Realme X7 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 04 Feb 2021 11:26:39 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme ने लॉन्च केले दोन पावरफुल 5G स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro, 19,999 रुपये आहे किंमत https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-5g-phone-launched-in-india-know-specs-price-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-5g-phone-launched-in-india-know-specs-price-sale-offer/#respond Thu, 04 Feb 2021 11:26:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9881 Realme X7 आणि Realme X7 Pro स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च झाले आहेत जे रियलमी युआयसह काम करतात.

The post Realme ने लॉन्च केले दोन पावरफुल 5G स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro, 19,999 रुपये आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत दोन नवीन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. लो बजेट मध्ये मोबाईल फोन घेऊन येणाऱ्या या कंपनीने यावेळी फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये आपली दावेदारी सादर केली आहे आणि रियलमी एक्स7 सीरीज भारतात सादर केली आहे. सीरीज अंतगर्त Realme X7 आणि Realme X7 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले आहेत जे 5G ला सपोर्ट करतात. लार्ज डिस्प्ले, दमदार प्रोसेसर आणि शानदार कॅमेऱ्यासह फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी या सीरीजला ताकदवान बनवते.

डिस्प्ले

रियलमीने आपली एक्स7 सीरीज पंच-होल डिस्प्लेवर लॉन्च केली आहे. Realme X7 मध्ये 1080 × 2400 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाचा फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे तर Realme X7 Pro स्मार्टफोन इतक्याच पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. रियलमी एक्स7 ची स्क्रीन 60हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करते तसेच एक्स7 प्रो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट सह लॉन्च केला गेला आहे. दोन्ही फोन्स मध्ये डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 देण्यात आली आहे.

प्रोसेसिंग

Realme X7 आणि Realme X7 Pro स्मार्टफोन अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च झाले आहेत जे रियलमी युआयसह काम करतात. प्रोसेसिंगसाठी रियलमी एक्स7 मध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम टेक्नॉलॉजीवर बनलेल्या मीडियाटेक डायमनसिटी 800यू चिपसेट देण्यात आला आहे. तसेच रियलमी एक्स7 प्रो 2.6गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरसह 7एनएम फेब्रिकेशनवरच काम करणाऱ्या मीडियाटेक डायमनसिटी 1000+ चिपसेटवर लॉन्च केला गेला आहे. हे दोन्ही चिपसेट 5G ला सपोर्ट करतात. ग्राफिक्ससाठी Realme X7 मध्ये माली-जी57 जीपीयू आणि Realme X7 Pro मध्ये माली-जी77 जीपीयू देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Poco M3 कि Realme 7i: जाणून घ्या, बजेट कॅटेगरीच्या लढाईत कोणाचे नाणे खणखणीत वाजेल

रॅम व स्टोरेज

रियलमी एक्स7 5जी भारतीय बाजारात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच रियलमी एक्स7 प्रो 5जी 8 जीबी रॅमवर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी

Realme X7 स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह लॉन्च केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे त्याचबरोबर एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी एक्स7 स्मार्टफोन एफ/2.5 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या सोनी आईएमएक्स471 सेंसरला सपोर्ट करतो.

Realme X7 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, एफ/2.3 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा पोर्टरेट सेंसर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर पंच-होल मध्ये एफ/2.5 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी

पावर बॅकअपसाठी Realme X7 स्मार्टफोन मध्ये 4,310एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 50वॉट सुपरडार्ट चार्ज टेक्नॉलॉजीसह येते. तर दुसरीकडे Realme X7 Pro स्मार्टफोन 4,500एमएएच बॅटरीवर लॉन्च केला गेला आहे जी 65वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हे दोन्ही स्मार्टफोन यूएसबी टाईप-सी पोर्टला सपोर्ट करतात.

किंमत

Realme X7 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपये तर 8 जीबी रॅम + 128 स्टोरेज वेरिएंट 21,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. याची विक्री फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वर 12 फेब्रुवारीपासून असेल. Realme X7 Pro च्या 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटने 29,999 रुपयांमध्ये बाजारात एंट्री घेतली आहे. या फोनची विक्री 10 फेब्रुवारीला फ्लिपकार्ट आणि रियलमी.कॉम वर केली जाईल.

रियलमी एक्स7 प्रो व्हिडीओ

The post Realme ने लॉन्च केले दोन पावरफुल 5G स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro, 19,999 रुपये आहे किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-5g-phone-launched-in-india-know-specs-price-sale-offer/feed/ 0
4 फेब्रुवारीला भारतात येत आहे पावरफुल फोन Realme X7 आणि Realme X7 Pro, अशी असू शकते किंमत https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-series-india-launch-set-for-february-4-price-sale-flipkart/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-series-india-launch-set-for-february-4-price-sale-flipkart/#respond Wed, 27 Jan 2021 14:07:49 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9789 Realme X7 मध्ये 6.4-इंचाचा FHD + सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 60Hz का रिफ्रेश रेट आहे.

The post 4 फेब्रुवारीला भारतात येत आहे पावरफुल फोन Realme X7 आणि Realme X7 Pro, अशी असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रियलमी आपली पावरफुल Realme X7 सीरीज भारतात लॉन्च करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. अनेक दिवसांपासून कंपनी या सीरीजच्या इंडिया लॉन्च बद्दल टीज करत होती. आता कंपनीने स्वतः किंवा सीरीज मध्ये आगामी Realme X7 आणि X7 Pro ची लॉन्च डेट सांगितली आहे. Realme ने पाठवलेल्या मीडिया इन्वाइटनुसार रियलमी एक्स एक्स7 आणि रियलमी एक्स7 प्रो भारतात 4 फेब्रुवारी 2021 दुपारी 12.30 वाजता लॉन्च केला जाईल.

इथे बघा लाइव इवेंट

हा इवेंट कंपनीच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेल आणि सोशल मीडिया हँडल वर लाइव बघता येईल. जर तुम्हाला घरातून रियलमी एक्स 7 सीरीजचा लॉन्च बघायचा असेल तर या चॅनेलच्या माध्यमातून बघू शकता. काही दिवसांपूर्वी हि सीरीज ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट वर टीज केला गेला होता.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधीच समोर आली Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 ची किंमत, तुम्हाला कशी वाटते?

चीन मध्ये लॉन्च झाले आहेत फोन

भारताआधी कंपनीने आपल्या घरच्या मार्केट मध्ये आणले आहेत. फोन्स चीन मध्ये लॉन्च झाल्यामुळे आपल्याला या दोन्ही डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा : Breaking: Samsung घेऊन येत आहे वर्षाचा सर्वात स्वस्त फोन, 7 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत आणि 6.5 इंचाची मोठी स्क्रीन

किती असेल किंमत

भारतात Realme X7 ची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे कारण चीन मध्ये फोनची किंमत RMB 1,799 (जवळपास 19,000 रुपये) आहे. Realme X7 Pro ची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असू शकते कारण चीन मध्ये फोनची किंमत RMB 2,199 (जवळपास 23,400 रुपये) आहे.

स्पेसिफिकेशन्स

Realme X7 मध्ये 6.4-इंचाचा FHD + सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यात 60Hz का रिफ्रेश रेट आहे. स्मार्टफोनला पावर देण्यासाठी मीडियाटेक डाइमेंशन 800U चिपसेट असेल जो 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज सह येतो. स्मार्टफोन 64MP क्वाड-कॅमेरा सिस्टम आणि 32MP फ्रंट-फेसिंग कॅमेऱ्याने सुसज्ज आहे. हँडसेट मध्ये 4,300mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

दुसरीकडे, Realme X7 Pro मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सह 6.5-इंच FHD + सुपर AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोन मीडियाटेक डाइमेंशन 1000+ चिपसेट वर चालतो जो 8GB रॅम आणि 256GB पर्यंतच्या इंटरनल स्टोरेज सह येतो. Realme X7 प्रमाणेच X7 Pro पण 64MP क्वाड-कॅमेरा सिस्टम आहे. स्मार्टफोन मध्ये थोडी मोठी 4,500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

The post 4 फेब्रुवारीला भारतात येत आहे पावरफुल फोन Realme X7 आणि Realme X7 Pro, अशी असू शकते किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-series-india-launch-set-for-february-4-price-sale-flipkart/feed/ 0
Realme X7 Pro 5G फोन येत आहे भारतात, सीईओने शेयर केले बाॅक्सचे फोटो, बघा कशी असेल डिजाईन https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-retail-box-shared-by-madhav-sheth-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-retail-box-shared-by-madhav-sheth-india-launch-soon/#respond Thu, 21 Jan 2021 13:01:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9736 Realme X7 Pro चा रिटेल बाॅक्स स्वतः कंपनी सीईओने शेयर केला आहे. पण या ट्वीट मध्ये एक नाही तर 9 बॉक्सेसचा फोटो शेयर करण्यात आला आहे आणि सर्वांवर रियलमी एक्स7 प्रो लिहिण्यात आले आहे.

The post Realme X7 Pro 5G फोन येत आहे भारतात, सीईओने शेयर केले बाॅक्सचे फोटो, बघा कशी असेल डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेक मार्केट मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे कि टेक कंपनी Realme लवकरच भारतात आपली ‘एक्स 7 सीरीज’ लाॅन्च करणार आहे. हि सीरीज चीनी बाजारात आधीच आली आहे ज्यात Realme X7 आणि Realme X7 Pro सादर केले गेले होते. काही दिवसांपूर्वी यातील रियलमी एक्स7 प्रो स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन साइट बीआयएस वर स्पाॅट केला गेला होता, पण कंपनीने आतापर्यंत लाॅन्च डेटचा खुलासा केला नाही. पण आज रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी आपल्या ट्वीटर हँडल वर Realme X7 Pro चा रिटेल बाॅक्स शेयर केला आहे.

Realme X7 Pro चा रिटेल बाॅक्स स्वतः कंपनी सीईओने शेयर केला आहे. पण या ट्वीट मध्ये एक नाही तर 9 बॉक्सेसचा फोटो शेयर करण्यात आला आहे आणि सर्वांवर रियलमी एक्स7 प्रो लिहिण्यात आले आहे. हा फोटो शेयर करत माधव सेठ यांनी युजर्सना प्रश्न केला आहे कि यातील कोणता बाॅक्स त्यांना आवडला आहे. म्हणजे ट्वीट मध्ये असे स्पष्ट सांगितले नाही कि कोणता रिटेल बाॅक्स फोनचा वास्तविक बाॅक्स असेल आणि बाजारात येईल. चर्चा अशी आहे कि Realme X7 Pro भारतात 6एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या मीडियाटेकच्या लेटेस्ट डायमनसिटी 1200 चिपसेट वर लाॅन्च केला जाऊ शकतो.

अशी आहे सीरीजची पावर

Realme X7 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 800U प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-जी57 जीपीयू देण्यात आला आहे. तसेच फोन मध्ये रॅम 8 जीबी पर्यंत आहे आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. रियलमीचा हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड रियलमी युआय वर चालतो. हँडसेट मध्ये पावर देण्यासाठी 4300mAh ची बॅटरी आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हे देखील वाचा : स्वस्त Realme C20 च्या लॉन्चच्या आधी समोर आली किंमत आणि स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Realme X7 Pro मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज, सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 1000+ प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी 9-कोर माली-G77 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हँडसेट मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आहे आणि 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देण्यात आली आहे. या फोन मध्ये कॅमेरा स्पेक्स Realme X7 सारखेच आहेत. तसेच फोनला पावर देण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme X7 Pro

दोन्ही फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आणि एक सारख्या लेंस देण्यात आल्या आहेत. फक्त कॅमेरा मधील अपर्चर मध्ये थोडा फरक आहे. Realme X7 आणि X7 Pro मध्ये अपर्चर f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर, (X7 मध्ये अपर्चर f/2.3) आणि (X7 Pro मध्ये अपर्चर f/2.25) सह अल्ट्रा-वाइड-अँगल 8 मेगापिक्सल सेंसर, अपर्चर /2.4 सह 2 मेगापिक्सलचा ब्लॅक आणि वाइट पोर्टेट सेंसर व अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. तसेच व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी (Realme X7 मध्ये अपर्चर f/2.5) आणि (Realme X7 Pro मध्ये अपर्चर f/2.45) सह 32 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.

रियलमी एक्स7 प्रो व्हिडीओ

The post Realme X7 Pro 5G फोन येत आहे भारतात, सीईओने शेयर केले बाॅक्सचे फोटो, बघा कशी असेल डिजाईन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-retail-box-shared-by-madhav-sheth-india-launch-soon/feed/ 0
रियलमीचा कमी किंमत असलेला मोबाईल Realme C21 लवकरच होईल लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/realme-c21-launch-india-soon-phone-receives-indonesian-telecom-certification-bis-nbtc/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c21-launch-india-soon-phone-receives-indonesian-telecom-certification-bis-nbtc/#respond Tue, 19 Jan 2021 14:30:27 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9704 Realme C21 भारतात लवकरच लॉन्च होऊ शकतो कारण फोनला बीआयएस सर्टिफिकेशन मिळाले आहे.

The post रियलमीचा कमी किंमत असलेला मोबाईल Realme C21 लवकरच होईल लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme लवकरच बजेट सेगमेंट मध्ये दमदार फीचर्स सह Realme नवीन फोन रियलमी सी21 लॉन्च करणार आहे. हा फोन अलीकडेच BIS certification bureau वर मॉडेल नंबर RMX3201 सह दिसला होता, ज्यावरून स्पष्ट झाले होते कि फोन भारतात एंट्री करेल. आता फोन Indonesian Telecom certification व्यतिरिक्त NBTC, Wi-Fi Alliance आणि दुसऱ्या सर्टिफिकेशन साइट वर स्पॉट केला गेला आहे.

टिप्सटर मुकुल शर्माने या डिवाइसची माहिती दिली कि फोन मॉडेल नंबर RMX3201 सह इंडोनेशियन टेलीकॉम वेबसाइट वर स्पॉट केला गेला आहे. आशा आहे कि रियलमी सी21 एकप्रकारे Realme C11 चा सक्सेसर असेल.

हे देखील वाचा : फक्त 19,999 रुपयांमध्ये लॉन्च झाली हि 42 इंच डिस्प्ले असलेली शानदार अँड्रॉइड स्मार्टटीव्ही

इंडोनेशियन टेलीकॉम सर्टिफिकेशन Realme C21 बाबत काही खास सांगत नाही, पण आमच्याकडे सर्टिफिकेशन साइट्सच्या माध्यमातून फोनच्या स्पेसिफिकेशन्स बाबत काही माहिती आहे. चायनीज क्वालिटी सर्टिफिकेशननुसार फोन 10W चार्जिंगला सपोर्ट सह येईल.

दरम्यान, वाय-फाय एलायंसने खुलासा केला आहे कि डिवाइस फक्त 2.4GHz वाय-फाय बॅंड आणि अँड्रॉइड 10 आउट ऑफ द बॉक्स सह येईल. यावरून समजते कि हा एक बजेट डिवाइस असेल जो Realme C सीरीज मध्ये येईल.

Realme C21 भारतात लवकरच लॉन्च होऊ शकतो कारण फोनला बीआयएस सर्टिफिकेशन मिळाले आहे. कंपनीने फोन बाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिली नाही. दुसरीकडे आशा आहे कि कंपनी या महिन्याच्या शेवटी किंवा फेब्रुवारीच्या सुरवातीला भारतात Realme X7 सीरीज लॉन्च करेल. काही दिवसांपूर्वी Realme X7 Pro रियलमी इंडिया वेबसाइट वर सपोर्ट पेज सेग्मेंट मध्ये दिसला होता. सपोर्ट पेज लाईव झाल्यानंतर आशा व्यक्त केली जात आहे कि येत्या काही दिवसांत कंपनी या फोनच्या इंडिया लाॅन्चची घोषणा पण करेल. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांत ‘रियलमी एक्स7’ सीरीज चीनच्या बाहेर थायलंड आणि तैवान मध्ये पण लाॅन्च झाली आहे.

हे देखील वाचा : लॉन्चच्या आधी Motorola Nio ची लाइव इमेज झाली लीक, 6 कॅमेरा आणि पवारफुल बॅटरी सह करेल एंट्री

Realme X7 Pro

रियलमी एक्स7 प्रो मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज, सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 1000+ प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी 9-कोर माली-G77 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हँडसेट मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आहे आणि 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोन मध्ये कॅमेरा स्पेक्स Realme X7 सारखे आहेत. तसेच फोनला पावर देण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

रियलमी सी11 व्हिडीओ

The post रियलमीचा कमी किंमत असलेला मोबाईल Realme C21 लवकरच होईल लॉन्च, वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c21-launch-india-soon-phone-receives-indonesian-telecom-certification-bis-nbtc/feed/ 0
रियलमीचा 5G फोन Realme X7 Pro येत आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-support-page-goes-live-in-india-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-support-page-goes-live-in-india-launch-soon/#respond Thu, 24 Dec 2020 13:29:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9443 रियलमी एक्स7 स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट रियलमी इंडिया वर पण लिस्ट झाला आहे.

The post रियलमीचा 5G फोन Realme X7 Pro येत आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने सप्टेंबर मध्ये आपल्या ‘एक्स सीरीज’ चा विस्तार करत चीन मध्ये दोन नवीन स्मार्टफोन Realme X7 आणि Realme X7 Pro लाॅन्च केले होते. टेक मंचावर एंट्री करताच इंडियन रियलमी फॅन पण या स्मार्टफोन्सची वाट बघू लागले होते, त्यांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हा फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट वर दिसला होता तसेच कंपनीचे सीईओ माधव सेठ यांनी फोनचा फोटो शेयर केला होता, तसेच आता रियलमी एक्स7 स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत वेबसाइट रियलमी इंडिया वर पण लिस्ट झाला आहे.

Realme X7 Pro रियलमी इंडिया वेबसाइट वरील सपोर्ट पेज सेग्मेंट मध्ये दिसला आहे, जो टिपस्टर मुकुलशर्मा ने स्पाॅट केला आहे. टिपस्टर नुसार कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइट वर फोनचा सपोर्ट पेज लाईव करण्यात आला आहे.सपोर्ट पेज लाईव झाल्यानंतर आशा व्यक्त केली जात आहे कि येत्या काही दिवसात कंपनी या फोनच्या भारतातील लाॅन्चची घोषणा पण करेल. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये ‘रियलमी एक्स7’ सीरीज चीनच्या बाहेर थायलंड आणि तैवान मध्ये पण लाॅन्च झाली आहे.

हे देखील वाचा : 44MP सेल्फी कॅमेरा आणि 8GB रॅम सह लॉन्च झाला Vivo V20 (2021), जाणून घ्या किंमत

Realme X7

रियलमी एक्स7 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 800U प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-जी57 जीपीयू देण्यात आला आहे. फोन मध्ये रॅम 8 जीबी आहे आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. रियलमीचा हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड रियलमी युआय वर चालतो. हँडसेट मध्ये पावर देण्यासाठी 4300mAh ची बॅटरी आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme X7 Pro

रियलमी एक्स7 प्रो मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज, सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 1000+ प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी 9-कोर माली-G77 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हँडसेट मध्ये 8 जीबी पर्यंत रॅम आहे आणि 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोन मध्ये कॅमेरा स्पेक्स Realme X7 सारखेच आहेत. फोनला पावर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हे देखील वाचा : Huawei ने लॉन्च केले दोन दमदार 5G स्मार्टफोन्स Nova 8 आणि Nova 8 Pro, येत आहेत जबरदस्त फीचर्ससह

कॅमेरा

दोन्ही फोन मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आणि एक सारख्या लेंस देण्यात आल्या आहेत. कॅमेऱ्यात देण्यात आलेल्या अपर्चर मध्ये काही फरक आहे. Realme X7 आणि X7 Pro मध्ये अपर्चर f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर, (X7 मध्ये अपर्चर f/2.3) आणि (X7 Pro मध्ये अपर्चर f/2.25) सह अल्ट्रा-वाइड-अँगल 8 मेगापिक्सल सेंसर, अपर्चर /2.4 सह 2 मेगापिक्सलचा ब्लॅक आणि वाइट पोर्टेट सेंसर व अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. व्हिडीओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी (Realme X7 मध्ये अपर्चर f/2.5) आणि (Realme X7 Pro मध्ये अपर्चर f/2.45) सह 32 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.

रियलमी एक्स7 प्रो व्हिडीओ

The post रियलमीचा 5G फोन Realme X7 Pro येत आहे भारतात, कंपनीच्या वेबसाइट वर झाला लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-pro-support-page-goes-live-in-india-launch-soon/feed/ 0
Realme X7 सीरीज लवकरच होईल भारतात लॉन्च, वेबसाइट वर लिस्ट झाले स्मार्टफोन्स https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-series-india-launch-soon-x7-pro-receives-bis-certification/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-series-india-launch-soon-x7-pro-receives-bis-certification/#respond Mon, 02 Nov 2020 13:38:53 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8768 टिप्सटर Sudhanshu ने Realme X7 Pro 5G मॉडेल नंबर RMX2121 सह हा BIS सर्टिफिकेशन साइट वर स्पॉट केला आहे.

The post Realme X7 सीरीज लवकरच होईल भारतात लॉन्च, वेबसाइट वर लिस्ट झाले स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वेगाने भारतीय स्मार्टफोन मार्केट मध्ये आपला विस्तार करत असलेली चिनी कंपनी रियलमी येत्या काळात रियलमी एक्स7 सीरीजचे स्मार्टफोन्स भारतात लॉन्च करण्यासाठी तयार दिसत आहे. या सीरीजचे फोन लुक सोबतच कॅमेरा क्वॉलिटी आणि स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत खूप शानदार असतील. काही दिवसांपूर्वीच रियलमीचे सीईओ माधव सेठ यांनी हिंट दिली आहे कि लवकरच भारतात रियलमी एक्स7 आणि एक्स 7 प्रो फोन लॉन्च होणार आहेत. तसेच आता टिप्सटर Sudhanshu ने Realme X7 Pro 5G मॉडेल नंबर RMX2121 सह हा BIS सर्टिफिकेशन साइट वर स्पॉट केला आहे.

या सर्टिफिकेशन वरून स्पष्ट झाले आहे कि प्रो मॉडेल पण भारतात सादर केला जाईल. पण अजूनही Realme X7 आणि X7 Pro च्या भारतीय किंमत आणि लॉन्च डेट बद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. आशा आहे कि फोनची किंमत 20,000 रुपयांच्या आसपास असेल.

हे देखील वाचा : 6,000एमएएच बॅटरी आणि 4 जीबी रॅम सह लॉन्च झाला स्वस्त असलेला Realme C15 Qualcomm Edition

Realme X7 सीरीजची भारतातील लॉन्च टाइमलाइन

टिपस्टर मुकुल शर्मानुसार, Realme X7 सीरीज भारतात डिसेंबर मध्ये रिलीज होईल. हा 2020 मध्ये ब्रँडचा शेवटचा मुख्य स्मार्टफोन लॉन्च असू शकतो आणि डिसेंबरच्या लॉन्च इवेंट मध्ये कंपनी डिसेंबरच्या मध्यात भारतात Realme X2 ची घोषणा करण्याची शक्यता आहे.

Realme X7 चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी एक्स7 मध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी+ (1080×2400 पिक्सल) एमोलेड डिस्प्ले आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 800U प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी माली-जी57 जीपीयू देण्यात आला आहे. फोन मध्ये रॅम 8 जीबी पर्यंत आहे आणि 128 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे. रियलमीचा हा फोन अँड्रॉइड 10 बेस्ड रियलमी यूआई वर चालतो.

हे देखील वाचा : 48MP कॅमेरा आणि शानदार प्रोसेसर सह Realme Q2 आणि Q2 Pro झाले लॉन्च, जाणून घ्या किंमत

फोन मध्ये 64 मेगापिक्सल प्राइमरी, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड-अँगल, 2 मेगापिक्सल मोनोक्रोम आणि 2 मेगापिक्सल मॅक्रो सेंसर आहेत. सेल्फीसाठी फोन मध्ये एफ/2.5 सह 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा आहे. हँडसेट मध्ये पावर देण्यासाठी 4300mAh ची बॅटरी आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Realme X7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

रियलमी एक्स7 प्रो मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 हर्ट्ज, सॅम्पलिंग रेट 240 हर्ट्ज आहे. तसेच फोन मध्ये ऑक्टा-कोर डाइमेंसिटी 1000+ प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी 9-कोर माली-G77 ग्राफिक्स प्रोसेसर आहे. हँडसेट मध्ये 8 जीबी पर्यंतचा रॅम आहे आणि 256 जीबी पर्यंत इनबिल्ट स्टोरेज आहे. या फोन मध्ये कॅमेरा स्पेक्स Realme X7 सारखे आहेत. तसेच फोनला पावर देण्यासाठी 4500mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 65 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

The post Realme X7 सीरीज लवकरच होईल भारतात लॉन्च, वेबसाइट वर लिस्ट झाले स्मार्टफोन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-series-india-launch-soon-x7-pro-receives-bis-certification/feed/ 0
8GB रॅम, 64MP कॅमेरा आणि शानदार डिजाइन सह लॉन्च झाले Realme X7 आणि X7 Pro, बघा स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-x7-pro-launched-with-amoled-display-65w-fast-charging-know-price-specification-and-sale/ https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-x7-pro-launched-with-amoled-display-65w-fast-charging-know-price-specification-and-sale/#respond Tue, 01 Sep 2020 14:29:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7942 Realme X7 आणि Realme X7 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी वेगवेगळ्या बॅटरीज देण्यात आल्या आहेत. पण दोन्ही फोन्सची बॅटरी 65W स्मार्ट प्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते.

The post 8GB रॅम, 64MP कॅमेरा आणि शानदार डिजाइन सह लॉन्च झाले Realme X7 आणि X7 Pro, बघा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Realme ने आज आपल्या घरच्या मार्केट चीन मध्ये नवीन सीरीज Realme X7 लॉन्च केली आहे. कंपनीने वर्चुअल इवेंट मध्ये रियलमी एक्स7 सीरीज सोबतच स्वस्त Realme V3 5G फोन पण सादर केला आहे. रियलमी एक्स7 सीरीज बद्दल बोलायचे तर यात Realme X7Realme X7 Pro स्मार्टफोनने एंट्री घेतील आहे. Realme X7 सीरीज मध्ये सुपरफास्ट चार्जिंग, हाई रिफ्रेश रेट, टच सॅम्पलिंग रेट स्क्रीन आणि 5G कनेक्टिविटी सारखे प्रभावशील स्पेसिफिकेशन्स आहेत. दोन्ही फोन्सची डिजाइन एक सारखी आहे पण रॅम, स्टोरेज आणि कॅमेरा सेटअप मध्ये थोडा फरक आहे.

सुरवात करूया रियलमी एक्स7 व रियलमी एक्स7 प्रो च्या डिजाइन पासून. दोन्ही फोन्स फुल-व्यू पंच होल डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहेत. फोन्स मधील होल-पंच डिस्प्ले वरच्या बाजूला डावीकडे आहे. रियलमी एक्स 7 मध्ये तिन्ही बाजूंना कमी बेजल्स आहेत. पण बॉटमला थोडा जाड बेजल दिसत आहे. तर रियलमी एक्स 7 प्रो मध्ये बॉटमला कमी बेजल देण्यात आला आहे. दोन्ही फोन्स मध्ये पावर ऑन-ऑफ बटन उजवीकडे आहे आणि वॉल्यूम रॉकर बटन डावीकडे आहे.

बॅक पॅनल पाहता दोन्ही फोन्स मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप मिळतो. या सेटअप मध्ये तीन सेंसर वर्टिकल आहेत. तसेच त्याच्या बाजूला एक मॅक्रो सेंसर आणि त्या खाली एलईडी लाइट आहे. रियलमी एक्स 7 च्या मागे रियलमीची ब्रँडिंग डावीकडे खाली देण्यात आली आहे. तर रियलमी एक्स 7 प्रो च्या मागे उजवीकडे वर्टिकली मोठ्या अक्षरांत कंपनीची टॅग लाइन ‘Dare to Leap’ लिहिण्यात आली आहे.

दोन्ही फोन्स मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आणि एक सारख्या लेंस देण्यात आल्या आहेत. कॅमेऱ्यातील अपर्चर मध्ये थोडा फरक आहे. Realme X7 आणि X7 Pro मध्ये अपर्चर f/1.8 सह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी शूटर, X7 मध्ये अपर्चर f/2.3 आणि X7 Pro मध्ये अपर्चर f/2.25 सह अल्ट्रा-वाइड-अँगल 8 मेगापिक्सल सेंसर, अपर्चर /2.4 सह 2 मेगापिक्सलचा ब्लॅक आणि वाइट पोर्टेट सेंसर व अपर्चर f/2.4 सह 2 मेगापिक्सलचा मॅक्रो शूटर देण्यात आला आहे. वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी Realme X7 मध्ये अपर्चर f/2.5 आणि Realme X7 Pro मध्ये अपर्चर f/2.45 सह 32 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे.

Realme X7 आणि Realme X7 Pro मध्ये पावर बॅकअपसाठी वेगवेगळ्या बॅटरीज देण्यात आल्या आहेत. पण दोन्ही फोन्सची बॅटरी 65W स्मार्ट प्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येते. या टेक्नॉलॉजीच्या मदतीने फोन्स फास्ट चार्ज केले जाऊ शकतात. हि टेक्नॉलजी वोल्टेज कमी करून चार्जिंग पावर वाढवते आणि यात हीट पण कमी निर्माण होते. Realme X7 मध्ये 4300mAh ची बॅटरी देण्यात आली आहे आणि X7 Pro मध्ये 4500mAh ची बॅटरी आहे. तसेच दोन्ही फोन्स सोबत टाइप-सी चार्जिंग पोर्ट आणि स्टँडर्ड 10V / 6.5A फ्लॅश चार्ज अडॅप्टर मिळतो.

Realme X7 मध्ये 6.4-इंचाचा फुल-एचडी+ (1,080×2,400 पिक्सल) AMOLED डिस्प्ले 90.8 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो सह देण्यात आला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये कोर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन आहे. इतकेच नव्हे तर फोनच्या स्क्रीन मध्ये 180Hz टच सॅम्पलिंग रेट देण्यात आला आहे.

Realme X7 Pro मध्ये 6.55-इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आणि सॅम्पलिंग रेट 240Hz पर्यंत आहे. इतकेच नव्हे तर फोन मधील डिस्प्ले 91.6 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो सह येतात. तसेच फोन मध्ये 5th-जनरेशन कोर्निंग गोरिल्ला ग्लासचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. यात 1,200 निट्स ब्राईटनेस आहे.

रियलमी एक्स7 बद्दल बोलायचे झाले तर हा फोन Mediatek Dimensity 800U चिपसेट सह येतो. या चिपसेट मध्ये चार कॉर्टेक्स-ए 76 कोर आहेत आणि ग्राफिक्ससाठी GPU माली-G57 MC3 आहे. फोन मध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB पर्यंतची स्टोरेज आहे. दुसरीकडे Realme X7 Pro मध्ये ऑक्टा-कोर Dimensity 1000+ SoC आणि 9-core Mali-G77 ग्राफिक प्रोसेसर आहे. डिवाइस मध्ये 8GB पर्यंतचा LPDDR4X रॅम आणि 256GB पर्यंतची USF 2.1 स्टोरेज देण्यात आली आहे.

दोन्ही फोन्स एंडरॉयड 10 सह रियलमी यूआई वर चालतात. कनेक्टिविटी ऑप्शन पाहता दोन्ही फोन्सच्या दोन्ही सिम कार्ड्सवर 5जी, 4 जी एलटीई आहे तसेच फोन्स मध्ये डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ वी 5.1, जीपीएस, ग्लोनास आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा समावेश आहे. त्याचबरोबर जियोमॅग्नेटिक सेंसर, एंबियंट लाइट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर, जायरोस्कोप आणि एक्सेलेरोमीटरचा समावेश पण आहे.

Realme X7 च्या 6GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 1,799 (जवळपास 19,000 रुपये), 8GB + 128GB वेरिएंटची किंमत RMB 2,399 (जवळपास 25,600 रुपये) आहे. Realme X7 कंपनीने Haiyu Blue, C Color, आणि Fantasy White कलर मध्ये सादर केला आहे.

तर Realme X7 Pro च्या 6GB + 128GB वेरिएंटसाठी CNY 2,199 (जवळपास 23,400 रुपये), 8GB + 128GB वेरिएंटची किंमत CNY 2,499 (जवळपास 26,600 रुपये) आणि 8GB + 256GB वेरिएंटची किंमत CNY 3,199 (जवळपास 34,300 रुपये) आहे. हँडसेट C Color, Fantasy White आणि Xingyu Black मध्ये विकला जाईल.

The post 8GB रॅम, 64MP कॅमेरा आणि शानदार डिजाइन सह लॉन्च झाले Realme X7 आणि X7 Pro, बघा स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-x7-x7-pro-launched-with-amoled-display-65w-fast-charging-know-price-specification-and-sale/feed/ 0