Poco X3 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:26:35 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 पोकोने पुन्हा दाखवला दम, लॉन्च केला 5,160mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला POCO X3 Pro https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launch-in-india-with-8gb-ram-5160mah-battery-price-specification-sale/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launch-in-india-with-8gb-ram-5160mah-battery-price-specification-sale/#respond Tue, 30 Mar 2021 11:34:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10418 POCO X3 Pro एंडरॉयड 11 ओएस आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.9गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटवर चालतो.

The post पोकोने पुन्हा दाखवला दम, लॉन्च केला 5,160mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला POCO X3 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Poco X3 Pro स्मार्टफोन आज भारतीय बाजारात अधिकृतपणे लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीने गेल्या आठवड्यात Poco X3 Pro आणि Poco F3 स्मार्टफोन ग्लोबल टेक मंचावर सादर केले होते. भारतात आलेल्या पोको एक्स3 प्रो आणि ग्लोबल मंचावर आलेल्या फोनचे फीचर्स जवळपास एकसारखेच आहेत. पोको एक्स3 चा अपग्रेडेड वर्जन म्हणून लॉन्च केल्या गेलेल्या पोको एक्स3 प्रो ची टक्कर भारतात Realme 8 सीरीजशी होईल, जो काही दिवसांपूर्वीच लॉन्च केला गेला होता. (Poco x3 pro launch in india with 8gb ram 5160mah battery price specification sale)

Poco X3 Pro डिजाइन आणि डिस्प्ले

POCO X3 Pro कंपनीने पंच होल डिस्प्ले डिजाईनवर लॉन्च केला आहे त्यामुळे कंपनीने याला डॉटनॉच असे नाव दिले आहे. स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वर मध्यभागी सेल्फी कॅमेरा असलेला पंच होल देण्यात आला आहे जो बॉडी पार्टपासून थोडा दूर आहे. हा फोन कोर्निंग गोरिल्ला 6 ने प्रोटेक्टेड 6.67 इंचाच्या एफएचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सँपलिंग रेटला सपोर्ट करतो.

कॅमेऱ्यांची पावर

पोको एक्स3 प्रो मध्ये फोटोग्राफीसाठी क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअपमध्ये एलईडी फ्लॅशसह एफ/1.79 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा सोनी आईएमएक्स582 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा स्मार्टफोन एफ/1.22 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची वाइड एंगल लेंस, 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोनमध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा : ऑर्डर केला 4.7-इंचाचा ‘स्वस्त iPhone’, घरात आल्यावर बॉक्समधून निघाला 4 फुटाचा…

प्रोसेसरचा दम

POCO X3 Pro एंडरॉयड 11 ओएस आधारित मीयूआई 11 वर लॉन्च केला गेला आहे जो 2.9गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 860 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 640 जीपीयू आहे. हा फोन LPDDR4x रॅम आणि UFC 3.1 स्टोरेजला सपोर्ट करतो.

पावरफुल बॅटरी

ताकदवान स्पेसिफिकेशन्स सोबत पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये दमदार बॅटरी पण देण्यात आली आहे. POCO X3 Pro स्मार्टफोन 5,160एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते. कंपनीच्या दाव्यानुसार पोको एक्स3 प्रो ची बॅटरी एका चार्जमध्ये 11 तासांची गेमिंग आणि 18 तासांचा वीडियो प्लेबॅक देऊ शकते.

हे देखील वाचा : Samsung करत आहे स्वस्त फोन लॉन्च करण्याची मोठी तयारी, या किंमतीत Galaxy F02S लवकरच करेल भारतात एंट्री

किंमत

भारतात POCO X3 Pro च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत 18,999 रुपये आणि 8GB + 128GB मॉडेलची किंमत 20,999 रुपये आहे. हा Steel Blue, Graphite Black आणि Golden Bronze कलरमध्ये येतो. भारतात POCO X3 Pro चा पहिला सेल 6 एप्रिलला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टच्या माध्यमातून होईल. बॅंक ऑफरमध्ये ICICI बॅंक क्रेडिट कार्ड आणि EMI देवाणघेवाणीवर 1,000 रुपयांपर्यंतची सूट मिळत आहे.

The post पोकोने पुन्हा दाखवला दम, लॉन्च केला 5,160mAh बॅटरी आणि 8GB रॅम असलेला POCO X3 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-pro-launch-in-india-with-8gb-ram-5160mah-battery-price-specification-sale/feed/ 0
POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/#respond Thu, 07 Jan 2021 14:13:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9584 पोको इंडियाने चार स्मार्टफोन्सच्या एकूण सात वेरिएंट्सचे भाव कमी केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये POCO M2, POCO M2 Pro, POCO X3 आणि POCO C3 चा समावेश आहे.

The post POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO फॅन्ससाठी साल 2021 खास असणार आहे असे वाटत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात पोको इंडिया आपल्या फॅन्सना एका मागून एक आनांदाच्या बातम्या देत आहे. कालच बातमी समोर आली होती कि पोकोचा हिट स्मार्टफोन Poco F1 चा नवीन वर्जन Poco F2 आता लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. तसेच आज कंपनीने घोषणा केली आहे कि पोकोने आपल्या 7 स्मार्टफोनच्या किंमतीत कपात करत त्यांची किंमत 4,000 रुपयांपर्यंत कमी केली आहे.

पोको इंडियाने चार स्मार्टफोन्सच्या एकूण सात वेरिएंट्सचे भाव कमी केले आहेत. या स्मार्टफोन्स मध्ये POCO M2, POCO M2 Pro, POCO X3 आणि POCO C3 चा समावेश आहे. सर्वप्रथम पोको सी3 पाहता 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेला स्मार्टफोन आतापर्यंत 10,999 रुपयांमध्ये विकला जात होता पण कंपनीने याची किंमत 2,500 रुपयांनी कमी केली आहे. या प्राइस कट नंतर POCO C3 8,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

POCO M2 स्मार्टफोनचा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 14,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. पण आता कंपनीने या वेरिएंटची किंमत थेट 4,000 रुपयांनी कमी केली आहे त्यामुळे हा 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच 12,999 रुपये किंमत असलेल्या पोको एम2 च्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 3,000 रुपयांनी कमी होऊन आता 9,999 रुपये झाली आहे.

हे देखील वाचा : Poco F2 ची प्रतीक्षा संपणार, लवकरच होईल भारतात लॉन्च

POCO M2 Pro चे सर्व तिन्ही वेरिएंट्सच्या किंमतीत कंपनीने 4,000 रुपयांची कपात केली आहे. या फोनचा 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट आता 16,999 रुपयांच्या ऐवजी 12,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर 17,999 रुपयांमध्ये मिळणारा फोनच्या 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 13,999 तर 19,999 रुपये किंमत असलेला 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी होऊन 15,999 रुपये झाली आहे.

POCO X3 स्मार्टफोन ज्याचा 6 जीबी रॅम व 128 जीबी स्टोरेज असलेला वेरिएंट आतापर्यंत 20,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होता. त्यावर कंपनीने 3,000 रुपयांचा प्राइस कट केला आहे. या कपातीनंतर पावरफुल पोको एक्स3 17,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. पोकोचे हे सर्व स्मार्टफोन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर नवीन किंमतीसह विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

The post POCO ने दिला नवीन वर्षाची भेट, 7 स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी, 4000 रुपयांपर्यंत झाली किंमत कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-pro-poco-x3-poco-c3-smartphone-price-cut-discount-in-india-rs-4000/feed/ 0
6000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि 6.67 इंचाच्या पंच-होल डिस्प्ले सह Poco X3 भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-launched-in-india-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-launched-in-india-specs-price-sale-offer/#respond Tue, 22 Sep 2020 13:31:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8253 POCO X3 भारतीय बाजारात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

The post 6000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि 6.67 इंचाच्या पंच-होल डिस्प्ले सह Poco X3 भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO ने काही दिवसांपूर्वी आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला होता. या फोनने POCO M2 नावासह बाजारात प्रवेश केला होता जो फक्त 10,999 रुपयांच्या बेस किंमतीत देशात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्वस्त स्मार्टफोन नंतर आज पोकोने भारतात आपला अजून एक नवीन मोबाईल POCO X3 पण लॉन्च केला आहे. मोठी बॅटरी आणि पावरफुल कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन 16,999 रुपयांच्या बेस किंमतीत भारतात लॉन्च झाला आहे जो येत्या 29 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

डिस्प्ले

Poco X3 पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. पोको एक्स3 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला गेला आहे जो 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते आणि डायनामिक स्वीच टेक्नॉलॉजी सह येते.

प्रोसेसिंग

POCO X3 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 12 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा सर्वात वेगवान 4जी चिपसेट असलेला स्नॅपड्रॅगॉन 732G देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी पोको एक्स3 मध्ये एड्रेनो 618 जीपीयू आहे. गेमिंग आणि चार्जिंग करताना स्मूद प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये लिक्विड कूलिंग टेक्नोलॉजी प्लस देण्यात आली आहे.

कॅमेरा

POCO X3 च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.73 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा Sony IMX682 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

POCO X3 भारतात 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहेत. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुलचार्ज केल्यास हा फोन अडीच दिवस आरामात वापरता येईल. हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो जी फोन वेगाने चार्ज करण्यास सक्षम आहे. चांगली बाब अशी आहे कि 33वॉट चा चार्जर पोको एक्स3 सोबत दिला जाईल.

वेरिएंट्स

POCO X3 भारतीय बाजारात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दूसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरीला सपोर्ट करतो तथा सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Shadow Gray आणि Cobalt Blue कलर मध्ये 29 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

किंमत

6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 16,999 रुपये

6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 18,499 रुपये

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 19,999 रुपये

The post 6000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि 6.67 इंचाच्या पंच-होल डिस्प्ले सह Poco X3 भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-launched-in-india-specs-price-sale-offer/feed/ 0
8 जीबी रॅम सह समोर आला POCO X3, 19999 रुपये किंमतीसह 22 सप्टेंबरला होऊ शकतो लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-8-gb-ram-variant-on-google-play-console-india-launch-22-september-price-rs-19999/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-8-gb-ram-variant-on-google-play-console-india-launch-22-september-price-rs-19999/#respond Wed, 16 Sep 2020 13:22:38 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8182 POCO X3 गूगल प्ले कंसोल वर दिसला आहे जिथे या फोनच्या नावासोबतच इतर अनेक स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत.

The post 8 जीबी रॅम सह समोर आला POCO X3, 19999 रुपये किंमतीसह 22 सप्टेंबरला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. या ब्रँडने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात 10,999 रुपयांच्या बेस किंमतीसह आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च केला होता. आता असे समोर आले आहे कि कंपनी येत्या 22 सप्टेंबरला भारतात आपला अजून एक स्मार्टफोन POCO X3 पण लॉन्च करणार आहे. पोकोने या लॉन्चची माहिती पण दिली आहे पण त्याआधी या फोनचा भारतीय वेरिएंट गूगल वर लिस्ट झाला आहे.

POCO X3 गूगल प्ले कंसोल वर दिसला आहे जिथे या फोनच्या नावासोबतच इतर अनेक स्पेसिफिकेशन्स पण शेयर करण्यात आले आहेत. या लिस्टिंग मध्ये पोको एक्स3 8 जीबी रॅम सह दाखवण्यात आला आहे जो फोनचा भारतीय मॉडेल असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी ग्लोबल बाजारात लॉन्च झालेला पोको एक्स3 6 जीबी रॅम सह आला होता. त्यामुळे POCO X3 चा हा नवीन 8 जीबी रॅम असलेल्या वेरिएंट बद्दल बोलले जात आहे कि हा भारतीय मॉडेल असेल.

पोको इंडियाने अधिकृत ट्विटर अकाउंट वरून ट्विट केले आहे कि पोको एक्स3 स्मार्टफोन येत्या 22 सप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाईल. काही दिवसांपूर्वी आलेल्या लिक्स मध्ये दावा करण्यात आला होता याची किंमत 18,999 रुपये किंवा 19,999 रुपये असेल. या सगळ्याचा विचार केल्यास असे म्हणता येईल कि POCO X3 का 8 जीबी रॅम मॉडेल भारतात 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

POCO X3

पोकोच्या या नवीन फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.67-इंचाच्या फुल एचडी+ डॉट डिस्प्ले सह येतो. डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह सादर करण्यात आला आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 240 आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित MIUI 12 वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट वर चालतो.

ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह लॉन्च झाला आहे जी माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रिनो 618 जीपीयू देण्यात आला आहे. पोको एक्स 3 मध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली मोठी 5,160mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरी बाबत कंपनीचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यावर बॅटरी दोन दिवस चालेल. बॅटरी फुल चार्ज झाल्यावर 10 तास गेमिंग आणि 17 तास वीडियो प्लेबॅक टाइम मिळेल. डिवाइस फुल चार्ज करण्यासाठी एकूण 65 मिनिटांचा वेळ लागतो.

फोन मध्ये एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यातले चार मागे आणि एक सेल्फीसाठी फ्रंटला आहे. डिवाइसच्या मागे असलेल्या क्वाड कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात अपर्चर f/1.73 सह 64MP Sony IMX 682 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.2 सह 13 मेगापिक्सलचा 119 डिग्री अल्ट्रावाइड सेंसर, अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

The post 8 जीबी रॅम सह समोर आला POCO X3, 19999 रुपये किंमतीसह 22 सप्टेंबरला होऊ शकतो लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-8-gb-ram-variant-on-google-play-console-india-launch-22-september-price-rs-19999/feed/ 0
POCO X3 भारतात होऊ शकतो 22 सप्टेंबरला लॉन्च, एवढी असेल किंमत https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-might-launch-in-india-on-22-september-price-rs-19999/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-might-launch-in-india-on-22-september-price-rs-19999/#respond Tue, 15 Sep 2020 09:44:33 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8153 POCO X3 च्या लॉन्चची माहिती सध्या लीकच्या माध्यमातून समोर आली आहे कंपनीने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही.

The post POCO X3 भारतात होऊ शकतो 22 सप्टेंबरला लॉन्च, एवढी असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO ने गेल्याच आठवड्यात इंडियन मार्केट मध्ये आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च केला होता. हा फोन 10,999 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला गेला आहे जो आज पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. पोको एम2 च्या लॉन्च ईवेंटच्या वेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते कि पोको लवकरच भारतात आपला अजून एक स्मार्टफोन POCO X3 पण लॉन्च करेल. आता बातमी समोर येत आहे कि पोको एक्स3 येत्या 22 सप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

POCO X3 च्या लॉन्चची माहिती सध्या लीकच्या माध्यमातून समोर आली आहे कंपनीने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि पोको एक्स3 स्मार्टफोन येत्या 22 सप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन किती वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल याची माहिती तर समोर आली नाही पण लीकनुसार या फोनची किंमत भारतात 18,999 रुपये किंवा 19,999 रुपये असेल. असे असले तरी 91मोबाईल्सला POCO X3 ची लॉन्च डेट ठोस वाटत नाही.

हे देखील वाचा: 6GB रॅम असलेल्या Poco M2 आणि RealMe Narzo 10 मध्ये टक्कर: जाणून घ्या कोण आहे जास्त दमदार?

पोकोच्या या नवीन फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.67-इंचाच्या फुल एचडी+ डॉट डिस्प्ले सह येतो. डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह सादर करण्यात आला आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 240 आहे. हा फोन एंडरॉयड 10 आधारित MIUI 12 वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट वर चालतो.

ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह लॉन्च झाला आहे जी माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रिनो 618 जीपीयू देण्यात आला आहे. पोको एक्स 3 मध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली मोठी 5,160mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरी बाबत कंपनीचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यावर बॅटरी दोन दिवस चालेल. बॅटरी फुल चार्ज झाल्यावर 10 तास गेमिंग आणि 17 तास वीडियो प्लेबॅक टाइम मिळेल. डिवाइस फुल चार्ज करण्यासाठी एकूण 65 मिनिटांचा वेळ लागतो.

हे देखील वाचा: पोकोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी सह क्वॉड रियर कॅमेरा

फोन मध्ये एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यातले चार मागे आणि एक सेल्फीसाठी फ्रंटला आहे. डिवाइसच्या मागे असलेल्या क्वाड कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात अपर्चर f/1.73 सह 64MP Sony IMX 682 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.2 सह 13 मेगापिक्सलचा 119 डिग्री अल्ट्रावाइड सेंसर, अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

The post POCO X3 भारतात होऊ शकतो 22 सप्टेंबरला लॉन्च, एवढी असेल किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-might-launch-in-india-on-22-september-price-rs-19999/feed/ 0
पोकोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी सह क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-launched-in-india-price-rs-10999-6gb-ram-specs-sale/ https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-launched-in-india-price-rs-10999-6gb-ram-specs-sale/#respond Tue, 08 Sep 2020 12:24:08 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8039 POCO M2 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

The post पोकोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी सह क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
POCO ने कालच 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि 5,160एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन POCO X3 टेक मंचावर सादर केला आहे. हा स्मार्टफोन येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात पण लॉन्च केला जाईल ज्याची माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज पोकोने आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये आणला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन POCO M2 नावाने लॉन्च केला आहे जो येत्या 15 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर फक्त 10,999 रुपयांच्या बेस किंमतीत विक्रीसाठी उपलब्ध होईल.

POCO M2

पोको एम2 ब्रँडचा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता POCO M2 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला आहे ज्याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन पी2आई कोटेड आहे ज्यामुळे स्क्रीन पाणी आणि धुळीपासून वाचते. पोको एम2 स्मार्टफोन 6.53 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो.

POCO M2 एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 12 ला पण सपोर्ट करेल. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट देण्यात आला आहे. मोबाईल गेमिंग लॅग फ्री व स्मूद बनवण्यासाठी हा फोन हायपर इंजन गेमिंग टेक्नोलॉजी सह येतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी52 जीपीयू ला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता POCO M2 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर मधोमध वर्टिकल शेप मध्ये आहे. या सेटअप मध्ये फ्लॅश लाईट सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

POCO M2 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक सोबतच फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी पोको एम2 मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

वेरिएंट्स व किंमत

POCO M2 दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता पोको एम2 चा 6 जीबी + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 6 जीबी + 128 जीबी वेरिएंट 12,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. हा फोन Blue, Black आणि Red कलर मध्ये विकत घेता येईल.

The post पोकोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी सह क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-m2-launched-in-india-price-rs-10999-6gb-ram-specs-sale/feed/ 0
5,160mAh बॅटरी आणि 64MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Poco X3, जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-launched-with-64mp-quad-camera-and-5160mah-battery-know-price-sale-detail/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-launched-with-64mp-quad-camera-and-5160mah-battery-know-price-sale-detail/#respond Mon, 07 Sep 2020 14:17:16 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8030 Poco X3 NFC कंपनीने Shadow Gray आणि Cobalt Blue कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे.

The post 5,160mAh बॅटरी आणि 64MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Poco X3, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Poco X3 NFC आज एक वर्चुअल इवेंट मध्ये अधिकृतपणे लॉन्च केला गेला आहे. लॉन्चच्या आधी Xiaomi च्या स्पिन-ऑफ ब्रँड पोकोच्या या फोन बाबत अनेक लीक व माहिती समोर येत होती, ज्यावर आज पूर्णविराम देण्यात आला आहे. पोको एक्स3 कंपनीच्या एक्स सीरीजचा पहिला फोन आहे, जो ग्लोबली सादर केला गेला आहे. चला जाणून घेऊया या फोनच्या डिजाइन, किंमत आणि फुल स्पेसिफिकेशन्स बाबत.

डिजाइन

कंपनी म्हणत आहे कि पोको एक्स 3 एनएफसी ‘फिनिश लाइन’ डिजाइन वर सादर केला गेला आहे. डिवाइस छोट्या डॉट डिस्प्ले सह येतो. डिवाइसच्या बॉटमला 3.5एमएम हेडफोन जॅक, टाइप-सी चार्जिंग पोर्ट, स्पीकर ग्रिल आणि माइक आहे. डिवाइसच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर बटन आणि पावर बटन आहे. फोनचा पावर बटनच फिंगरप्रिंट सेंसरचे काम करतो. फोनच्या समोरच्या बाजूला गोरिल्ला ग्लास 5 चे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तर मागे “पॉलीकार्बोनेट” पॅनल आहे. मागे एक वर्तुळाकृती कॅमेरा मॉड्यूल आहे, ज्यात क्वाड कॅमेरा सेटअप सह एक एलईडी फ्लॅश आहे.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट देण्यात आला आहे. जो क्वालकॉम क्रियो 470 सीपीयू प्राइम कोर सह येतो ज्याच्या क्लॉक स्पीड 2.3 गीगाहर्ट्ज आहे. तसेच स्मूद गेमिंगसाठी यात एड्रिनो 618 जीपीयू देण्यात आला आहे. फोन मध्ये मल्टीटास्किंगसाठी 6GB रॅम LPDDR4X आणि स्टोरेजसाठी 128GB पर्यंत UFS 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे. स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512GB पर्यंत वाढवता येते. पोको एक्स3 एनएफसी मध्ये हाय एफिशिएंसी लिक्विड टेक्नोलॉजी 1.0 प्लसचा वापर करण्यात आला आहे.

फोन मध्ये 6.67-इंचाचा फुल एचडी+ डॉट डिस्प्ले आहे. डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह सादर करण्यात आला आहे, जायचा टच सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. Poco X3 NFC एंडरॉयड 10 MIUI 12 वर चाललो. पोको एक्स 3 मध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली मोठी 5,160mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरी बाबत कंपनीचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यावर बॅटरी दोन दिवस चालेल. फोनची बॅटरी फुल चार्ज झाल्यावर 10 तास गेमिंग आणि 17 तास वीडियो प्लेबॅक टाइम देते.

फोन मध्ये एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत ज्यातील चार मागे आणि एक सेल्फीसाठी फ्रंटला आहे. डिवाइसच्या मागे असलेल्या कॅमेरा सेटअप मध्ये अपर्चर f/1.73 सह 64MP Sony IMX 682 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.2 सह 13 मेगापिक्सलचा 119 डिग्री अल्ट्रावाइड सेंसर, अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

किंमत

Poco X3 NFC कंपनीने Shadow Gray आणि Cobalt Blue कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे. डिवाइसच्या 6जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत€229 (जवळपास 20,000 रुपये) आणि 6जीबी व 128जीबी वेरिएंटची किंमत €269 (जवळपास 24,000 रुपये) आहे. फोनची विक्री 8 सप्टेंबरला केली जाईल.

The post 5,160mAh बॅटरी आणि 64MP क्वाड कॅमेऱ्यासह आला Poco X3, जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-launched-with-64mp-quad-camera-and-5160mah-battery-know-price-sale-detail/feed/ 0
POCO X3 होत आहे 7 सप्टेंबरला लॉन्च, हा असेल जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट वर चालणारा फोन https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-nfc-to-launch-on-7-september-snapdragon-732g-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-nfc-to-launch-on-7-september-snapdragon-732g-specs-price/#respond Tue, 01 Sep 2020 11:55:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7936 POCO X3 ची लॉन्च डेट 7 सप्टेंबर घोषित झाली आहे. यादिवशी कंपनी 20:00 GMT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी लॉन्च ईवेंटचे अयोजन सुरु होईल.

The post POCO X3 होत आहे 7 सप्टेंबरला लॉन्च, हा असेल जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट वर चालणारा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि टेक ब्रँड POCO स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला नवीन डिवाईस आणण्याची तयारी करत आहे जो POCO X3 नावाने लॉन्च केला जाईल. आता पोकोने अधिकृतपणे फोनच्या लॉन्च डेटची माहिती दिली आहे. पोकोने ट्वीट करून घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 7 सप्टेंबरला आपला नवीन स्मार्टफोन POCO X3 टेक मंचावर सादर करेल. हा फोन पण ऑनलाईन लाईव स्ट्रीमच्या माध्यमातून लॉन्च केला जाईल.

POCO X3 ची लॉन्च डेट 7 सप्टेंबर घोषित झाली आहे. यादिवशी कंपनी 20:00 GMT म्हणजे भारतीय वेळेनुसार रात्री 1 वाजून 30 मिनिटांनी लॉन्च ईवेंटचे अयोजन सुरु होईल. पोको एक्स3 चा लॉन्च कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर लाईव स्ट्रीमिंगच्या माध्यमातून प्रक्षेपित केला जाईल. नावावरून समजले असलेच कि पोको एक्स3 यावर्षी फेब्रुवारी मध्ये भारतात लॉन्च झालेल्या POCO X2 स्मार्टफोनचा पुढील वर्जन असेल जो लेटेस्ट चिपसेट सह लॉन्च होईल.

पोको एक्स3 बाबत बोलले जात आहे कि हा स्मार्टफोन क्वॉलकॉम द्वारे अलीकडेच अनाउंस केल्या गेलेल्या स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 732जी वर लॉन्च केला जाऊ शकतो. त्याचबरोबर POCO X3 मध्ये 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला मोठा डिस्प्ले मिळू शकतो. चर्चा अशी आहे कि हा स्मार्टफोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल तसेच पोको एक्स3 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह बाजारात येऊ शकतो.

POCO X2

POCO X2 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67-इंचाच्या फुलएचडी+ डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. पोको ने आपला हा फोन 120हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेल्या स्क्रीन वर सादर केला आहे जी शानदार विजुअल एक्सपीरियंस देते. तसेच डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे. POCO X2 चा बॅक पॅनल पण गोरिल्ला ग्लासने कोटेड आहे.

POCO X2 कंपनीने क्वॉड रियर कॅमेऱ्याने सुसज्ज केला आहे, सोबतच हा डिवाईस डुअल पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये एकूण 6 कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत ज्यात 4 रियर कॅमेरा तसेच 2 सेल्फी कॅमेरे आहेत. सर्वात आधी फ्रंट कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर हा डिस्प्लेच्या उजवीकडे पंच-होल मध्ये आहे. POCO X2 चा प्राइमरी सेल्फी कॅमेरा सेंसर 20 मेगापिक्सलचा आहे तसेच सेकेंडरी सेल्फी कॅमेरा सेंसर 2 मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. पोको एक्स2 चा रियर कॅमेरा सेटअप पाहता इथे फ्लॅश लाईट सह चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. हा फोन 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी Sony IMX686 सेंसरला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे.

पोको एक्स2 एंडरॉयड 10 वर सादर झाला आहे जो मीयूआई 11 सह येतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 618 जीपीयूला सपोर्ट करतो. POCO X2 डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट बटण देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4500एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो जी 27वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

वीडियो

The post POCO X3 होत आहे 7 सप्टेंबरला लॉन्च, हा असेल जगातील पहिला स्नॅपड्रॅगॉन 732जी चिपसेट वर चालणारा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/poco-x3-nfc-to-launch-on-7-september-snapdragon-732g-specs-price/feed/ 0