमेरा पाहता यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यात f/1.8 अपर्चर सह प्राइमरी सेंसर 13 मेगापिक्सलचा आहे. त्यांनतर f/2.4 अपर्चर सह 8 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. रियर कॅमेरा फीचर्स पाहता हा 6X झूम आणि ऑटोफोकस फीचर सह येतो. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी एन्जॉय 20 एसई मध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Huawei Enjoy 20 SE

Huawei Enjoy 20 SE चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.67 इंचाचा FHD+ LCD होल पंच डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रिजॉल्यूशन 1080×2400 पिक्सल आहे. सोबतच या फोन मध्ये कंपनीने आपला octa-core Kirin 710A प्रोसेसर दिला आहे. तसेच, हँडसेट मध्ये 4GB रॅम आणि 8GB रॅम सह 128GB स्टोरेज आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने वाढवता येते.

Huawei च्या या फोनची एक सर्वात मोठी खासियत यात देण्यात आलेली 5,000mAh ची बॅटरी आहे जी 22.5W फास्ट चार्जिंगला सपोर्ट सह येते. कनेक्टिविटीसाठी वाय-फाय 802.11 b / g / n, ब्लूटूथ v5.1, USB टाइप- C पोर्ट आणि 3.5 मिमी ऑडियो जॅक आणि GPS चा समावेश करण्यात आला आहे. एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आहे आणि इतर सेंसर्स मध्ये एक्सीलेरोमीटर, एंबियंट लाइट सेंसर, डिजिटल कंपास, ग्रेविटी सेंसर आणि प्रॉक्सिमिटी सेंसर पण फोन मध्ये देण्यात आले आहेत.

हे देखील वाचा : 50एमपी रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह Huawei चा 5G फोन Mate 40 झाला लॉन्च

Huawei Enjoy 20

हुआवई एन्जॉय 20 पाहता हा फोन 6.6 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च झाला होता. हा फोन वॉटरड्रॉप नॉच सह बाजारात आला होता. एन्जॉय 20 स्मार्टफोन पण प्रोसेसिंगसाठी आक्टाकोर प्रोसेसर सह 5जी कनेक्टिविटी असलेल्या मीडियाटेकच्या डायमनसिटी 720 चिपसेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी Huawei Enjoy 20 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे.

यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिकसलचा प्राइमरी सेंसरला आहे. तसेच फोन मध्ये 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर पण आहे. हुआवईचा हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

The post 8GB रॅम आणि 5000mAh बॅटरी सह लॉन्च झाला हा बजेट फोन, जाणून घ्या संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-enjoy-20-launch-with-8gb-ram-5000mah-battery-know-price/feed/ 0
8GB रॅम आणि शानदार प्रोसेसर सह लिस्ट झाला हा फोन, लवकरच करेल मार्केट मध्ये एंट्री https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-8-se-spotted-dimensity-720-and-8gb-ram-on-geekbench/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-8-se-spotted-dimensity-720-and-8gb-ram-on-geekbench/#respond Thu, 29 Oct 2020 13:42:36 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8721 टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशनने दावा केला आहे कि JSC-AN00 मॉडेल नंबर Huawei Nova 8 संबंधित आहे. विशेष म्हणजे JSC-AN00 मॉडेल नंबर असलेला हुवावे फोन सप्टेंबर मध्ये TENAA वर पण दिसला होता.

The post 8GB रॅम आणि शानदार प्रोसेसर सह लिस्ट झाला हा फोन, लवकरच करेल मार्केट मध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei Nova 8 सीरीज कंपनी पुढल्या महिन्यात आपल्या घरच्या मार्केट मध्ये सादर करू शकते. या सीरीज मध्ये कथितरित्या Nova 8 SE, Nova 8 आणि Nova 8 Pro असे तीन फोन्स सादर केले जाण्याची शक्यता आहे. तसेच अलीकडेच Huawei चा JSC-AN00 मॉडेल नंबर असलेला फोन टेना, 3C सर्टिफिकेशन आणि MIIT सर्टिफिकेशन वेबसाइट वर स्पॉट केला गेला होता. हा विशेष मॉडेल तीन कथित हॅंडसेट्स पैकी एक असू शकतो. तसेच आता JSC-AN00 मॉडेल नंबर गीकबेंच वर दिसला आहे, ज्या बाबत बोलले जात आहे कि हा Huawei Nova 8E असेल. कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

टेक वेबसाइट NashvilleChatterClass वर JSC-AN00’s ची गीकबेंच लिस्टिंग स्पॉट केली गेली आहे. लिस्टिंग मध्ये या मॉडेल नंबरच्या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. लिस्टिंग नुसार फोन मध्ये MediaTek MT6853V (Dimensity 720) चिपसेट असेल, ज्याची बेस फ्रिक्यूएंसी 2GHz असेल. यात 8जीबी रॅम आणि अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम आहे. हँडसेट बेंचमार्किंग साइट वर सिंगल-कोर 2837 आणि मल्टी-कोर टेस्ट मध्ये 7093 नंबर्स मिळाले आहेत.

3C लिस्टिंगनुसार, JSC-AN00 मॉडेल नंबर सह हुवावे नोवा 8 सीरीजच्या एका स्मार्टफोनला चीन मध्ये सर्टिफिकेशन मिळाले आहे. 3सी सर्टिफिकेशन वरून समजले आहे कि या हँडसेट सह येणाऱ्या चार्जरचा मॉडेल नंबर “HW-110600C00” असेल.

टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशनने दावा केला आहे कि JSC-AN00 मॉडेल नंबर Huawei Nova 8 संबंधित आहे. विशेष म्हणजे JSC-AN00 मॉडेल नंबर असलेला हुवावे फोन सप्टेंबर मध्ये TENAA वर पण दिसला होता.

हे देखील वाचा : 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये

तसेच टिप्स्टरनुसार Huawei Nova 8 सीरीज प्रमाणेच Honor V40 स्मार्टफोन पण 66W फास्ट चार्जर सह येतील. दुसरीकडे हॉनर वी40 सीरीजचे स्मार्टफोन मॉडेल नंबर YOR-AN00 / TN00, YOR-AN10 / TN10, YOR-AN00S आणि YOR-N49 सह येतील.

The post 8GB रॅम आणि शानदार प्रोसेसर सह लिस्ट झाला हा फोन, लवकरच करेल मार्केट मध्ये एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-nova-8-se-spotted-dimensity-720-and-8gb-ram-on-geekbench/feed/ 0
32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-30e-pro-5g-kirin-990e-soc-leica-quad-rear-cameras-launched-know-price/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-30e-pro-5g-kirin-990e-soc-leica-quad-rear-cameras-launched-know-price/#respond Fri, 23 Oct 2020 13:19:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8648 Huawei Mate 30E Pro ची रियर डिजाइन Mate 30 Pro प्रमाणे ग्लास आणि मेटलची बनली आहे.

The post 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei गुरुवारी एका इवेंटचे आयोजन करून Mate 40 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीज मध्ये कंपनी Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ सादर केले आहेत. दुसरीकडे कंपनीने चुपचाप Huawei Mate 30E Pro 5G स्मार्टफोन Mate 30 Pro चा अपग्रेड वर्जन म्हणून लॉन्च केला आहे. हुआवे मेट 30ई प्रो 5जी च्या ग्लोबल लॉन्च बद्दल सध्या कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

डिजाइन

तुम्ही फोटोज मध्ये बघू शकता कि Huawei Mate 30E Pro ची रियर डिजाइन Mate 30 Pro प्रमाणे ग्लास आणि मेटलची बनली आहे. तसेच फोन मध्ये सर्कुलर क्वाड-कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. एलईडी फ्लॅश यूनिट कॅमेरा मॉड्यूलच्या बाहेर देण्यात आला आहे. तसेच फोन दोन्ही बाजूंनी कर्व डिजाइन वर सादर केला जाईल. एकंदरीत फोनची डिजाइन अगदी Mate 30 Pro प्रमाणेच आहे.

हे देखील वाचा : 50एमपी रियर कॅमेरा आणि 8 जीबी रॅम सह Huawei चा 5G फोन Mate 40 झाला लॉन्च

दमदार कॅमेरा

फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्याचा प्राइमरी कॅमेरा f/1.8 अपर्चर सह 40 मेगापिक्सलचा आहे. तसेच f/1.6 अपर्चर सह वाइड-अँगल लेंस 40 मेगापिक्सलची आहे. यात f/2.4 अपर्चर आणि ओआईएस सपोर्ट सह 8 मेगापिक्सलचा तीसरा कॅमेरा आहे. डेप्थ सेंसिंगसाठी यात टाइम-ऑफ-फाइट (ToF) सेंसर पण देण्यात आला आहे. सेल्फी व व्हिडीओ कॉलिंगसाठी हुआवे मेट 30ई प्रो फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी कॅमेऱ्यासह f/2.0 लेंस आणि 3D डेप्थ सेंसर आहे.

स्पेसिफिकेशन्स

हुआवे मेट 30ई प्रो मध्ये 6.53 इंचाचा फुल-एचडी+ (1,176×2,400 पिक्सल) ओलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, तसेच आस्पेक्ट रेशियो 20:9 आहे. फोन HiSilicon Kirin 990E प्रोसेसर सह येतो, 14 कोर माली-जी76 जीपीयू आहे. फोन मध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी आणि 256 जीबी स्टोरेज आहे.

कनेक्टिविटीसाठी या फोन मध्ये 5जी, 4जी एलटीई, Wi-Fi 802.11ac, जीपीएस/ए-जीपीएस, इन्फ्रारेड (IR), एनएफसी, आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोन अँड्रॉइड 10 आधारित EMUI 11 वर चालतो. फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,500 एमएएच ची बॅटरी आहे, सोबत 40 वॉट सुपरचार्ज फास्ट चार्जिंग आई 27वॉट फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.

हे देखील वाचा : लॉन्च झाला जगातील सर्वात फास्ट आणि पावरफुल अँड्रॉइड स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघा आणि जाणून घ्या याची खासियत

किंमत

हुआवे मेट 30ई प्रो फोन ची प्री-बुकिंग चीन मध्ये सुरु करण्यात आली आहे. याची किंमत मात्र अजून समजली नाही. कंपनीने Huawei Mate 30E Pro स्मार्टफोन चार कलर ऑप्शन- Space Silver, Emerald Green, Cosmic Purple आणि Black मध्ये सादर केला गेला आहे. फोन लेदर फिनिश सह तसेच दोन अन्य शेड्स पण आहेता, ज्यांची नावे आहे वेगन लेदर फॉरेस्ट ग्रीन आणि वेगन लेदर ऑरेज.

The post 32MP सेल्फी कॅमेरा आणि 4500mAh बॅटरी सह आला Huawei Mate 30E Pro 5G, जाणून घ्या वैशिष्ट्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-30e-pro-5g-kirin-990e-soc-leica-quad-rear-cameras-launched-know-price/feed/ 0
लॉन्च झाला जगातील सर्वात फास्ट आणि पावरफुल अँड्रॉइड स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघा आणि जाणून घ्या याची खासियत https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-plus-launched-with-5nm-kirin-9000-chip-specs/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-plus-launched-with-5nm-kirin-9000-chip-specs/#respond Fri, 23 Oct 2020 12:40:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8641 कंपनीने एक साथ तीन नवीन फोन सादर केले आहेत जे Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ नावाने मार्केट मध्ये आले आहेत. हुआवईचे हे तिन्ही स्मार्टफोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये सादर केले गेले आहेत जे हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात.

The post लॉन्च झाला जगातील सर्वात फास्ट आणि पावरफुल अँड्रॉइड स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघा आणि जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
HUAWEI ने काल रात्री टेक मंचावर टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत ‘मेट 40 सीरीज’ सादर केली आहे. कंपनीने एक साथ तीन नवीन फोन सादर केले आहेत जे Huawei Mate 40, Huawei Mate 40 Pro आणि Huawei Mate 40 Pro+ नावाने मार्केट मध्ये आले आहेत. हुआवईचे हे तिन्ही स्मार्टफोन फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये सादर केले गेले आहेत जे हाईएंड स्पेसिफिकेशन्स सह येतात. पुढे आम्ही हुआवई मेट 40 प्रो आणि मेट 40 प्रो प्लस च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे.

डिस्प्ले

Huawei Mate 40 Pro आणि Mate 40 Pro+ दोन्ही स्मार्टफोन डुअल पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केले गेले आहेत. हे दोन्ही फोन 2376 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.76 इंचाच्या फुलएचडी+ फ्लॅक्स ओएलईडी डिस्प्लेला सपोर्ट करतात. हि स्क्रीन कर्व्ड एजेज सह येतात जो 88 डिग्री अँगल पर्यंत साईड पॅनलच्या दिशेने वळला आहे. फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेट वर काम करतो आहे तसेच लेटेस्ट DCI-P3 HDR टेक्नोलॉजी सह येतो.

प्रोसेसिंग

हुआवई मेट 40 प्रो आणि मेट 40 प्रो प्लस अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो ईएमयूआई 11 सह चालतो. प्रोेसेसिंगसाठी फोन मध्ये 5नॅनोमीटर फेब्रिकेशन वर अबनलेला हुआवई चा सर्वात पावरफुल चिपसेट किरीन 9000 देण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा चिपसेट अँड्रॉइड फोन्ससाठी बनलेला जगातील पहिला 5एनएम चिपसेट आहे जो डुअल मोड 5G (SA/NSA) ला सपोर्ट करतो. प्रोसेसिंग मध्ये या सीपीयू ची परफॉर्मन्स 25 टक्के पर्यंत तसेच एनपीयू ची परफॉर्मन्स 150 टक्क्यांपर्यंत फास्ट करतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एआरएम माली जी78 जीपीयू देण्यात आला आहे.

हे देखील वाचा :वनप्लस करत आहे मोठी तयारी, OnePlus 9 पुढल्या वर्षी मार्च मध्ये होईल लॉन्च!

फोटोग्राफी

Huawei Mate 40 Pro+ पेंटा कॅमेऱ्यासह लॉन्च केला गेला आहे. या सेटअप मध्ये एफ/1.9 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा Sony IMX700 प्राइमरी सेंसर, एफ/1.8 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलचा टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेंसर तसेच एक 3डी डेफ्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी या फोन मध्ये एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह एक टीओएफ लेंस देण्यात आली आहे.

Huawei Mate 40 Pro पाहता हा क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.9 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या Sony IMX700 प्राइमरी सेंसर सह एफ/1.8 अपर्चर असलेली 20 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस, 12 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस आणि 8 मेगापिक्सलचा पेरिस्कोप सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फीसाठी हा फोन पण एफ/2.4 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर आणि एक टीओएफ लेंसला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : या देशात आहे सर्वात फास्ट 5G स्पीड, क्षणात होईल संपूर्ण मूवी डाउनलोड

बॅटरी

Huawei Mate 40 Pro आणि Mate 40 Pro+ बाजारात 4,400एमएएच च्या बॅटरी वर लॉन्च केले गेले आहेत ज्या 66वॉट सुपरचार्ज फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजीला सपोर्ट करतात. तसेच वायरलेस पद्धतीने फास्ट चार्ज करण्यासाठी यात 50वॉट हुआवई वायरलेस सुपरचार्ज टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हुआवईचे हे दोन्ही स्मार्टफोन रिवर्स चार्जिंगला पण सपोर्ट करतात. कंपनीचा दावा आहे कि -5 डिग्री तापमानात पण फोन चार्जिंग विना सहज चालेल.

बेस्ट फीचर्स

हुआवई चे हे दोन्ही स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतात. हे आईपी68 रेटेड स्मार्टफोन आहेत जे 5G सोबतच डुअल 4जी वोएलटीई वर चालतात. हे दोन्ही फोन हुआवई मोबाईल सर्विस वर चालतात म्हणजे यात गूगल प्ले स्टोर मिळणार नाही. Mate 40 Pro चे डायमेंशन 162.9×74.5×9.1एमएम आणि वजन 212ग्राम आहे. तसेच Mate 40 Pro+ चे डायमेंशन 162.9×74.5×8.8एमएम आणि वजन 230ग्राम आहे.

वेरिएंट्स व किंमत

HUAWEI Mate 40 Pro मार्केट मध्ये 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत €1,199 म्हणजे 1,04,500 रुपयांच्या आसपास आहे. तसेच HUAWEI Mate 40 Pro+ कंपनीने 12 जीबी रॅम सह 256 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे ज्याची किंमत €1,399 अर्थात् भारतीय करंसीनुसार 1,21,900 रुपयांच्या आसपास आहे.

The post लॉन्च झाला जगातील सर्वात फास्ट आणि पावरफुल अँड्रॉइड स्मार्टफोन, स्पेसिफिकेशन्स बघा आणि जाणून घ्या याची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-mate-40-pro-plus-launched-with-5nm-kirin-9000-chip-specs/feed/ 0
5,000mAh बॅटरी, 48MP क्वॉड कॅमेरा आणि 4GB रॅम सह Huawei Y7a लॉन्च, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत https://www.91mobiles.com/marathi/huawei-y7a-launched-kirin-710a-48mp-quad-camera-5000mah-battery-specs-price-sale/ https://www.91mobiles.com/marathi/huawei-y7a-launched-kirin-710a-48mp-quad-camera-5000mah-battery-specs-price-sale/#respond Wed, 21 Oct 2020 14:10:14 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8617 Huawei Y7a स्मार्टफोन मलेशिया मध्ये 4 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता पण येईल.

The post 5,000mAh बॅटरी, 48MP क्वॉड कॅमेरा आणि 4GB रॅम सह Huawei Y7a लॉन्च, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Huawei ने आज इंटरनेशनल मार्केट मध्ये आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘वाय सीरीज’ मध्ये एक नवीन स्मार्टफोन जोडला आहे. हा मोबाईल Huawei Y7a नावाने लॉन्च झाला आहे जो मलेशियन मार्केट मध्ये आला आहे. हुआवई वाय7ए एक लो बजेट डिवायस आहे जो मोठी बॅटरी आणि पंच-होल डिस्प्ले सोबतच क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हुआवई इंडियाने हा फोन भारतात लॉन्च करण्याची सध्या कोणतीही माहिती दिली नाही पण आशा आहे कि हुआवई वाय7ए भारतीय बाजारात पण लवकरच येईल.

Huawei Y7a

हुआवई वाय7ए काही दिवसांपूर्वी आस्ट्रिया मध्ये लॉन्च झालेल्या हुआवई पी स्मार्ट 2021 चा रीब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे. फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता Huawei Y7a स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या आईपीएस एलसीडी फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.3 टक्के आहे ज्यात डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत आणि खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला मधोमध सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे.

Huawei Y7a कंपनीने अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला आहे जो ईएमयूआई 10.1 वर चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये हुआवईचा किरीन 710ए चिपसेट देण्यात आला आहे. लक्षात असू दे कि हुआवईचा का यह फोन प्री-इंस्टाल्ड गूगल ऍप्स सह येत नाही आणि हुआवई ऍप गॅलरी सोबतच हुआवई मोबाईल सर्विसला सपोर्ट करतो. म्हणजे या फोन मध्ये गूगल प्ले स्टोर चालणार नाही.

हे देखील वाचा : Huawei Mate 40 Pro ताकदवान प्रोसेसर आणि 8GB रॅम सह झाला लिस्ट, 22 ऑक्टोबरला होईल लॉन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता हुआवईचा हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 120डिग्री FoV असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड सेंसर, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सेलच्या डेफ्थ सेंसर आणि तेवढ्याच अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी हुआवई वाय7ए मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Huawei Y7a एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक, एनएफसी व इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तर पावर बॅकअपसाठी हुआवई वाय7ए स्मार्टफोन 22.5वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेल्या 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 165.5.65 x 76.88 x 9.26mm आणि वजन 206 ग्राम आहे.

वेरिएंट व किंमत

Huawei Y7a स्मार्टफोन मलेशिया मध्ये 4 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता पण येईल. मलेशियन मार्केट मध्ये या फोनची किंमत RM 799 म्हणजे भारतीय करंसीनुसार 14,000 रुपयांच्या आसपास आहे. हा फोन Midnight Black, Crushed Green आणि Blush Gold मध्ये बाजार मध्ये आला आहे.

The post 5,000mAh बॅटरी, 48MP क्वॉड कॅमेरा आणि 4GB रॅम सह Huawei Y7a लॉन्च, बघा स्पेसिफिकेशन्स आणि किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/huawei-y7a-launched-kirin-710a-48mp-quad-camera-5000mah-battery-specs-price-sale/feed/ 0