5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा असलेला Realme Narzo 30 झाला लॉन्च, Redmi फोन्सला मिळेल आव्हान

Realme narzo 30 launch

Realme ने गेल्या महिन्यात भारतीय बाजारात आपल्या Realme Narzo 30 सीरीजचे दोन स्मार्टफोन – Realme Narzo 30A आणि Narzo 30 Pro लॉन्च केले होते. आता कंपनीने या सीरीजचा स्टॅंडर्ड वर्जन Narzo 30 स्मार्टफोन लॉन्च अधिकृतपणे लॉन्च केला आहे. रियलमी नारजो 30 कंपनीने मलेशियाच्या मार्केटमध्ये सादर केला आहे. फोनच्या लॉन्चपूर्वी अनेक लीक्समध्ये याची माहिती समोर आली होती. पण, आता अधिकृतपणे हा हँडसेट लॉन्च केल्यानंतर त्या सर्व लीक्सवर पूर्णविराम लागला आहे. (Realme Narzo 30 launch price specifications)

Realme Narzo 30 ची डिजाइन

Realme Narzo 30 स्मार्टफोनमध्ये मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे ज्यात सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कट आउट डावीकडे वरच्या बाजूला आहे. त्याचबरोबर रियलमीच्या या फोनमध्ये मागे रेक्टेंगुलर कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. तर, मागे racetrack-inspired chevron स्ट्रिप दिसत आहे. Narzo 30 स्मार्टफोनचा बॅक पॅनल प्लास्टिकचा देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोनच्या बाजूला फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : SID 2021 मध्ये सॅमसंग आणि LG चे असेल हवा, Samsung मल्टी फोल्ड डिस्प्ले पॅनल S-Foldable येईल समोर

Realme Narzo 30 की बॅटरी

कंपनीने Realme Narzo 30 सह 30वॉट डार्ट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी दिली आहे. कंपनीचा दावा आहे कि या टेक्नॉलॉजीने फोन फक्त 25 मिनिटांत 50 टक्के चार्ज केला जाऊ शकतो. 100 टक्के चार्जसाठी फक्त 65 मिनिटांचा वेळ लागेल. फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. फोनची हि मोठी बॅटरी चार्ज करण्यासाठी टाइप-सी चार्जिंग प्वाइंटचा ऑप्शन मिळेल.

Realme Narzo 30 चा कॅमेरा

Realme 30 मध्ये ट्रिपल कॅमेरा आणि फ्रंटला सिंगल पंच-होल सेंसर देण्यात आला आहे. सर्वप्रथम मागील कॅमेऱ्याबाबत बोलायचे झाले तर यात अपर्चर f/1.8 सह 48 मेगापिक्सलचा अल्ट्रा हाई-रेजोल्यूशन असलेला वाइड अँगल प्राइमरी देण्यात आला आहे. फोनमध्ये 2MP B&W पोर्टेट कॅमेरा आणि f/2.4 अपर्चरसह 2MP 4cm मॅक्रो सेंसर आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोनच्या फ्रंटला f/2.1 अपर्चरसह 16MP चा Sony IMX471 सेंसर देण्यात आला आहे. रियर कॅमेऱ्यांचे मोड पाहता यात सुपर नाइटस्केप, स्टाररी मोड, पॅनोरमिक व्यू, एक्सपर्ट मोड, टाइम लॅप्स, पोर्ट्रेट मोड, एचडीआर, अल्ट्रा मोड, अल्ट्रा माइक्रो मोड, एआय ब्यूटी, फिल्टर, क्रोमा बूस्ट, स्लो मोशन, बोकेह इफेक्ट आहेत.

Realme Narzo 30 battery

Realme Narzo 30 चा सुंदर डिस्प्ले

फोनचा डिस्प्ले 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 120 हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटने सुसज्ज आहे. 90Hz अल्ट्रा स्मूद डिस्प्ले जुन्या 60Hz पेक्षा 50 टक्के जास्त रिफ्रेश रेटसह येतो. तसेच Realme 30 मध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे जो 20:9 रेश्यो, 2400x1080P FHD+ रेजोल्यूशन आणि 90.5% स्क्रीन-टू-बॉडी रेशियोसह येतो.

प्रोसेसिंग पावर

रियलमी नारजो 30 मध्ये मीडियाटेक हीलियो G95 गेमिंग प्रोसेसर देण्यात आला आहे, जिला AnTuTu मध्ये 30W+ सुपर हाई बेंचमार्क मिळाले आहेत. तसेच, हा प्रोसेसर 12nm प्रोसेसचा वापर करून बनवण्यात आला आहे. तसेच हे दोन्ही प्रोसेसर दोन हाई परफॉर्मन्स Cortex-A76 cores at up to 2.05GHz आणि सहा हाई-एफिशिएंसी Cortex-A55 सह येतात. ग्राफिक्ससाठी यात 900MHz Mali-G76GPU देण्यात आला आहे. फोनमध्ये 6GB LPPDDR4x रॅम आणि 128GB (UFS 2.1) स्टोरेज देण्यात आली आहे. फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 256GB पर्यंत वाढवता येते.

हे देखील वाचा : Instagram पासून राहायचे आहे का दूर मग अश्याप्रकारे करा तुमचे अकाउंट डिलीट

Realme Narzo 30 display

Realme Narzo 30 ची किंमत

realme narzo 30 कंपनीने Racing Blue आणि Racing Silver कलर ऑप्शनमध्ये सादर केला आहे. डिवाइसच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत RM 799 (जवळपास 14,150 रुपये) आहे. परंतु, एका ऑफरअंतगर्त फोन मर्यादित कालावधीसाठी RM 699 (जवळपास 12,400 रुपये) मध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here