4G नेटवर्कवरून 5G वर कसं शिफ्ट करायचं? जाणून घ्या सहजसोपी पद्धत

भारतात एयरटेल आणि रिलायन्स जियोनं 5G सर्व्हिस सुरु केली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल आणि जियोनं युजर्सना 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जर तुमच्या परिसरात देखील ह्या दोन्ही कंपन्यांची 5G सर्व्हिस सुरु झाली असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकता.

4G वरून 5G वर शिफ्ट कसं करायचं?

एयरटेल आणि जियोच्या 5G सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तुमच्यकडे 5G कम्पॅटिबल स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. फोनच्या सेटिंग मध्ये मामूली बदल करून तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकाल. इथे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये 5G इनेबल कसं करायचं हे सांगणार आहोत.

Google Pixel किंवा स्टॉक अँड्रॉइड असलेले स्मार्टफोन

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Settings मेन्यू ओपन करा. त्यानंतर Network & Internet वर टॅप करून SIM सिलेक्ट करा. जर तुमच्या फोनमध्ये दोन सिम असतील तर 5G नेटवर्क असलेला सिम सिलेक्ट करा आणि Preferred network टाइपवर टॅप करून 5G ची निवड करा. अशाप्रकारे तुमच्या फोनमध्ये 5G स्पीड वापरता येईल.

Samsung

सॅमसंगच्या स्मार्टफोन युजर्सना देखील सर्वप्रथम Settings मेन्यूमध्ये जावे लागेल. त्यानंतर Connections ऑप्शनमध्ये Mobile networks वर टॅप करा. सिम सिलेक्ट करून Network mode मध्ये 5G/LTE/3G/2G (autoconnect) असलेला ऑप्शन सिलेक्ट करा.

OnePlus

वनप्लस स्मार्टफोन युजर्स 4G वरून 5G वर शिफ्ट करण्यासाठी Settings मेन्यू ओपन करा. इथे Wi-Fi & networks वर क्लिक करा. त्यानंतर SIM सिलेक्ट करून Network ऑप्शनमध्ये तुम्हाला 2G/3G/4G/5G (automatic) वर क्लिक करा.

Oppo

ओप्पो युजर्स देखील फोनमध्ये 5G वापरू शकतील. ह्यासाठी Settings ओपन करा. तिथे Connection & Sharing ऑप्शनवर क्लिक करून सिम सिलेक्ट करा. त्यानंतर network type वर टॅप करून 2G/3G/4G/5G (automatic) सिलेक्ट करा.

Realme

रियलमीच्या स्मार्टफोनमध्ये 5G सुरु करण्यासाठी सर्वप्रथम Settings मेन्यूमध्ये जा. तिथे Connection & Sharing वर टॅप करून SIM सिलेक्ट करा. त्यानंतर Preferred network type मध्ये 2G/3G/4G/5G (automatic) सिलेक्ट करा.

Vivo/iQoo

विवो आणि आयकूचे स्मार्टफोन भारतात Funtouch OS वर चालतात. त्यामुळे दोन्ही फोनमध्ये 5G सुरु करण्यासाठी सर्वप्रथम Settings वर टॅप करा. तिथे SIM सिलेक्ट केल्यानंतर Mobile network वर टॅप करून Network Mode मध्ये 5G मोड सिलेक्ट करा.

Xiaomi/Poco

शाओमी आणि पोको स्मार्टफोन युजर्स 5G वर शिफ्ट करण्यासाठी फोनमध्ये सर्वप्रथम Settings मेन्यू उघडा. इथे SIM कार्ड सिलेक्ट करा. त्यानंतर Preferred network type ऑप्शन सिलेक्ट करून 5G नेटवर्कवर टॅप करा.

5G सुरु आहे की 4G कसं जाणून घ्यायचं

उपरोक्त सेटिंग फोनमध्ये इनेबल केल्यानंतर फोनमध्ये 4G सुरु आहे की 5G हे जाणून घेण्यासाठी फोनच्या डिस्प्लेमध्ये नेटवर्क बारवर लक्ष टाका. जिथे तुम्हाला सिम नेटवर्कसह 5G चा लोगो दिसेल. जर 4G दिसत असेल तर एकदा फोन रिस्टार्ट करा.

5G संबंधित प्रश्न

Q. 5G साठी नवीन सिम खरेदी करावं लागेल का?

A. नाही. एयरटेल आणि जियो दोन्ही कंपन्यांनी कन्फर्म केलं आहे की त्यांच्या ग्राहकांना 5G वापरण्यासाठी नवीन सिम कार्ड खरेदी करावं लागणार नाही. जुन्या 4G सिम वरच 5G नेटवर्क अ‍ॅक्सेस करता येईल.

Q. 4G फोनमध्ये 5G वापरता येईल का?

A. नाही. हे शक्य नाही. तुमच्या फोनमध्ये 4G नेटवर्कचा सपोर्ट असलेला मॉडेम आहे, जो 5G नेटवर्क अ‍ॅक्सेस करू शकत नाही. त्यामुळे 4G फोनमध्ये 5G चालू शकत नाही.

Q. 5G साठी जास्त पैसे खर्च करावे लागणार का?

A. एयरटेल आणि जियोनं सध्या 5G चे प्लॅन सादर केले नाहीत. दोन्ही कंपन्या सध्या ग्राहकांना अनलिमिटेड फ्री 5G नेटवर्क देत आहेत. 5G साठी जास्त खर्च करावा लागेल की नाही हे टेलीकॉम कंपन्यांनी प्लॅन रोलआउट नंतर स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here