Samsung Galaxy M32 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 08 Mar 2023 15:19:56 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung नं गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी https://www.91mobiles.com/marathi/samsung-scheme-discount-offer-samsung-galaxy-m52-5g-phone-and-galaxy-m32-4g-mobile/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-scheme-discount-offer-samsung-galaxy-m52-5g-phone-and-galaxy-m32-4g-mobile/#respond Wed, 23 Nov 2022 04:15:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15255 सॅमसंग कंपनी भारतातील जुना आणि विश्वासू मोबाइल ब्रँड आहे. अनेक मोबाइल युजर्स नवीन स्मार्टफोन खरेदी करताना चीनी ब्रँडच्या तुलनेत सॅमसंगवर जास्त विश्वास दाखवतात. आपल्या अशाच चाहत्यांना भेट देत सॅमसंग इंडियानं गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या दोन स्मार्टफोन्सवर डिस्कांउट ऑफर सादर केली आहे. Samsung Galaxy M32 आणि Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन डिस्काउंटसह विकले जात आहेत तसेच हे […]

The post Samsung नं गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सॅमसंग कंपनी भारतातील जुना आणि विश्वासू मोबाइल ब्रँड आहे. अनेक मोबाइल युजर्स नवीन स्मार्टफोन खरेदी करताना चीनी ब्रँडच्या तुलनेत सॅमसंगवर जास्त विश्वास दाखवतात. आपल्या अशाच चाहत्यांना भेट देत सॅमसंग इंडियानं गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या दोन स्मार्टफोन्सवर डिस्कांउट ऑफर सादर केली आहे. Samsung Galaxy M32 आणि Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन डिस्काउंटसह विकले जात आहेत तसेच हे Samsung Smartphone 5 हजार रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील.

Samsung Galaxy M52 5G Offer

सॅमसंग इंडियानं आपल्या मिडबजेट 5जी मोबाइल फोन गॅलेक्सी एम52 वर 5,000 रुपयांचा डिस्काउंट घोषित केला आहे. सॅमसंग ऑफर अंतगर्त Samsung Galaxy M52 5G स्मार्टफोन 5,000 रुपयांनी स्वस्तात विकत घेता येईल. ही सूट फोनच्या सर्व व्हेरिएंट्सवर लागू असेल ज्यात 6GB RAM + 128 GB Storage तसेच 8GB RAM + 128 GB Storage चा समावेश असेल. स्कीम अंतगर्त हे दोन्ही व्हेरिएंट्स आपल्या ऑरिजनल प्राइसपेक्षा 5 हजार रुपयांनी स्वस्तात विकत घेता येतील. हे देखील वाचा: तब्बल 512GB मेमरीसह येतोय iQOO Neo 7 SE; Xiaomi आणि OnePlus च्या अडचणी वाढणार

Samsung Galaxy M52 5G 6 जीबी रॅम व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे परंतु ऑफर अंतगर्त हा 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 28,999 रुपयांचा गॅलेक्सी ए52 5जी 8 जीबी रॅम व्हेरिएंट 23,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध झाला आहे. परंतु ही Samsung Offer कंपनीनं 5 दिवसांसाठी लागू केली आहे जी 24 नोव्हेंबरपर्यंत चालेल.

Samsung Galaxy M32 Offer

सॅमसंग गॅलेक्सी एम32 स्मार्टफोनच्या खरेदीवर कंपनी 2,500 रुपयांची सूट देत आहे. या मोबाइल फोनचा 4GB RAM + 64 GB Storage व्हेरिएंट 10,999 रुपयांच्या ऐवजी 8,499 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध होत आहे तसेच 12,999 रुपयांचा 6GB RAM + 128 GB Storage व्हेरिएंट ऑफर अंतगर्त 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही सॅमसंग स्कीम देखील 24 नोव्हेंबर पर्यंत वैध असेल.

Samsung Galaxy M52 5G Specification

फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल-एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट, 1080 x 2400 पिक्सल रिजॉल्यूशन आणि डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 प्रोटेक्शन मिळतं. प्रोसेसर बद्दल बोलायचं तर, यात Qualcomm SDM 778G Octa Core 2.4GHz चिपसेटचा वापर केला गेला आहे. Galaxy M52 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आधारित OneUI वर चालतो. जोडीला 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हे देखील वाचा: सॅमसंगचा नवा budget 5G Smartphone! सिम कार्ड न टाकताच मिळणार रेंज, स्वस्तात वॉटरप्रूफ फोन

सॅमसंग गॅलेक्सी एम52 5जी डिवाइसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64MP ची प्रायमरी कॅमेरा लेन्स, 12MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 5MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP ची फ्रंट कॅमेरा लेन्स मिळतो. बॅटरीच्या बाबतीत फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो, जी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung नं गॅलेक्सी ‘एम’ सीरीजच्या दोन स्मार्टफोन्सच्या किंमती केल्या कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-scheme-discount-offer-samsung-galaxy-m52-5g-phone-and-galaxy-m32-4g-mobile/feed/ 0
6,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यासह भारतात येत आहे Samsung Galaxy M32, किंमत असेल कमी https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-new-mobile-samsung-galaxy-m32-with-6000mah-battery-specification/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-new-mobile-samsung-galaxy-m32-with-6000mah-battery-specification/#respond Wed, 19 May 2021 11:21:39 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10971 ब्लूटूथ एसआईजी सर्टिफिकेशन साइटवर गॅलेक्सी एम32 SM-M325FV/DS मॉडेल नंबरसह दिसला आहे. सर्टिफिकेशन साइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एम32 मध्ये Bluetooth 5.0 कनेक्टिविटी मिळेल. हा 4जी फोन लेटेस्ट एंड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमसह लॉन्च केला जाईल.

The post 6,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यासह भारतात येत आहे Samsung Galaxy M32, किंमत असेल कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी सॅमसंग गेली अनेक दिवस बजेट आणि मिड रेंज स्मार्टफोन सेगमेंटमध्ये एकापाठोपाठ एक शानदार मोबाईल लॉन्च करून आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना आव्हान सादर करत आहे. आता बातमी समोर येत आहे कि कंपनी Galaxy M Series मध्ये एक नवीन फोन Samsung Galaxy M32 लॉन्च करणार आहे. अलीकडेच सॅमसंगचा हा अपकमिंग फोन Geekbench वर स्पॉट झाला होता, जिथे फोनच्या स्पेसिफिकेशन डीटेल्सबाबत माहिती समोर आली होती. आता हा फोन मॉडेल नंबर SM-M325FV/DS सह स्पॉट झाला आहे. या लिस्टिंगवरून स्पष्ट झाले आहे कि कंपनी लवकरच हा फोन टेक मंचावर सादर करणार आहे. (Samsung to launch new mobile Samsung Galaxy M32 with 6000mah battery specification)

Samsung Galaxy M32 कधी होईल लॉन्च

लिस्टिंगमध्ये सध्या फोनच्या लॉन्चबद्दल कोणतीही माहिती समोर आली नाही. परंतु, वारंवार नवीन सर्टिफिकेशनवर हा फोन दिसल्यामुळे असे वाटत आहे कि लवकरच मार्केटमध्ये हा फोन लॉन्च होईल. तसेच आशा व्यक्त केली जात आहे कि हा फोन गॅलेक्सी एम31 चा अपग्रेडेड वर्जन असेल. शक्यता व्यक्त केली जात आहे कि गॅलेक्सी एम32 लॉन्च झालेल्या Galaxy A32 4G चा रिब्रँडेड वर्जन असेल.

हे देखील वाचा : Honor स्मार्टफोन मार्केटमध्ये करेल जोरदार पुनरागमन, Snapdragon 775G चिपसेटसह घेऊन येईल स्मार्टफोन

samsung galaxy m32 bluetooth sig

Samsung Galaxy M32 चे स्पेसिफिकेशन

ब्लूटूथ एसआईजी सर्टिफिकेशन साइटवर गॅलेक्सी एम32 SM-M325FV/DS मॉडेल नंबरसह दिसला आहे. सर्टिफिकेशन साइटवरून मिळालेल्या माहितीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी एम32 मध्ये Bluetooth 5.0 कनेक्टिविटी मिळेल. हा 4जी फोन लेटेस्ट एंड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमसह लॉन्च केला जाईल.

हा फोन 6जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच यात MediaTek Helio G80 प्रोसेसर मिळेल. डिवाइसमध्ये कोणते फीचर्स असतील याची ठोस माहिती मिळाली नाही.

Samsung अपकमिंग फोन Galaxy M32

Samsung Galaxy M32 चे बाकीचे फीचर्स पाहता यात 6.4 इंचाचा HD+ AMOLED डिस्पले मिळेल. तसेच सॅमसंगच्या या आगामी फोनमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल, ज्याचा प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा असेल. सोबत 8 एमपीची अल्ट्रावाइड लेंस आणि 2-2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि मॅक्रो सेंसर असेल.

हे देखील वाचा : Google Photos ची फ्री स्टोरेज सर्विस बंद होणार आहे 1 जूनला, डिलीट होण्यापूर्वी अश्याप्रकारे करा फोटो डाउनलोड

या फोनमध्ये सेल्फीसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम32 मध्ये 6000 एमएएचची बॅटरी असू शकते, जी फास्ट चार्जिंगला सपोर्टसह येऊ शकते. सॅमसंग हा फोन लवकरच भारतात लॉन्च करू शकते आणि याची संभावित किंमत 10 ते 15 हजार रुपयांच्या आसपास असू शकते.

The post 6,000mAh बॅटरी आणि 5 कॅमेऱ्यासह भारतात येत आहे Samsung Galaxy M32, किंमत असेल कमी first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-to-launch-new-mobile-samsung-galaxy-m32-with-6000mah-battery-specification/feed/ 0
Samsung Galaxy M32 4G लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, या फीचर्ससह लवकरच करेल एंट्री https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m32-4g-geekbench-listing-specification-launch-soon/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m32-4g-geekbench-listing-specification-launch-soon/#respond Fri, 30 Apr 2021 13:48:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10784 लिस्टिंगमध्ये समोर आले आहे कि गॅलेक्सी एम-सीरीजचा हा फोन मॉडेल नंबर SM-M325FV सह स्पॉट केला गेला आहे.

The post Samsung Galaxy M32 4G लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, या फीचर्ससह लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Samsung कंपनीने अलीकडेच भारतीय टेक मंचावर आपला नवीन 5G स्मार्टफोन Galaxy M42 लॉन्च केला आहे. गॅलेक्सी एम42 बाजारात आल्यानंतर आता सॅमसंगच्या Galaxy M-सीरीजमध्ये यांच्या दुसऱ्या फोन Samsung Galaxy M32 बद्दल माहिती समोर येऊ लागली आहे. बोलले जात आहे कि कंपनी या फोनवर पण काम करत आहे आणि लवकरच हा टेक मार्केटमध्ये सादर करेल. कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे याची माहिती दिली नाही. Galaxy M32 कंपनीद्वारे सादर केलेल्या Galaxy M31s चा सक्सेसर वाटत आहे. जो आता Geekbench वर स्पॉट केला गेला आहे. लिस्टिंगमध्ये या अपकमिंग 4G स्मार्टफोनच्या काही स्पेसिफिकेशन्सची माहिती पण समोर आली आहे. चला एक नजर टाकूया या फोनवर. (Samsung Galaxy M32 4G Geekbench listing specification launch soon)

Samsung Galaxy M32 4G झाला Geekbench वर स्पॉट

लिस्टिंगमध्ये समोर आले आहे कि गॅलेक्सी एम-सीरीजचा हा फोन मॉडेल नंबर SM-M325FV सह स्पॉट केला गेला आहे. तसेच सांगण्यात आले आहे कि फोनमध्ये “Titan Marmot” मदरबोर्डची पावर असेल. हे कोडनेम MediaTek Helio G80 चिपचे आहे. फोनमध्ये 6GB रॅम आणि अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टम असेल. आम्हाला आशा आहे कि फोनमध्ये वनयुआय 3.0 टॉप अँड्रॉइड मोबाईल ऑपरेटिंग सिस्टम असेल.

हे देखील वाचा : ASUS Adolpad 10 Pro टॅबलेट चीनमध्ये झाला लॉन्च, MediaTek प्रोसेसर आणि 7300mAh बॅटरी

Samsung Galaxy M32 4G गिकबेंच स्कोर

गीकबेंच लिस्टिंगवरून डिवाइसच्या सिंगल-कोर आणि मल्टी-कोर टेस्ट स्कोरची माहिती मिळाली आहे. या दोन्ही टेस्टमध्ये क्रमश: 361 आणि 1254 स्कोर देण्यात आला आहे. याआधी सॅमसंग गॅलेक्सी एम32 ला DEKRA सर्टिफिकेशन एजेंसीवर स्पॉट केला गेला होता, ज्याची माहिती सॅममोबाईलच्या माध्यमातून समोर आली होती.

या लिस्टिंगमध्ये खुलासा झाला होता कि सॅमसंग गॅलेक्सी एम32 स्मार्टफोन 6,000एमएएच बॅटरीसह बाजारात येईल. सर्टिफिकेशन्स साइटवर बॅटरीची रेटेड कपॅसिटी 5,830एमएएच सांगण्यात आली आहे. इथे बॅटरीचा मॉडेल नंबर पण नोंदवण्यात आला आहे जो EB-BM325ABN आहे. या लिस्टिंगमध्ये सांगण्यात आले होते कि Samsung Galaxy M32 मध्ये 6,000एमएएचची बॅटरी असेल.

GalaxyA32 4g कॅमेरा

Samsung Galaxy M32

सॅमसंग गॅलेक्सी एम32 चे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या रिपोर्टनुसार हा फोन बऱ्याच अंशी गॅलेक्सी ए32 स्मार्टफोन सारखा असेल. या फोनमध्ये 6.4 इंचाचा एमोलेड डिस्प्ले मिळू शकतो जो 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करेल. लीकनुसार हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 वर लॉन्च होईल आणि सॅमसंग वनयुआय 3 वर काम करेल. फोनमध्ये प्रोसेसिंगसाठी मीडियाटेकचा हीलियो जी80 चिपसेट असल्याचे लीकमध्ये समोर आले आहे.

हे देखील वाचा : Jio चे 250 रुपयांपेक्षा कमी किंमतीतले 3 प्लान, देतील रोज 2GB पर्यंत डेटा आणि अनलिमिटेड फ्री कॉलिंग

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy M32 मध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर दिला जाऊ शकतो तसेच 8 मेगापिक्सलची सेकंडरी लेंस आणि 5 मेगापिक्सलचे दोन इतर सेंसर फोनमध्ये दिले जाऊ शकतात. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी गॅलेक्सी एम32 मध्ये 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असल्याचे लीक्समध्ये समोर आले आहे.

Samsung Galaxy M32 बद्दल सांगू इच्छितो कि हा एक 4G फोन असेल जो डुअल सिम सपोर्टसह लॉन्च केला जाईल. गॅलेक्सी ए32 मध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली होती तर गॅलेक्सी एम32 स्मार्टफोनमध्ये 6,000एमएएचची बॅटरी मिळेल. सॅमसंग हा फोन कधी बाजारात घेऊन येईल हे अजून समजले नाही पण आशा आहे कि कंपनी Samsung Galaxy M32 च्या लॉन्चमध्ये जास्त वेळ घेणार नाही.

सॅमसंग गॅलेक्सी एम31एस व्हिडीओ

The post Samsung Galaxy M32 4G लॉन्चच्या आधी वेबसाइटवर झाला लिस्ट, या फीचर्ससह लवकरच करेल एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-m32-4g-geekbench-listing-specification-launch-soon/feed/ 0