Redmi K60 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 10:24:55 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB रॅमसह Redmi K60 आणि Redmi K60E चीनमध्ये सादर https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-redmi-k60e-launched-in-china-know-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-redmi-k60e-launched-in-china-know-price-specifications/#respond Tue, 27 Dec 2022 13:34:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16420 शाओमीनं चीनमध्ये Redmi K60 series लाँच केली आहे. या नव्या सीरिजमध्ये Redmi K60, Redmi K60E आणि Redmi K60 Pro असे तीन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. यातील प्रो मॉडेल क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 जेन2 सह सादर करण्यात आला आहे. परंतु त्यापेक्षा कमी किंमतीत येऊन देखील Redmi K60 आणि Redmi K60E मध्ये 16GB पर्यंत […]

The post 8GB रॅमसह Redmi K60 आणि Redmi K60E चीनमध्ये सादर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीनं चीनमध्ये Redmi K60 series लाँच केली आहे. या नव्या सीरिजमध्ये Redmi K60, Redmi K60E आणि Redmi K60 Pro असे तीन स्मार्टफोन सादर करण्यात आले आहेत. यातील प्रो मॉडेल क्वॉलकॉमच्या सर्वात शक्तिशाली प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 8 जेन2 सह सादर करण्यात आला आहे. परंतु त्यापेक्षा कमी किंमतीत येऊन देखील Redmi K60 आणि Redmi K60E मध्ये 16GB पर्यंत रॅम, 120Hz रिफ्रेश रेट आणि फ्लॅगशिप ग्रेड प्रोसेसर देण्यात आले आहेत. पुढे आम्ही या सीरिजमधील Redmi K60 आणि Redmi K60E स्मार्टफोनची सर्व माहिती दिली आहे.

Redmi K60, Redmi K60E Price

Redmi K60 स्मार्टफोनची किंमत 2,499 युआन (सुमारे 29,800 रुपये) पासून सुरु होते, ही किंमत फोनच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची आहे. तर 2699 युआन (सुमारे 32,200 रुपये) मध्ये 8GB + 256GB मॉडेल, 2,999 युआन (सुमारे 35,700 रुपये) मध्ये 12GB + 256GB व्हेरिएंट, 3299 युआन (सुमारे 39,300 रुपये) मध्ये 12GB + 512GB मॉडेल आणि 3,599 युआन (सुमारे 42,900 रुपये) मध्ये 16GB + 512GB व्हर्जन मिळेल.

छोट्या Redmi K60E च्या बेस मॉडेलची किंमत 2,199 युआन (सुमारे 26,200 रुपये) ठेवण्यात आली आहे, ज्यात 8GB रॅम व 128GB स्टोरेज मिळते. तर 2,399 युआन (सुमारे 28,600 रुपये) 8GB + 256GB व्हेरिएंट, 2599 युआन (सुमारे 31,000 सुमारे) 12GB + 256GB मॉडेल आणि 2,799 युआन (सुमारे 33,400 रुपये) 12GB + 512GB व्हर्जनसाठी मोजावे लागतील. हे देखील वाचा: कमी किंमतीत वरच्या दर्जाचे फिचर देणारा Redmi K60 Pro लाँच; जाणून घ्या स्पेशल फीचर्स

Redmi K60 Specifications

  • 6.67-inch 2K 120Hz AMOLED Display
  • Snapdragon 8+ Gen1 Chipset
  • 16GB RAM, 512GB Storage and MIUI 14
  • 5500mAh Battery
  • 67W Fast Charging, 30W Wireless Charging
  • 64MP OIS Triple Camera

Redmi K60 स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा क्यूएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 3200 X 1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1400nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो तसेच ही पंच होल डिजाईन असलेली स्क्रीन 12 बिट पी3-कलर गामुट, डॉल्बी व्हिजन, 1920Hz पीडब्लूएएम डीमींग, HDR10+ आणि JNCD प्रोटेक्शन लेयरसह येते.

Redmi K60 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen1 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला ग्राफिक्ससाठी Adreno GPU आहे. हा फोन 16GB पर्यंत RAM आणि 512GB पर्यंत स्टोरेजला सपोर्ट करतो. रेडमीनं हा स्मार्टफोन Android 13 आधारित MIUI 14 सह सादर केला आहे.

Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 67W फास्ट चार्जिंग आणि 30W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये ड्युअल स्पिकर्स, एनएफसी आणि इन्फ्रारेड सेन्सर मिळतो. तर कनेक्टव्हिटीसाठी 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

फोटोग्राफीसाठी Redmi K60 स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एफ 1.79 अपर्चर आणि ओआयएस सपोर्ट आलेला 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, ही एक 6P लेन्स आहे. जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Redmi K60E Specifications

  • 6.67-inch 2K 120Hz AMOLED Display
  • MediaTek Dimensity 8200 SoC
  • 12GB RAM, 256GB Storage and MIUI 14
  • 5500mAh Battery
  • 67W Fast Charging
  • 48MP OIS Triple Camera
  • Redmi K60E या सीरिजमधील सर्वात स्वस्त स्मार्टफोन आहे, जो 6.7-इंचाच्या 2K अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. ही पंच होल स्क्रीन 120Hz रिफ्रेश रेट, 1920Hz पीडब्ल्यूएम डीमींग, HDR10+ आणि गोरल ग्लास विक्ट्सला सपोर्ट करते. सिक्योरिटीसाठी यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे, तसेच फोनमध्ये ड्युअल स्पिकर्स, एनएफसी आणि इन्फ्रारेड सेन्सर देखील आहे. हे देखील वाचा: मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत?

    या फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 8200 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे, जी मायक्रो एसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. हा फोन Android 13 आधारित MIUI 14 वर चालतो. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्टचा पर्याय देण्यात आला आहे. फोनमधील 5500mAh ची दमदार बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

    Redmi K60E मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप फोनच्या बॅक पॅनलवर देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 48MP चा Sony IMX582 सेन्सर प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे, जो OIS ला सपोर्ट करतो. त्याचबरोबर 8MP चा अल्ट्रा वाइड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 16MP चा सेल्फी स्नॅपर देण्यात आला आहे.

    The post 8GB रॅमसह Redmi K60 आणि Redmi K60E चीनमध्ये सादर first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-redmi-k60e-launched-in-china-know-price-specifications/feed/ 0 आगामी Redmi K60 सीरिजची संभाव्य लाँच टाइमलाइन समजली; तीन मॉडेल होऊ शकतात लाँच https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-pro-k60e-early-launch-tipped-know-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-pro-k60e-early-launch-tipped-know-specifications/#respond Thu, 22 Dec 2022 07:34:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16254 शाओमीच्या सब ब्रँड रेडमीची ‘के सीरिज’ फ्लॅगशिप किलर म्हणून ओळखली जाते. कंपनी वरच्या दर्जाचे फीचर्स कमी किंमतीत देण्यासाठी ही सीरिज लाँच करते. आता आगामी Redmi K60 सीरिजची लाँच टाइमलाइन प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं विबोच्या माध्यमातून लीक केली आहे. त्यानुसार ही सीरिज याच महिन्यात चीनमध्ये लाँच केली जाऊ शकते आणि यात तीन मॉडेल मिळू शकतात. […]

    The post आगामी Redmi K60 सीरिजची संभाव्य लाँच टाइमलाइन समजली; तीन मॉडेल होऊ शकतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    शाओमीच्या सब ब्रँड रेडमीची ‘के सीरिज’ फ्लॅगशिप किलर म्हणून ओळखली जाते. कंपनी वरच्या दर्जाचे फीचर्स कमी किंमतीत देण्यासाठी ही सीरिज लाँच करते. आता आगामी Redmi K60 सीरिजची लाँच टाइमलाइन प्रसिद्ध टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं विबोच्या माध्यमातून लीक केली आहे. त्यानुसार ही सीरिज याच महिन्यात चीनमध्ये लाँच केली जाऊ शकते आणि यात तीन मॉडेल मिळू शकतात. आगामी रेडमी के सीरिजमध्ये Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60E असे तीन मॉडेल सादर केले जाऊ शकतात.

    टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननुसार, हे फोन्स ‘किंग ऑफ परफॉर्मन्स’ या टॅगलाईनसह बाजारात येऊ शकतात. या स्मार्टफोन्समध्ये क्वॉलकॉम आणि मीडियाटेकचे हायएंड चिपसेट दिला जाऊ शकतो. काही दिवसांपूर्वी आलेल्या माहितीनुसार रेडमी के60 सीरिज पुढील वर्षी जानेवारीमध्ये आली होती, त्यामुळे ही नवीन माहिती रेडमी प्रेमींसाठी गुडन्यूज म्हणता येईल. ही सीरिज भारतासह जागतिक बाजारात मात्र पोको ब्रॅंडिंगसह येऊ शकते. हे देखील वाचा: जियोला मात देण्यासाठी एयरटेलची नवी चाल; मोफत हॉटस्टार सब्सस्क्रिप्शन असलेल्या प्लॅनचं पुनरागमन

    Redmi K60 सीरिजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

    लीक रिपोर्ट्सनुसार Redmi K60 स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा लेटेस्ट Snapdragon 8 Gen2 चिपसेट दिला जाऊ शकतो, तर प्रो व्हर्जनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8+ Gen1 चिपसेट मिळू शकतो, असं सांगण्यात आलं आहे. परंतु बेस मॉडेलमध्ये प्रो मॉडेलपेक्षा शक्तिशाली प्रोसेसर मिळेल, ही माहिती पचनी पडत नाही. त्यामुळे या दोन मॉडेलच्या चिपसेटच्या माहितीसाठी लाँचची वाट पाहावी लागेल.

    Redmi k60

    दुसरीकडे Redmi K60E स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा चिपसेट मिळू शकतो, ज्याचं नाव अद्याप समोर आलं नाही. परंतु असा अंदाज लावला जात आहे की या रेडमी स्मार्टफोनमध्ये Dimensity 8200 चिपसेट दिला जाऊ शकतो. Redmi K60 मध्ये 6.67-इंचाचा क्यूएचडी+ डिस्प्ले दिला जाऊ शकतो, जो 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. या फोनमध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी मिळेल जी 67W फास्ट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करू शकते. तसेच रेडमी के सीरिजमध्ये पहिल्यांदाच 30W वायरलेस चार्जिंगचा सपोर्ट मिळू शकतो.

    फोटोग्राफी सेगमेंट पाहता Redmi K60 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात येऊ शकतो, जोडीला 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या फोनमध्ये 16MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. तर Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये 2K रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो. तसेच प्रो मॉडेल 67W वायर्ड फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकतो. हे देखील वाचा: स्वस्त 5G फोन हवा? मग थांबा! Snapdragon 4 Gen 1, 50MP ट्रिपल कॅमेऱ्यासह Moto G53 5G येतोय

    Redmi K60 सीरिज या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात चीनमध्ये लाँच होऊ शकतो, त्यामुळे लवकरच या सीरीजच्या सर्व स्पेक्सची माहिती समोर येईल.

    The post आगामी Redmi K60 सीरिजची संभाव्य लाँच टाइमलाइन समजली; तीन मॉडेल होऊ शकतात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-pro-k60e-early-launch-tipped-know-specifications/feed/ 0
    शक्तिशाली प्रोसेसर अत्यंत कमी किंमतीत; वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी येतेय Redmi K60 Series https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-series-camera-and-chipset-details-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-series-camera-and-chipset-details-leaked/#respond Tue, 08 Nov 2022 07:16:10 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14700 शाओमी आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत के सीरिज स्मार्टफोन सादर करत असते, जे कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देतात. आता बातम्या येत आहे की कंपनी आपल्या नवीन Redmi K60 series वर काम करत आहे जी डिसेंबरमध्ये टेक मंचावर येऊ शकते. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली नाही परंतु चर्चा आहे की सीरीज अंतगर्त Redmi K60, Redmi K60 Pro आणि […]

    The post शक्तिशाली प्रोसेसर अत्यंत कमी किंमतीत; वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी येतेय Redmi K60 Series first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    शाओमी आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत के सीरिज स्मार्टफोन सादर करत असते, जे कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देतात. आता बातम्या येत आहे की कंपनी आपल्या नवीन Redmi K60 series वर काम करत आहे जी डिसेंबरमध्ये टेक मंचावर येऊ शकते. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली नाही परंतु चर्चा आहे की सीरीज अंतगर्त Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60 Gaming Edition लाँच केले जातील. आज एक नवीन लीकमध्ये या सीरीजच्या कॅमेरा सेग्मेंटचे डिटेल्स देखील समोर आले आहेत. पुढे माहिती देण्यात आली आहे की रेडमी के60, रेडमी के60 प्रो आणि रेडमी के60 गेमिंग 5जी फोन कोणत्या स्पेसिफिकेशन्ससह येतील.

    Redmi K60 Series चा कॅमेरा

    रेडमी के60 सीरीजच्या कॅमेरा सेगमेंटची माहिती डिजिटल चॅट स्टेशनच्या माध्यमातून समोर आली आहे. लीकनुसार Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच Redmi K60 Gaming 5G फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. तसेच सीरीजचा बेस मॉडेल Redmi K60 स्मार्टफोन 48 मेगापिक्सल कॅमेरा लेन्ससह लाँच केला जाईल. लीकनुसार Redmi K60 Series चे सर्व स्मार्टफोन optical image stabilisation (OIS) ला सपोर्ट करतील. हे देखील वाचा: Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर

    Redmi K60 Series चा प्रोसेसर

    लीकनुसार रेडमी के60 स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. हा चिपसेट 3.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर काम करू शकतो. तसेच रेडमी के60 प्रो मीडियाटेक डिमेनसिटी 9200 चिपसेटसह बाजारात येईल. लीकनुसार खास गेमिंगच्या चाहत्यांसाठी बनवण्यात येत असलेला रेडमी के60 गेमिंग एडिशन पावरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. जो क्वॉलकॉमचा आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर असेल.

    अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता या सीरीजमध्ये 144हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला 2के डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पवार बॅकअपसाठी 5,500एमएएच बॅटरी आणि 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. आशा आहे की कंपनी पुढील काही दिवसांत ही सीरीज टीज करण्यास सुरुवात करेल तसेच Redmi K60, Redmi K60 Pro आणि K60 Gaming 5G चा लाँच अनाउंस करेल. हे देखील वाचा: एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही

    लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

    The post शक्तिशाली प्रोसेसर अत्यंत कमी किंमतीत; वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी येतेय Redmi K60 Series first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/redmi-k60-series-camera-and-chipset-details-leaked/feed/ 0