6000mAh बॅटरी, 64MP कॅमेरा आणि 6.67 इंचाच्या पंच-होल डिस्प्ले सह Poco X3 भारतात लॉन्च

POCO ने काही दिवसांपूर्वी आपला सर्वात स्वस्त स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला होता. या फोनने POCO M2 नावासह बाजारात प्रवेश केला होता जो फक्त 10,999 रुपयांच्या बेस किंमतीत देशात विक्रीसाठी उपलब्ध आहे. या स्वस्त स्मार्टफोन नंतर आज पोकोने भारतात आपला अजून एक नवीन मोबाईल POCO X3 पण लॉन्च केला आहे. मोठी बॅटरी आणि पावरफुल कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन 16,999 रुपयांच्या बेस किंमतीत भारतात लॉन्च झाला आहे जो येत्या 29 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

डिस्प्ले

Poco X3 पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फ्रंट पॅनल वर स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट देण्यात आला आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल आहे. पोको एक्स3 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला गेला आहे जो 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते आणि डायनामिक स्वीच टेक्नॉलॉजी सह येते.

प्रोसेसिंग

POCO X3 अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो मीयूआई 12 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा सर्वात वेगवान 4जी चिपसेट असलेला स्नॅपड्रॅगॉन 732G देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी पोको एक्स3 मध्ये एड्रेनो 618 जीपीयू आहे. गेमिंग आणि चार्जिंग करताना स्मूद प्रोसेसिंगसाठी फोन मध्ये लिक्विड कूलिंग टेक्नोलॉजी प्लस देण्यात आली आहे.

कॅमेरा

POCO X3 च्या फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर हा फोन क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.73 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा Sony IMX682 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 13 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

POCO X3 भारतात 6,000एमएएच च्या मोठ्या बॅटरी सह लॉन्च केला गेला आहेत. कंपनीचा दावा आहे कि एकदा फुलचार्ज केल्यास हा फोन अडीच दिवस आरामात वापरता येईल. हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो जी फोन वेगाने चार्ज करण्यास सक्षम आहे. चांगली बाब अशी आहे कि 33वॉट चा चार्जर पोको एक्स3 सोबत दिला जाईल.

वेरिएंट्स

POCO X3 भारतीय बाजारात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बेस वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दूसरा वेरिएंट 6 जीबी रॅम सह 128 जीबी मेमरीला सपोर्ट करतो तथा सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन Shadow Gray आणि Cobalt Blue कलर मध्ये 29 सप्टेंबर पासून फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल.

किंमत

6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 16,999 रुपये

6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 18,499 रुपये

8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 19,999 रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here