POCO F5 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 01 May 2023 09:31:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 POCO F5 ची किंमत लाँचपूर्वीच आली समोर; 9 मेला होणार भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-price-in-india-leak-before-9-may-launch/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-price-in-india-leak-before-9-may-launch/#respond Mon, 01 May 2023 09:31:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20600 पोको कंपनी येत्या 9 मेला भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचा नवीन मोबाइल फोन POCO F5 लाँच करणार आहे. हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 2 प्रोसेसरसह येणारा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल. या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स व फीचर्स ब्रँडनं शेयर केले आहेत, परंतु आज फोन लाँचपूर्वीच पोको एफ5 ची किंमत इंटरनेटवर लीक झाला आहे. पोको एफ5 ची किंमत […]

The post POCO F5 ची किंमत लाँचपूर्वीच आली समोर; 9 मेला होणार भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा फोन 9 मेला भारतात लाँच होईल.
  • याची किंमत 30,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते.
  • फोनची इफेक्टिव प्राइस 26,000 रुपये असू शकते.

पोको कंपनी येत्या 9 मेला भारतात आपल्या ‘एफ’ सीरीजचा नवीन मोबाइल फोन POCO F5 लाँच करणार आहे. हा क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7+ जेन 2 प्रोसेसरसह येणारा भारतातील पहिला स्मार्टफोन असेल. या फोनचे काही स्पेसिफिकेशन्स व फीचर्स ब्रँडनं शेयर केले आहेत, परंतु आज फोन लाँचपूर्वीच पोको एफ5 ची किंमत इंटरनेटवर लीक झाला आहे.

पोको एफ5 ची किंमत

टिपस्टर अभिषेक यादवनं आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून पोको एफ5 5जी फोनची किंमत लीक केली आहे. सविस्तर शेयर करत अभिषेकनं दावा केला आहे की या मोबाइल फोनची किंमत भारतात 30,000 रुपयांपेक्षा कमी असेल. तसेच ऑफर्स व डिस्काउंट नंतर या फोनचा इफेक्टिव्ह प्राइस 26,000 रुपयांच्या आसपास होऊ शकते. फोनची खरी किंमत किती असेल हे मात्र 9 मेला स्पष्ट होईल. हे देखील वाचा: WhatsApp घेऊन येत आहे नवीन आणि दमदार फीचर; लवकरच व्हॉइस नोट वाचता देखील येणार

पोको एफ5 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.67″ FHD+ Display
  • 120Hz Refresh Rate

POCO F5 संबंधित रिपोर्ट्स व लीक्सनुसार, हा स्मार्टफोन 6.67 इंचाच्या मोठ्या स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनवर चालेल. हा पंच-होल स्टाईल डिस्प्ले असेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. समोर आलेल्या फोटोमध्ये फोनचा बॅक पॅनल खूप चमकदार दाखवण्यात आला आहे.

  • 969,903 ANTUTU Score
  • Qualcomm Snapdragon 7+ Gen 2

कंपनीनं खुलासा केला आहे की पोको एफ5 क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 2 चिपसेटसह लाँच होईल. तसेच 2.92गीगाहर्ट्ज पर्यंतचा क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. विशेष म्हणजे पोको एफ5 ला 969,903 एनटूटू बेंचमार्क स्कोर मिळाला आहे. हा फोन 8जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो.

  • 64MP Triple camera
  • 16MP Selfie camera

फोटोग्राफीसाठी POCO F5 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. समोर आलेल्या माहितीनुसार याच्या बॅक पॅनलवर ओआयएस फीचर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाईल, जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या पोको फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. हे देखील वाचा: Realme GT Neo 3T वर मोठा डिस्काउंट; फ्लिपकार्टवर मिळतेय ऑफर

  • 67W charging
  • 5,000mAh battery

पोको एफ5 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच ही बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी पोको एफ5 5जी फोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येऊ शकतो.

The post POCO F5 ची किंमत लाँचपूर्वीच आली समोर; 9 मेला होणार भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-price-in-india-leak-before-9-may-launch/feed/ 0
64 MP कॅमेरा आणि 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह लाँच होईल POCO F5, पाहा संपूर्ण माहिती https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-and-67w-fast-charging-featured-poco-f5-details-leaked-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-and-67w-fast-charging-featured-poco-f5-details-leaked-exclusive/#respond Thu, 27 Apr 2023 05:46:08 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20504 पोको ब्रँड आपल्या एफ सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीनुसार, या सीरीजमध्ये दोन मॉडेल-पोको एफ5 आणि पोको एफ5 प्रो येतील. परंतु भारतात 9 मेला वॅनिला व्हेरिएंट येईल. तर, ग्लोबली दोन्ही फोन्स सादर केले जातील. आता 91मोबाइल्स हिंदीला पोको एफ5 ची एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. ही माहिती भारतातील प्रसिद्ध टिप्सटर सुधांशुनं लीक केली आहे […]

The post 64 MP कॅमेरा आणि 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह लाँच होईल POCO F5, पाहा संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • पंच होल डिजाइनसह बेजल लेस डिस्प्ले मिळेल.
  • 5,000 एमएएचची मोठी बॅटरी मिळू शकते.
  • 9 मेला भारतात लाँच होईल हा फोन.

पोको ब्रँड आपल्या एफ सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीनुसार, या सीरीजमध्ये दोन मॉडेल-पोको एफ5 आणि पोको एफ5 प्रो येतील. परंतु भारतात 9 मेला वॅनिला व्हेरिएंट येईल. तर, ग्लोबली दोन्ही फोन्स सादर केले जातील. आता 91मोबाइल्स हिंदीला पोको एफ5 ची एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. ही माहिती भारतातील प्रसिद्ध टिप्सटर सुधांशुनं लीक केली आहे ज्यात फोनच्या फोटोसह स्पेसिफिकेशनचा देखील समावेश आहे.

पोको एफ5 ची डिजाइन

Poco F5 ची डिजाइन पाहता, फ्रंटला स्क्रीनवर पंच कटआउट मिळेल ज्यावर सेल्फी कॅमेरा आहे. तर स्क्रीनच्या चारही बाजूंना खूप बारीक बेजल आहेत. साइड पॅनलवर पावर बटन आणि वाॅल्यूम राॅकर देण्यात आला आहे.

तर मागील पॅनलवर दोन मोठे आणि एक छोटं वर्तुळ आहे, ज्यात रियर कॅमेरा उपलब्ध आहे. जवळच तुम्हाला एलईडी फ्लॅश मिळेल आणि खाली पोकोची ब्रँडिंग आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा फोन सफेद आणि काळ्या रंगसह उपलब्ध होईल. दोन्ही कलर ऑप्शनमध्ये बॅक पॅनलवर तुम्हाला वेगळा पॅटर्न मिळेल. हे देखील वाचा: आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर

पोको एफ5 चे स्पेसिफिकेशन

  • मिळालेल्या माहितीनुसार पोको एक5 देखील कंपनी प्रो मॉडेल प्रमाणे स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन2 प्रोसेसरसह सादर करू शकते.
  • तसेच फोनमध्ये तुम्हाला 6.67 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. महत्वाची बाब अशी की कंपनी अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर करणार आहे.
  • म्हणजे तुम्हाला डिस्प्ले क्वॉलिटी चांगली मिळणार आहे आणि जोडीला फोनमध्ये 120 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेट मिळेल.
  • कॅमेरा पाहता पोको एफ5 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल.
  • फोनचा मेन कॅमेरा 64 एमपीचा असेल तर जोडीला 8 एमपीचा वाइड अँगल आणि 2 एमपीचा मॅक्रो सेन्सर कंपनी देऊ शकते. त्याचबरोबर 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा फ्रंटला मिळेल.
  • हे देखील वाचा: Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक

  • पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह 5,000 एमएएचची बॅटरी मिळेल.
  • पोको एफ5 ची संभाव्य किंमत

    सुधांशुकडून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन कंपनी रेडमी नोट 12 प्रो प्लस पेक्षा जास्त किंमतीत सादर करू शकते. म्हणजे फोनची लाँच प्राइस 30 हजार रुपयांच्या देखील वर जाऊ शकते.

    The post 64 MP कॅमेरा आणि 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह लाँच होईल POCO F5, पाहा संपूर्ण माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/64mp-camera-and-67w-fast-charging-featured-poco-f5-details-leaked-exclusive/feed/ 0
    POCO F5 होणार आहे भारतात लाँच! स्पेसिफिकेशन्स आले समोर https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-specifications-in-hindi-launch-soon-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-specifications-in-hindi-launch-soon-in-india/#respond Wed, 19 Apr 2023 11:29:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20360 POCO F5 आणि POCO F5 Pro बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की भारतीय बाजारात पोको एफ5 लाँच होईल परंतु एफ5 प्रो येणार नाही. कंपनीच्या भारतीय अधिकाऱ्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून हिंट दिली आहे की शाओमी सब-ब्रँड लवकरच आपल्या ‘एफ’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. तसेच आता […]

    The post POCO F5 होणार आहे भारतात लाँच! स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • पोको इंडियाच्या कंट्री हेडनं POCO F5 चा लाँच टीज केला आहे.
    • गिकबेंचवर देखील हा एफ सीरिजचा फोन लिस्ट झाला आहे.
    • लवकरच हा स्मार्टफोन भारतीय बाजारात लाँच होऊ शकतो.

    POCO F5 आणि POCO F5 Pro बद्दल आतापर्यंत अनेक लीक्स समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की भारतीय बाजारात पोको एफ5 लाँच होईल परंतु एफ5 प्रो येणार नाही. कंपनीच्या भारतीय अधिकाऱ्यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून हिंट दिली आहे की शाओमी सब-ब्रँड लवकरच आपल्या ‘एफ’ सीरीजचा नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. तसेच आता हा मोबाइल फोन बेंचमार्किंग साइटवर देखील लिस्ट झाला आहे.

    पोको इंडियाचे कंट्री हेड हिमांशु टंडन यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून POCO F5 लाँच टीज केला आहे. या ट्वीटमध्ये ‘Fa5t’ लिहिण्यात आलं आहे जो एफ5 कडे इशारा करतो. ताईच गीकबेंचवर हा मोबाइल Xiaomi 23049PCD8I मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे ज्यात ‘आय’ अल्फाबेट फोनच्या इंडियन मॉडेलसाठी आहे. या दोन्ही नवीन अपडेट्सनंतर अंदाज लावला जात आहे की कंपनी लवकरच भारतात हा स्मार्टफोन सादर करू शकते.

    पोको एफ5 चे स्पेसिफिकेशन्स

    • Qualcomm Snapdragon 7+ Gen 2
    • Android 13
    • 8GB RAM

    POCO F5 गीकबेंचवर क्लॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन 2 चिपसेटसह दाखवण्यात आला आहे ज्यात 2.92गीगाहर्ट्ज पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसरचा समावेश करण्यात आला आहे. तसेच या लिस्टिंगमध्ये फोनचा 8जीबी रॅम व्हेरिएंट देखील समोर आला आहे. गीकबेंचवर हा पोको फोन अँड्रॉइड 13 ओएससह दाखवण्यात आला आहे.

    • 6.67″ FHD+ Display
    • 120Hz Refresh Rate

    फोनचे अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता POCO F5 स्मार्टफोन 6.67 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो फुलएचडी+ पिक्सल रिजोल्यूशनवर काम करेल. ही स्क्रीन पंच-होल स्टाईलसह येईल ज्यावर 120हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट मिळू शकतो.

    • 64MP Triple camera
    • 16MP Selfie camera

    POCO F5 मध्ये फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. समोर आलेल्या माहितीनुसार फोनच्या बॅक पॅनलवर ओआयएस फीचर असलेला 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिला जाऊ शकतो. जोडीला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर असू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या पोको फोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

    • 67W charging
    • 5,000mAh battery

    बॅटरी सेग्मेंट पाहता पावर बॅकअपसाठी पोको एफ5 मध्ये 5,000एमएएच बॅटरी असल्याचं समोर आलं आहे. तसेच बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी हा मोबाइल फोन 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकतो.

    The post POCO F5 होणार आहे भारतात लाँच! स्पेसिफिकेशन्स आले समोर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-specifications-in-hindi-launch-soon-in-india/feed/ 0
    OnePlus च्या तोडीचा स्मार्टफोन येतोय भारतात; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत POCO F5 येणार बाजारात https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-india-launch-price-specifications-details/ https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-india-launch-price-specifications-details/#respond Wed, 12 Oct 2022 08:56:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13911 शाओमी आपल्या सब ब्रँड पोकोच्या एफ सीरिज अंतर्गत कमी किंमतीत वनप्लस सारख्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना टक्कर देतील असे हँडसेट सादर करते. यातील POCO F4 5G Phone भारतात 23,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे, जो Qualcomm Snapdragon 870 चिपसेट, 64MP camera, 120Hz AMOLED डिस्प्ले तसेच 67W Sonic Charging सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. शक्तिशाली पोको एफ4 5जी च्या यशानंतर […]

    The post OnePlus च्या तोडीचा स्मार्टफोन येतोय भारतात; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत POCO F5 येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    शाओमी आपल्या सब ब्रँड पोकोच्या एफ सीरिज अंतर्गत कमी किंमतीत वनप्लस सारख्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सना टक्कर देतील असे हँडसेट सादर करते. यातील POCO F4 5G Phone भारतात 23,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे, जो Qualcomm Snapdragon 870 चिपसेट, 64MP camera, 120Hz AMOLED डिस्प्ले तसेच 67W Sonic Charging सारख्या स्पेसिफिकेशन्सला सपोर्ट करतो. शक्तिशाली पोको एफ4 5जी च्या यशानंतर आता कंपनी या स्मार्टफोनचा उत्तराधिकारी POCO F5 लाँच करण्याची तयारी करत आहे. पोको एफ5 स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइटवर लिस्ट झाला आहे, लवकरच पोको एफ5 भारतात लाँच होईल.

    POCO F5 India Launch

    पोको एफ5 स्मार्टफोन IMEI database मध्ये स्पॉट करण्यात आहे जिथे हा मोबाइल फोन 23013RK75G आणि 23013PC75I मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. यातील एक मॉडेल ग्लोबल व्हर्जन तर दुसरा मॉडेल इंडियन व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. हे सर्टिफिकेशन समोर आल्यानंतरPOCO F5 स्मार्टफोन लवकरच बाजारात येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे, तसेच दुसरीकडे कंपनी पोको एफ5 ग्लोबल मंचावर सादर केल्यानंतर जास्त वेळ न दवडता भारतीय बाजारात देखील सादर करेल, अशी चर्चा देखील सुरु झाली आहे. हे देखील वाचा: Jio आणि Airtel चं साम्राज्य धोक्यात! Adani कंपनीला मिळालं टेलीकॉम सर्व्हिसचं लायसन्स

    POCO F5 India Launch Price Specifications Details

    POCO F5 Specifications

    पोको एफ5 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता, समोर आलेल्या माहिती व लीक्स नुसार हा मोबाइल फोन 2के अ‍ॅमोलेड डिस्प्लेवर लाँच केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. या फोनच्या स्क्रीन मध्ये 1000निट्स ब्राइटनेस दिली जाऊ शकते. तसेच लीकनुसार प्रोसेसिंगसाठी POCO F5 मध्ये सर्वात दणकट Qualcomm Snapdragon 8+ Gen1 processor दिला जाईल. हा पोको फोन 12जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो.

    POCO F4 5G चे स्पेसिफिकेशन्स

    जाता जाता पोको एफ4 5जी वर देखील एक नजर टाकूया. हा स्मार्टफोन 6.67 इंचाच्या फुलएचडी+ ई4 अ‍ॅमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 395पीपीआय तसेच 1300निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या स्मार्टफोनमध्ये 3.2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 870 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा पोको फोन एड्रेनो 650 जीपीयूला सपोर्ट करतो. POCO F4 5G फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन 3जीबी पर्यंतच्या अ‍ॅडिशनल टर्बो रॅमसह येतो. हे देखील वाचा: Jio चा टेंशन वाढलं! BSNL नं आणला भन्नाट प्लॅन; स्वस्तात 30 दिवसांसाठी डेली 2GB डेटा आणि फ्री कॉलिंग

    POCO F5 India Launch Price Specifications Details

    फोटोग्राफीसाठी पोको एफ4 5जी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एफ/1.8 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तथा 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी POCO F4 5G फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी पोको एफ4 5जी फोन 4,500mAh Battery ला सपोर्ट करतो जी 67W sonic charging टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

    लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

    The post OnePlus च्या तोडीचा स्मार्टफोन येतोय भारतात; खिशाला परवडणाऱ्या किंमतीत POCO F5 येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/poco-f5-india-launch-price-specifications-details/feed/ 0