पोकोने पुन्हा दाखवला दम, लॉन्च केला 5,160mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला POCO X3 Pro

Poco X3 Pro स्मार्टफोन आज भारतीय बाजारात अधिकृतपणे लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात Poco X3 Pro आणि Poco F3 स्मार्टफोन ग्लोबल टेक मंचावर सादर केले होते. भारतात आलेल्या पोको एक्स3 प्रो आणि ग्लोबल मंचावर आलेल्या फोनचे फीचर्स जवळपास एकसारखेच आहेत. पोको एक्स3 चा अपग्रेडेड वर्जन म्हणून लॉन्च केल्या गेलेल्या पोको एक्स3 प्रो ची टक्कर भारतात Realme 8 सीरीजशी होईल, जो काही दिवसांपूर्वीच लॉन्च केला गेला होता. (Poco x3 pro launch in india with 8gb ram 5160mah battery price specification sale)

Poco X3 Pro डिजाइन आणि डिस्प्ले

POCO X3 Pro कंपनीने पंच होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे त्यामुळे कंपनीने याला डॉटनॉच असे नाव दिले आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच होल देण्यात आला आहे जो बॉडी पार्टपासून थोडा दूर आहे. हा फोन कोर्निंग गोरिल्ला 6 ने प्रोटेक्टेड 6.67 इंचाच्या एफएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो.

कॅमेऱ्यांची पावर

पोको एक्स3 प्रो मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/1.22 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा…

प्रोसेसरचा दम

POCO X3 Pro एंडरॉयड 11 ओएस आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.9गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 640 जीपीयू आहे. हा फोन LPDDR4x रॅम आणि UFC 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो.

पावरफुल बॅटरी

ताकदवान स्पेसिफिकेशन्स सोबत पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये दमदार बॅटरी पण देण्यात आली आहे. POCO X3 Pro स्मार्टफोन 5,160एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार पोको एक्स3 प्रो ची बॅटरी एका चार्जमध्ये 11 तासांची गेमिंग आणि 18 तासांचा वीडियो प्लेबॅक देऊ शकते.

हे देखील वाचा : Samsung करत आहे स्वस्त फोन लॉन्च करण्याची मोठी तयारी, या किंमतीत Galaxy F02S लवकरच करेल भारतात एंट्री

किंमत

भारतात POCO X3 Pro च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आणि 8GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. हा Steel Blue, Graphite Black आणि Golden Bronze कलरमध्ये येतो. भारतात POCO X3 Pro चा पहिला सेल 6 एप्रिलला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टच्या माध्यमातून होईल. बॅंक ऑफरमध्ये ICICI बॅंक क्रेडिट कार्ड आणि EMI देवाणघेवाणीवर 1,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here