एयरटेल नंबर कॉलर ट्यून कशी सेट करायची; अशी आहे सोपी ट्रिक

Airtel भारतातील प्रमुख टेलीकॉम कंपनी आहे. भारतात सब्सक्राइबर्सची संख्येच्या आधारावर एयरटेल दुसरी मोठी कंपनी आहे. एयरटेल भारतातील दूसरी टेलीकॉम कंपन्या जसे की रिलायन्स जियो, वोडाफोन आयडिया (VI) आणि बीएसएनएल सर्व्हिसेसच्या बाबतीत चांगली टक्कर देत आहे. Airtel आपल्या युजर्सना अनेक व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस सादर करते, ज्यात कॉलर ट्यूनचा देखील समावेश आहे. कॉलर ट्यून सर्व्हिसला Airtel हॅलो ट्यून म्हणतात.

एयरटेलवर युजर्सनी कॉलर ट्यून किंवा हॅलो ट्यून सेट करताच युजर्सना कॉल करणाऱ्या कॉलर्सना रिंग टोनच्या ऐवजी सेट केलेलं गाणं ऐकू येतं. Airtel युजर्सना अनलिमिटेड प्लॅनसह कॉलर ट्यून सर्व्हिस फ्री मिळते. इतर सब्सक्राइबर्ससाठी एयरटेल 19 रुपये प्रतिमाह शुल्क आकारते. पुढे आम्ही एयरटेल नंबरवर कॉलर ट्यून कशी सेट करण्याची पद्धत सांगितली आहे.

एयरेटलवर कॉलर ट्यून कशी सेट करायची?

स्टेप 1 : सर्वप्रथम स्मार्टफोनमध्ये Google Play किंवा App Store वरून एयरटेलचं म्यूजिक स्ट्रीमिंग अ‍ॅप Wynk Music इंस्टॉल करा.

स्टेप 2 : त्यानंतर एयरटेल नंबरवरून अ‍ॅपवर वन-टाइम-पासवर्ड (OTP) लॉगइन करा.

स्टेप 3 : लॉगइन केल्यानंतर होम स्क्रीनवर पोहोचाल. इथे डावीकडे असलेल्या Airtel Hello Tunes ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 4 : आता तुम्हाला गाण्यांची यादी मिळेल, त्यातून तुमच्या आवडीचं गाणं निवडून तुम्ही तुमच्या एयरटेल मोबाइल नंबरवर कॉलर ट्यून सेट करू शकता.

स्टेप 5 : गीत सिलेक्ट केल्यावर तुम्हाला अ‍ॅक्टिव्हेशन फी (शुल्क) द्यावी लागेल. एयरटेल कॉलर ट्यून तीस दिवसांसाठी सेट करता येते. जर तुम्ही एयरेटल नंबरवर अनलिमिटेड प्लॅनचा रिचार्ज केला तर तुम्हाला मोफत एयरटेल कॉलर ट्यून दिली जाते. तसेच इतर युजर्ससाठी ह्याचे शुल्क 19 रुपये प्रतिमाह आहे.

एयरटेल कॉलर ट्यून डिसेबल कशी करायची?

एयरटेल कॉलर ट्यून डिसेबल करण्यासाठी तुम्हाला Wynk Music app ओपन करावा लागेल. आता डावीकडे मेन्यू ऑप्शनवर टॅप करा. इथे ‘Manage Hello Tunes’ वर क्लिक करा. पुढे थ्री डॉट मेन्यूवर क्लिक करून करंट हॅलो ट्यून सिलेक्ट करा. कॉलर ट्यून बंद करण्यासाठी ‘Stop Hellotune’ वर टॅप करून ‘Done’ वर क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here