Tips and Tricks - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 23 Jul 2023 11:36:18 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 व्हॉट्सअ‍ॅपवरून हाय क्वॉलिटी फोटो कसे पाठवायचे? जाणून घ्या नवीन ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-ne-high-quality-photo-kase-pathavayche/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-ne-high-quality-photo-kase-pathavayche/#respond Sun, 23 Jul 2023 11:31:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20955 WhatsApp जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर लोक रोज एकेमेकांना मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि ऑडियोसह कॉलिंग देखील करतात. परंतु व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो शेयर करताना क्वॉलिटी कम्प्रेस होते. त्यामुळे युजर्स फोटो शेयर करण्यासाठी WhatsApp ला पर्याय शोधतात. व्हॉट्सअ‍ॅपनं युजर्सची ही समस्या सोडवण्यासाठी ‘Photo Quality’ फीचर सादर केलं आहे. ह्या फीचरच्या मदतीनं युजर्स हाय क्वॉलिटी फोटो शेयर […]

The post व्हॉट्सअ‍ॅपवरून हाय क्वॉलिटी फोटो कसे पाठवायचे? जाणून घ्या नवीन ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
WhatsApp जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर लोक रोज एकेमेकांना मेसेज, फोटो, व्हिडीओ आणि ऑडियोसह कॉलिंग देखील करतात. परंतु व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो शेयर करताना क्वॉलिटी कम्प्रेस होते. त्यामुळे युजर्स फोटो शेयर करण्यासाठी WhatsApp ला पर्याय शोधतात. व्हॉट्सअ‍ॅपनं युजर्सची ही समस्या सोडवण्यासाठी ‘Photo Quality’ फीचर सादर केलं आहे. ह्या फीचरच्या मदतीनं युजर्स हाय क्वॉलिटी फोटो शेयर करता येतात. तसेच युजर्स डेटा वाचवण्यासाठी कंप्रेस फॉर्मेट फोटो देखील शेयर करू शकतील.

हे फिचर सध्या निवडक युजर्सकडे आलं आहे, जे लवकरच सर्वांसाठी उपलब्ध होऊ शकतं. जर तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपचं अपडेटेड व्हर्जन वापरत असाल तर हे फीचर कसं वापरायचं हे आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.

अँड्रॉइड फोनवरून व्हॉट्सअ‍ॅपवर ऑरिजनल साइज फोटो कसे पाठवायचे

स्टेप 1 : तुमच्या फोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा आणि सेटिंग मेन्यूमध्ये जा.

स्टेप 2 : सेटिंग मेन्यू ओपन करण्यासाठी तुम्हाला चॅट विंडोमध्ये डावीकडे दिलेल्या तीन डॉटवर टॅप करावं लागेल.

स्टेप 3 : स्क्रोल डाउन केल्यावर तुम्हाला स्टोरेज आणि डेटाचा ऑप्शन मिळेल.

स्टेप 4 : इथे ‘मीडिया अपलोड क्वॉलिटी’ ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 5 : पुढे तीन ऑप्शन ऑटो, बेस्ट क्वॉलिटी आणि डेटा सेव्हर मिळतील. हाय क्वॉलिटी फोटोसाठी Best Quality ची निवड करा.

जसे की नावावरून समजलं असेल की ‘डाटा सेवर’ मोड कंप्रेस्ड इमेज फाईल शेयर करतो. तर ऑटो मोड तुमच्या नेटवर्कवर अवलंबून असतो, जो चांगल्या नेटवर्क क्वॉलिटी दरम्यान हाय क्वॉलिटी इमेज शेयर करतो.

iPhone वरून व्हॉट्सअ‍ॅपवर ऑरिजनल साइज फोटो कसे पाठवायचे

स्टेप 1 : आयफोनमध्ये WhatsApp ओपन करा आणि ‘सेटिंग्स’ मेन्यूमध्ये जा.

स्टेप 2 : सेटिंग सेक्शनमध्ये स्टोरेज आणि डेटावर क्लिक करा.

स्टेप 3 : स्क्रोल डाउन केल्यावर ‘मीडिया अपलोड क्वॉलिटी’ ऑप्शनवर जा.

स्टेप 4 : ह्यात तुम्हाला तीन ऑप्शन – ऑटो, बेस्ट क्वॉलिटी आणि डेटा सेव्हरचा ऑप्शन मिळेल.

The post व्हॉट्सअ‍ॅपवरून हाय क्वॉलिटी फोटो कसे पाठवायचे? जाणून घ्या नवीन ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-ne-high-quality-photo-kase-pathavayche/feed/ 0
हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करणं झालं सोपं, नवीन संचार साथी पोर्टल करेल मदत https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-lost-or-stolen-phone-on-sanchar-saathi-portal/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-lost-or-stolen-phone-on-sanchar-saathi-portal/#respond Sun, 23 Jul 2023 03:30:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20960 केंद्र सरकारनं हरवलेल्या किंवा चोरीला गेल्या मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासाठी संचार साथी पोर्टल – www.sancharsaathi.gov.in लाँच केलं आहे. हे पोर्टल भारतातील सर्व टेलीकॉम युजर्ससाठी फायदेशीर ठरेल. ह्या पोर्टलच्या मदतीनं युजर्स चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनला ट्रॅक करण्यासह ब्लॉक देखील करू शकतील. तसेच स्वतःच्या नावावर किती फोन नंबर रजिस्टर आहेत याची माहिती देखील मिळवू शकतील. आज […]

The post हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करणं झालं सोपं, नवीन संचार साथी पोर्टल करेल मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
केंद्र सरकारनं हरवलेल्या किंवा चोरीला गेल्या मोबाइल फोनला ट्रॅक करण्यासाठी संचार साथी पोर्टल – www.sancharsaathi.gov.in लाँच केलं आहे. हे पोर्टल भारतातील सर्व टेलीकॉम युजर्ससाठी फायदेशीर ठरेल. ह्या पोर्टलच्या मदतीनं युजर्स चोरीला गेलेल्या किंवा हरवलेल्या फोनला ट्रॅक करण्यासह ब्लॉक देखील करू शकतील. तसेच स्वतःच्या नावावर किती फोन नंबर रजिस्टर आहेत याची माहिती देखील मिळवू शकतील. आज आम्ही तुम्हाला संचार साथी पोर्टलवर हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनला ब्लॉक करण्याची माहिती देणार आहोत आहोत.

चोरीला गेलेला किंवा हरवलेला फोन ब्लॉक कसा करायचा

स्टेप 1 : सर्वप्रथम संचार साथी पोर्टल – https://sancharsaathi.gov.in/ वर लॉगइन करा. इथे दिलेल्या लिंकव्हर क्लिक करून तुम्ही संचार साथीवर जाऊ शकता.

स्टेप 2 : या वेबसाइटच्या होम पेजवर तुम्हाला संचार साथी पोर्टलसंबंधित सर्व्हिसेजची माहिती दिसेल. इथे तुम्हाला मेन मेन्यूवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करा.

स्टेप 3 : सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस ऑप्शनवर क्लिक करताच नवीन पेज ओपन होईल, ज्यात दोन ऑप्शन दिसतील. मोबाइल फोन ब्लॉक करण्यासाठी ऑप्शन ‘ब्लॉक युवर्स स्टोलन/लॉस्ट फोन’ वर करा.

स्टेप 4 : एक नवीन पेज ओपन होईल, ज्यात तीन ऑप्शन मिळतील. पहिला – ब्लॉक स्टोलन/ लॉस्ट मोबाइल, दुसरा अनब्लॉक फाउंड मोबाइल आणि तिसरा चेक रिक्वेस्ट स्टेटसचा असेल. फोन ब्लॉक करण्यासाठी पहिला ऑप्शन निवडा.

स्टेप 5 : आता नवीन पेजवर तुम्हाला मोबाइल नंबर, IMEI नंबर, फोन ब्रँडचं नाव, मोबाइलच्या बिलाची कॉपी, पोलीस कंप्लेंट आणि कोणत्या ठिकाणी स्मार्टफोन चोरी झाला ही सर्व माहिती भरावी लागेल.

स्टेप 6 : सर्व डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तुमची माहिती द्यावी लागेल, ज्यात तुमचं नाव, पत्ता, आयडेंटिटी आणि स्मार्टफोनच्या माध्यमातून ओटीपी वेरीफिकेशन करावं लागेल.

स्टेप 7 : आता तुम्हाला तुमची कम्प्लेंट रिक्वेस्ट आयडी नंबर मिळेल. ज्याच्या मदतीनं तुम्ही स्टेटस चेक करू शकता.

फोन ब्लॉकचं स्टेटस कसं चेक करायचं

स्टेप 1 : चोरी झालेल्या किंवा हरवलेल्या फोनची तक्रार केली असेल तर ह्या पोर्टलवर तुम्ही तुमच्या कम्प्लेंटचं स्टेटस देखील चेक करू शकता. ह्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम होम पेजवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करावं लागेल.

स्टेप 2 : इथे Check Request Status वर क्लिक करा.

स्टेप 3 : नवीन पेज ओपन होईल जिथे रिक्वेस्ट आयडी सबमिट करा आणि तुम्हाला तुमच्या कम्प्लेंटची माहिती मिळेल.

फोन मिळाल्यावर असा करा अनब्लॉक

जर तुमचा हरवलेला फोन तुम्हाला मिळालं तर ब्लॉक केलेला फोन तुम्ही संचार साथी पोर्टलच्या मदतीनं अनब्लॉक देखील करू शकता. ह्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

स्टेप 1 : होम पेजवर ‘सिटीजंस सेंट्रिक सर्व्हिसेस’ वर क्लिक करून ‘अनब्लॉक फाउंड मोबाइल’ वर क्लिक करा.

स्टेप 2 : नवीन पेजवर तुम्हाला अनब्लॉकचं कारण विचारलं जाईल. चार पर्यायांपैकी एकाची निवड करा.

स्टेप 3 : त्यानंतर कॅप्चा कोड, मोबाइल नंबर टाका आणि ओटीपी वेरीफिकेशन टाका.

स्टेप 4 : सबमिट केल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबर अनब्लॉकची रिक्वेस्ट आयडी मिळेल. नंतर तुम्ही अनब्लॉकचं स्टेटस चेक करू शकता.

The post हरवलेला किंवा चोरी झालेला फोन ब्लॉक करणं झालं सोपं, नवीन संचार साथी पोर्टल करेल मदत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-lost-or-stolen-phone-on-sanchar-saathi-portal/feed/ 0
Google अकाऊंट कसं बनवायचं, चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप पद्धत https://www.91mobiles.com/marathi/google-account-kas-banavayach/ https://www.91mobiles.com/marathi/google-account-kas-banavayach/#respond Fri, 21 Jul 2023 10:30:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20919 जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरू इच्छित असाल तर तुमच्याकडे गुगल अकाऊंट (जीमेल ईमेल आयडी) असणं आवश्यक आहे. हे अकाऊंट फक्त अँड्रॉइड फोनमध्ये वापरता येतं असं नाही तर ह्याचा वापर तुम्ही कोणत्याही वेब ब्राउजरमध्ये दैनंदिन ईमेल किंवा कम्यूनिकेशनसाठी करू शकता. त्यामुळे जर तुमच्याकडे गुगल अकाऊंट नसेल तर आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप पद्धत सांगणार आहोत. Google अकाऊंट बनवण्याची […]

The post Google अकाऊंट कसं बनवायचं, चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरू इच्छित असाल तर तुमच्याकडे गुगल अकाऊंट (जीमेल ईमेल आयडी) असणं आवश्यक आहे. हे अकाऊंट फक्त अँड्रॉइड फोनमध्ये वापरता येतं असं नाही तर ह्याचा वापर तुम्ही कोणत्याही वेब ब्राउजरमध्ये दैनंदिन ईमेल किंवा कम्यूनिकेशनसाठी करू शकता. त्यामुळे जर तुमच्याकडे गुगल अकाऊंट नसेल तर आम्ही तुम्हाला स्टेप-बाय-स्टेप पद्धत सांगणार आहोत.

Google अकाऊंट बनवण्याची पद्धत

कोणत्याही मोबाइल, लॅपटॉप, कंप्यूटर किंवा तत्सम डिवाइसवर ब्राउजरमधून गुगल अकाऊंट बनवता येईल. ह्यासाठी सर्वप्रथम

स्टेप 1 : ह्या पेजवर क्लिक करा किंवा तुम्ही ब्राउजरवर जीमेल लिहून सर्च करू शकता. सर्च पेजवर जो पहिला ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. ओपन होताच सर्वप्रथम क्रिएट जीमेल अकाऊंटचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 2 : यात सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव लिहावं लागेल.

स्टेप 3 : त्यानंतर खाली युजर नेमचा पर्याय दिसेल आणि जिथे एखादा यूनिक युजर नेम टाकावा लागेल. हे नाव तुमच्या घरच्या पत्त्याप्रमाणे आहे त्यामुळे युनिक आणि प्रोफेशनल असणं आवश्यक आहे.

स्टेप 4 : त्यानंतर खाली पासवर्डचा ऑप्शन दिसेल. इथे तुम्हाला यूनिक पासवर्ड बनवावा लागेल. हा यूनिक पासवर्ड तुमचा गुप्त कोड असेल जो तुमच्या गुगल अकाऊंटल सुरक्षित ठेवेल

स्टेप 5 : त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल जिथे तुम्हाला मोबाइल नंबर, रिकव्हरी ईमेल, जन्म तारीख इत्यादि माहिती विचारली जाईल. जन्म तारीख वगळता इतर माहिती नाही दिली तरी चालेल.

स्टेप 6 : हे पूर्ण करताच तुमचं गुगल अकाऊंट बनून तयार होईल. आता तुम्ही अकाऊंट वापरू शकता. मोबाइल नंबर आणि रिकव्हरी ईमेल आयडी दिल्यास पासवर्ड विसरल्यावर अकाऊंट रिकवर करणे सोपे जाईल

जर तुमचं वय 13 वर्षांपेक्षा कमी असेल तर गुगल अकाऊंटसह तुम्हाला एखादे पॅरेंटल अकाऊंट जोडावे लागेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या मुलांचे अकाऊंट मॅनेज करू शकता.

मोबाइलमध्ये गुगल अकाऊंट कसं बनवायचं

जर तुमच्याकडे कंप्यूटर नसेल तर तुम्ही मोबाइलवरून देखील तुमचं गुगल अकाऊंट बनवू शकता. मोबाइलमध्ये दोन पद्धतीनं गुगल अकाऊंट बनवता येतं. पहिली पद्धत ब्राउजरच्या माध्यमातून तर दुसरी पद्धत अ‍ॅपचा वापर करून आहे. ब्राउजरमधील अकाऊंट बनवण्याची पद्धत वर देण्यात आली आहे. तर अ‍ॅपमधून अकाऊंट बनवण्यासाठी तुम्ही पुढील स्टेप्स फॉलो करू शकता.

स्टेप 1 : सर्वप्रथम गुगल अ‍ॅपवर क्लिक करा.

स्टेप 2 : इथे तुम्हालावर प्रोफाईल इमेज दिसेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : इथे सर्वप्रथम तुम्हाला ईमेल किंवा फोन नंबरनं साइन इन करण्यास सांगितलं जाईल तर थोडं खाली क्रिएट अकाऊंटचा ऑप्शन मिळेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 4 : ह्यावर क्लिक करताच तुम्हाला विचारलं जाईल की कोणत्या प्रकारचं अकाऊंट तुम्हाला बनवायचं आहे. स्वतःसाठी, मुलांसाठी किंवा व्यवसायासाठी. तुम्ही मायसेल्फवर क्लिक करा.

स्टेप 5 : त्यानंतर दोन काॅलम दिसतील ज्यात तुम्हाला तुमचं नाव आणि आडनाव टाका.

स्टेप 6 : ही माहिती दिल्या नंतर एक नवीन पेज येईल जिथे तुम्हाला तुमची जन्म तारीख टाकावी लागेल.

स्टेप 7 : त्यानंतर पुढे गेल्यावर तुमच्याकडे गुगल अकाऊंटसाठी यूनिक आयडी मागितला जाईल. तुम्ही तुमच्या नावाशी संबंधित आयडी बनवू शकता किंवा आयडी स्वरूपात मोबाइल नंबरचा वापर करू शकता.

स्टेप 8 : जर तुम्ही तुमच्या नावानं आयडी बनवत असाल तर पुढे गेल्यावर तुमच्याकडे पासवर्ड मागितला जाईल आणि जर तुमच्या मोबाइल नंबरचा गुगल आयडीसाठी वापर केला तर आधी त्या मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल आणि तो टाकल्यानंतर अकाऊंट बनवण्यासाठी पासवर्ड टाकावा लागेल.

स्टेप 9 : पासवर्ड टाकल्यावर तुमचं काम होईल. गुगल कडून एक दोन दिशा निर्देश दिले जातील, जे ओके करताच तुमचं गुगल अकाऊंट सुरु होईल.

अशाप्रकारे फक्त काही स्टेप फॉलो करून तुम्ही गुगल अकाऊंट बनवू शकता. विशेष म्हणजे तुम्ही जीमेल अ‍ॅप, गुगल पे अ‍ॅप आणि युट्युबवर या अकाऊंटचा वापर करता येईल.

The post Google अकाऊंट कसं बनवायचं, चला जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/google-account-kas-banavayach/feed/ 0
आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/ https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/#respond Fri, 14 Jul 2023 12:05:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21329 आधार कार्ड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र बनलं आहे. एयरपोर्ट ते बँक, सिम खरेदी पासून आणि इतर सरकारी, बिगर-सरकारी कामांसाठी सध्या आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच भारतात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक अनेक कामं बँकेच्या रांगेत न लागत करू शकतात. विशेष म्हणजे युजर्स इंटनेट कनेक्शनविना देखील बँकिंग […]

The post आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
आधार कार्ड गेल्या काही वर्षांमध्ये भारतीयांसाठी एक महत्वपूर्ण ओळखपत्र बनलं आहे. एयरपोर्ट ते बँक, सिम खरेदी पासून आणि इतर सरकारी, बिगर-सरकारी कामांसाठी सध्या आधार कार्ड आवश्यक आहे. तसेच भारतात बँक खात्याशी आधार कार्ड लिंक केल्यावर ग्राहकांना अनेक सेवा मिळतात. ग्राहक अनेक कामं बँकेच्या रांगेत न लागत करू शकतात. विशेष म्हणजे युजर्स इंटनेट कनेक्शनविना देखील बँकिंग सेवा वापरू शकतात. आज आम्ही तुम्हाला आधारच्या मदतीनं बँक अकाऊंटमधील बॅलेन्स चेक करण्याची माहिती देणार आहोत.

आधार नंबरवरून बँक बँलेस चेक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

जर तुमच्या बँक अकाऊंटशी आधार लिंक असेल तर तुम्ही *99# सर्व्हिसच्या मदतीनं ऑफलाइनच बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकता. ह्यासाठी तुम्हाला पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

स्टेप 1 : बँक अकाऊंटशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरवरून *99# डायल करा.

स्टेप 2 : तुमच्या मोबाइल नंबरवर ‘वेलकम टू *99#’ मेसेज फ्लॅश होईल.

स्टेप 3 : ओकेवर क्लिक केल्यावर फ्लॅश मेसेजमध्ये मेन्यू ओपन होईल. त्यात तुम्हाला तिसऱ्या नंबरवर चेक बॅलेन्सचा ऑप्शन मिळेल.

स्टेप 4 : त्यामुळे बॅलेन्स चेक करण्यासाठी 3 टाइप करून रिप्लाय करा.

स्टेप 5 : थोड्या वेळानं फोनमध्ये फ्लॅश मेसेज येईल ज्यात तुम्हाला यूपीआय पिन रिप्लाय करावा लागेल.

स्टेप 6 : पुढील फ्लॅश मेसेजमध्ये तुम्हाला तुमचा बँक बॅलेन्स समजेल.

नोट : जर तुमचे दोन किंवा अधिक बँक अकाऊंट असतील तर *99# सर्व्हिस तुम्हाला त्या बँकेतील बॅलेन्स सांगेल जी सरकारी यूपीआय अ‍ॅप BHIM मध्ये तुमची प्रायमरी बँक असेल.

*99# चे इतर फायदे

*99# द्वारे ऑफलाइन बँक बॅलेन्स चेक करण्यासोबतच इतर फीचर्स देखील वापरता येतात. ह्या सर्व्हिसचे इतर फीचर्स खाली देण्यात आले आहेत.

  • सेंड मनी
  • रिक्वेस्ट मनी
  • चेक बॅलेन्स
  • माय प्रोफाईल
  • पेंडिंग रिक्वेस्ट
  • ट्रँजॅक्शन्स
  • यूपीआय पिन

बँकेशी आधार लिंक कसं करायचं?

बँक अकाऊंटला आधार लिंक करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही बँकेत जाऊन मॅन्युअली आधार लिंक करण्यासह ऑनलाइन आणि एटीएमवरून देखील तुमचं बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

बँकेत जाऊन : तुमच्या आधार कार्डच्या प्रतीसह एक अर्ज देऊन तुम्ही बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

ऑनलाइन : जर तुम्ही इंटरनेट बँकिंग वापरत असाल तर लॉगइन करून अकाऊंटशी आधार कार्ड लिंक करू शकता.

एटीएम : बँक अकाऊंटशी आधार कार्ड लिंक एटीएममधून देखील करता येतं. एटीएम मध्ये कार्ड स्कॅन केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर आधार लिंकचा ऑप्शन मिळतो. इथून देखील तुम्ही तुमच्या अकाऊंटशी आधार लिंक करू शकता.

The post आधार कार्ड नंबरवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा? इंटरनेटविना होईल काम, अशी आहे ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aadhar-cardne-bank-balance-check/feed/ 0
फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं? अशी आहे सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-create-a-facebook-account-on-desktop/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-create-a-facebook-account-on-desktop/#respond Sat, 01 Jul 2023 12:22:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21288 Facebook जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट आहे. फेसबुकवर अकाऊंट बनवणं खूप सोपं आहे. जर तुम्ही आतापर्यंत फेसबुकवर तुमचं अकाऊंट बनवलं नसेल तर आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे जिच्या मदतीनं तुम्ही फेसबुकवर तुमची आयडी बनवू शकता. सोशल मीडिया साइट फेसबुकच्या मदतीनं युजर्स फोटोज पोस्ट, आर्टिकल शेयर करणे आणि वेगवेगळ्या ग्रुप शेयर करण्यासोबतच मित्रांशी कनेक्ट […]

The post फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं? अशी आहे सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Facebook जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साइट आहे.
  • फेसबुक युजर्स फोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि डेस्कटॉप कुठूनही अ‍ॅक्सेस करू शकतात.
  • फेसबुकची आयडी बनवण्यासाठी ईमेल आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे.

Facebook जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट आहे. फेसबुकवर अकाऊंट बनवणं खूप सोपं आहे. जर तुम्ही आतापर्यंत फेसबुकवर तुमचं अकाऊंट बनवलं नसेल तर आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे जिच्या मदतीनं तुम्ही फेसबुकवर तुमची आयडी बनवू शकता. सोशल मीडिया साइट फेसबुकच्या मदतीनं युजर्स फोटोज पोस्ट, आर्टिकल शेयर करणे आणि वेगवेगळ्या ग्रुप शेयर करण्यासोबतच मित्रांशी कनेक्ट करू शकता. फेसबुकवर आयडी कंप्यूटर आणि मोबाइल अ‍ॅप दोन्हीच्या मदतीनं बनवता येईल. इथे आम्ही तुम्हाला कंप्यूटर आणि मोबाइलवरून फेसबुक आयडी बनवण्याची माहिती देत आहोत.

फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं

फेसबुक कंप्यूटर आणि मोबाइल फोनवरून अ‍ॅक्सेस केलं जाऊ शकतं. त्यामुळे आयडी देखील कंप्यूटर किंवा मोबाइलवरून बनवता येते. इथे आम्ही तुम्हाला दोन्हीवरून फेसबुक आयडी बनवण्याची पद्धत सांगितली आहे.

  • कंप्यूटरवरून फेसबुक अकाऊंट
  • मोबाइलवरून फेसबुक अकाऊंट

कंप्यूटरवरून फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं?

स्टेप 1 : सर्वप्रथम facebook.com ओपन करा. क्रिएट न्यू अकाऊंटवर क्लिक करा.

स्टेप 2 : पुढील पेजवर नाव, आडनाव तसेच ईमेल आयडी किंवा फोन नंबर टाइप करा.

स्टेप 3 : त्यानंतर तुमचा फेसबुक अकाऊंटसाठी पासवर्ड टाइप करा.

स्टेप 4 : त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाइप करा आणि लिंकची माहिती द्या.

स्टेप 5 : साइन अप वर क्लिक करा आणि अकाऊंट क्रिएट फिनिश केल्यानंतर तुमचा इमेल आयडी आणि फोन नंबर कंफर्म करा.

मोबाइलवरून फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं?

स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये फेसबुक अ‍ॅप डाउनलोड करा.

स्टेप 2 : अ‍ॅप ओपन करून साइन-अपवर क्लिक करा.

स्टेप 3 : त्यानंतर Get Started वर क्लिक करा.

स्टेप 4 : ऑन स्क्रीन सूचना पूर्ण करा आणि विचारलेली माहिती जसे की नाव, जन्मतारीख आणि लिंग इत्यादी माहिती द्या.

स्टेप 5 : आता पुढील पेजवर तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी टाका.

स्टेप 6 : त्यानंतर फेसबुक अकाऊंटसाठी पासवर्ड बनवा.

स्टेप 7 : साइन-अप वर टॅप करा.

फेसबुक अकाऊंट क्रिएट प्रोसेस फिनिश करण्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी किंवा फोन नंबर कंफर्म करावा लागेल.

The post फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं? अशी आहे सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-create-a-facebook-account-on-desktop/feed/ 0
युट्युबवरून पैसे कसे कमवायचे, अशी आहे बेस्ट पद्धत https://www.91mobiles.com/marathi/youtube-varun-paise-kase-kamavayche/ https://www.91mobiles.com/marathi/youtube-varun-paise-kase-kamavayche/#respond Sat, 01 Jul 2023 03:43:37 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21259 सध्या छोट्या व्हिडीओचा बोलबाला आहे परंतु युट्युब वरील मोठे व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांची संख्या आजही मोठी आहे. ह्या व्हिडीओजच्या मदतीनं क्रियेटर्स कोट्यवधींची कामे करत आहेत. हो! युट्युब व्हिडीओ बनवून कोट्यवधींची कामे करता येऊ शकते. त्यामुळे तुम्हालाही आता प्रश्न पडला असेल की युट्युबवरून पैसे कसे कमवायचे? तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि व्हिडीओ शूटिंगमध्ये थोडा रस असेल तर हा […]

The post युट्युबवरून पैसे कसे कमवायचे, अशी आहे बेस्ट पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या छोट्या व्हिडीओचा बोलबाला आहे परंतु युट्युब वरील मोठे व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांची संख्या आजही मोठी आहे. ह्या व्हिडीओजच्या मदतीनं क्रियेटर्स कोट्यवधींची कामे करत आहेत. हो! युट्युब व्हिडीओ बनवून कोट्यवधींची कामे करता येऊ शकते. त्यामुळे तुम्हालाही आता प्रश्न पडला असेल की युट्युबवरून पैसे कसे कमवायचे? तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि व्हिडीओ शूटिंगमध्ये थोडा रस असेल तर हा तुमच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही तुमची ओळख निर्माण करू शकता. ह्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला युट्युबवरून पैसे कमावण्याची ट्रिक आणि अटी सविस्तर सांगणार आहोत.

युट्युबवरून पैसे कसे कमवायचे?

Youtube वरून पैसे कमावण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युट्युबवर एक चॅनेल बनवावं लागेल. त्यानंतर तुम्ही युट्युबवर तुमचे स्वतःचे व्हिडीओ आणि शॉर्ट्स व्हिडीओ टाकून पैसे कमवू शकता. इथे आम्ही तुम्हाला युट्युब चॅनेल बनवणे आणि युट्युबवरून पैसे कमवण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील ह्याची माहिती देत आहोत.

युट्युबवरून पैसे कमावण्यासाठी आवश्यक अटी

युट्युबवरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला युट्युबच्या काही अटींचे पालन करावे लागेल. तुम्हाला युट्युब मॉनीटाइज पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करावी लागेल. तसेच तुमच्या चॅनेलवर काही क्रायटेरिया पूर्ण करावे लागतील, ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

  1. तुमच्या युट्युब चॅनेलचे 1000 सब्सक्राइबर्स पूर्ण व्हायला हवेत.
  2. तुमच्या युट्युब चॅनेलवर 4000 तास व्यूज असाव्या, ज्या एका वर्षात पूर्ण झालेल्या असाव्या.
  3. किंवा युट्युब शॉर्ट्सवर 3 महिन्यात 100 लाख व्यूज झालेल्या असाव्या.
  4. तुमच्या चॅनेलवर कोणताही कॉपी राइट किंवा कॉम्यूनिटी स्टॅंडर्ड स्ट्राईक नसावी.
  5. तुमच्या चॅनेलनं युट्युबच्या अटींचं उल्लंघन केलं नसावं.

युट्युब चॅनेल कसं बनवायचं

युट्युब चॅनेल बनवण्यासाठी तुमच्याकडे Gmail ची एक मेल आयडी असावी. इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही सहज तुमचं युट्युब चॅनेल बनवू शकता.

  1. सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉपमध्ये युट्युब ओपन करा आणि तुमच्या Gmail आयडीनं लॉगइन करा.
  2. डावीकडे प्रोफाईल फोटोवर क्लिक करून मेन्यू ओपन करा आणि Your Channel च्या ऑप्शनवर क्लिक करा.
  3. आता एक नवीन पेज येईल, तिथे तुमचं चॅनेल कस्टमाइज करण्यासाठी Custmize Channel वर क्लिक करा.
  4. तुमच्या कंप्यूटरवर नवीन पेज ओपन होईल जे तुम्हाला युट्युब स्टुडियोमध्ये घेऊन जाईल. इथून तुम्ही तुमच्या चॅनेलची प्रोफाईल आणि कव्हर इमेज बदलू शकाल. तसेच तुमच्या चॅनेलचं नाव देखील इथून बदलता येईल. ह्यासाठी कंटीन्यूवर क्लिक करा.
  5. फोटो बदलण्यासाठी ब्रँडिंग ऑप्शनमध्ये क्लिक करा. इथे तुम्हाला प्रोफाईल आणि कव्हर इमेज बदलण्याचा ऑप्शन मिळतील. तसेच तुम्हाला व्हिडीओ वॉटरमार्क देखील अपलोड करण्याच्या ऑप्शन दिसेल.
  6. वर तुम्हाला Basic Info ऑप्शन दिसेल, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव आणि हँडल चेंज करू शकता. तसेच तुम्हाला तुमच्या चॅनेलचं डिस्क्रिप्शन देखील लिहावं लागेल, त्यामुळे प्रेक्षकांना तुमच्या चॅनेलची माहिती मिळेल. तसे तुम्ही तुमचं चॅनेल इतर सोशल मीडिया साइट जसे की फेसबुक, ट्विटरशी कनेक्ट करू शकाल.

सर्व सेटिंग केल्यांनतर तुमचं युट्युब चॅनेल तयार होईल. आता तुम्ही व्हिडीओ बनवून युट्युबवर अपलोड करू शकता. युट्युबवर व्हिडीओ अपलोड केल्यावर जर उपरोक्त अटी पूर्ण झाल्या की तुमची कमाई सुरु होईल.

युट्युब व्हिडीओ बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी?

कॅमेरा : व्हिडीओ बनवण्यासाठी तुमच्याकडे कॅमेरा असावा. तुम्ही मोबाइल फोनच्या कॅमेऱ्याचा देखील वापर करू शकता.

माइक : व्हिडीओमध्ये चांगला आवाज असणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे एक चांगला माइक घ्यावा.

लाइट : लाइटिंगचा व्हिडीओवर खूप परिणाम होतो. जर तुम्हाला आकर्षक व्हिडीओ बनवायचा असेल तर तुम्हाला चांगल्या लाइट्स विकत घ्याव्या लागतील.

कंप्यूटर : व्हिडीओ एडिट करण्यासाठी तुम्हाला कंप्यूटर किंवा लॅपटॉप लागेल.

व्हिडीओ एडिट सॉफ्टवेयर : व्हिडीओ एडिट करण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेयर घ्यावं लागेल.

इंटरनेट कनेक्शन : व्हिडीओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन लागेल.

The post युट्युबवरून पैसे कसे कमवायचे, अशी आहे बेस्ट पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/youtube-varun-paise-kase-kamavayche/feed/ 0
आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं? जाणून घ्या सर्व स्टेप्स https://www.91mobiles.com/marathi/aadhar-card-harvalyavar-kay-karayach/ https://www.91mobiles.com/marathi/aadhar-card-harvalyavar-kay-karayach/#respond Wed, 28 Jun 2023 12:22:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21797 जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर घाबरून जाऊ नका. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं हे सांगणार आहोत. त्याचबरोबर ह्या पोस्टमध्ये आधार कार्डचा दुरुपयोग कसा केला जाऊ शकतो ते देखील समजेल. आधार कार्ड हरवल्यास दुसरं आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ऑनलाइन घर बसल्या दुसरं आधार कार्ड डाउनलोड […]

The post आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं? जाणून घ्या सर्व स्टेप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • आधार कार्ड हरवल्यावर सहज दुसरं डाउनलोड करता येतं.
  • आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी मोबाइल नंबर रजिस्टर असणं आवश्यक आहे.
  • नवीन आधार कार्डसाठी ऑफलाइन देखील अर्ज करता येतो.

जर तुमचं आधार कार्ड हरवलं असेल तर घाबरून जाऊ नका. आज आम्ही तुम्हाला आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं हे सांगणार आहोत. त्याचबरोबर ह्या पोस्टमध्ये आधार कार्डचा दुरुपयोग कसा केला जाऊ शकतो ते देखील समजेल. आधार कार्ड हरवल्यास दुसरं आधार कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जाण्याची गरज नाही. ऑनलाइन घर बसल्या दुसरं आधार कार्ड डाउनलोड करता येईल. जर तुम्हाला ऑनलाइन आधार कार्ड डाउनलोड करण्यास अडचण येत असेल तर आम्ही तुम्हाला ऑफलाइन दुसऱ्या आधार कार्डसाठी कसा अर्ज करायचा हे देखील सांगणार आहोत.

आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं?

आधार कार्ड हरवल्यावर तुम्ही ऑनलाइन नवीन कार्ड डाउनलोड करू शकता. ह्यासाठी आधार क्रमांक आणि रजिस्टर्ड मोबाइल नंबर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. जर तुम्ही आधार क्रमांक विसरला असाल तरीही देखील रजिस्टर नंबरवरून आधार कार्ड डाउनलोड करता येईल. तसेच नंबर लिंक नसेल तर डुप्लीकेट आधार कार्डसाठी ऑफलाइन अर्ज करता येतो.

आधार नंबर कसा शोधायचा?

स्टेप 1 : सर्वप्रथम आधारच्या ऑफिशियल वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/retrieve-eid-uid वर जा.

स्टेप 2 : तिथे आधार क्रमांक सिलेक्ट करून, रजिस्टर्ड मोबाइल आणि कॅप्चा कोड टाकून ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.

स्टेप 3 : तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर एक ओटीपी येईल तो सबमिट केल्यावर तुमच्या मोबाइल नंबरवर तुमचा 12 अंकी आधार कार्ड नंबर पाठवला जाईल.

आता तुम्हाला आधार कार्ड नंबर मिळाला आहे. त्यामुळे सहज आधार कार्ड डाउनलोड करता येईल. पुढे तुम्हाला स्टेप बाय स्टेप आधार कार्ड डाउनलोड करण्याची माहिती देण्यात आली आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नंबर असेल तर तुम्ही थेट ही प्रोसेस करू शकता.

आधार कार्ड कसं डाउनलोड करायचं?

स्टेप 1 : आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑफिशियल वेबसाइट https://myaadhaar.uidai.gov.in/genricDownloadAadhaar ओपन करा.

स्टेप 2 : तिथे तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून ‘सेंड ओटीपी’ वर क्लिक करा.

स्टेप 3 : पुढील पेजवर ओटीपी व्हेरिफाय करून ‘डाउनलोड’ वर क्लिक करा. काही सेकंदात आधार कार्ड डाउनलोड होईल.

ऑफलाइन डुप्लीकेट आधार कार्ड कसं बनवायचं?

जर तुमच्या आधार कार्डशी मोबाइल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला डुप्लीकेट आधार कार्डसाठी आधार सेंटर जावं लागेल. तुमच्या जवळच्या आधार कार्ड सेंटरवर जा आणि तिथे तुम्हाला एक फॉर्म मिळेल त्यात आवश्यक माहिती भरा. सोबत एक ओळखीचा पुरावा द्यावा लागेल.

तुमचं बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन केलं जाईल आणि त्यानंतर नवीन आधार कार्डसाठी विनंती करता येईल. तसेच तुम्ही तुमचा मोबाइल नंबर देखील रजिस्टर करू शकता. त्यामुळे भविष्यात ऑनलाइन आधार सर्व्हिसचा लाभ घेता येईल. काही दिवसांत तुमचं आधार कार्ड तुमच्या घरी पोस्टाने येईल.

आधार कार्डचा गैरवापर करता येतो का?

आधार कार्ड हरवल्यावर त्याचा गैरवापर करता येत नाही. सरकारी किंवा खाजगी सर्व्हिस जसे की सिम कार्ड खरेदीसाठी आधार व्हेरिफाय करावं लागतं. ज्यासाठी ऑनलाइन, ओटीपी किंवा बायोमॅट्रिक ऑथेंटिकेशन आवश्यक आहे. म्हणजे तुमच्याव्यतिरिक्त तुमचं आधार कार्ड कोणीही वापरू शकत नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नका. परंतु तुम्ही जवळच्या पोलीस ठाण्यात कार्ड हरवल्याची तक्रार करू शकता.

The post आधार कार्ड हरवल्यावर काय करायचं? जाणून घ्या सर्व स्टेप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/aadhar-card-harvalyavar-kay-karayach/feed/ 0
विजेचं बिल ऑनलाइन कसं चेक करायचं, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/vij-bill-kas-check-karayach-how-to-check-electricity-bill/ https://www.91mobiles.com/marathi/vij-bill-kas-check-karayach-how-to-check-electricity-bill/#respond Wed, 21 Jun 2023 10:42:24 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21687 विजेचं बिल चेक करणं खूप सोपं झालं आहे. जरी तुम्हाला वीज बिलाची हार्ड कॉपी, एसएमएस किंवा ईमेल मिळाला नसेल तरी वीज बिलाची माहिती ऑनलाइन मिळवू शकता. ह्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या वीज डिस्कॉम विभागाच्या वेबसाइट किंवा पेटीएम (PayTM), फोनपे (PhonePe), गुगल पे (Google Pe) इत्यादी टूल्सची मदत घेऊ शकता. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅप्सच्या मदतीनं तुमचं विजेचं […]

The post विजेचं बिल ऑनलाइन कसं चेक करायचं, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विजेचं बिल चेक करणं खूप सोपं झालं आहे. जरी तुम्हाला वीज बिलाची हार्ड कॉपी, एसएमएस किंवा ईमेल मिळाला नसेल तरी वीज बिलाची माहिती ऑनलाइन मिळवू शकता. ह्यासाठी तुम्ही राज्य सरकारच्या वीज डिस्कॉम विभागाच्या वेबसाइट किंवा पेटीएम (PayTM), फोनपे (PhonePe), गुगल पे (Google Pe) इत्यादी टूल्सची मदत घेऊ शकता. इथे आम्ही तुम्हाला अ‍ॅप्सच्या मदतीनं तुमचं विजेचं बिल चेक करण्याची पद्धत सांगणार आहोत.

विजेचं बिल ऑनलाइन चेक करण्याची पद्धत

  • ऑफिशियल वेबसाइटवरून
  • फोनपे अ‍ॅपवरून
  • गुगल पे आणि अ‍ॅमेझॉन पेवरून

प्रत्येक राज्यात ऑनलाइन वीज बिल चेक करण्याची आणि भरण्याची व्यवस्था आहे. नागरिकांच्या सोयीसाठी वीज विभागाने सर्व माहिती ऑनलाइन केली आहे. युजर्स फक्त एका क्लिकमध्ये अकाऊंटची संपूर्ण माहिती मिळवू शकतात म्हणजे विज बिल घरी न आल्यास टेन्शन घेण्याची गरज नाही. त्याचबरोबर बिल जाणून घेण्यासाठी वीज कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्याच्या गरज नाही. सर्व ऑनलाइन चेक करता येईल.

ऑफिशियल वेबसाइटवरून कसं चेक करायचं वीज बिल

जर ताज्या वीज बिलाची माहिती हवी असेल तर तुम्हाला राज्याच्या वीज विभागाच्या अधिकृत वेबसाइट जावं लागेल. तसेच काही यूपीआय अ‍ॅप्सवरून देखील तुम्ही माहिती मिळवू शकता. ह्यासाठी तुम्हाला कोणत्याही सायबर कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही. ही माहिती तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरच पाहू शकता. ह्यासाठी तुमच्या फोनमध्ये इंटरनेट कनेक्शन असावं.

ऑफिशियल वेबसाइटवरून ऑनलाइन वीज बिल चेक करण्यासाठी वीज कनेक्शन नंबर तुम्हाला माहिती असाल पाहिजे. जो प्रत्येक बिलावर छापलेला असतो. ह्याच्या मदतीनं वीज बिलाची माहिती मिळवू शकता.

तसेच जर तुम्हाला वीज बिलचा भरणा ऑनलाइन करायचा असेल तर तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग किंवा यूपीआयचा देखील वापर करू शकता.

महाराष्ट्रातील वीज बिल चेक करण्यासाठी इथे क्लिक करा.

PhonePe वरून चेक करा वीज बिल

  • सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये PhonePe अ‍ॅप डाउनलोड करा. त्यानंतर अ‍ॅप ओपन करा.
  • इथे ‘रिचार्ज अँड पे बिल’ सेक्शन मध्ये तुम्हाला ‘इलेक्ट्रिसिटी’ चा ऑप्शन दिसेल.
  • इलेक्ट्रिसिटी ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हायडर निवडा. इथे तुम्हाला अकाऊंट नंबर किंवा ग्राहक क्रमांक द्यावा लागेल. ही माहिती दिल्यावर लेटेस्ट वीज बिल पाहता येईल.

Google Pay, BHIM से चेक करा वीज बिल

इतर अ‍ॅप्स जसे की Google Pay, BHIM, Amazon Pay, Freecharge वरून देखील तुम्ही विजेचं बिल चेक करू शकता आणि पेमेंट देखील करू शकता. इथे देखील तुम्हाला तुमचा प्रोव्हायडर निवडावा लागेल आणि नंतर ग्राहक क्रमांक किंवा अकाऊंट नंबर टाकून थेट बिल पाहता येईल.

The post विजेचं बिल ऑनलाइन कसं चेक करायचं, जाणून घ्या सर्वात सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vij-bill-kas-check-karayach-how-to-check-electricity-bill/feed/ 0
एयरटेल नंबर कॉलर ट्यून कशी सेट करायची; अशी आहे सोपी ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/airtel-caller-tune-kashi-lavayachi/ https://www.91mobiles.com/marathi/airtel-caller-tune-kashi-lavayachi/#respond Sat, 17 Jun 2023 12:33:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21158 Airtel भारतातील प्रमुख टेलीकॉम कंपनी आहे. भारतात सब्सक्राइबर्सची संख्येच्या आधारावर एयरटेल दुसरी मोठी कंपनी आहे. एयरटेल भारतातील दूसरी टेलीकॉम कंपन्या जसे की रिलायन्स जियो, वोडाफोन आयडिया (VI) आणि बीएसएनएल सर्व्हिसेसच्या बाबतीत चांगली टक्कर देत आहे. Airtel आपल्या युजर्सना अनेक व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस सादर करते, ज्यात कॉलर ट्यूनचा देखील समावेश आहे. कॉलर ट्यून सर्व्हिसला Airtel हॅलो […]

The post एयरटेल नंबर कॉलर ट्यून कशी सेट करायची; अशी आहे सोपी ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Airtel भारतातील प्रमुख टेलीकॉम कंपनी आहे. भारतात सब्सक्राइबर्सची संख्येच्या आधारावर एयरटेल दुसरी मोठी कंपनी आहे. एयरटेल भारतातील दूसरी टेलीकॉम कंपन्या जसे की रिलायन्स जियो, वोडाफोन आयडिया (VI) आणि बीएसएनएल सर्व्हिसेसच्या बाबतीत चांगली टक्कर देत आहे. Airtel आपल्या युजर्सना अनेक व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस सादर करते, ज्यात कॉलर ट्यूनचा देखील समावेश आहे. कॉलर ट्यून सर्व्हिसला Airtel हॅलो ट्यून म्हणतात.

एयरटेलवर युजर्सनी कॉलर ट्यून किंवा हॅलो ट्यून सेट करताच युजर्सना कॉल करणाऱ्या कॉलर्सना रिंग टोनच्या ऐवजी सेट केलेलं गाणं ऐकू येतं. Airtel युजर्सना अनलिमिटेड प्लॅनसह कॉलर ट्यून सर्व्हिस फ्री मिळते. इतर सब्सक्राइबर्ससाठी एयरटेल 19 रुपये प्रतिमाह शुल्क आकारते. पुढे आम्ही एयरटेल नंबरवर कॉलर ट्यून कशी सेट करण्याची पद्धत सांगितली आहे.

एयरेटलवर कॉलर ट्यून कशी सेट करायची?

स्टेप 1 : सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये Google Play किंवा App Store वरून एयरटेलचं म्यूजिक स्ट्रीमिंग अ‍ॅप Wynk Music इंस्टॉल करा.

स्टेप 2 : त्यानंतर एयरटेल नंबरवरून अ‍ॅपवर वन-टाइम-पासवर्ड (OTP) लॉगइन करा.

स्टेप 3 : लॉगइन केल्यानंतर होम स्क्रीनवर पोहोचाल. इथे डावीकडे असलेल्या Airtel Hello Tunes ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 4 : आता तुम्हाला गाण्यांची यादी मिळेल, त्यातून तुमच्या आवडीचं गाणं निवडून तुम्ही तुमच्या एयरटेल मोबाइल नंबरवर कॉलर ट्यून सेट करू शकता.

स्टेप 5 : गीत सिलेक्ट केल्यावर तुम्हाला अ‍ॅक्टिव्हेशन फी (शुल्क) द्यावी लागेल. एयरटेल कॉलर ट्यून तीस दिवसांसाठी सेट करता येते. जर तुम्ही एयरेटल नंबरवर अनलिमिटेड प्लॅनचा रिचार्ज केला तर तुम्हाला मोफत एयरटेल कॉलर ट्यून दिली जाते. तसेच इतर युजर्ससाठी ह्याचे शुल्क 19 रुपये प्रतिमाह आहे.

एयरटेल कॉलर ट्यून डिसेबल कशी करायची?

एयरटेल कॉलर ट्यून डिसेबल करण्यासाठी तुम्हाला Wynk Music app ओपन करावा लागेल. आता डावीकडे मेन्यू ऑप्शनवर टॅप करा. इथे ‘Manage Hello Tunes’ वर क्लिक करा. पुढे थ्री डॉट मेन्यूवर क्लिक करून करंट हॅलो ट्यून सिलेक्ट करा. कॉलर ट्यून बंद करण्यासाठी ‘Stop Hellotune’ वर टॅप करून ‘Done’ वर क्लिक करा.

The post एयरटेल नंबर कॉलर ट्यून कशी सेट करायची; अशी आहे सोपी ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/airtel-caller-tune-kashi-lavayachi/feed/ 0
4G नेटवर्कवरून 5G वर कसं शिफ्ट करायचं? जाणून घ्या सहजसोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/4g-varun-5g-var-kasa-shift-karayach/ https://www.91mobiles.com/marathi/4g-varun-5g-var-kasa-shift-karayach/#respond Wed, 14 Jun 2023 11:30:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21612 भारतात एयरटेल आणि रिलायन्स जियोनं 5G सर्व्हिस सुरु केली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल आणि जियोनं युजर्सना 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जर तुमच्या परिसरात देखील ह्या दोन्ही कंपन्यांची 5G सर्व्हिस सुरु झाली असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकता. 4G वरून 5G वर […]

The post 4G नेटवर्कवरून 5G वर कसं शिफ्ट करायचं? जाणून घ्या सहजसोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात एयरटेल आणि रिलायन्स जियोनं 5G सर्व्हिस सुरु केली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल आणि जियोनं युजर्सना 5G सेवा देण्यास सुरुवात केली आहे. जर तुमच्या परिसरात देखील ह्या दोन्ही कंपन्यांची 5G सर्व्हिस सुरु झाली असेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कशाप्रकारे तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकता.

4G वरून 5G वर शिफ्ट कसं करायचं?

एयरटेल आणि जियोच्या 5G सर्व्हिसचा लाभ घेण्यासाठी तुमच्यकडे 5G कम्पॅटिबल स्मार्टफोन असणे आवश्यक आहे. फोनच्या सेटिंग मध्ये मामूली बदल करून तुम्ही 4G वरून 5G वर शिफ्ट करू शकाल. इथे आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या ब्रँडच्या स्मार्टफोनमध्ये 5G इनेबल कसं करायचं हे सांगणार आहोत.

Google Pixel किंवा स्टॉक अँड्रॉइड असलेले स्मार्टफोन

सर्वप्रथम तुमच्या स्मार्टफोनमध्ये Settings मेन्यू ओपन करा. त्यानंतर Network & Internet वर टॅप करून SIM सिलेक्ट करा. जर तुमच्या फोनमध्ये दोन सिम असतील तर 5G नेटवर्क असलेला सिम सिलेक्ट करा आणि Preferred network टाइपवर टॅप करून 5G ची निवड करा. अशाप्रकारे तुमच्या फोनमध्ये 5G स्पीड वापरता येईल.

Samsung

सॅमसंगच्या स्मार्टफोन युजर्सना देखील सर्वप्रथम Settings मेन्यूमध्ये जावे लागेल. त्यानंतर Connections ऑप्शनमध्ये Mobile networks वर टॅप करा. सिम सिलेक्ट करून Network mode मध्ये 5G/LTE/3G/2G (autoconnect) असलेला ऑप्शन सिलेक्ट करा.

OnePlus

वनप्लस स्मार्टफोन युजर्स 4G वरून 5G वर शिफ्ट करण्यासाठी Settings मेन्यू ओपन करा. इथे Wi-Fi & networks वर क्लिक करा. त्यानंतर SIM सिलेक्ट करून Network ऑप्शनमध्ये तुम्हाला 2G/3G/4G/5G (automatic) वर क्लिक करा.

Oppo

ओप्पो युजर्स देखील फोनमध्ये 5G वापरू शकतील. ह्यासाठी Settings ओपन करा. तिथे Connection & Sharing ऑप्शनवर क्लिक करून सिम सिलेक्ट करा. त्यानंतर network type वर टॅप करून 2G/3G/4G/5G (automatic) सिलेक्ट करा.

Realme

रियलमीच्या स्मार्टफोनमध्ये 5G सुरु करण्यासाठी सर्वप्रथम Settings मेन्यूमध्ये जा. तिथे Connection & Sharing वर टॅप करून SIM सिलेक्ट करा. त्यानंतर Preferred network type मध्ये 2G/3G/4G/5G (automatic) सिलेक्ट करा.

Vivo/iQoo

विवो आणि आयकूचे स्मार्टफोन भारतात Funtouch OS वर चालतात. त्यामुळे दोन्ही फोनमध्ये 5G सुरु करण्यासाठी सर्वप्रथम Settings वर टॅप करा. तिथे SIM सिलेक्ट केल्यानंतर Mobile network वर टॅप करून Network Mode मध्ये 5G मोड सिलेक्ट करा.

Xiaomi/Poco

शाओमी आणि पोको स्मार्टफोन युजर्स 5G वर शिफ्ट करण्यासाठी फोनमध्ये सर्वप्रथम Settings मेन्यू उघडा. इथे SIM कार्ड सिलेक्ट करा. त्यानंतर Preferred network type ऑप्शन सिलेक्ट करून 5G नेटवर्कवर टॅप करा.

5G सुरु आहे की 4G कसं जाणून घ्यायचं

उपरोक्त सेटिंग फोनमध्ये इनेबल केल्यानंतर फोनमध्ये 4G सुरु आहे की 5G हे जाणून घेण्यासाठी फोनच्या डिस्प्लेमध्ये नेटवर्क बारवर लक्ष टाका. जिथे तुम्हाला सिम नेटवर्कसह 5G चा लोगो दिसेल. जर 4G दिसत असेल तर एकदा फोन रिस्टार्ट करा.

5G संबंधित प्रश्न

Q. 5G साठी नवीन सिम खरेदी करावं लागेल का?

A. नाही. एयरटेल आणि जियो दोन्ही कंपन्यांनी कन्फर्म केलं आहे की त्यांच्या ग्राहकांना 5G वापरण्यासाठी नवीन सिम कार्ड खरेदी करावं लागणार नाही. जुन्या 4G सिम वरच 5G नेटवर्क अ‍ॅक्सेस करता येईल.

Q. 4G फोनमध्ये 5G वापरता येईल का?

A. नाही. हे शक्य नाही. तुमच्या फोनमध्ये 4G नेटवर्कचा सपोर्ट असलेला मॉडेम आहे, जो 5G नेटवर्क अ‍ॅक्सेस करू शकत नाही. त्यामुळे 4G फोनमध्ये 5G चालू शकत नाही.

Q. 5G साठी जास्त पैसे खर्च करावे लागणार का?

A. एयरटेल आणि जियोनं सध्या 5G चे प्लॅन सादर केले नाहीत. दोन्ही कंपन्या सध्या ग्राहकांना अनलिमिटेड फ्री 5G नेटवर्क देत आहेत. 5G साठी जास्त खर्च करावा लागेल की नाही हे टेलीकॉम कंपन्यांनी प्लॅन रोलआउट नंतर स्पष्ट होईल.

The post 4G नेटवर्कवरून 5G वर कसं शिफ्ट करायचं? जाणून घ्या सहजसोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4g-varun-5g-var-kasa-shift-karayach/feed/ 0