Mi 11 Ultra - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 07 Apr 2021 18:22:42 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi चा सर्वात दमदार स्मार्टफोन Mi 11 Ultra भारतात विक्रीसाठी इथे होईल उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-ultra-will-be-available-for-sale-in-india-on-amazon-india/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-ultra-will-be-available-for-sale-in-india-on-amazon-india/#respond Wed, 07 Apr 2021 18:22:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10547 शाओमीने आपला अपकमिंग स्मार्टफोन Mi 11 Ultra चा लॉन्च ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर लिस्ट केला आहे.

The post Xiaomi चा सर्वात दमदार स्मार्टफोन Mi 11 Ultra भारतात विक्रीसाठी इथे होईल उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi लवकरच आपला सर्वात पावरफुल स्मार्टफोन Mi 11 Ultra लॉन्च करेल. शाओमीचा हा फोन भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये 23 एप्रिल 2021 ला लॉन्च केला जाईल. शाओमीने Mi 11 Ultra स्मार्टफोन चीनमध्ये आधीच लॉन्च केला आहे. त्यामुळे शाओमीच्या या स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचरची सर्व माहिती आधीपासून माहित आहे. Mi 11 Ultra ची किंमत पाहता भारतात शाओमीचा हा स्मार्टफोन 70,000 रुपयांची बेस किंमतीत सादर केला जाऊ शकतो.

Mi 11 Ultra Amazon availability

शाओमीने आपला अपकमिंग स्मार्टफोन Mi 11 Ultra चा लॉन्च ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट Amazon India वर लिस्ट केला आहे. त्यामुळे शाओमीचा दमदार स्मार्टफोन विक्रीसाठी Amazon वर उपलब्ध होईल हि शक्यता आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन Mi.com आणि Mi Home stores वरून पण विकत घेता येईल.

हे देखील वाचा : iQOO Neo5 स्मार्टफोन दमदार स्पेसिफिकेशन्ससह भारतात होईल लॉन्च, जाणून घ्या वैशिष्ट्ये

Mi 11 Ultra स्पेसिफिकेशन्स

Xiaomi Mi 11 Ultra स्मार्टफोनमध्ये 6.81 इंचाचा शानदार WQHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. तसेच हा डिस्प्ले HDR10+ Dolby Vision सर्टिफाइड आहे आणि Gorilla Glass Victus च्या प्रोटेक्शनसह येतो. परफॉर्मन्स पाहता Mi 11 Ultra स्मार्टफोन Snapdragon 888 चिपसेटसह 12GB RAM आणि 512GB इंटरनल स्टोरेजसह सादर केला गेला आहे. शाओमीच्या या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 67W वायर्ड फास्ट चार्ज आणि वायरलेस चार्जला सपोर्ट करतो.

Xiaomi Mi 11 Ultra चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता या फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. या कॅमेरा मॉड्यूलमध्ये 3 कॅमेरा सेंसरसह LED फ्लॅश आणि सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले व्यूफाइंडरप्रमाणे वापर करून बॅक कॅमेऱ्याने सहज सेल्फी क्लिक केली जाऊ शकते.

हे देखील वाचा : Redmi Note 10 सीरीजच्या सर्वात स्वस्त स्मार्टफोनचा सेल, यात आहे 6GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी

कॅमेरा स्पेसिफिकेशन्स पाहता Mi 11 Ultra मध्ये प्राइमेरी कॅमेरा लेंस 50 मेगापिक्सल Samsung GN2 वाइंड अँगल सेंसर आहे, तसेच दोन 48-मेगापिक्सल Sony IMX586 अल्ट्रा-वाइड-अँगल आणि टेलीफोटो-मॅक्रो कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या फोनमध्ये देण्यात आलेला टेली-मॅक्रो कॅमेरा लेंस 5x ऑप्टिकल आणि 120x डिजिटल झूमला सपोर्ट करतो. Mi 11 Ultra स्मार्टफोनच्या फ्रंटमध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे.

The post Xiaomi चा सर्वात दमदार स्मार्टफोन Mi 11 Ultra भारतात विक्रीसाठी इथे होईल उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-ultra-will-be-available-for-sale-in-india-on-amazon-india/feed/ 0
दोन डिस्प्ले असलेला ‘SUPERPHONE’ Mi 11 Ultra भारतात यादिवशी होईल लॉन्च, यात आहे 50MP चा कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-ulta-india-launch-date-april-23-dual-display-50mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-ulta-india-launch-date-april-23-dual-display-50mp-camera/#respond Thu, 01 Apr 2021 12:12:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10463 मनु जैन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे कि Xiaomi Mi 11 Ultra भारतीय मार्केटमध्ये 23 एप्रिलला लॉन्च करत आहोत.

The post दोन डिस्प्ले असलेला ‘SUPERPHONE’ Mi 11 Ultra भारतात यादिवशी होईल लॉन्च, यात आहे 50MP चा कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने या आठवड्यात चीनमध्ये आयोजित केलेल्या इवेंटमध्ये आपल्या Mi 11 सीरीजमध्ये नवीन फोन्स सादर केले आहेत. या फोन्समध्ये Mi 11 Ultra 5G, Mi 11 Pro 5G आणि Mi 11 Lite 5G यांचा समावेश होता. आता Xiaomi इंडिया हेड आणि ग्लोबल वाइस प्रेसिडेंट मनु कुमार जैन यांनी माहिती दिली आहे कि भारतात या सीरीजचा सर्वात पावरफुल फोन Mi 11 Ultra सादर केला जाईल. मनु जैन यांनी ट्विट करून माहिती दिली आहे कि Xiaomi Mi 11 Ultra भारतीय मार्केटमध्ये 23 एप्रिलला लॉन्च करत आहोत. मनु जैन यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे कि Mi 11 Ultra आता पर्यंतचा सर्वात प्रीमियम आणि बेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. त्यांनी याला सुपर फोनची उपमा दिली आहे आणि DXO चा हवाला देत हा जगातील बेस्ट कॅमेरा स्मार्टफोन असल्याचे पण म्हटले आहे. (xiaomi mi 11 ulta india launch date april 23 dual display 50mp camera)

लॉन्च पोस्टर

भारत लॉन्चसाठी एक टीजर पोस्टर पण शेयर केला आहे ज्यात 23 एप्रिलसह फोनचा फोटो आहे. विशेष म्हणजे या स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आपल्याला आधीपासून माहित आहेत. चला पुढे जाणून घेऊया मी 11 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन आणि किंमत.

हे देखील वाचा : 8 एप्रिलला आहे Nokia चा मोठा ईवेंट, बघा कोणकोणते स्मार्टफोन होतील लॉन्च आणि किती असेल किंमत

Mi 11 Ultra चे स्पेसिफिकेशन्स

Mi 11 अल्ट्रामध्ये 6.81 इंचाच्या 2K AMOLED डिस्प्लेसह 120Hz रिफ्रेश रेट आणि वरच्या बाजूला HDR10 + डॉल्बी विजनला सपोर्ट व गोरिल्ला ग्लास विक्टस आहे. तसेच फोनमध्ये फ्लॅगशिप स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट आहे ज्यात 12GB रॅम आणि 512GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हँडसेट 67W फास्ट वायर्ड आणि वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh च्या बॅटरीवर चालतो. Mi 11 अल्ट्रा Android 11-आधारित MIUI 12 वर चालतो.

विशेष म्हणजे Mi 11 Ultra रियर कॅमेरा मॉड्यूलवर एक छोटा होल-पंच आहे. कॅमेरा पाहता Mi 11 अल्ट्रा 50MP प्राइमरी कॅमेरा, 48MP टेलीफोटो कॅमेऱ्यासह 120x डिजिटल झूम सपोर्ट आणि 48MP वाइड-अँगल लेंससह येतो. तर, फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20MP चा कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : 8 एप्रिलला आहे Nokia चा मोठा ईवेंट, बघा कोणकोणते स्मार्टफोन होतील लॉन्च आणि किती असेल किंमत

अशी असू शकते किंमत

भारतात Mi 11 अल्ट्रा ची किंमत 23 एप्रिलला अधिकृतपणे समोर येईल. चीनमध्ये डिवाइसचा 8GB + 256GB स्टोरेज वेरिएंट आरएमबी 5,999 (जवळपास 67,000 रुपये), 12GB + 256GB आणि 12GB + 512GB वेरिएंट क्रमशः RMB 6,499 (जवळपास 72,500 रुपये) आणि RMB 6,999 (जवळपास 78,100 रुपये) मध्ये मिळत आहे. यावरून समजते कि स्मार्टफोनची किंमत भारतात 60,000 रुपयांच्यावर असेल.

The post दोन डिस्प्ले असलेला ‘SUPERPHONE’ Mi 11 Ultra भारतात यादिवशी होईल लॉन्च, यात आहे 50MP चा कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-ulta-india-launch-date-april-23-dual-display-50mp-camera/feed/ 0
एक नव्हे तर दोन डिस्प्लेसह Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, 5G आणि Samsung कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Mi 11 Ultra 5G https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-ultra-launched-price-two-displays-50mp-camera/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-ultra-launched-price-two-displays-50mp-camera/#respond Tue, 30 Mar 2021 12:16:41 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10421 Xiaomi Mi 11 Ultra स्मार्टफोन कंपनीने वाइट सिरॅमिक आणि ब्लॅक कलरमध्ये सादर केला आहे. तसेच फोनच्या मागे ब्लॅक कलरमध्ये कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे आणि डिवाइसच्या वरच्या अर्ध्या भागावर हा कॅमेरा आहे.

The post एक नव्हे तर दोन डिस्प्लेसह Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, 5G आणि Samsung कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Mi 11 Ultra 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने आपला सेकंड जेनरेशन अल्ट्रा फ्लॅगशिप फोन लॉन्च केला आहे. नवीन मी 11 अल्ट्रामध्ये नवीन टेक्नॉलजी देण्यात आली आहे आणि हा मी 11 च्या तुलनेत चांगल्या स्पेसिफिकेशन्ससह येतो. Xiaomi Mi 11 Ultra सोबतच कंपनीने अजून दोन आणि नवीन फोन Mi 11 Pro व Mi 11 Lite मार्केटमध्ये सादर केले आहेत. सध्या तिन्ही फोन चायनीज मार्केटमध्ये सादर केले गेले आहेत. Mi 11 Ultra बद्दल बोलायचे झाले तर यात दोन डिस्प्ले, तीन रियर कॅमेरे आणि डॉल्बी विजन सपोर्ट पण आहे. (xiaomi mi 11 ultra launched price two displays 50mp camera)

डिजाइन

Xiaomi Mi 11 Ultra स्मार्टफोन कंपनीने वाइट सिरॅमिक आणि ब्लॅक कलरमध्ये सादर केला आहे. तसेच फोनच्या मागे ब्लॅक कलरमध्ये कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे आणि डिवाइसच्या वरच्या अर्ध्या भागावर हा कॅमेरा आहे. तसेच हँडसेटमध्ये मागे तीन कॅमेरा आणि एक सेकंडरी डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेवर नोटिफिकेशन, बॅटरी लेवल, वेदर, हेल्थ अलर्टसह इतर बरीच माहिती मिळेल. त्याचबरोबर फ्रंटला कर्व्ड डिस्प्लेसह टॉप लेफ्टला पंच होल आहे. फोनच्या दोन्ही साइड कर्व्ड बेजल नगण्य आहेत. तसेच, बॉटमला बारीक चिन पार्ट मिळेल. फोन IP68 वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंससह येतो आणि याचा आकार 164.3mm X 74.6mm X 8.8mm आहे. तसेच, याचे वजन 225 ग्राम आहे.

हे देखील वाचा : Samsung करत आहे स्वस्त फोन लॉन्च करण्याची मोठी तयारी, या किंमतीत Galaxy F02S लवकरच करेल भारतात एंट्री

डुअल डिस्प्लेची कमाल

कर्व्डसह फोनमध्ये 6.81-इंचाचा 2K WQHD+ (3,200× 1,440 पिक्सल) E4 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 551ppi पिक्सल डेंसिटी आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लास Victus प्रोटेक्शनसह येते. इतकेच नव्हे तर फोनचा डिस्प्ले HDR10+ आणि Dolby Vision सह A+ रेटिंग DisplayMate वरून मिळाली आहे. DisplayMate सर्व प्रकारच्या डिस्प्लेचे परिक्षण करतो.

फोनच्या मागे 1.1 इंचाचा (126×294 पिक्सल) AMOLED सेकंडरी टच डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अल्वेज ऑन-मोड सपोर्टसह येतो. यात 450 निट्स ब्राइट्नेस आहे.

दमदार कॅमेरा

कॅमेरा पाहता मी 11 अल्ट्रा मध्ये दमदार ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये सॅमसंगचा 50MP ISOCELL GN2 प्राइमरी सेंसर आहे जो f/1.95 अपर्चर, OIS, LED, laser autofocus सह येतो. तसेच फोनमध्ये 48MP Sony IMX586 अल्ट्रा-वाइड-लेंस आहे जी OIS आणि f/2.2 अपर्चरसह येते. तसेच, फोनमध्ये तिसरा सेंसर 48MP Sony IMX586 टेलिलेंस आहे जो 5x ऑप्टिकल झूम, 120x डिजिटल झूम आणि OIS सह येतो. तसेच, फोन 8K व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो आणि यात dToF आणि फ्लिकर सेंसर आहे. यात सेल्फी स्नॅपरसाठी समोरच्या बाजूस 20MP चा कॅमेरा आहे. वर सांगितल्याप्रमाणे Xiaomi Mi 11 Ultra मध्ये मागे एक सेकंडरी स्क्रीन आहे जी नोटिफिकेशन दाखवते, मुख्य डिस्प्लेला मिरर करते, कॅमेरा मिररिंग करते आणि AOD (अल्वेज ऑन डिस्प्ले) चे पण काम करेल.

प्रोसेसिंग पावर आणि रॅम/स्टोरेज

Mi 11 Ultra मध्ये क्वॉलकमने आपला स्नॅपड्रॅगॉन 888 प्लेस केला आहे. कंपनीनुसार स्नॅपड्रॅगॉन 888 मध्ये 25 टक्के वेगवान CPU परफॉर्मन्स आणि 35 टक्के पर्यंत जास्त वेगवान ग्राफिक्ससह 7.5 Gbps पर्यंतचा डाउनलोड स्पीड मिळतो. तसेच स्नॅपड्रॅगॉन 888 मध्ये क्वॉलकमचा 6th जेनरेशन AI इंजन सह Hexagon 780 AI प्रोसेसर आहे. फोन मध्ये 8 जीबी रॅम व 12 जीबी रॅमसह 256 जीबी आणि 512 जीबी इनबिल्ट स्टोरेजचा विकल्प मिळतो.

हे देखील वाचा : पोकोने पुन्हा दाखवला दम, लॉन्च केला 5,160mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला POCO X3 Pro

बॅटरी आणि कनेक्टिविटी

Mi 11 Ultra मध्ये 67W वायर्ड सह 5,000mAh ची बॅटरी आणि वायरलेस फास्ट चार्जिंग आहे. तसेच फोनमध्ये 10W रिवर्स वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे. फोनमध्ये कनेक्टिविटी पर्याय म्हणून 5 जी, 4 जी वीओएलटीई, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, एनएफसी आणि चार्जिंगसाठी एक यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. फोनमध्ये हरमन कार्डन स्टीरियो स्पीकर आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर पण आहे.

Xiaomi Mi 11 Ultra की किंमत आणि उपलब्धता

मी 11 अल्ट्रा च्या 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 5,999 युआन (जवळपास 66,500 रुपये) आहे. तर 12 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6499 युआन (जवळपास 72,000 रुपये) आणि 12 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 6,999 युआन (जवळपास 77,500 रुपये) आहे. मी 11 अल्ट्रा च्या सर्व वेरियंटची विक्री चीनमध्ये 2 एप्रिलपासून सुरु होईल. सध्या ग्लोबल मार्केटमधील उपलबद्धतेबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

The post एक नव्हे तर दोन डिस्प्लेसह Xiaomi ने केले शक्तिप्रदर्शन, 5G आणि Samsung कॅमेऱ्यासह लॉन्च झाला Mi 11 Ultra 5G first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-11-ultra-launched-price-two-displays-50mp-camera/feed/ 0
Mi 11 Ultra लॉन्च करून Xiaomi करणार आहे धमाका, 120Hz डिस्प्लेसह यात असेल 67W वायरलेस चार्जिंग https://www.91mobiles.com/marathi/mi-11-ultra-launch-soon-with-2k-120hz-display-67w-wireless-charging/ https://www.91mobiles.com/marathi/mi-11-ultra-launch-soon-with-2k-120hz-display-67w-wireless-charging/#respond Wed, 03 Feb 2021 12:24:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9865 Xiaomi ने Mi 11 स्मार्टफोन गेल्या वर्षीच्या शेवटी लॉन्च केला होता, जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 5G चिपसेटसह सादर केला गेला होता.

The post Mi 11 Ultra लॉन्च करून Xiaomi करणार आहे धमाका, 120Hz डिस्प्लेसह यात असेल 67W वायरलेस चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi च्या मी सीरीजच्या अपकमिंग फोन Mi 11 Ultra बद्दल पहिल्यांदा माहिती समोर आली आहे. चीनच्या सोशल मीडिया साइट Weibo वर टिप्स्टर Digital Chat Station ने हँडसेटबाबत महत्वाचा खुलासा केला आहे. टिप्सटरने म्हटले आहे कि कंपनी चुपचाप मी 11 च्या प्रो मॉडेलवर काम करत आहे. अजूनतरी फोनच्या खुलासा झाला नाही. नावाचा पण, बोलले जात आहे कि हा नवीन फोन Mi 11 Ultra नावाने सादर केला जाईल. चला जाणून घेऊया Mi 11 Ultra बद्दल आतापर्यंत काय समोर आले आहे.

लीकनुसार कथित Mi 11 अल्ट्रा मध्ये 2K डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट, सेल्फी कॅमेऱ्यासाठी एक पंच-होल कटआउट आणि चारीही बाजूनी घुमावदार कडा असतील. तसेच फोन मध्ये 67W वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी आणि मोठी बॅटरी असेल. याव्यतिरिक्त फोनबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही.

तुम्हाला सांगू इच्छितो कि Xiaomi Mi 11 ग्लोबल मार्केट मध्ये 8 फेब्रुवारीला दुपारी 1 वाजता CET (5:30 pm IST) सादर केला जाईल. त्याचबरोबर Xiaomi या इवेंट मध्ये Mi 11 प्रो आणि Mi 11 लाइट पण सादर करू शकते. पण हे निश्चितपणे सांगता येत नाही.

हे देखील वाचा : लॉन्च होणार आहे जगातील पहिला MediaTek Dimensity 1100 SoC असलेला 5G फोन Vivo S9

Xiaomi ने Mi 11 स्मार्टफोन गेल्या वर्षीच्या शेवटी लॉन्च केला होता, जो क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 5G चिपसेटसह सादर केला गेला होता. तर दुसरीकडे असे रिपोर्ट्स आले आहेत कि कंपनी मी सीरीजचे स्मार्टफोन Mi 11 Pro आणि Mi 11 Lite वर पण काम करत आहे.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका लीकनुसार मी 11 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये येईल, ज्यात 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा समावेश असेल. तर मी 11 लाइट स्मार्टफोन 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज, 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजवर लाॅन्च होईल. Mi 11 मध्ये Gray आणि Blue कलर तथा Mi 11 Lite मध्ये Pink, Black आणि Blue hue कलर उपलब्ध होतील.

हे देखील वाचा : Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल

दुसरीकडे Xiaomi Mi 11 Lite फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करेल. फिंगरप्रिंट सेंसर साईड पॅनलवर पावर बटन मध्ये दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च केला जाईल त्याचबरोबर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट मिळू शकतो. सध्या बाजारात POCO X3 एकमेव असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेटसह येतो.

The post Mi 11 Ultra लॉन्च करून Xiaomi करणार आहे धमाका, 120Hz डिस्प्लेसह यात असेल 67W वायरलेस चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-11-ultra-launch-soon-with-2k-120hz-display-67w-wireless-charging/feed/ 0