Realme Narzo 30 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 18 May 2021 12:01:34 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Realme Narzo 30 झाला लॉन्च, Redmi फोन्सला मिळेल आव्हान https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-launch-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-launch-price-specifications/#respond Tue, 18 May 2021 12:01:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10951 Realme ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपल्या Realme Narzo 30 सीरीजचे दोन स्मार्टफोन – Realme Narzo 30A आणि Narzo 30 Pro लॉन्च केले होते. आता कंपनीने या सीरीजचा स्टॅंडर्ड वर्जन Narzo 30 स्मार्टफोन लॉन्च अधिकृतपणे लॉन्च केला आहे. रियलमी नारजो 30 कंपनीने मलेशियाच्या मार्केटमध्ये सादर केला आहे. फोनच्या लॉन्चपूर्वी अनेक लीक्समध्ये याची माहिती समोर आली […]

The post 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Realme Narzo 30 झाला लॉन्च, Redmi फोन्सला मिळेल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपल्या Realme Narzo 30 सीरीजचे दोन स्मार्टफोन – Realme Narzo 30A आणि Narzo 30 Pro लॉन्च केले होते. आता कंपनीने या सीरीजचा स्टॅंडर्ड वर्जन Narzo 30 स्मार्टफोन लॉन्च अधिकृतपणे लॉन्च केला आहे. रियलमी नारजो 30 कंपनीने मलेशियाच्या मार्केटमध्ये सादर केला आहे. फोनच्या लॉन्चपूर्वी अनेक लीक्समध्ये याची माहिती समोर आली होती. पण, आता अधिकृतपणे हा हँडसेट लॉन्च केल्यानंतर त्या सर्व लीक्सवर पूर्णविराम लागला आहे. (Realme Narzo 30 launch price specifications)

Realme Narzo 30 ची डिजाइन

Realme Narzo 30 स्मार्टफोनमध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कट आउट डावीकडे वरच्या बाजूला आहे. त्याचबरोबर रियलमीच्या या फोनमध्ये मागे रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. तर, मागे racetrack-inspired chevron स्ट्रिप दिसत आहे. Narzo 30 स्मार्टफोनचा बॅक पॅनल प्लास्टिकचा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : SID 2021 मध्ये सॅमसंग आणि LG चे असेल हवा, Samsung मल्टी फोल्ड डिस्प्ले पॅनल S-Foldable येईल समोर

Realme Narzo 30 की बॅटरी

कंपनीने Realme Narzo 30 सह 30वॉट डार्ट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली आहे. कंपनीचा दावा आहे कि या टेक्नॉलॉजीने फोन फक्त 25 मिनिटांत 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो. 100 टक्के चार्जसाठी फक्त 65 मिनिटांचा वेळ लागेल. फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. फोनची हि मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी टाइप-सी चार्जिंग प्वाइंटचा ऑप्शन मिळेल.

Realme Narzo 30 चा कॅमेरा

Realme 30 मध्ये ट्रिपल कॅमेरा आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेंसर देण्यात आला आहे. सर्वप्रथम मागील कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाले तर यात अपर्चर f/1.8 सह 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा हाई-रेजोल्यूशन असलेला वाइड अँगल प्राइमरी देण्यात आला आहे. फोनमध्ये 2MP B&W पोर्टेट कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP 4cm मॅक्रो सेंसर आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला f/2.1 अपर्चरसह 16MP चा Sony IMX471 सेंसर देण्यात आला आहे. रियर कॅमेऱ्यांचे मोड पाहता यात सुपर नाइटस्केप, स्टाररी मोड, पॅनोरमिक व्यू, एक्सपर्ट मोड, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, एचडीआर, अल्ट्रा मोड, अल्ट्रा माइक्रो मोड, एआय ब्यूटी, फिल्टर, क्रोमा बूस्ट, स्लो मोशन, बोकेह इफेक्ट आहेत.

Realme Narzo 30 battery

Realme Narzo 30 चा सुंदर डिस्प्ले

फोनचा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 120 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटने सुसज्ज आहे. 90Hz अल्ट्रा स्मूद डिस्प्ले जुन्या 60Hz पेक्षा 50 टक्के जास्त रिफ्रेश रेटसह येतो. तसेच Realme 30 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 20:9 रेश्यो, 2400x1080P FHD+ रेजोल्यूशन आणि 90.5% स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह येतो.

प्रोसेसिंग पावर

रियलमी नारजो 30 मध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे, जिला AnTuTu मध्ये 30W+ सुपर हाई बेंचमार्क मिळाले आहेत. तसेच, हा प्रोसेसर 12nm प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. तसेच हे दोन्ही प्रोसेसर दोन हाई परफॉर्मन्स Cortex-A76 cores at up to 2.05GHz आणि सहा हाई-एफिशिएंसी Cortex-A55 सह येतात. ग्राफिक्ससाठी यात 900MHz Mali-G76GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 6GB LPPDDR4x रॅम आणि 128GB (UFS 2.1) स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Instagram पासून राहायचे आहे का दूर मग अश्याप्रकारे करा तुमचे अकाउंट डिलीट

Realme Narzo 30 display

Realme Narzo 30 ची किंमत

realme narzo 30 कंपनीने Racing Blue आणि Racing Silver कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RM 799 (जवळपास 14,150 रुपये) आहे. परंतु, एका ऑफरअंतगर्त फोन मर्यादित कालावधीसाठी RM 699 (जवळपास 12,400 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

The post 5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Realme Narzo 30 झाला लॉन्च, Redmi फोन्सला मिळेल आव्हान first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-launch-price-specifications/feed/ 0
Realme Narzo 30 च्या लॉन्चपूर्वी समोर आला व्हिडीओ आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्टये https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-design-and-specifications-leaked-ahead-launching/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-design-and-specifications-leaked-ahead-launching/#respond Mon, 10 May 2021 14:35:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10873 Realme Narzo 30 स्मार्टफोनमध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे.

The post Realme Narzo 30 च्या लॉन्चपूर्वी समोर आला व्हिडीओ आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्टये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्या महिन्यात भारतात Realme Narzo 30 सीरीजचे दोन स्मार्टफोन – Realme Narzo 30A आणि Narzo 30 Pro लॉन्च केले होता. आता कंपनी या सीरीजचा स्टॅंडर्ड Narzo 30 स्मार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. Realme ने या आगामी स्मार्टफोनच्या लॉन्चसाठी अधिकृत घोषणा पण केली आहे. Realme Narzo 30 स्मार्टफोन मलेशियामध्ये 18 मेला लॉन्च होणार आहे. Mark Yeo Tech Review ने रियलमीच्या या अपकमिंग स्मार्टफोनचा अनबॉक्सिंग व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये रियलमीच्या अपकमिंग स्मार्टफोनचे स्पेसिफिकेसन्स पण सांगण्यात आले आहेत. (Realme Narzo 30 design and specifications leaked ahead launching)

Realme Narzo 30: डिजाइन

Realme Narzo 30 स्मार्टफोनमध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट देण्यात आला आहे. त्याचबरोबर रियलमीच्या या फोनमध्ये आयताकृती कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. Narzo 30 स्मार्टफोनचा बॅक पॅनल प्लास्टिकचा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

Realme Narzo 30 चा फोटो

Realme Narzo 30: स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 30 स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आणि ब्राइटनेस 580 निट्स आहे. Narzo 20 शी तुलना केल्यास रियलमीने डिस्प्लेच्या बाबतीत मोठा बदल केला आहे. कंपनीने Narzo 20 मध्ये HD+ डिस्प्ले दिला आहे.

हे देखील वाचा : Xiaomi Redmi Note 10S स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स लॉन्चपूर्वीच लीक, जाणून घ्या या दमदार स्मार्टफोनची वैशिष्ट्ये

लीक व्हिडीओनुसार, Narzo 30 स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G95 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीने याआधी हा चिपसेट मिडरेंज स्मार्टफोन Realme 8 मध्ये पण दिला होता. तसेच शाओमीच्या Redmi Note 10 5G मध्ये पण हाच चिपसेट आहे. Geekbench लिस्टिंगनुसार रियलमीचा हा स्मार्टफोन 6GB RAM सह सादर केला जाऊ शकतो, पण कंपनी 4GB वेरिएंट पण सादर करू शकते. Narzo 30 कंपनीचा Narzo सीरीजचा पहिला फोन असेल जो Android 11 वर आधारित Realme UI 2.0 वर रन करेल.

Realme Narzo 30

हे देखील वाचा : वारंवार रिचार्जचा त्रास कमी करतील Jio चे हे प्लान, खर्च करावे लागतील 120 रुपयांपेक्षा कमी आणि मिळेल 740GB पर्यंतचा डेटा

Narzo 30 स्मार्टफोनमध्ये कंपनी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देईल. या फोनचा प्राइमेरी कॅमेरा 48MP चा आहे. या फोनचा दुसरा सेन्सर 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा ब्लॅक अँड व्हाइट लेंस पण देण्यात आली आहे. रियलमीच्या या फोनच्या फ्रंटला 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Narzo 30 स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे. हि बॅटरी 30W फास्ट चार्जला सपोर्ट करते. रियलमीच्या या फोनमध्ये 3.5mm चा ऑडियो जॅक, चार्जिंगसाठी USB Type-C पोर्ट, micro-SD कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. स्पेसिफिकेशन्सच्या आधारावर समजले आहे कि रियलमीचा हा स्मार्टफोन Realme 7 सारखा आहे. Realme 7 स्मार्टफोन कंपनीने याच स्क्रीन साइज, प्रोसेसर, कॅमेरा आणि बॅटरीसह सादर केला होता.

The post Realme Narzo 30 च्या लॉन्चपूर्वी समोर आला व्हिडीओ आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या वैशिष्टये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-design-and-specifications-leaked-ahead-launching/feed/ 0
24 फेब्रुवारीला भारतात एंट्री करतील Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-5g-series-launch-date-india-24-february-twitter-madhav-seth/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-5g-series-launch-date-india-24-february-twitter-madhav-seth/#respond Thu, 18 Feb 2021 11:31:56 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10077 XDA Developers ला दिलेल्या आपल्या इंटरव्यू मध्ये Realme चे CEO Madhav Sheth यांनी माहिती दिली आहे कि Narzo 30 सीरीजचा एक फोन MediaTek Dimensity 800U सह येईल आणि हा 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करेल.

The post 24 फेब्रुवारीला भारतात एंट्री करतील Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme Narzo 30 सीरीज अनेक दिवस टीज केल्यानंतर आज अखेरीस कंपनीने अधिकृतपणे या सीरीजच्या इंडिया लॉन्च डेटची घोषणा केली आहे. रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करून माहिती दिली आहे कि रियलमी नारजो 30 प्रो 5जी आणि रियलमी नारजो 30 स्मार्टफोन 24 फेब्रुवारीला सादर केला जाईल. विशेष म्हणजे लॉन्च डेटची घोषणा करण्याआधी कंपनीने नारजो 30 प्रो 5जी ची झलक दाखवली होती त्याचबरोबर कँपेनचा खुलासा पण केला होता. या कँपेन अंतगर्त काही लोकांना हा स्मार्टफोन लॉन्चच्या आधी वापरण्याची संधी मिळेल.

येतील दोन मॉडेल

बोलले जात आहे कि Realme Narzo 20 सीरीज प्रमाणे या सीरीज मध्ये पण तीन स्मार्टफोन असतील, जे Realme Narzo 30, Realme Narzo 30 Pro 5G आणि Realme Narzo 30A स्मार्टफोन असू शकतात. पण, Realme India चे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक जिफ पोस्ट केली आहे, ज्यात फक्त Realme Narzo 30 Pro 5G आणि Realme Narzo 30A ची नावे दिसत आहेत.

हे देखील वाचा : जाणून घ्या कधी लॉन्च होईल कागदाप्रमाणे घडी होणारा iPhone, फीचर्स आणि लुकने करेल Samsung-Xiaomi ची सुट्टी

लॉन्चची वेळ

कंपनी हि नवीन नारजो सीरीज वर्चुअल इवेंटच्या माध्यमातून सादर करेल जो 24 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता सुरु होईल. तुम्ही हा इवेंट कंपनीच्या ऑफिशियल सोशल मीडिया चॅनेल जसे कि यूट्यूब, फेसबुक आणि ट्विटरवर लाइव बघू शकता.

चिपसेटचा झाला खुलासा

अलीकडेच XDA Developers ला दिलेल्या आपल्या इंटरव्यू मध्ये Realme चे CEO Madhav Sheth यांनी माहिती दिली आहे कि Narzo 30 सीरीजचा एक फोन MediaTek Dimensity 800U सह येईल आणि हा 5G कनेक्टिविटीला सपोर्ट करेल. यावरून स्पष्ट झाले आहे कि हा चिपसेट नारजो 30 प्रो मध्ये असेल कारण या सीरीज मध्ये 5G फोन Narzo 30 Pro असतील.

हे देखील वाचा : Moto E7i Power वेबसाइटवर झाला लिस्ट, लवकरच करेल बाजारात एंट्री

डिजाइन

अलीकडेच माधव सेठ यांनी केलेला ट्विट पाहता फोटो मध्ये दिसणारा स्मार्टफोन पण नारजो 30 प्रो असल्याचे बोलले जात आहे. स्मार्टफोनची डिजाइन पाहता फोन मध्ये आयताकृती कॅमेरा मॉड्यूल मिळू शकतो, ज्यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप एलईडी फ्लॅशसह मिळेल. तसेच Narzo ची ब्रँडिंग फोनच्या मागे देण्यात आली आहे.

रिटेल पोस्टर पण झाला लीक

एका टिप्सटरने ट्विट करून रियलमी नारजोचा एक रिटेल पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टर नुसार Narzo 30 Pro मध्ये MediaTek Dimensity 800U SoC दिला जाईल जो 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. तसेच सांगण्यात आले आहे कि Narzo 30 Pro मध्ये 120Hz डिस्प्ले दिला जाईल. आम्हाला आशा आहे कि फोन मध्ये एलसीडी पॅनलचा वापर केला जाऊ शकतो. तसेच, डिवाइस मध्ये फ्रंटला टॉप-लेफ्ट कॉर्नरवर पंच होल असेल. तसेच, डिवाइस मध्ये मागे चौकोनी कॅमेरा मॉड्यूल असेल.

स्पेसिफिकेशन्स

काही दिवसांपूर्वी एक रियलमी फोन मॉडेल नंबर RMX3161 सह चीनी सर्टिफिकेशन साइट TENAA वर लिस्ट केला गेला होता. तेव्हा सांगण्यात आले होते कि हा Realme Narzo 30 Pro फोन असेल. बोलले जात आहे कि फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 6.5 इंचाचा डिस्प्ले दिला जाईल. या सर्टिफिकेशन्स साइटवर फोनचे डायमेंशन 162.5 x 74.8 x 8.8एमएम दाखवण्यात आले आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 सह वेबसाइटवर लिस्ट झाला आहे तसेच फोनमध्ये रियलमी युआय देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4,880एमएएचची बॅटरी असल्याचे पण समोर आले आहे.

The post 24 फेब्रुवारीला भारतात एंट्री करतील Realme Narzo 30 Pro 5G आणि Narzo 30, लॉन्चच्याआधी जाणून घ्या सर्वकाही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-5g-series-launch-date-india-24-february-twitter-madhav-seth/feed/ 0
120Hz डिस्प्ले असलेल्या Realme Narzo 30 5G सीरीजच्या लॉन्च डेटचा झाला खुलासा, जाणून घ्या कधी करेल भारतात एंट्री https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-india-launch-last-week-feb-with-5g-mediatek-dimensity-800u-120hz-display/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-india-launch-last-week-feb-with-5g-mediatek-dimensity-800u-120hz-display/#respond Tue, 16 Feb 2021 11:24:02 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10055 रियलमी नारजो 30 सीरीज मध्ये रेगुलर Realme Narzo 30 सह Realme Narzo 30 Pro आणि Realme Narzro 30A स्मार्टफोनचा समावेश असू शकतो.

The post 120Hz डिस्प्ले असलेल्या Realme Narzo 30 5G सीरीजच्या लॉन्च डेटचा झाला खुलासा, जाणून घ्या कधी करेल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपासून माहिती समोर येत आहे कि Realme आपल्या ‘नारजो’ सीरीजचा विस्तार करण्याची योजना बनवत आहे. यावेळी कंपनी आपले नारजो फोन्सच्या कॅटेगरी मध्ये Realme Narzo 30 लाॅन्च करेल. अलीकडेच रियलमी कम्यूनिटी वेबसाइटवर रियलमी नारजो 30 च्या रिटेल बाॅक्सचे फोटोज शेयर करण्यात आले होते, त्यानंतर या सीरीजचा एक फोन Narzo 30 Pro स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट टेनावर पण स्पॉट केला गेला होता. आता टेक वेबसाइट MySmartPrice च्या रिपोर्ट मध्ये माहिती देण्यात आली आहे कि Realme Narzo 30 सीरीज फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात 21 फेब्रुवारीपासून 28 फेब्रुवारी दरम्यान लॉन्च केली जाऊ शकते.

पोस्टर आला समोर

अलीकडेच एका टिप्सटरने ट्विट करून रियलमी नारजोचा एक रिटेल पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरनुसार Narzo 30 Pro मध्ये MediaTek Dimensity 800U SoC दिला जाईल जो 5G नेटवर्कला सपोर्ट करतो. तसेच सांगण्यात आले आहे कि Narzo 30 Pro मध्ये 120Hz डिस्प्ले दिला जाईल. आम्हाला आशा आहे कि फोनमध्ये एलसीडी पॅनलचा वापर केला जाऊ शकतो. डिवाइसच्या फ्रंटला टॉप-लेफ्ट कॉर्नरवर पंचहोल असेल. तसेच, डिवाइस मध्ये मागे आयताकृती कॅमेरा मॉड्यूल असेल. पोस्टरमध्ये कॅमेरा डिटेलची माहिती देण्यात आली नाही.

हे देखील वाचा : Realme ने केली कमाल, लॉन्च केला 14,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन, यात आहे 4GB रॅम आणि 5,000mAh बॅटरी

तसेच स्टॅंडर्ड Narzo 30A च्या मागे चौकनी कॅमेरा मॉड्यूल असेल. त्याचबरोबर मागे माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर दिला जाईल. पोस्टरमध्ये फक्त दोन फोनबद्दल सांगण्यात आले आहे. पण, काही रिपोर्ट्सनुसार फोनचे तीन मॉडेल्स सादर केले जातील.

Realme Narzo 30 सीरीज मध्ये असतील 3 मॉडेल्स

काही रिपोर्ट्सनुसार रियलमी नारजो 30 सीरीज मध्ये रेगुलर Realme Narzo 30 सह Realme Narzo 30 Pro आणि Realme Narzro 30A स्मार्टफोनचा समावेश असू शकतो. रियलमी कथितरित्या नार्जो 30 लाइनअपसह काही गेमिंग ऍक्सेसरीज पण आणण्याची योजना बनवत आहे.

रिटेल बॉक्सपण झाला लीक

काही आठवड्यांपूर्वी Realme India चे सीईओ माधव सेठ यांनी माहिती दिली होती कि त्यांचा नवीन 5जी फोन भारतात लॉन्च केला जाईल. कंपनीने काही दिवसांपूर्वी नार्जो 30 च्या रीटेल बॉक्सचे काही डिजाइनपण युजर्सच्या समोर सादर केल्या होत्या. त्यानंतर युजर्सना आवडलेल्या रिटेल बॉक्सच्या फोटोसह माधव सेठ यांनी ट्विट करून हिंट दिली कि रियलमी नारजो 30 लवकरच लॉन्च केला जाईल.

हे देखील वाचा : काहीशी अशी असेल रियलमीच्या आगामी ताकदवान फ्लॅगशिप फोन Realme Race ची डिजाइन

5G सपोर्ट

माधव सेठ यांनी रिटेल बॉक्स फोटो शेयर केल्यानंतर स्पष्ट झाले आहे कि नवीन सीरीज मध्ये 5G सपोर्ट असेल. पण, बोलले जात आहे कि Realme Narzo 30 सीरीजचा एक मॉडेल 5जी सपोर्टसह येईल. हा Realme Narzo 30 Pro असू शकतो.

गेमिंग मध्ये असेल दमदार

अलीकडेच माधव सेठ यांनी ट्विट करून नारजो 30 सीरीज गेमिंग सेंट्रिक फोन्सच्या रूपात सादर केली जाईल असे सुचवले होते.फोनमधील फीचर्सबद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती समोर आली नाही. पण, काही दिवसांपूर्वी टेनावर फोनचे काही फीचर्स समोर आले होते.

स्पेसिफिकेशन्स

अलीकडेच एक रियलमी फोन मॉडेल नंबर RMX3161 सह चीनी सर्टिफिकेशन साइट TENAA वर लिस्ट केला गेला होता. तेव्हा बोलले जात होते कि हा Realme Narzo 30 Pro फोन असेल. असे बोलले जात आहे कि फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप आणि 6.5 इंच डिस्प्ले दिला जाईल. या सर्टिफिकेशन्स साइटवर फोनचे डायमेंशन 162.5 x 74.8 x 8.8एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 सह वेबसाइटवर लिस्ट झाला आहे त्याचबरोबर फोन मध्ये रियलमी युआय देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,880एमएएचची बॅटरी असल्याचे पण समोर आले आहे.

The post 120Hz डिस्प्ले असलेल्या Realme Narzo 30 5G सीरीजच्या लॉन्च डेटचा झाला खुलासा, जाणून घ्या कधी करेल भारतात एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-india-launch-last-week-feb-with-5g-mediatek-dimensity-800u-120hz-display/feed/ 0
Realme Narzo 30 Pro वेबसाइटवर झाला लिस्ट, Realme Narzo 30 सोबत लवकरच होईल लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-listed-on-tenaa-4880mah-battery-specs-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-listed-on-tenaa-4880mah-battery-specs-leaked/#respond Thu, 11 Feb 2021 12:26:05 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=10002 Realme Narzo 30 Pro चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर स्पाॅट केला गेला आहे. चायनीज वेबसाइटच्या हवाल्याने जीएसएम एरिनाने बातमी दिली आहे त्यावरून समजले आहे कि रियलमी नारजो 30 प्रो टेनावर RMX3161 मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे.

The post Realme Narzo 30 Pro वेबसाइटवर झाला लिस्ट, Realme Narzo 30 सोबत लवकरच होईल लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme संबंधित माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती ज्यात समजले होते कि हि टेक कंपनी आपल्या ‘नारजो’ सीरीजच्या विस्ताराची योजना बनवत आहे त्याअंतर्गत Realme Narzo 30 लाॅन्च केला जाईल. रियलमी कम्यूनिटी वेबसाइटवर रियलमी नारजो 30 च्या रिटेल बाॅक्सचे फोटोज पण शेयर करण्यात आले होते. आता अजून एक मोठी बातमी समोर येत आहे त्यानुसार या सीरीजचा Realme Narzo 30 Pro स्मार्टफोन सर्टिफिकेशन्स साइट टेनावर लिस्ट केला गेला आहे.

Realme Narzo 30 Pro चीनी सर्टिफिकेशन्स साइट टेनावर स्पाॅट केला गेला आहे. चायनीज वेबसाइटच्या हवाल्याने जीएसएम एरिनाने बातमी दिली आहे त्यावरून समजले आहे कि रियलमी नारजो 30 प्रो टेनावर RMX3161 मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. या लिस्टिंग मध्ये फोनचा फोटो समोर आल्यामुळे नारजो 30 प्रो च्या लुक आणि डिजाईनची माहिती मिळाली आहे तसेच हा या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे.

असा असेल लुक

टेनावर समोर आलेल्या फोटोज मध्ये कथित रियलमी नारजो 30 प्रो पंच-होल डिस्प्ले डिजाईनवर बनलेला दाखवण्यात आला आहे. सेल्फी कॅमेरा असलेला हा पंच-होल स्क्रीनच्या वर डावीकडे देण्यात आला आहे. फोटो मध्ये डिस्प्लेच्या चारही कडा नॅरो बेजल्ससह दिसत आहेत. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर क्वाॅड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे बनलेल्या चौकोनी आकारात आहे. फोनच्या डाव्या पॅनलवर वाल्यूम राॅकर देण्यात आहे तर उजव्या पॅनलवर फिंगरप्रिंट सेंसर इम्बेडेड पावर बटन आहे.

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Realme Narzo 30 Pro म्हणजे RMX3161 टेनानुसार 6.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेवर लाॅन्च केला जाईल. या सर्टिफिकेशन्स साइटवर फोनचे डायमेंशन 162.5 x 74.8 x 8.8एमएम असल्याचे सांगण्यात आले आहे. रियलमीचा हा आगामी स्मार्टफोन अँड्रॉइड 11 सह वेबसाइटवर लिस्ट झाला आहे ज्या अंतर्गत फोन मध्ये रियलमी युआय देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 4,880एमएएचची बॅटरी असल्याचे सांगण्यात आले आहे. Realme Narzo 30 Pro मध्ये प्रोसेसर कोणता दिला जाईल, याची माहिती समजली नाही पण सर्टिफिकेशन्स मध्ये स्पष्ट सांगण्यात आले आहे कि रियलमीचा हा फोन एक 5G स्मार्टफोन असेल.

Realme Narzo 30

अलीकडेच रियलमी कम्यूनिटी वेबसाइटवर रियलमी नारजो 30 फोनच्या 6 रिटेल बॉक्सचे फोटोज शेयर केले गेले होते. हि पोस्ट शेयर करून फॅन्सकडून अभिप्राय मागवण्यात आला होता कि यातील कोणता बाॅक्स त्यांना सर्वात चांगला वाटला आहे. म्हणजे यातील तो बॉक्स फाइनल होईल आणि बाजारात येईल. विशेष म्हणजे रियलमी एक्स7 सीरीजच्या लॉन्चच्या आधी पण कंपनीने अश्याच रिटेल बॉक्सेजचा फोटो शेयर करून फॅन्सकडे अभिप्राय मागितला होता. आता नारजो 30 सीरीजच्या लॉन्च बद्दल कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Realme Narzo 30 Pro वेबसाइटवर झाला लिस्ट, Realme Narzo 30 सोबत लवकरच होईल लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-listed-on-tenaa-4880mah-battery-specs-leaked/feed/ 0
Realme Narzo 30 झाली भारतात येण्यासाठी तयार, रिटेल बॉक्सचा फोटो झाला शेयर https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-retail-box-image-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-retail-box-image-india-launch-soon/#respond Tue, 09 Feb 2021 14:32:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9966 सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन लॉन्च होतील ज्यात Realme Narzo 30 आणि Realme Narzo 30 Pro चा समावेश असेल. त्यामुळे नारजो 30 सीरीजच्या लॉन्च बद्दल कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

The post Realme Narzo 30 झाली भारतात येण्यासाठी तयार, रिटेल बॉक्सचा फोटो झाला शेयर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने गेल्या आठवड्यात भारतीय बाजारात दोन नवीन 5G स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro लॉन्च केले आहेत. ‘एक्स सीरीज’ चा विस्तार केल्यानंतर आता कंपनी ‘नारजो सीरीज’ भारतात वाढवण्याची योजना बनवत आहे. बातमी समोर आली आहे कि रियलमी इंडियाच्या अधिकृत कम्यूनिटी वेबसाइटवर Realme Narzo 30 चा रिटेल बॉक्स टीज केला गेला आहे ज्यात बॉक्सचे फोटोज शेयर केले गेले आहेत. या पोस्टनंतर आता रियलमी नारजो 30 सीरीज लवकरच भारतात लॉन्च केला जाऊ शकतो.

Realme Narzo 30 च्या एक नाही तर एकूण 6 रिटेल बॉक्सचे फोटोज रियलमी कम्यूनिटी वेबसाइटवर शेयर केले गेले आहेत. हि पोस्ट शेयर करून फॅन्सकडे अभिप्राय मागण्यात आला आहे कि यातील कोणता बाॅक्स त्यांना आवडला आहे. म्हणजे यातील तो बॉक्स फाइनल होईल आणि बाजारात येईल. रियलमी एक्स7 सीरीजच्या लॉन्चच्या आधी पण कंपनीने असाच रिटेल बॉक्सेजचा फोटो शेयर करून फॅन्सचा अभिप्राय मागितला होता.

रियलमी नारजो 30 सीरीज बद्दल आधी सांगण्यात आले होते कि कंपनी जानेवारी मध्ये आपल्या नारजो सीरीजची नेक्स्ट जेनरेशन सादर करेल, आता त्याला उशीर झाला आहे. त्यामुळे आशा आहे कि या महिन्यात म्हणजे फेब्रुवारी मध्ये हि सीरीज सादर केली जाईल. लीक मध्ये सांगण्यात आले होते कि सीरीज मध्ये दोन स्मार्टफोन लॉन्च होतील ज्यात Realme Narzo 30 आणि Realme Narzo 30 Pro चा समावेश असेल. त्यामुळे नारजो 30 सीरीजच्या लॉन्च बद्दल कंपनीच्या घोषणेची वाट बघितली जात आहे.

हे देखील वाचा : जगातील सर्वात छोटा होल-पंच कटआउट असलेला Redmi K40 होईल 25 फेब्रुवारीला लॉन्च, करेल का प्रभावित

Realme Narzo 20 सीरीज

बाजारात उपलब्ध असलेला Realme Narzo 20 फोन 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 10,499 रुपये आहे. तर मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जो 11,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. Realme Narzo 20A चा बेस वेरिएंट 3 जीबी रॅमसह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर मोठ्या वेरिंएट मध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या वेरिएंट्सची किंमत क्रमश: 8,499 रुपये आणि 9,499 रुपये आहे. हे दोन्ही फोन Glory Silver आणि Victory Blue कलर मध्ये लॉन्च झाले आहेत.

Realme Narzo 20

Realme Narzo 20 बद्दल बोलायचे तर हा फोन पण दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन White Knight आणि Black Ninja कलर मध्ये विकत घेता येईल.

The post Realme Narzo 30 झाली भारतात येण्यासाठी तयार, रिटेल बॉक्सचा फोटो झाला शेयर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-retail-box-image-india-launch-soon/feed/ 0
Realme करणार आहे नारजो सीरीजचा विस्तार, पुढल्या महिन्यात लाॅन्च होतील Realme Narzo 30 आणि Narzo 30 Pro https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-might-launch-in-january-2021/ https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-might-launch-in-january-2021/#respond Thu, 10 Dec 2020 14:24:09 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9259 लीक मध्ये या सीरीज मध्ये लाॅन्च होणाऱ्या दोन स्मार्टफोनची नावे सांगितली आहेत जे बाजारात Realme Narzo 30 आणि Realme Narzo 30 Pro नावाने येतील.

The post Realme करणार आहे नारजो सीरीजचा विस्तार, पुढल्या महिन्यात लाॅन्च होतील Realme Narzo 30 आणि Narzo 30 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने सप्टेंबर मध्ये भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत ‘नारजो सीरीज’ चा विस्तार केला होता. कंपनीने एक साथ तीन स्मार्टफोन लॉन्च केले होते, ज्यात Realme Narzo 20, Realme Narzo 20 Pro आणि Realme Narzo 20A चा समावेश होता. कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले हे स्मार्टफोन्स भारतीयांना आवडले होते. तसेच आता बातमी येत आहे कि रियलमी पुन्हा आपल्या नारजो सीरीजची नेक्स्ट जेनरेशन बाजारात आणण्याची तयारी करत आहे. माहिती समोर आली आहे कि पुढल्या महिन्यात म्हणजे जानेवारी 2021 मध्ये कंपनीने Realme Narzo 30 सीरीज लाॅन्च केली जाणार आहे.

Realme Narzo 30 सीरीजची माहिती एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली आहे. टिपस्टर स्टफलिस्टिंग्सचा हवाला देत वेबसाइटने सांगितले आहे कि रियलमी कंपनी नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारी मध्ये आपल्या नारजो सीरीजचा नेक्स्ट जेनरेशन सादर करणार आहे. लीक मध्ये या सीरीज मध्ये लाॅन्च होणाऱ्या दोन स्मार्टफोनची नावे सांगितली आहेत जे बाजारात Realme Narzo 30 आणि Realme Narzo 30 Pro नावाने येतील. बातमी मध्ये स्पष्ट झाले नाही कि नारजो 30 सीरीज मध्ये दोन्ही फोन लाॅन्च होतील कि कंपनी अजून काही फोन पण यात जोडेल. सीरीजच्या लाॅन्चसाठी आता कंपनीच्या अधिकृत घोषणेची वाट बघितली जात आहे.

Realme Narzo 20 सीरीज

Realme Narzo 20 चा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 10,499 रुपये आहे. तसेच मोठ्या वेरिएंट मध्ये 4 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जो 11,499 रुपयांमध्ये लॉन्च झाला आहे. Realme Narzo 20A चा बेस वेरिएंट 3 जीबी रॅम सह 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तसेच मोठ्या वेरिंएट मध्ये 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. या वेरिएंट्सची किंमत क्रमश: 8,499 रुपये आणि 9,499 रुपये आहे. हे दोन्ही फोन Glory Silver आणि Victory Blue कलर मध्ये लॉन्च झाले आहेत.

Realme Narzo 20 बद्दल बोलायचे तर हा फोन पण दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 14,999 रुपये आहे आणि 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत 16,999 रुपये आहे. हा फोन White Knight आणि Black Ninja कलर मध्ये विकत घेता येईल.

The post Realme करणार आहे नारजो सीरीजचा विस्तार, पुढल्या महिन्यात लाॅन्च होतील Realme Narzo 30 आणि Narzo 30 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-narzo-30-pro-series-might-launch-in-january-2021/feed/ 0