जगातील सर्वात छोटा होल-पंच कटआउट असलेला Redmi K40 होईल 25 फेब्रुवारीला लॉन्च, करेल का प्रभावित

Redmi K40 बाबत अनेक दिवसांपासून माहिती समोर येत आहे. अलीकडेच Redmi च्या या अपकमिंग फोनच्या स्पेसिफिकेशन्सबद्दल इंटरनेटवर एक नवीन लीक समोर आला होता. आता कंपनीने या फोनच्या लॉन्च डेटबद्दल ऑफिशियल माहिती दिली आहे. कंपनीने चायनीज माइक्रोब्लागिंग साइट वीबोवर एक पोस्ट केला आहे, त्यानुसार रेडमी के40 25 फेब्रुवारीला लॉन्च केला जाईल. हा डिवाइस गेल्यावर्षी डिसेंबर मध्ये लॉन्च झालेल्या Redmi K30 5G चा अपग्रेडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

जगातील सर्वात छोटा होल-पंच

अलीकडेच Redmi चे जनरल मॅनेजर Lu Weibing यांनी Weibo वर टीजर्स पोस्ट केले होते. या टीजर्स मध्ये Lu ने खुलासा केला होता कि Redmi K40 “जगातील सर्वात छोटा” होल-पंच डिस्प्ले डिजाइनवर सादर केला जाईल. तसेच, फोन मध्ये सेल्फी कॅमेरा होल वरच्या बाजूला मध्यभागी असेल. होल-पंच डिजाइन व्यतिरिक्त, वीबिंगने Redmi K40 वर फ्लॅट डिस्प्ले असल्याची पण माहिती दिली होती.

दमदार बॅटरी लाइफ

कंपनीने फोन मधील दमदार बॅटरी लाइफ पण टीज केली आहे. वीबिंग यांनी आपल्या वीबो पोस्टवर एका कमेंटला उत्तर देत सांगितले कि फोन डुअल स्टीरियो स्पीकर्ससह येईल. पण, बॅटरी कपॅसिटी बद्दल कोणतीही माहिती कंपनीने दिली नाही. समोर आलेल्या लीक मध्ये सांगण्यात आले होते कि फोन मध्ये 4,000mAh बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्टसह मिळेल.

पावरफुल चिपसेट

गेल्या महिन्यात Weibing ने Redmi K40 च्या फेब्रुवारी मध्ये लॉन्च होण्याची माहिती देण्यात आली होती. त्यांनी एक फोटो पोस्ट केला, ज्यात आगामी फोनवर क्वालकॉम Snapdragon 888 चिपसेट असल्याचे सुचवण्यात आले होते. पण काही रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आले होते कि Redmi K40 सीरीज तीन वेगवेगळ्या चिपसेट ऑप्शन सह सादर केली जाऊ शकते.

डिस्प्ले, रॅम व स्टोरेज

रेडमी के40 स्मार्टफोन मध्ये फुलएचडी+ डिस्प्ले आणि रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज असू शकतो. तसेच फोन मध्ये कमीत कमी 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज. सॉफ्टवेयर पाहता फोन अँड्रॉइड 11 वर आधारित मीयुआय 12.5 सह मिळू शकतो. कनेक्टिविटीसाठी 5जी सपोर्ट, 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट असू शकतो.

Redmi K40 सीरीज मध्ये कंपनी Redmi K40, Redmi K40S आणि Redmi K40 Pro असे मॉडेल्स घेऊन येऊ शकते. अलीकडेच आलेल्या एका रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि रेडमी के40 प्रो स्मार्टफोन मध्ये स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 888 चिपसेट, एमोलेड डिस्प्ले, 120 हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 108 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

अशी असेल किंमत

चीन मध्ये Redmi K40 ची किंमत काही दिवसांपूर्वी लीक झाली होती. स्मार्टफोनची किंमत CNY 2,999 (जवळपास 34,000 रुपये) पासून सुरु होऊ शकते. हा Mi 11 च्या तुलनेत स्वस्त असेल आणि सर्वात स्वस्त स्नॅपड्रॅगॉन 888-संचालित फोन्स पैकी एक असू शकतो जर स्मार्टफोन या फ्लॅगशिप चिपसेट सह लॉन्च झाला तर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here