Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक

Highlights

  • Realme 11 सीरीजच्या चायना लाँच डेटचा ऑफिशियल खुलासा करण्यात आला आहे.
  • सीरीजमध्ये Realme 11, 11 Pro आणि 11 Pro+ चा समावेश असू शकतो.
  • फोन्स लाँचपूर्वीच अनेक सर्टिफिकेशन्स साइट्सवर समोर आले आहेत.

Realme ने अधिकृतपणे रियलमी 11 सीरीजच्या लाँच डेटचा खुलासा केला आहे. ब्रँड नुसार, ही नवीन सीरीज चीनमध्ये 10 मे 2023 लाँच केली जाईल. तसेच आशा आहे की Realme 11 series मध्ये तीन फोन (Realme 11, Realme 11 Pro, आणि Realme 11 Pro+) सादर केले जाऊ शकतात. तसेच तिन्ही स्मार्टफोन्स काही दिवसांपूर्वी चिनमधील 3सी सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसले होते.

वीबोवरून लाँच डेटचा खुलासा

  • Realme नं चीनच्या सोशल मीडिया साइट Weibo वरील अधिकृत अकाऊंटवरून माहिती दिली आहे.
  • कंपनीनं एक पोस्टर शेयर करून खुलासा केला आहे की Realme 11 series चीनमध्ये 10 मेला सादर केली जाईल.
  • ब्रँडचा दावा आहे की रियलमी 11 सीरीजच्या फोन्समध्ये शानदार फोटोग्राफीसाठी कॅमेरा मिळतील.
  • 100 वॉट पर्यंत मिळू शकते फास्ट चार्जिंग सपोर्ट

    Realme 11, Realme 11 Pro आणि Realme 11 Pro+ डिवाइस अलीकडेच Chinese 3C certification website वर देखील दिसला होता. 3C रेकॉर्डनुसार, Realme 11 (मॉडेल नंबर Realme RMX3751) मध्ये 33W फास्ट चार्जिंग असेल. तसेच, Realme 11 Pro (मॉडेल नंबर Realme RMX3770) मध्ये 67W फास्ट चार्जिंग आणि Realme 11 Pro+ (मॉडेल नंबर Realme RMX3740) मध्ये 100W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असेल. हे देखील वाचा: Vivo X90 आणि Vivo X90 Pro ची दणक्यात एंट्री; 12GB RAM सह मिळतोय शानदार कॅमेरा

    रियलमी 11 प्रो आणि प्रो+ 5जी चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • लीक्स नुसार Realme 11 Pro 5G तसेच Realme 11 Pro+ 5G मध्ये 2412 × 1080 पिक्सल रेजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा मोठा पंच-होल डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसिंगसाठी रियलमी 11 प्रो आणि 11 प्रो प्लस दोन्ही मॉडेल्समध्ये मीडियाटेकचा नवीन डिमेनसिटी 7200 चिपसेट असल्याचं लीकमधून समोर आलं आहे.
  • रियलमी 11 प्रो 5जीचा व्हेरिएंट 6जीबी रॅम सपोर्टसह येऊ शकतो. तर प्रो प्लसचे देखील 4 मेमरी व्हेरिएंट्स बाजारात येऊ शकतात.
  • पावर बॅकअपसाठी Realme 11 Pro आणि Pro+ 5G दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते.
  • Realme 11 Pro+ 5G फोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्टसह 200 मेगापिक्सल प्रायमरी, 8 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सल सेन्सर असू शकतो.
  • हे देखील वाचा: आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर

  • Realme 11 Pro 5G मध्ये 100 मेगापिक्सल रियर कॅमेरा असल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here