64 MP कॅमेरा आणि 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह लाँच होईल POCO F5, पाहा संपूर्ण माहिती

Highlights

  • पंच होल डिजाइनसह बेजल लेस डिस्प्ले मिळेल.
  • 5,000 एमएएचची मोठी बॅटरी मिळू शकते.
  • 9 मेला भारतात लाँच होईल हा फोन.

पोको ब्रँड आपल्या एफ सीरीजमध्ये नवीन स्मार्टफोन सादर करण्यासाठी तयार आहे. कंपनीनुसार, या सीरीजमध्ये दोन मॉडेल-पोको एफ5 आणि पोको एफ5 प्रो येतील. परंतु भारतात 9 मेला वॅनिला व्हेरिएंट येईल. तर, ग्लोबली दोन्ही फोन्स सादर केले जातील. आता 91मोबाइल्स हिंदीला पोको एफ5 ची एक्सक्लूसिव्ह माहिती मिळाली आहे. ही माहिती भारतातील प्रसिद्ध टिप्सटर सुधांशुनं लीक केली आहे ज्यात फोनच्या फोटोसह स्पेसिफिकेशनचा देखील समावेश आहे.

पोको एफ5 ची डिजाइन

Poco F5 ची डिजाइन पाहता, फ्रंटला स्क्रीनवर पंच कटआउट मिळेल ज्यावर सेल्फी कॅमेरा आहे. तर स्क्रीनच्या चारही बाजूंना खूप बारीक बेजल आहेत. साइड पॅनलवर पावर बटन आणि वाॅल्यूम राॅकर देण्यात आला आहे.

तर मागील पॅनलवर दोन मोठे आणि एक छोटं वर्तुळ आहे, ज्यात रियर कॅमेरा उपलब्ध आहे. जवळच तुम्हाला एलईडी फ्लॅश मिळेल आणि खाली पोकोची ब्रँडिंग आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार हा फोन सफेद आणि काळ्या रंगसह उपलब्ध होईल. दोन्ही कलर ऑप्शनमध्ये बॅक पॅनलवर तुम्हाला वेगळा पॅटर्न मिळेल. हे देखील वाचा: आता एकच WhatsApp नंबर वापरता येईल वेगवेगळ्या मोबाइल फोन्सवर, आलं दमदार फीचर

पोको एफ5 चे स्पेसिफिकेशन

  • मिळालेल्या माहितीनुसार पोको एक5 देखील कंपनी प्रो मॉडेल प्रमाणे स्नॅपड्रॅगन 7 प्लस जेन2 प्रोसेसरसह सादर करू शकते.
  • तसेच फोनमध्ये तुम्हाला 6.67 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो. महत्वाची बाब अशी की कंपनी अ‍ॅमोलेड पॅनलचा वापर करणार आहे.
  • म्हणजे तुम्हाला डिस्प्ले क्वॉलिटी चांगली मिळणार आहे आणि जोडीला फोनमध्ये 120 हर्ट्ज स्क्रीन रिफ्रेश रेट मिळेल.
  • कॅमेरा पाहता पोको एफ5 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लाँच केला जाईल.
  • फोनचा मेन कॅमेरा 64 एमपीचा असेल तर जोडीला 8 एमपीचा वाइड अँगल आणि 2 एमपीचा मॅक्रो सेन्सर कंपनी देऊ शकते. त्याचबरोबर 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा फ्रंटला मिळेल.
  • हे देखील वाचा: Realme 11 series ची लाँच डेट समजली, स्पेसिफिकेशन्सही झाले लीक

  • पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 67 वाॅट फास्ट चार्जिंगसह 5,000 एमएएचची बॅटरी मिळेल.
  • पोको एफ5 ची संभाव्य किंमत

    सुधांशुकडून मिळालेल्या माहितीनुसार हा फोन कंपनी रेडमी नोट 12 प्रो प्लस पेक्षा जास्त किंमतीत सादर करू शकते. म्हणजे फोनची लाँच प्राइस 30 हजार रुपयांच्या देखील वर जाऊ शकते.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here