POCO X3 भारतात होऊ शकतो 22 सप्टेंबरला लॉन्च, एवढी असेल किंमत

POCO ने गेल्याच आठवड्यात इंडियन मार्केट मध्ये आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च केला होता. हा फोन 10,999 रुपयांच्या बेस किंमतीत सादर केला गेला आहे जो आज पासून भारतात विक्रीसाठी उपलब्ध होईल. पोको एम2 च्या लॉन्च ईवेंटच्या वेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते कि पोको लवकरच भारतात आपला अजून एक स्मार्टफोन POCO X3 पण लॉन्च करेल. आता बातमी समोर येत आहे कि पोको एक्स3 येत्या 22 सप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

POCO X3 च्या लॉन्चची माहिती सध्या लीकच्या माध्यमातून समोर आली आहे कंपनीने अधिकृतपणे कोणतीही घोषणा केली नाही. लीक मध्ये दावा केला गेला आहे कि पोको एक्स3 स्मार्टफोन येत्या 22 सप्टेंबरला भारतात लॉन्च केला जाऊ शकतो. हा फोन किती वेरिएंट्स मध्ये लॉन्च होईल याची माहिती तर समोर आली नाही पण लीकनुसार या फोनची किंमत भारतात 18,999 रुपये किंवा 19,999 रुपये असेल. असे असले तरी 91मोबाईल्सला POCO X3 ची लॉन्च डेट ठोस वाटत नाही.

हे देखील वाचा: 6GB रॅम असलेल्या Poco M2 आणि RealMe Narzo 10 मध्ये टक्कर: जाणून घ्या कोण आहे जास्त दमदार?

पोकोच्या या नवीन फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 6.67-इंचाच्या फुल एचडी+ डॉट डिस्प्ले सह येतो. डिस्प्ले 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट सह सादर करण्यात आला आहे, ज्याचा टच सॅम्पलिंग रेट 240 आहे. हा फोन एंडरॉयड 10 आधारित MIUI 12 वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट वर चालतो.

ग्लोबल मार्केट मध्ये हा फोन 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह लॉन्च झाला आहे जी माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512GB पर्यंत वाढवता येते. ग्राफिक्ससाठी या फोन मध्ये एड्रिनो 618 जीपीयू देण्यात आला आहे. पोको एक्स 3 मध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली मोठी 5,160mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. या बॅटरी बाबत कंपनीचा दावा आहे कि एकदा चार्ज केल्यावर बॅटरी दोन दिवस चालेल. बॅटरी फुल चार्ज झाल्यावर 10 तास गेमिंग आणि 17 तास वीडियो प्लेबॅक टाइम मिळेल. डिवाइस फुल चार्ज करण्यासाठी एकूण 65 मिनिटांचा वेळ लागतो.

हे देखील वाचा: पोकोचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन POCO M2 लॉन्च, 6 जीबी रॅम आणि 5000एमएएच बॅटरी सह क्वॉड रियर कॅमेरा

फोन मध्ये एकूण 5 कॅमेरे देण्यात आले आहेत, त्यातले चार मागे आणि एक सेल्फीसाठी फ्रंटला आहे. डिवाइसच्या मागे असलेल्या क्वाड कॅमेरा सेटअप बद्दल बोलायचे तर यात अपर्चर f/1.73 सह 64MP Sony IMX 682 सेंसर आहे. तसेच फोन मध्ये अपर्चर f/2.2 सह 13 मेगापिक्सलचा 119 डिग्री अल्ट्रावाइड सेंसर, अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here