फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं? अशी आहे सोपी पद्धत

Highlights

  • Facebook जगातील सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया साइट आहे.
  • फेसबुक युजर्स फोन, टॅबलेट, लॅपटॉप आणि डेस्कटॉप कुठूनही अ‍ॅक्सेस करू शकतात.
  • फेसबुकची आयडी बनवण्यासाठी ईमेल आणि मोबाइल नंबर आवश्यक आहे.

Facebook जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किंग साइट आहे. फेसबुकवर अकाऊंट बनवणं खूप सोपं आहे. जर तुम्ही आतापर्यंत फेसबुकवर तुमचं अकाऊंट बनवलं नसेल तर आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहे जिच्या मदतीनं तुम्ही फेसबुकवर तुमची आयडी बनवू शकता. सोशल मीडिया साइट फेसबुकच्या मदतीनं युजर्स फोटोज पोस्ट, आर्टिकल शेयर करणे आणि वेगवेगळ्या ग्रुप शेयर करण्यासोबतच मित्रांशी कनेक्ट करू शकता. फेसबुकवर आयडी कंप्यूटर आणि मोबाइल अ‍ॅप दोन्हीच्या मदतीनं बनवता येईल. इथे आम्ही तुम्हाला कंप्यूटर आणि मोबाइलवरून फेसबुक आयडी बनवण्याची माहिती देत आहोत.

फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं

फेसबुक कंप्यूटर आणि मोबाइल फोनवरून अ‍ॅक्सेस केलं जाऊ शकतं. त्यामुळे आयडी देखील कंप्यूटर किंवा मोबाइलवरून बनवता येते. इथे आम्ही तुम्हाला दोन्हीवरून फेसबुक आयडी बनवण्याची पद्धत सांगितली आहे.

  • कंप्यूटरवरून फेसबुक अकाऊंट
  • मोबाइलवरून फेसबुक अकाऊंट

कंप्यूटरवरून फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं?

स्टेप 1 : सर्वप्रथम facebook.com ओपन करा. क्रिएट न्यू अकाऊंटवर क्लिक करा.

स्टेप 2 : पुढील पेजवर नाव, आडनाव तसेच ईमेल आयडी किंवा फोन नंबर टाइप करा.

स्टेप 3 : त्यानंतर तुमचा फेसबुक अकाऊंटसाठी पासवर्ड टाइप करा.

स्टेप 4 : त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाइप करा आणि लिंकची माहिती द्या.

स्टेप 5 : साइन अप वर क्लिक करा आणि अकाऊंट क्रिएट फिनिश केल्यानंतर तुमचा इमेल आयडी आणि फोन नंबर कंफर्म करा.

मोबाइलवरून फेसबुक अकाऊंट कसं बनवायचं?

स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये फेसबुक अ‍ॅप डाउनलोड करा.

स्टेप 2 : अ‍ॅप ओपन करून साइन-अपवर क्लिक करा.

स्टेप 3 : त्यानंतर Get Started वर क्लिक करा.

स्टेप 4 : ऑन स्क्रीन सूचना पूर्ण करा आणि विचारलेली माहिती जसे की नाव, जन्मतारीख आणि लिंग इत्यादी माहिती द्या.

स्टेप 5 : आता पुढील पेजवर तुमचा फोन नंबर किंवा ईमेल आयडी टाका.

स्टेप 6 : त्यानंतर फेसबुक अकाऊंटसाठी पासवर्ड बनवा.

स्टेप 7 : साइन-अप वर टॅप करा.

फेसबुक अकाऊंट क्रिएट प्रोसेस फिनिश करण्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी किंवा फोन नंबर कंफर्म करावा लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here