Telecom - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 06 Jul 2023 08:24:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 4G नेटवर्कवरून 5G वर कसं शिफ्ट करायचं? जाणून घ्या सहजसोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/4g-varun-5g-var-kasa-shift-karayach/ https://www.91mobiles.com/marathi/4g-varun-5g-var-kasa-shift-karayach/#respond Wed, 14 Jun 2023 11:30:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21612 भारतात एयरटेल आणि रिलायन्स जियोनं 5G सर्व्हिस सुरु केली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल आणि जियोनं युजर्सना 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जर तुमच्या परिसरात देखील ह्या दोन्ही कंपन्यांची 5G सर्व्हिस सुरु झाली असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकता. 4G वरून 5G वर […]

The post 4G नेटवर्कवरून 5G वर कसं शिफ्ट करायचं? जाणून घ्या सहजसोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात एयरटेल आणि रिलायन्स जियोनं 5G सर्व्हिस सुरु केली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल आणि जियोनं युजर्सना 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जर तुमच्या परिसरात देखील ह्या दोन्ही कंपन्यांची 5G सर्व्हिस सुरु झाली असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकता.

4G वरून 5G वर शिफ्ट कसं करायचं?

एयरटेल आणि जियोच्या 5G सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तुमच्यकडे 5G कम्पॅटिबल स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. फोनच्या सेटिंग मध्ये मामूली बदल करून तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकाल. इथे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये 5G इनेबल कसं करायचं हे सांगणार आहोत.

Google Pixel किंवा स्टॉक अँड्रॉइड असलेले स्मार्टफोन

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Settings मेन्यू ओपन करा. त्यानंतर Network & Internet वर टॅप करून SIM सिलेक्ट करा. जर तुमच्या फोनमध्ये दोन सिम असतील तर 5G नेटवर्क असलेला सिम सिलेक्ट करा आणि Preferred network टाइपवर टॅप करून 5G ची निवड करा. अशाप्रकारे तुमच्या फोनमध्ये 5G स्पीड वापरता येईल.

Samsung

सॅमसंगच्या स्मार्टफोन युजर्सना देखील सर्वप्रथम Settings मेन्यूमध्ये जावे लागेल. त्यानंतर Connections ऑप्शनमध्ये Mobile networks वर टॅप करा. सिम सिलेक्ट करून Network mode मध्ये 5G/LTE/3G/2G (autoconnect) असलेला ऑप्शन सिलेक्ट करा.

OnePlus

वनप्लस स्मार्टफोन युजर्स 4G वरून 5G वर शिफ्ट करण्यासाठी Settings मेन्यू ओपन करा. इथे Wi-Fi & networks वर क्लिक करा. त्यानंतर SIM सिलेक्ट करून Network ऑप्शनमध्ये तुम्हाला 2G/3G/4G/5G (automatic) वर क्लिक करा.

Oppo

ओप्पो युजर्स देखील फोनमध्ये 5G वापरू शकतील. ह्यासाठी Settings ओपन करा. तिथे Connection & Sharing ऑप्शनवर क्लिक करून सिम सिलेक्ट करा. त्यानंतर network type वर टॅप करून 2G/3G/4G/5G (automatic) सिलेक्ट करा.

Realme

रियलमीच्या स्मार्टफोनमध्ये 5G सुरु करण्यासाठी सर्वप्रथम Settings मेन्यूमध्ये जा. तिथे Connection & Sharing वर टॅप करून SIM सिलेक्ट करा. त्यानंतर Preferred network type मध्ये 2G/3G/4G/5G (automatic) सिलेक्ट करा.

Vivo/iQoo

विवो आणि आयकूचे स्मार्टफोन भारतात Funtouch OS वर चालतात. त्यामुळे दोन्ही फोनमध्ये 5G सुरु करण्यासाठी सर्वप्रथम Settings वर टॅप करा. तिथे SIM सिलेक्ट केल्यानंतर Mobile network वर टॅप करून Network Mode मध्ये 5G मोड सिलेक्ट करा.

Xiaomi/Poco

शाओमी आणि पोको स्मार्टफोन युजर्स 5G वर शिफ्ट करण्यासाठी फोनमध्ये सर्वप्रथम Settings मेन्यू उघडा. इथे SIM कार्ड सिलेक्ट करा. त्यानंतर Preferred network type ऑप्शन सिलेक्ट करून 5G नेटवर्कवर टॅप करा.

5G सुरु आहे की 4G कसं जाणून घ्यायचं

उपरोक्त सेटिंग फोनमध्ये इनेबल केल्यानंतर फोनमध्ये 4G सुरु आहे की 5G हे जाणून घेण्यासाठी फोनच्या डिस्प्लेमध्ये नेटवर्क बारवर लक्ष टाका. जिथे तुम्हाला सिम नेटवर्कसह 5G चा लोगो दिसेल. जर 4G दिसत असेल तर एकदा फोन रिस्टार्ट करा.

5G संबंधित प्रश्न

Q. 5G साठी नवीन सिम खरेदी करावं लागेल का?

A. नाही. एयरटेल आणि जियो दोन्ही कंपन्यांनी कन्फर्म केलं आहे की त्यांच्या ग्राहकांना 5G वापरण्यासाठी नवीन सिम कार्ड खरेदी करावं लागणार नाही. जुन्या 4G सिम वरच 5G नेटवर्क अ‍ॅक्सेस करता येईल.

Q. 4G फोनमध्ये 5G वापरता येईल का?

A. नाही. हे शक्य नाही. तुमच्या फोनमध्ये 4G नेटवर्कचा सपोर्ट असलेला मॉडेम आहे, जो 5G नेटवर्क अ‍ॅक्सेस करू शकत नाही. त्यामुळे 4G फोनमध्ये 5G चालू शकत नाही.

Q. 5G साठी जास्त पैसे खर्च करावे लागणार का?

A. एयरटेल आणि जियोनं सध्या 5G चे प्लॅन सादर केले नाहीत. दोन्ही कंपन्या सध्या ग्राहकांना अनलिमिटेड फ्री 5G नेटवर्क देत आहेत. 5G साठी जास्त खर्च करावा लागेल की नाही हे टेलीकॉम कंपन्यांनी प्लॅन रोलआउट नंतर स्पष्ट होईल.

The post 4G नेटवर्कवरून 5G वर कसं शिफ्ट करायचं? जाणून घ्या सहजसोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4g-varun-5g-var-kasa-shift-karayach/feed/ 0
Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल 84 दिवसांची व्हॅलिडिटी, फक्त My Jio अ‍ॅपवर प्लॅन उपलब्ध https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-395-recharge-plan-with-84-days-validity/ https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-395-recharge-plan-with-84-days-validity/#respond Fri, 24 Feb 2023 12:44:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18140 Jio rs 395 recharge plan: Jio सध्या देशातील नंबर वन टेलीकॉम ब्रँड आहे. हीयह टेलीकॉम कंपनी स्वस्त डेटा प्लॅन सादर करण्यासाठी ओळखली जाते. एकीकडे मासिक रिचार्ज प्लॅनच्या किंमती सतत वाढत आहेत. तुम्हाला एक महिना किंवा 28 दिवसांच्या वैधतेच्या डेटा प्लॅनसाठी आता कमीत कमी 200 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. या योजना डेली डेटा कॅपसह येतात. Jio […]

The post Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल 84 दिवसांची व्हॅलिडिटी, फक्त My Jio अ‍ॅपवर प्लॅन उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Jio rs 395 recharge plan मध्ये 84 दिवसांची व्हॅलिडिटी मिळेल.
  • रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिडेट व्हॉइस कॉलची सुविधा आहे.
  • Jio rs 395 रिचार्ज प्लॅनमध्ये फक्त 6GB डेटा मिळतो.

Jio rs 395 recharge plan: Jio सध्या देशातील नंबर वन टेलीकॉम ब्रँड आहे. हीयह टेलीकॉम कंपनी स्वस्त डेटा प्लॅन सादर करण्यासाठी ओळखली जाते. एकीकडे मासिक रिचार्ज प्लॅनच्या किंमती सतत वाढत आहेत. तुम्हाला एक महिना किंवा 28 दिवसांच्या वैधतेच्या डेटा प्लॅनसाठी आता कमीत कमी 200 रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. या योजना डेली डेटा कॅपसह येतात. Jio कडे एक स्पेशल रिचार्ज प्लॅन आहे, जो फक्त My Jio अ‍ॅपवर उपलब्ध आहे. या प्लॅनची किंमत फक्त 141 रुपये दरमहा किंवा 84 दिवसांसाठी 395 रुपये आहे. चला जाणून घेऊया या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची माहिती.

Jio 395 recharge plan चे फायदे

Jio चा 395 प्रीपेड रिचार्ज प्लॅन My Jio अ‍ॅप वर उपलब्ध आहे. तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला 84 दिवसांची वैधता, 6GB डेटा, 1000 एसएमएस आणि संपूर्ण वैधतेच्या कालावधीत अमर्याद कॉलची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये संपूर्ण वैधतेसाठी फक्त 6GB डेटाची सुविधा मिळते म्हणजे रोज 6GB डेटा मिळत नाही. त्यामुळे हा प्लॅन त्या लोकांसाठी नाही ज्यांना रोज 1/2GB मोबाइल डेटा वापरायचा आहे. हे देखील वाचा: दगडासारखा दणकट फोन! Doogee S100 मध्ये 10800mAh बॅटरी आणि 12GB रॅम

परंतु हा प्लॅन त्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतो जे व्हॉइस कॉलसाठी आपला फोन नंबर वापरतात आणि ज्यांच्याकडे वाय-फाय नेटवर्कची सुविधा आहे. हा प्लॅन तुम्हाला खूप पैसे वाचवण्यासाठी मदत करू शकतो. जरी डेटा संपला तरी तुम्ही अ‍ॅड-ऑन डेटा प्लॅन घेऊ शकता. जियो 15 रुपयांमध्ये 1GB 4G डेटा, तसेच 25 रुपयांमध्ये 2GB डेटा देते.

अमर्याद 5G नेटवर्कचा फायदा

जियो वेलकम ऑफर (Jio Welcome Offer) मध्ये मोफत अमर्याद 5G नेटवर्कचा अ‍ॅक्सेस देखील दिला जात आहे. जर युजर्स त्या निवडक शहरांमध्ये राहत असतील जिथे जियोचं 5जी नेटवर्क उपलब्ध आहे, तर 1Gbps पर्यंतच्या डाउनलोड स्पीडसह हाय-स्पीड 5G डेटाचा आनंद घेता येईल. हे देखील वाचा: Vivo V27 Pro Price in India: लाँचपूर्वीच समोर आली माहिती, इतकी असेल किंमत

रिचार्ज कसा करायचा

तुमच्या स्मार्टफोनवर My Jio अ‍ॅप डाउनलोड करा, लॉग इन करा आणि मेन्यूमध्ये रिचार्ज पर्यायावर क्लिक करा. पुढील पेजवर ‘व्हॅल्यू’ रिचार्ज प्लॅन्स पर्यंत जाण्यासाठी उजवीकडे स्वाइप करा आणि 395 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनवर क्लिक करा. त्यानंतर पेमेंट करून रिचार्जची प्रोसेस पूर्ण करा.

The post Jio च्या स्वस्त रिचार्ज प्लॅनमध्ये मिळेल 84 दिवसांची व्हॅलिडिटी, फक्त My Jio अ‍ॅपवर प्लॅन उपलब्ध first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/jio-rs-395-recharge-plan-with-84-days-validity/feed/ 0
999 रुपयांमध्ये कुटुंबातील 4 माणसांचा रिचार्ज; अनलिमिटेड कॉलिंग व डेटा असलेला Airtel चा भन्नाट प्लॅन https://www.91mobiles.com/marathi/airtel-999-rupees-postpaid-plan-gives-4-numbers-data-calling-and-many-more-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-999-rupees-postpaid-plan-gives-4-numbers-data-calling-and-many-more-benefits/#respond Tue, 20 Dec 2022 03:33:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16143 Bharti Airtel एयरटेलकडे पोस्टपेड युजर्ससाठी अनेक प्लॅन्स आहेत, ज्यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि अन्य बेनिफिट्स मिळतात. परंतु तुमचं जर एक छोटं कुटुंब असेल तर कंपनीच्या एकाच प्लॅनमधून सर्वांच्या गरजा पूर्ण करता येतात. एयरटेलचा 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन एका छोट्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांची आरामात काळजी घेऊ शकतो. पुढे आम्ही या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची सविस्तर माहिती […]

The post 999 रुपयांमध्ये कुटुंबातील 4 माणसांचा रिचार्ज; अनलिमिटेड कॉलिंग व डेटा असलेला Airtel चा भन्नाट प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Bharti Airtel एयरटेलकडे पोस्टपेड युजर्ससाठी अनेक प्लॅन्स आहेत, ज्यात अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि अन्य बेनिफिट्स मिळतात. परंतु तुमचं जर एक छोटं कुटुंब असेल तर कंपनीच्या एकाच प्लॅनमधून सर्वांच्या गरजा पूर्ण करता येतात. एयरटेलचा 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅन एका छोट्या कुटुंबाच्या सर्व सदस्यांची आरामात काळजी घेऊ शकतो. पुढे आम्ही या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची सविस्तर माहिती दिली आहे.

Airtel चा 999 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमधील फायदे

एयरटेलचा 999 रुपयांचा पोस्टपेड प्लॅटिनम प्लॅन तीन-चार लोकांच्या कुटुंबासाठी एक चांगला प्लॅन ठरू शकतो. या प्लॅनमध्ये 100 GB डेटा बेनिफिट दिला जातो, तसेच महिनाभरात न वापरलेल्या 200 GB पर्यंतचा डेटा पुढील महिन्यात Data rollover च्या मदतीनं वापरता येतो. या प्लॅनमध्ये अ‍ॅड ऑन बेनिफिट देखील मिळतो आणि तुम्ही या प्लॅनमध्ये आणखी 3 नंबर जोडू शकता. प्रत्येक नव्या मेम्बरच्या मागे 30 GB अतिरिक्त डेटा फॅमिलीच्या डेटा पूलमध्ये जोडला जाईल. हे देखील वाचा: भारतीयांसाठी खास भेट! अत्यंत स्वस्तात 50MP कॅमेरा आणि 8GB रॅम असलेला Samsung Galaxy A04 लाँच

सर्व कनेक्शनना अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, एसएमएस आणि प्लॅनमधील डेटा बेनिफिट मिळतील. ग्राहक या प्लॅनमध्ये जास्तीत जास्त नऊ नंबर जोडू शकतो परंतु प्रत्येक कनेक्शन मागे 299 रुपये दयावे लागतील. हा प्लॅन घेणारा नुंबर आणि अ‍ॅड ऑन नंबर एकच राज्य किंवा सर्कलमधील असू शकतात किंवा दुसऱ्या राज्य-सर्कलमधील नंबर देखील या प्लॅनचा फायदा घेऊ शकतील.

अन्य बेनिफिट्स

Airtel पोस्टपेड 999 प्लॅटिनम प्लॅनमध्ये सहा महिन्याचे अ‍ॅमेझॉन प्राइमचे सब्सस्क्रिप्शन मिळत आहे, तर डिज्नी प्लस हॉटस्टारचं वर्षभराचं सब्सस्क्रिप्शन देखील या प्लॅनमध्ये मिळतं. एयरटेल या प्लॅनमध्ये विंक म्युजिक आणि फ्री हॅलो ट्यून देखील देत आहे. तसेच यात व्हीआयपी सर्व्हिस, अपोलो 24X7, फास्टटॅग, हँडसेट प्रोटेक्शन आणि ब्लु रिबन बॅग्स सर्व्हिस देखील या प्लॅनमध्ये दिली जात आहे. हे देखील वाचा: रेडमी-रियलमीच्या डोकेदुखीत वाढ; 9,299 रुपयांमध्ये Samsung Galaxy A04e ची एंट्री

कोणासाठी आहे हा प्लॅन

हा एयरटेलचा 999 रुपयांच्या प्लॅटिनम पोस्टपेड प्लॅन एका छोट्या कुटुंबाची कॉल्स आणि डेटाची गरज सहज भागवू शकतो. एकूण चार कनेक्शन असल्यामुळे संपूर्ण कुटुंबला वेगवेगळे रिचार्ज करण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असल्यामुळे एकत्रित वापरावा लागणार डेटा देखील वाया जात नाही. तरी या प्लॅनमधील डेटा कमी पडल्यास कंपनी महिन्याच्या शेवटी डेटा रोलओव्हरचा फायदा देतच आहे. त्यामुळे एखाद्या छोट्या कुटुंबासाठी किंवा 4 मित्रांसाठी देखील हा प्लॅन बेस्ट ठरू शकतो.

The post 999 रुपयांमध्ये कुटुंबातील 4 माणसांचा रिचार्ज; अनलिमिटेड कॉलिंग व डेटा असलेला Airtel चा भन्नाट प्लॅन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-999-rupees-postpaid-plan-gives-4-numbers-data-calling-and-many-more-benefits/feed/ 0
3 रुपयांपेक्षा कमी किंमती रोज 1 GB डेटा देत आहे हि कंपनी, Jio कडे पण नाही याचे उत्तर https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-vi-best-prepaid-plan-with-1gb-data-daily-compare-to-reliance-jio/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-vi-best-prepaid-plan-with-1gb-data-daily-compare-to-reliance-jio/#respond Fri, 22 Jan 2021 13:21:22 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9761 वोडाफोन-आयडियाच्या या प्लान मध्ये युजर्सना डबल डेटाचा लाभ मिळतो. त्यामुळे 84 दिवसांच्या प्लान मध्ये एकूण 336 जीबी डेटा युजर्सना मिळतो.

The post 3 रुपयांपेक्षा कमी किंमती रोज 1 GB डेटा देत आहे हि कंपनी, Jio कडे पण नाही याचे उत्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम सेक्टर मध्ये नेहमीच अशी चर्चा होत असते कि जियो, वोडाफोन आयडिया आणि एयरेटल पैकी कोणाकडे बेस्ट प्रीपेड प्लान्स आहेत. याबाबत आम्ही पण तुम्हाला एकच किंमत आणि बेनिफिट्स सह येणारे तिन्ही कंपन्यांच्या प्लान्सची तुलना करून तुम्हाला कोणत्या प्लान मध्ये जास्त फायदा मिळत आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. डेटाच्या बाबतीत अनेकदा रिलायंस जियोचा विजय होतो. पण दुसरीकडे वोडाफोन-आयडियाकडे एक असा जबरदस्त प्रीपेड प्लान आहे, ज्यात युजर फक्त 2 रुपये 8 पैश्यात रोज 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सह OTT सब्सक्रिप्शनचा लाभ मिळतो. चला जाणून घेऊया या प्लान बाबत.

असा आहे प्लान

आम्ही ज्या प्लान बाबत बोलत आहोत तो वोडाफोन-आयडिया (Vi) पॉप्युलर रिचार्ज 699 रुपयांचा आहे. या प्लान मध्ये युजर्स अनेक लाभ मिळत आहेत. जर तुम्ही हा रिचार्ज केला तर तुम्हाला 84 दिवसांच्या वैधतेसह रोज 4जीबा डेटा सह सर्व नेटवर्क वर अनलिमिटेड कॉलिंग आणि Vi Movies & TV ऍपचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते.

हे देखील वाचा : Samsung फॅन्ससाठी मोठी बातमी, येत आहे Samsung Galaxy S21 4G मॉडेल, किंमतीत असेल कमी

अश्याप्रकारे मिळेल 2.80 रुपयांमध्ये डेली 1जीबी डेटा

वोडाफोन-आयडियाच्या या प्लान मध्ये युजर्सना डबल डेटाचा लाभ मिळतो. त्यामुळे 84 दिवसांच्या प्लान मध्ये एकूण 336 जीबी डेटा युजर्सना मिळतो. म्हणजे रोजच्या हिशोबाने फक्त 2 रुपये 8 पैशांमध्ये 1 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सह अजून अनेक सुविधा मिळत आहेत.

Jio कडे नाही उत्तर

जियो 599 रुपयांमध्ये 84 दिवसांच्या वॅलिडिटी सह प्रीपेड प्लान ऑफर करत आहे, ज्यात युजर्सना रोज 2 जीबी डेटा मिळत आहे. या प्लान मध्ये युजर्सना एक जीबीसाठी 3.56 रुपये द्यावे लागतील.

हे देखील वाचा : रियलमीने लाॅन्च केला सध्याचा ‘आउट डेटेड’ फोन Realme C20, जाणून घ्या का आहे हा जुनाट

Vi ने दिल्ली मध्ये बंद केली 3G सिम सर्विस

वोडाफोन-आयडिया (Vi) ने 15 जानेवारी पासून दिल्ली मध्ये आपली 3जी सिम सर्विस बंद केली आहे. Vodafone Idea (Vi) ने सर्विस बंद करण्याच्या घोषणेनंतर 3जी सिम युजर्सना मेसेज आणि कॉलच्या माध्यमातून याची माहिती दिली होती.

The post 3 रुपयांपेक्षा कमी किंमती रोज 1 GB डेटा देत आहे हि कंपनी, Jio कडे पण नाही याचे उत्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-vi-best-prepaid-plan-with-1gb-data-daily-compare-to-reliance-jio/feed/ 0
Airtel ने वाढवली आपल्या प्लान्सची किंमत, इथे बघा सर्व प्लान्स सविस्तर https://www.91mobiles.com/marathi/airtel-announces-revised-tariffs-for-mobile-customers-know-about-it/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-announces-revised-tariffs-for-mobile-customers-know-about-it/#respond Mon, 02 Dec 2019 12:50:54 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5935 आम्ही तुम्हाला इथे एयरटेलच्या नवीन किंमतींची माहिती देत आहोत.

The post Airtel ने वाढवली आपल्या प्लान्सची किंमत, इथे बघा सर्व प्लान्स सविस्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेलीकॉम यूजर्स साठी आता पर्यंत उपलब्ध असलेल्या स्वस्त प्लान्सच्या किंमती लवकरच वाढणार आहेत. जियो, वोडाफोन-आइडिया सोबत एयरटेलच्या प्रीपेड ग्राहकांच्या खिश्यावर पण अतिरिक्त बोजा पडणार आहे. वोडाफोन-आइडिया आणि एयरटेलने प्रीपेड मोबाईल सेवांचे दर 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा रविवारी करून आपल्या वेगवेगळ्या प्लॅन्सच्या वाढलेल्या किंमतींची माहिती दिली आहे. आम्ही तुम्हाला इथे एयरटेलच्या नवीन किंमतींची माहिती देत आहोत.

सर्वात आधी बोलूया 2 दिवसांची वैधता सह येणाऱ्या नवीन प्लानच्या किंमत आणि मिळणाऱ्या फायद्यांबद्दल. कंपनीने 19 रुपयांच्या प्लानच्या किंमतीत कोणतीही वाढ केली नाही. या प्लानची किंमत आता पण 19 रुपये आहे, ज्यात तुम्हाला प्रतिदिन 100SMS, अनलिमिटेड कॉलिंग आणि 150एमबी डेटा मिळतो.

28 दिवस वैधता सह येणाऱ्या प्लान बद्दल बोलायचे तर कंपनीने 35 रुपयांच्या प्लानची किंमत वाढवून 49 रुपये केली आहे. या प्लान मध्ये तुम्हाला आता 38.52 रुपयांचा टॉकटाइम आणि 100एमबी डेटा मिळेल. तसेच 65 रुपयांच्या प्लान साठी आता 79 रुपये द्यावे लागतील, ज्यात 63.95 रुपयांचा टॉकटाइम आणि 200एमबी डेटा दिला जात आहे. सोबतच कंपनीच्या 128 रुपयांच्या प्लान साठी 3 डिसेंबर नंतर 148 रुपये द्यावे लागतील, ज्यात अनलिमिटेड कॉलिंग, 300एसएमएस, 2जीबी डेटा आणि एयरटेल एक्सट्रीम, विंक आणि हॅलो ट्यून्सचा लाभ मिळेल.

169/199 रुपयांच्या प्लान साठी यूजर्सना आता 248 रुपये द्यावे लागतील. या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 100एसएमएस आणि 1.5जीबी प्रतिदिन या हिशोबाने डेटा मिळेल. तर 28 दिवसांची वैधता असलेला 249 रुपयांचा प्लान तीन तारखेपासून 298 चा होईल. या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100एसएमएस प्रतिदिन आणि 2जीबी डेटा प्रतिदिन मिळेल.

तसेच कंपनीचा 82 दिवसांची वैधता असलेल्या प्लानची किंमतीत जवळपास 33.48 टक्के वाढली आहे. याची किंमत आता 399/448 रुपयांवरून 598 रुपये आणि 499/558 रुपयांच्या प्लानची किंमत वाढून 698 झाली आहे. या दोन्ही प्लानची वैधता आता 82 दिवसांच्या ऐवजी 84 दिवस झाली आहे. तसेच 598 च्या प्लान मध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंग, 100एसएमएस प्रतिदिन आणि 1जीबी डेटा प्रतिदिन मिळेल. तर 698 च्या प्लान मध्ये अनलिमिटेड कॉलिंग, 100एसएमएस प्रतिदिन आणि 2जीबी डेटा प्रतिदिन मिळेल.

एयरटेलने वार्षिक प्लानची किंमतीत 41.14 टक्के वाढवली आहे. कंपनीच्या 1,699 रुपयांचा प्लान 2,398 रुपयांचा केला आहे. कंपनीचा मर्यादित डेटा असलेला वार्षिक प्लान आता 998 रुपयांच्या ऐवजी तीन तारखेपासून 1,498 रुपयांचा होईल.

स्मार्ट पॅक

35 रुपयांच्या टॅरिफची किंमत वाढवण्याआधी या प्लान मध्ये 26.66 रुपयांच्या टॉक टाइम आणि 100MB डेटा मिळत होता. आता या प्लानची किंमत 49 रुपये झाली आहे. आता या प्लान मध्ये आता 38.53 रुपयांच्या टॉक टाइम सह 100MB डेटा मिळतो. 65 रुपयांमध्ये येणारा एयरटेलचा प्लान आता 79 रुपयांचा झाला आहे. प्लान झाल्यानंतर यात आता 28 दिवसांची वॅलिडिटी सह 63.95 रुपयांचा टॉक टाइम आणि 200MB डेटा दिला जात आहे.

The post Airtel ने वाढवली आपल्या प्लान्सची किंमत, इथे बघा सर्व प्लान्स सविस्तर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-announces-revised-tariffs-for-mobile-customers-know-about-it/feed/ 0
25 महिन्यात 25,00,00,000 यूजर मिळवून जियो ने केला रेकॉर्ड https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-added-250-million-subscriber-in-25-month-and-771-gb-data-consumption-in-quarter-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-added-250-million-subscriber-in-25-month-and-771-gb-data-consumption-in-quarter-in-marathi/#respond Thu, 18 Oct 2018 08:38:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2562 रिलायंस जियो ने सांगितले की फक्त 25 महिन्यांत जियो ने 250 मिलियन म्हणजे 25 कोटि लोक आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत.

The post 25 महिन्यात 25,00,00,000 यूजर मिळवून जियो ने केला रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंंडियन टेलीकॉम बाजारात फक्त 4जी नेटवर्क वर चालणारी दूरसंचार कंपनी ​रिलायंस जियो ने आपल्या एंट्रीने देशातील टेलीकॉम बाजारचा चेहराच बदलून टाकला. इंटरनेट डेटा साठी भरभक्कम पैसे देणार्‍या यूजर्सना फ्री मध्ये इंटरनेट मिळू लागले आणि देशभरात केले जाणारे कॉल्स पण निशुल्क झाले. आपल्या अनोख्या प्लान्स मुळे जियो काही दिवसांत लोकांना आवडू लागली आहे. त्यातच आज रिलायंस जियो ने आपला नवीन तिमाही रिपोर्ट सादर करून सर्वाना आश्चर्यचकित केले आहे. रिलायंस जियो ने सांगितले की फक्त 25 महिन्यांत जियो ने 250 मिलियन म्हणजे 25 कोटि लोक आपल्या नेटवर्कशी जोडले आहेत.

रिलायंस जियो चे चेअरमन मुकेश अंबानी ने आज रिलायंस जियो संबंधीत रिपोर्ट शेयर करताना या मोठ्या रेकॉर्डची माहिती दिली आहे. अंबानी ने रिपोर्ट मधून सांगितले की रिलायंस जियो ने आपल्या सुरवातीपासून आता पर्यंत गेल्या 25 महिन्यात 250 मिलियन यूजर्सचा बेस मिळवला आहे. जियोशी पहिल्या 25 महिन्यात जोडल्या गेलेल्या लोकांची ही संख्या 25,00,00,000 आहे.

ताजे आकडे पाहिले तर 30 सप्टेंबर पर्यंत जियोचे 252.3 मिलियन सब्स्क्राइबर्स झाले होते. तुम्ही ऐकून हैराण व्हाल की गेल्या फक्त 12 महिन्यांत जियो नेटवर्क सोबत 114 मिलियन यूजर जोडले गेले आहेत आणि जियो सर्विसेज वापरता आहेत. जियो ने फक्त इतके यूजर्स जोडले नाहीत तर आपल्या डेटा आणि कॉलिंग स​र्विस ने पण नवीन रेकॉर्ड बनवाला आहे. ताज्या रिपोर्ट नुसार ​जियो नेटवर्क वर मागील तिमाहीत एकूण 771 कोटि जीबी डेटा वापरला गेला आहे.

जियो च्या नवीन रिपोर्ट नुसार 2018 च्या गेल्या तिमाहीत म्हणजे फक्त 3 महिन्यात वेगवेगळ्या प्लॅटफार्म वर जियो नटवर्क वरून एकूण 771 कोटी जीबी 4जी डेटा वापरला गेला. डेटा सोबतच वॉयस कॉलिंग साठी पण युजर्स जियो नेटवर्क निवडतात. रिपोर्ट नुसार गेल्या तिमाहीत जियो नेटवर्क वर एकूण 53,379 मिनिटे वॉयस कॉलिंग करण्यात आली आहे.

रिलायंस जियो च्या नवीन रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे की एक जियो यूजर एक महिन्यात सरासरी 11.0जीबी 4जी डेटा वापरत आहे. तसेच सरासरी प्रत्येक जियो यूजर एका महिन्यात जवळपास 17.5 तास आॅनलाईन वीडियो बघण्यात घालवतात. तसेच ग्राहक आपल्या जियो ​नंबर वरून एका महिन्यात जवळपास 761 मिनिटांचे वॉयस कॉल करतात.

मुकेश अंबानी ने जियो मानसून आॅफर पण यशस्वी झाल्याचे सांगितले आहे. रिपोर्ट मधून त्यांनी सांगितले आहे की जियो नेटवर्कशी जोडल्या जाणार्‍या यूजर्सच्या संख्येवर कंपनीच्या जियो मानसून आॅफरचा पण सकारात्मक परिणाम झाला आहे आणि 501 रुपयांच्या जियोफोनच्या आॅफर ने अनेक टेलीकॉम युजर्स जियो नेटवर्कशी जोडले आहेत. तसेच जियोफोन व जियोफोन 2 मध्ये फेसबुक, व्हाट्सॅप व यूट्यूब सपोर्ट मिळण्याचा फायदा पण जियोला झाला आहे.

The post 25 महिन्यात 25,00,00,000 यूजर मिळवून जियो ने केला रेकॉर्ड first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/reliance-jio-added-250-million-subscriber-in-25-month-and-771-gb-data-consumption-in-quarter-in-marathi/feed/ 0
हे आहेत एयरटेल प्रीपेड यूजर्स साठी बेस्ट प्लान, ज्यात डेटा सोबत मिळते कॉलिंग फ्री https://www.91mobiles.com/marathi/best-plan-for-airtel-prepaid-user-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/best-plan-for-airtel-prepaid-user-in-marathi/#respond Mon, 15 Oct 2018 12:19:42 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2499 खाली दिलेली प्लान संपूर्ण भारतातील एयरटेल च्या प्रीपेड यूजर्स साठी आहेत. या प्लान मध्ये भरपूर 2जी, 3जी आणि 4जी डेटा सह कॉलिंग फ्री आहे.

The post हे आहेत एयरटेल प्रीपेड यूजर्स साठी बेस्ट प्लान, ज्यात डेटा सोबत मिळते कॉलिंग फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही एयरटेल यूजर असाल आणि तुमच्यासाठी एखादा बेस्ट प्लान शोधत असाल ज्यात कॉलिंग, मेसेजिंग आणि डेटा पण मिळेल तर तुमच्यासाठी 4 प्लान बेस्ट आहेत ज्यांची माहित आम्ही खाली दिली आहे. खाली दिलेली प्लान संपूर्ण भारतातील एयरटेल च्या प्रीपेड यूजर्स साठी आहेत. या प्लान मध्ये भरपूर 2जी, 3जी आणि 4जी डेटा सह कॉलिंग फ्री आहे.

एयरटेल 199 प्लान
हा एयरटेल चा मासिक प्लान आहे. 199 रुपयांच्या या प्लान मध्ये तुम्हाला रोज 1.4जीबी डेटा मिळेल. एयरटेल चा हा प्लान 28 दिवसांसाठी वैध आहे. या प्लान अंतर्गत अनलिमिटेड कॉलिंग फ्री आहे आणि तुम्ही फ्री इनकमिंग आणि आउट गोइंग रोमिंग कॉल्सचा लाभ घेऊ शकता. याचबरोबर तुम्हाला रोज 100 एसएमएस मोफत मिळतील. खास बाब म्हणजे या प्लानचा वापर 2जी, 3जी आणि 4जी सहित कोणत्याही डिवाइस वर केला जाऊ शकतो.

एयरटेल 399 प्लान
एयरटेल के 399 रुपयांच्या प्लान मध्ये डेटा बेनिफिट खूप चांगले आहेत. या प्लानची वैधता 70 दिवस आहे आणि या प्लान मध्ये तुम्हाला रोज 1.4जीबी डेटा मिळेल. म्हणजेच तुम्ही 70 दिवसांत 98जीबी डेटा वापरू शकाल. डेटा सोबत सर्व लोकल आणि एसटीडी कॉलिंग यात मोफत आहे. तसेच रोमिंग मध्ये पण इन कमिंग किंवा आउट गोइंग कॉल वर कोणताही चार्ज लागणार नाही . या प्लान मध्ये रोज तुम्हाला 100 एसएमएस मोफत मिळतील. एयरटेल च्या या प्लानचा लाभ पण तुम्ही 2जी, 3जी आणि 4जी फोन वर घेऊ शकता.

एयरटेल 448 प्लान
जर तुम्ही एखादा जास्त चालणार प्लान शोधात असाल तर एयरटेल चा 448 रुपयांचा प्लान तुम्ही घेऊ शकता. एयरटेलचा 448 रुपयांच्या प्लानची वैधता 82 दिवस आहे आणि या प्लान मध्ये पण तुम्हाला रोज 1.4 जीबी डेटा मिळेल. अर्थात 82 दिवसांत तुम्ही 114.8जीबी डेटा वापरू शकता. प्लान मध्ये सर्व नॅशनल कॉलिंग सहित रोमिंग मध्ये पण इन कमिंग किंवा आउट गोइंग कॉल वर कोणताही चार्ज लागणार नाही. सोबतच रोज तुम्हाला 100 एसएमएस मोफत मिळतील.

एयरटेल 509 प्लान
एयरटेल कडे संपूर्ण तीन महिन्यांचा पण एक प्लान आहे ज्याची किंमत 509 रुपये आहे . एयरटेलच्या 509 रुपयांच्या प्लानची वैधता 90 दिवस आहे आणि यात तुम्हाला रोज 1.4जीबी डेटा मिळेल. संपूर्ण प्लान मध्ये तुम्ही एकूण 126जीबी डेटा वापरू शकाल. कंपन च्या अन्य प्लान प्रमाणे यात पण लोकल आणि नॅशनल कॉलिंग फ्री असेल. त्याचबरोबर रोज तुम्हाला 100 एसएमएस पण दिले जातील. विशेष म्हणजे एयरटेलचा हा प्लान सर्व 2जी, 3जी आणि 4जी प्रीपेड यूजर साठी उपलब्ध आहे.

एयरटेल प्रीपेड यूजर्सनी कसा करावा बॅलेन्स चेक

जर तुम्ही एयरटेल प्रीपेड यूजर असाल आणि तुमच्या नंबरचा बॅलेन्स आणि वैधता बघायची असेल तर तुम्हाला तुमच्या फोन वरून *121# डायल करावे लागेल. त्यामुळे फोन वर तुमच्या नंबर संबंधित माहिती येईल. जसे कि माय आॅफर, डेटा आॅफर आणि टॉक टाइम आॅफर इत्यादी. तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही हि माहिती मिळवू शकता. तसेच 121 वर कॉल करून पण माहिती मिळवता येते.

The post हे आहेत एयरटेल प्रीपेड यूजर्स साठी बेस्ट प्लान, ज्यात डेटा सोबत मिळते कॉलिंग फ्री first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-plan-for-airtel-prepaid-user-in-marathi/feed/ 0
जियो ला टक्कर देण्यासाठी एयरटेल ने आणला 398 रुपयांचा प्लान, 70 दिवस मिळतील अनलिमिटेड वॉयस कॉल आणि 1.5जीबी 4जी डेटा रोज https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-398-prepaid-plan-offer-unlimited-voice-call-1-5-gb-4g-data-for-70-days-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-398-prepaid-plan-offer-unlimited-voice-call-1-5-gb-4g-data-for-70-days-in-marathi/#respond Thu, 11 Oct 2018 13:41:07 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2456 साधारणतः वॉयस कॉल एफयूपी लिमिट सह येतात पण या प्लान मध्ये कोणतीही दैनिक किंवा साप्ताहिक मर्यादा देण्यात आली नाही.

The post जियो ला टक्कर देण्यासाठी एयरटेल ने आणला 398 रुपयांचा प्लान, 70 दिवस मिळतील अनलिमिटेड वॉयस कॉल आणि 1.5जीबी 4जी डेटा रोज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंडियन टेलीकॉम बाजारात दूरसंचार कंपन्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेचा फायदा सामन्यांना होत आहे. यूजर्सना आकर्षित करण्यासाठी कंपन्या असे प्लान्स घेऊन येत आहेत ज्यांची किंमत कमी आणि त्यातील फायदे जास्त आहेत.याच हेतूने एयरटेल ने पण आपल्या यूजर्स साठी पण नवीन प्लान सादर केला आहे. एयरटेल ने आणलेला हा नवीन प्लान 398 रुपयांचा आहे जो जास्त वॅलिडिटी सह अनलिमिटेड वॉयस कॉल आणि भरपूर इंटरनेट बेनिफिट देतो.

एयरटेल द्वारा लॉन्च करण्यात आलेला 398 रुपयांचा हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे. हा प्लान 70 दिवसांच्या वॅलिडिटी सह येतो. प्लान मध्ये मिळणारे फायदे पाहता कंपनी कडून ग्राहकांना रोज 1.5जीबी इंटरनेट डेटा देण्यात येईल. अशा प्रकारे संपूर्ण प्लान मध्ये एकूण 105जीबी इंटरनेट डेटा मिळेल. या डेटाचा वापर 4जी सोबतच 3जी वर पण करता येईल.

त्याचबरोबर एयरटेल 398 रुपयांच्या प्लान मध्ये अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा पण देत आहे. साधारणतः वॉयस कॉल एफयूपी लिमिट सह येतात पण या प्लान मध्ये कोणतीही दैनिक किंवा साप्ताहिक मर्यादा देण्यात आली नाही. एयरटेल ग्राहक लोकल व एसटीडी प्रत्येक नंबर वर अनलिमिटेड वॉयस कॉल करू शकतील. हे वॉयस कॉल रोमिंग मध्ये पण पूर्णपणे फ्री असतील. तसेच एयरटेल 70 दिवस रोज 90 एसएमएस पण देईल.

विशेष म्हणजे 398 रुपयांच्या प्लानच्या आधी एयरटेल ने 399 रुपयांचा पण एक प्लान सादर केला आहे. हा प्लान 84 दिवसांच्या वैधते सह येतो. पण या प्लान मध्ये इंटरनेट डेटा 1.4जीबी प्रतिदिन मिळत आहे. तसेच रोज मिळणारे एसएमएस 100 आहेत. अर्थात हा प्लान वॅलिडिटी एसएसएस बेनिफिट मध्ये जरी पुढे असला तरी इंटरनेट डेटाच्या बाबतीती मागे आहे.

The post जियो ला टक्कर देण्यासाठी एयरटेल ने आणला 398 रुपयांचा प्लान, 70 दिवस मिळतील अनलिमिटेड वॉयस कॉल आणि 1.5जीबी 4जी डेटा रोज first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-rs-398-prepaid-plan-offer-unlimited-voice-call-1-5-gb-4g-data-for-70-days-in-marathi/feed/ 0
एयरटेल यूजर्सना धक्का! बंद होऊ शकतात फ्री इनकमिंग कॉल https://www.91mobiles.com/marathi/airtel-incoming-voice-call-might-ban-mute-soon-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-incoming-voice-call-might-ban-mute-soon-in-marathi/#respond Mon, 08 Oct 2018 06:45:53 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2391 रिलायंज जियोच्या एंट्री मुळे इंडियन टेलीकॉम बाजार पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त डेटा पॅक्स मुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे तसेच सामन्य माणसांसाठी वॉयस कॉलिंग जणू मोफत झाली आहे. बाजारात असे प्लान आहेत ज्यात इंटरनेट डेटा, एसएमएस आणि वॉयस कॉलिंग एक साथ मिळतात. एक वेळ होती जेव्हा इन​कमिंग कॉलचे पण पैसे द्यावे लागत होते. पण आता इनकमिंग […]

The post एयरटेल यूजर्सना धक्का! बंद होऊ शकतात फ्री इनकमिंग कॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
रिलायंज जियोच्या एंट्री मुळे इंडियन टेलीकॉम बाजार पूर्णपणे बदलला आहे. स्वस्त डेटा पॅक्स मुळे इंटरनेटचा वापर वाढला आहे तसेच सामन्य माणसांसाठी वॉयस कॉलिंग जणू मोफत झाली आहे. बाजारात असे प्लान आहेत ज्यात इंटरनेट डेटा, एसएमएस आणि वॉयस कॉलिंग एक साथ मिळतात. एक वेळ होती जेव्हा इन​कमिंग कॉलचे पण पैसे द्यावे लागत होते. पण आता इनकमिंग कॉल सोबत आउटगोइंग कॉल पण फ्री झाले आहेत. पण असे असताना एयरटेल ने आपल्या यूजर्सना मोठा धक्का दिला आहे. एयरटेल ने असे काही दिशा-निर्देश लागू केले आहेत ज्यामुळे एयरटेल यूजर्सची फ्री इन​कमिंग बंद होऊ शकते.

एयरटेल सोबत देशातील सर्वच कंपन्यांनी इनकमिंग कॉल फ्री ठेवल्या आहेत. म्हणजे कोणत्याही रिचार्ज विना यूजर कमीत कमी इनकमिंग कॉल रिसीव करू शकतात. पण आता एयरटेल यूजर्सची ही फ्री ची सुविधा संपणार आहे. अशी माहिती मिळाली आहे की एयरटेल कंपनी आपली फ्री इनकमिंग बंद करणार आहे. ही फ्री इनकमिंग कॉल बंद होण्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला इन​कमिंग साठी ​​पैसे द्यावे लागतील. पण जर तुम्ही एका महिन्यासाठी तुमच्या फोन नंबर वर कोणताही रिचार्ज केला नाही तर त्या नंबरची इनकमिंग सर्विस बंद केली जाईल.

एयरटेल यूजर्सना 28 दिवसांतून कमीत कमी 20 रुपयांचा एक रिचार्ज करावा लागेल. या रिचार्ज ने तुमचा नंबर चालू राहील आणि तुम्ही इन​कमिंग सोबत आउटगोइंग कॉल व इंटरनेटचा वापर करू शकाल. जर 28 दिवसांत एयरटेल यूजर्सनी आपल्या नंबर वर कोणताही रिचार्ज केला नाही तर त्या नंबर वर येणारे वॉयस कॉल बंद केले जातील. फक्त एवढेच नाही तर काही ठरावीक काळा नंतर एयरटेल तो नंबर कायमस्वरूपी सस्पेंड म्हणजे बॅन करेल.

एयरटेल ने हे निर्देश आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. हा नियम आल्यामुळे दोन​ ​नंबर वापरणाऱ्या लोकांची अडचण होईल. कारण अनेक यूजर आपल्या फोन मध्ये दोन नंबर ठेवतात. एक नंबर वरून इंटरनेट वापरली वापरली जाते आणि त्याच इंटरनेट ने व्हाट्सॅप व अन्य वॉयस तसेच वीडियो कॉल केले जातात. तर दुसरा नंबर फक्त कॉल रिसीव करण्यासाठी ठेवला जातो.

पण आता एयरटेल चे नवीन नियम आल्यामुळे लोकांना दोन्ही नंबर्स वर रिचार्ज करावा लागेल. विशेष म्हणजे एयरटेल च्या आधी रिलायंस जियो ने पण हा नियम आणला आहे. जियो ने निर्देश दिले आहेत ज्यात यूजर्सना आपल्या नंबर वर न्यूनतम रिचार्ज करणे अनिवार्य आहे.

The post एयरटेल यूजर्सना धक्का! बंद होऊ शकतात फ्री इनकमिंग कॉल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-incoming-voice-call-might-ban-mute-soon-in-marathi/feed/ 0
वोडाफोनचा धमाका : 279 रुपयांमध्ये मिळेल 84 दिवस अनलिमिटेड कॉल आणि मिळेल 4जी इंटरनेट डेटा https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-279-plan-unlimited-voice-calling-4gb-data-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-279-plan-unlimited-voice-calling-4gb-data-in-marathi/#respond Fri, 05 Oct 2018 13:17:01 +0000 https://hub.91mobiles.com/marathi/?p=2386 वोडाफोन ने आणलेला 279 रु[रुपयांचा हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे जो 84 दिवसांच्या वैधते सह येतो.

The post वोडाफोनचा धमाका : 279 रुपयांमध्ये मिळेल 84 दिवस अनलिमिटेड कॉल आणि मिळेल 4जी इंटरनेट डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
वोडाफोन ने नुकतेच आपल्या यूजर्स साठी 99 रुपये तसेच 109 रुपयांचे दोन प्लान सादर केले आहेत. हे दोन्ही प्लान वॉयस प्लान म्हणून सादर करण्यात आले आहेत जे 28 दिवस ग्राहकांना बेनिफिट देतात. तसेच आता वोडाफोन ने अजून एक नवीन प्लान सादर केला आहे जो जास्त वैधते साठी फायदे देतो. या टेलीकॉम कंपनी ने 279 रुपयांचा नवीन प्लान सादर केला आहे जो 84 दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि इंटरनेट डेटाची सुविधा देतो.

वोडाफोन ने आणलेला 279 रु[रुपयांचा हा प्लान प्रीपेड ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे जो 84 दिवसांच्या वैधते सह येतो. वोडाफोन ने हा प्लान वॉयस पॅक महान सादर केला आहे जो अनलिमिटेड वॉयस कॉलिंग सह येतो. वोडाफोन च्या या प्लान मध्ये 84 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉल मिळत आहेत ज्यांचा वापर लोकल व एसटीडी नंबर सोबत नॅशनल रोमिंग मध्ये पण केला जाऊ शकतो.

पण हे अनलिमिटेड वॉयस कॉल एफयूपी लिमिट सह मिळतील. म्हणजे यूजर्स एका दिवसात जास्तीत जास्त 250 मिनिटे बोलू शकतात. एफयूपी लिमिट अंतर्गत यूजर एका आठवड्यात जास्तीत जास्त 1000 मिनिटे बोलू शकतो. या वॉयस कॉलचा वापर संपूर्ण महिन्यात 100 वेगवेगळ्या नंबर्स वर करता येईल. विशेष म्हणजे 300 रुपयांपेक्षा कमी किंमतीती वोडाफोन व्यतिरिक्त कोणतीही कंपनी 84 दिवसांसाठी वॉयस कॉल देत नाही.

इंटरनेट डेटा पाहता या प्लान मध्ये वोडाफोन 84 दिवसांसाठी 4जीबी इंटरनेट डेटा देत आहे जो 4जी सोबतच 3जी स्पीड वर पण चालेल. वोडाफोन ने आपला हा प्लान सध्या काही निवडक सर्कल्स मध्ये लॉन्च केला आहे जो येत्या काही दिवसांत संपूर्ण देशात उपलब्ध होईल. जाता जाता वोडाफोन च्या 109 रुपयांच्या प्लान बद्दल पण सांगतो, यात तुम्हाला 28 दिवसांसाठी अनलिमिटेड वॉयस कॉलिंगची सुविधा मिळेल तसेच कंपनी संपूर्ण महिन्यासाठी 1जीबी 4जी इंटरनेट डेटा देत आहे.

The post वोडाफोनचा धमाका : 279 रुपयांमध्ये मिळेल 84 दिवस अनलिमिटेड कॉल आणि मिळेल 4जी इंटरनेट डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-rs-279-plan-unlimited-voice-calling-4gb-data-in-marathi/feed/ 0