OnePlus Nord CE 3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 21 Jun 2023 09:27:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 वनप्लस नॉर्ड 3, नॉर्ड सीई 3 चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच आले समोर, जाणून घ्या ह्यांची खासियत https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-nord-ce-3-full-specifications-emerge-ahead-of-launch/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-nord-ce-3-full-specifications-emerge-ahead-of-launch/#respond Wed, 21 Jun 2023 09:27:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21675 OnePlus नं यंदा भारतात Nord CE 3 Lite लाँच केला होता. आता बातमी आली आहे की कंपनी OnePlus Nord 3 सह Nord CE 3 लाँच करण्याची तयारी करत आहे. वनप्लसचे हे दोन आगामी फोन जुलैमध्ये लाँच होऊ शकतात. परंतु आतापर्यंत कंपनीनं अधिकृतपणे नॉर्ड सीई 3 आणि नॉर्ड 3 च्या लाँचची घोषणा केलेली नाही, परंतु दोन्ही […]

The post वनप्लस नॉर्ड 3, नॉर्ड सीई 3 चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच आले समोर, जाणून घ्या ह्यांची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये 6.7 इंच डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट असू शकतो.
  • वनप्लस नॉर्ड 3 मध्ये असू शकतो मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसर
  • नॉर्ड सीई 3 क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसरसह येऊ शकतो

OnePlus नं यंदा भारतात Nord CE 3 Lite लाँच केला होता. आता बातमी आली आहे की कंपनी OnePlus Nord 3 सह Nord CE 3 लाँच करण्याची तयारी करत आहे. वनप्लसचे हे दोन आगामी फोन जुलैमध्ये लाँच होऊ शकतात. परंतु आतापर्यंत कंपनीनं अधिकृतपणे नॉर्ड सीई 3 आणि नॉर्ड 3 च्या लाँचची घोषणा केलेली नाही, परंतु दोन्ही फोन्सचे अनेक लीक समोर आले आहेत. आता टिपस्टर मुकुल शर्मानं लाँचपूर्वीच वनप्लस नॉर्ड सीई 3 आणि नॉर्ड 3 दोन्हीचे फुल स्पेसिफिकेशन शेयर केले आहेत.

वनप्लस नॉर्ड 3 चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: वनप्लस नॉर्ड 3 5जी मध्ये 6.74-इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. ह्यात सेल्फीसाठी पंच होल डिजाइनसह 120Hz रिफ्रेश रेट आहे.
  • प्रोसेसर: वनप्लस फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 9000 प्रोसेसरसह येऊ शकतो.
  • रॅम आणि स्टोरेज: फोनमध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज असू शकते.
  • ओएस: OnePlus Nord 3 5G Android 13 आधारित OxygenOS 13.1 सह येऊ शकतो.
  • कॅमेरा: रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा होने की उम्मीद आहे, ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 8MP चा सेकंडरी सेन्सर आणि 2MP चा तिसरा सेन्सर असेल. सेल्फीसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी: फोनमध्ये 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.
  • इतर फीचर: वनप्लस नॉर्ड 3 मध्ये ड्युअल स्पिकर, डॉल्बी एटमॉस, एक्स-अ‍ॅक्सिस मोटर एनएफसी, आयआर ब्लास्टर आणि अलर्ट स्लाइडरचा समावेश केला जाऊ शकतो.

वनप्लस नॉर्ड सीई 3 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिस्प्ले: वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये 6.7 इंचाचा फ्लूइड AMOLED डिस्प्ले असू शकतो. जो 950 निट्स पीक ब्राइटनेस आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो.
  • प्रोसेसर: हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 782G प्रोसेसरसह येऊ शकतो.
  • रॅम आणि स्टोरेज: फोन 12GB पर्यंत LPDDR4X रॅम (16GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम) सह लाँच होण्याची शक्यता आहे.
  • ओएस: वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी ऑक्सीजनओएस 13.1 सह येऊ शकतो. असं देखील सांगण्यात आलं आहे की हा दोन वर्ष अँड्रॉइड अपडेट आणि तीन वर्ष सिक्योरिटी अपडेटसह येईल.
  • कॅमेरा: वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा असण्याची शक्यता आहे, ज्यात 50MP IMX890 प्रायमरी कॅमेरा (OIS), 8MP 112-डिग्री UW आणि 2MP 4cm मॅक्रो लेन्स असेल.
  • बॅटरी: फोन 80W SUPERVOOC फास्ट चार्जिंगला सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असू शकते.
  • अन्य फीचर: वनप्लस नॉर्ड 3 प्रमाणे नॉर्ड सीई 3 देखील ड्युअल स्पिकर, हायपरटच, हायपरबूस्ट, डॉल्बी एटमॉस, एक्स-अ‍ॅक्सिस मोटर एनएफसी आणि आयआर ब्लास्टर असण्याची शक्यता आहे.

The post वनप्लस नॉर्ड 3, नॉर्ड सीई 3 चे स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच आले समोर, जाणून घ्या ह्यांची खासियत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-3-nord-ce-3-full-specifications-emerge-ahead-of-launch/feed/ 0
2023 च्या उत्तरार्धात येऊ शकतो OnePlus Nord CE 3; टिपस्टरनी दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-launch-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-launch-specifications-leaked/#respond Fri, 03 Mar 2023 04:51:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18347 एकेकाळी फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणाऱ्या चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus नं गेल्या काही वर्षांपासून आपली रणनीती बदलली आहे. कंपनीनं बजेट आणि मिडरेंज मधील सेगमेंटमध्ये इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नॉर्ड सीरिज सादर केली आहे. या सीरिजमधील OnePlus Nord CE 2 ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या फोनचा उत्तराधिकारी OnePlus Nord CE 3 बाजारात […]

The post 2023 च्या उत्तरार्धात येऊ शकतो OnePlus Nord CE 3; टिपस्टरनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Nord CE 3 जुलैच्या आसपास लाँच केला जाऊ शकतो.
  • हा फोन गेल्यावर्षी आलेल्या Nord CE 2 चा उत्तराधिकारी आहे.
  • OnePlus Nord CE 3 मध्ये फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 80W फास्ट चार्जिंग आणि 256GB स्टोरेज मिळेल.

एकेकाळी फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणाऱ्या चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी OnePlus नं गेल्या काही वर्षांपासून आपली रणनीती बदलली आहे. कंपनीनं बजेट आणि मिडरेंज मधील सेगमेंटमध्ये इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी नॉर्ड सीरिज सादर केली आहे. या सीरिजमधील OnePlus Nord CE 2 ला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता या फोनचा उत्तराधिकारी OnePlus Nord CE 3 बाजारात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

टेक वेबसाइट मायस्मार्टप्राइसनं टिपस्टर ऑनलिक्सच्या हवाल्याने कथित OnePlus Nord CE 3 च्या लाँच टाइमलाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती दिली आहे. त्यानुसार हा फोन 2023 च्या उत्तरार्धात सादर केला जाईल. आता आलेले वनप्लस नॉर्ड सीई 3 चे स्पेसिफिकेशन याआधी आलेल्या लिक्सपेक्षा कितीतरी वेगळे आहेत. रिपोर्टनुसार हा फोन फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले, 80वॉट फास्ट चार्जिंग आणि 256जीबी स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Jio, Vi की Airtel कोण देतंय 296 रुपयांमध्ये जास्त फायदे; 30 दिवसांच्या वैधतेसाठी कोणाची करावी निवड

कधी येणार OnePlus Nord CE 3

टेक वेबसाइटच्या रिपोर्टनुसार वनप्लस नॉर्ड सीरिजचा हा आगामी स्मार्टफोन OnePlus Nord CE 3 यावर्षी जुलैच्या आसपास सादर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे यंदा जुलैच्या आसपास नॉर्ड 3 देखील लाँच केला जाऊ शकतो. वनप्लस नॉर्ड सीई 3 एक मिडरेंज स्मार्टफोन असू शकतो आणि गेल्यावर्षी आलेल्या वनप्लस नॉर्ड सीई 2 ची जागा घेऊ शकतो.

OnePlus Nord CE 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.72” FHD+ AMOLED display
  • Snapdragon 782G processor
  • 12GB RAM and 256GB storage
  • 50MP triple rear camera
  • 5000mAh battery, 80W fast charging

वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये 6.72 इंचाचा फुल एचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्याचे रिजोल्यूशन 2400 X 1080 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 120हर्ट्झ असू शकतो. याआधी आलेल्या रिपोर्ट्समध्ये सांगण्यात आलं होतं की हा फोन आयपीएस एलसीडी स्क्रीनसह येऊ शकतो. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 782जी प्रोसेसरची ताकद दिली जाऊ शकते, जोडीला 8जीबी/12जीबी रॅम आणि 128जीबी/256जीबी स्टोरेज मिळू शकते.

वनप्लस नॉर्ड सीई 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा मिळू शकतो. फ्रंटला 16 मेगापिक्सलचा कॅमेरा कॅमेरा सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: Honda नं सादर केल्या 3 इलेक्ट्रिक बाइक्स, सिंगल चार्जमध्ये मिळेल जबरदस्त रेंज

कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5जी, 4जी, ड्युअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ आणि यूएसबी टाइप सी पोर्ट मिळू शकतो. तसेच सिक्योरिटीसाठी हा फोन इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात येऊ शकतो. यातील 5000 एमएएचची बॅटरी 80वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते. वनप्लस नॉर्ड सीई 3 ची आणखी माहिती लवकरच हाती लागू शकते.

The post 2023 च्या उत्तरार्धात येऊ शकतो OnePlus Nord CE 3; टिपस्टरनी दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-launch-specifications-leaked/feed/ 0
OnePlus Nord CE 3 च्या कथित लाइव्ह इमेजेस झाल्या लीक https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-live-image-leaked-ahead-of-launch-triple-rear-camera-setup-spotted/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-live-image-leaked-ahead-of-launch-triple-rear-camera-setup-spotted/#respond Thu, 12 Jan 2023 12:54:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16842 चायनीज स्मार्टफोन कंपनी OnePlus आता फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणारी कंपनी राहिली नाही. ग्राहक संख्या वाढवण्यासाठी आता कंपनीनं मिडरेंज आणि बजेट डिवाइस देखील बाजारात आणेल आहेत. वनप्लस आता OnePlus Nord CE 3 नावाच्या आणखी एका मिड रेंज स्मार्टफोनची योजना बनवत आहे. आता लाँचपूर्वीच या स्मार्टफोनची लाइव्ह इमेज ऑनलाइन लीक झाली आहे. टेक वेबसाइट Rmupdate नं […]

The post OnePlus Nord CE 3 च्या कथित लाइव्ह इमेजेस झाल्या लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • OnePlus Nord CE 3 ची एक लाइव्ह इमेज ऑनलाइन लीक
  • आगामी नॉर्डमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • हा फोन यंदा जूनमध्ये ग्राहकांच्या भेटीला येण्याची शक्यता

चायनीज स्मार्टफोन कंपनी OnePlus आता फक्त फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणारी कंपनी राहिली नाही. ग्राहक संख्या वाढवण्यासाठी आता कंपनीनं मिडरेंज आणि बजेट डिवाइस देखील बाजारात आणेल आहेत. वनप्लस आता OnePlus Nord CE 3 नावाच्या आणखी एका मिड रेंज स्मार्टफोनची योजना बनवत आहे. आता लाँचपूर्वीच या स्मार्टफोनची लाइव्ह इमेज ऑनलाइन लीक झाली आहे. टेक वेबसाइट Rmupdate नं टिपस्टर Gadgetsdata च्या मदतीनं OnePlus Nord CE 3 च्या कथित लाइव्ह इमेजेस मिळवल्या आहेत. हे फोटो याआधी टिपस्टर OnLeaks ने दिलेल्या माहितीशी मिळतेजुळते आहेत. चला जाणून घेऊया आगामी वनप्लस स्मार्टफोनची डिजाईन, लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स.

वनप्लस नॉर्ड सीई 3 ची लीक डिजाईन

लीक इमेजेसनुसार आगामी OnePlus Nord CE 3 स्मार्टफोनमध्ये मागच्या बाजूला दोन वर्तुळाकार कॅमेरा कटआऊट मिळतील. या कॅमेरा सेटअप तीन कॅमेरे आणि एक एलईडी फ्लॅश दिला जाईल. वरच्या कटआऊटमध्ये एक कॅमेरा सेन्सर असेल, तर उर्वरित दोन खालच्या कटआऊटमध्ये मिळतील. हे देखील वाचा: दोन फोन आणि एक स्वस्त लॅपटॉप घेऊन येतेय ही छोटी कंपनी; रेडमी-रियलमीची वाट लागणार का?

इमेजेसनुसार या स्मार्टफोनची फ्रेम प्लास्टिकपासून बनवण्यात येईल. तसेच रिपोर्ट्सनुसार OnePlus Nord CE 3 च्या फ्रंटला एक पंच-होल डिजाईन असलेला डिस्प्ले देण्यात येईल. या कटआऊटमध्ये कंपनी सेल्फी कॅमेरा देईल. फोनमध्ये इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळणार नाही, तर साइड माउंटेड सेन्सर असेल. ऑनलिक्सच्या रेंडर्सनुसार या वनप्लसमध्ये पावर बटन आणि व्हॉल्युम रॉकर डावीकडे मिळतील.

वनप्लस नॉर्ड सीई 3 ची संभाव्य लाँच डेट

वनप्लस येत्या 7 फेब्रुवारीला भारतात OnePlus 11 हा कंपनीचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करणार आहे. परंतु, रिपोर्ट्सनुसार OnePlus Nord CE 3 सध्या देशात कोडनेम Larry अंतर्गत टेस्ट केला जात आहे आणि हा फोन यावर्षी जूनमध्ये ग्राहकांच्या भेटीला येऊ शकतो. कंपनीनं मात्र OnePlus Nord CE 3 च्या लाँच डेट बद्दल कोणतीही माहिती दिली नाही. हे देखील वाचा: BGMI खेळण्यासाठी बजेटमध्ये फोन हवा? रेडमी नोट 12 सीरीजमध्ये नव्या प्रोसेसरसह येतोय Note 12 Turbo

वनप्लस नॉर्ड सीई 3 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord CE 3 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा स्मार्टफोन फुल एचडी+ फ्लॅट डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. फोनच्या मागे 108MP प्रायमरी कॅमेरा देखील मिळू शकतो. याआधी आलेल्या रिपोर्ट्सनुसार, 6.7-इंचाचा IPS LCD पॅनल देण्यात येईल, जो 120Hz रिफ्रेश रेटसह येऊ शकतो. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यात 108MP+2MP+2MP चे सेन्सर असू शकतात. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 695 चिपसेट असण्याची शक्यता आहे. जोडीला यात 12GB RAM आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळू शकते. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी असू शकते जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.

The post OnePlus Nord CE 3 च्या कथित लाइव्ह इमेजेस झाल्या लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-live-image-leaked-ahead-of-launch-triple-rear-camera-setup-spotted/feed/ 0
महागड्या वनप्लसची जादू परवडणाऱ्या किंमतीत; OnePlus Nord CE 3 5G ची एक्सक्लूसिव्ह माहिती आली https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-5g-phone-renders-image-design-features-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-5g-phone-renders-image-design-features-and-specifications-leaked/#respond Wed, 30 Nov 2022 06:23:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15508 OnePlus ब्रँडचा अनुभव सर्वांना मिळावा म्हणून कंपनीनं आपली नॉर्ड सीरिज सादर केली आहे. या सीरिज मधील अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G Phone कंपनीनं 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 64MP Camera आणि 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह यंदा भारतात लाँच केला आहे. तर आता कंपनी या स्मार्टफोनच्या नव्या व अपग्रेड मॉडेलवर काम करत आहे […]

The post महागड्या वनप्लसची जादू परवडणाऱ्या किंमतीत; OnePlus Nord CE 3 5G ची एक्सक्लूसिव्ह माहिती आली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
OnePlus ब्रँडचा अनुभव सर्वांना मिळावा म्हणून कंपनीनं आपली नॉर्ड सीरिज सादर केली आहे. या सीरिज मधील अफोर्डेबल स्मार्टफोन OnePlus Nord CE 2 5G Phone कंपनीनं 8GB RAM, MediaTek Dimensity 900 चिपसेट, 64MP Camera आणि 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंगसह यंदा भारतात लाँच केला आहे. तर आता कंपनी या स्मार्टफोनच्या नव्या व अपग्रेड मॉडेलवर काम करत आहे आणि लवकरच OnePlus Nord CE 3 5G फोन लाँच होईल. 91मोबाइल्सला कंपनीच्या घोषणेच्या आधीच वनप्लस नॉर्ड सीई 3 चे फोटोज व स्पेसिफिकेशन्स मिळाले आहेत, ज्यांची माहिती पुढे देण्यात आली आहे.

91मोबाइल्सला OnePlus Nord CE 3 5G चा एक्सक्लूसिव्ह व्हिडीओ मिळाला आहे. या व्हिडीओमध्ये फोन 360 डिग्री अँगलनं दाखवण्यात आला आहे ज्यात फोनच्या लुक आणि डिजाईनचा खुलासा झाला आहे. वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोनच्या फोटोज सोबतच फोनच्या अनेक फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील मिळाली आहे ज्याची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे. आशा आहे की साल 2023 च्या सुरुवातीला OnePlus Nord CE 3 5G लाँच होईल. हे देखील वाचा: Motorola चा दणकट स्मार्टफोन येतोय; वनप्लसची सुट्टी करू शकतो Moto X40

कशी असेल OnePlus Nord CE 3 5G ची डिजाईन

वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोन पंच-होल डिस्प्ले डिजाइनसह लाँच केला जाईल. सेल्फी कॅमेरा असलेला हा होल स्क्रीनच्या वरच्या बाजूला मध्यभागी असेल आणि बॉडी एज पासून थोडा दूर ठेवण्यात येईल. फोनचा डिस्प्ले पूर्णपणे फ्लॅट असेल ज्याच्या तीन कडा पूर्णपणे बेजल लेस असतील तर खालच्या बाजूला थोडा चिन पार्ट असेल. फोनच्या उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर इम्बेडेड पावर बटन देण्यात आला आहे तर डाव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर आहे.

OnePlus Nord CE 3 5G च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. हा सेटअप पॅनलच्या वरच्या बाजूला डावीकडे असेल ज्यात दोन मोठे रिंग आहेत. वरच्या रिंगमध्ये सिंगल कॅमेरा लेन्स आहे तर खालच्या रिंगमध्ये दोन लेन्स फिट करण्यात आल्या आहेत. या रिंग्सच्या बाजूला फ्लॅश लाईट आहे. रियर पॅनलवर मध्यभागी OnePlus चा लोगो आहे. तर फोनच्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप-सी पोर्ट, 3.5एमएम जॅक आणि स्पिकर असेल.

असे असतील OnePlus Nord CE 3 5G चे स्पेसिफिकेशन्स

वनप्लस नॉर्ड सीई 3 5जी फोनचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाइल फोन 6.7 इंचाच्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार, हा स्मार्टफोन स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनला असेल जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. स्क्रीन स्टाइल कशी असेल ते तुम्ही वरील फोटोज आणि वीडियोमध्ये पाहू शकता. हे देखील वाचा: अरे वाह! रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone झाला आणखी स्वस्त; डिस्काउंटसह 6GB रॅम आणि 50MP कॅमेरा

OnePlus Nord CE 3 5G क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. तसेच लीक्सनुसार, वनप्लस मोबाइल फोन 12 जीबी रॅम तसेच 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो तसेच फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर मिळू शकतो. पावर बॅकअपसाठी नॉर्ड सीई 3 5जी मध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post महागड्या वनप्लसची जादू परवडणाऱ्या किंमतीत; OnePlus Nord CE 3 5G ची एक्सक्लूसिव्ह माहिती आली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/oneplus-nord-ce-3-5g-phone-renders-image-design-features-and-specifications-leaked/feed/ 0