युट्युबवरून पैसे कसे कमवायचे, अशी आहे बेस्ट पद्धत

सध्या छोट्या व्हिडीओचा बोलबाला आहे परंतु युट्युब वरील मोठे व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांची संख्या आजही मोठी आहे. ह्या व्हिडीओजच्या मदतीनं क्रियेटर्स कोट्यवधींची कामे करत आहेत. हो! युट्युब व्हिडीओ बनवून कोट्यवधींची कामे करता येऊ शकते. त्यामुळे तुम्हालाही आता प्रश्न पडला असेल की युट्युबवरून पैसे कसे कमवायचे? तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि व्हिडीओ शूटिंगमध्ये थोडा रस असेल तर हा तुमच्यासाठी चांगला प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्ही तुमची ओळख निर्माण करू शकता. ह्या या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला युट्युबवरून पैसे कमावण्याची ट्रिक आणि अटी सविस्तर सांगणार आहोत.

युट्युबवरून पैसे कसे कमवायचे?

Youtube वरून पैसे कमावण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युट्युबवर एक चॅनेल बनवावं लागेल. त्यानंतर तुम्ही युट्युबवर तुमचे स्वतःचे व्हिडीओ आणि शॉर्ट्स व्हिडीओ टाकून पैसे कमवू शकता. इथे आम्ही तुम्हाला युट्युब चॅनेल बनवणे आणि युट्युबवरून पैसे कमवण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतील ह्याची माहिती देत आहोत.

युट्युबवरून पैसे कमावण्यासाठी आवश्यक अटी

युट्युबवरून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला युट्युबच्या काही अटींचे पालन करावे लागेल. तुम्हाला युट्युब मॉनीटाइज पॉलिसी अ‍ॅक्सेप्ट करावी लागेल. तसेच तुमच्या चॅनेलवर काही क्रायटेरिया पूर्ण करावे लागतील, ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे.

  1. तुमच्या युट्युब चॅनेलचे 1000 सब्सक्राइबर्स पूर्ण व्हायला हवेत.
  2. तुमच्या युट्युब चॅनेलवर 4000 तास व्यूज असाव्या, ज्या एका वर्षात पूर्ण झालेल्या असाव्या.
  3. किंवा युट्युब शॉर्ट्सवर 3 महिन्यात 100 लाख व्यूज झालेल्या असाव्या.
  4. तुमच्या चॅनेलवर कोणताही कॉपी राइट किंवा कॉम्यूनिटी स्टॅंडर्ड स्ट्राईक नसावी.
  5. तुमच्या चॅनेलनं युट्युबच्या अटींचं उल्लंघन केलं नसावं.

युट्युब चॅनेल कसं बनवायचं

युट्युब चॅनेल बनवण्यासाठी तुमच्याकडे Gmail ची एक मेल आयडी असावी. इथे तुम्हाला स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही सहज तुमचं युट्युब चॅनेल बनवू शकता.

  1. सर्वप्रथम तुमच्या लॅपटॉपमध्ये युट्युब ओपन करा आणि तुमच्या Gmail आयडीनं लॉगइन करा.
  2. डावीकडे प्रोफाईल फोटोवर क्लिक करून मेन्यू ओपन करा आणि Your Channel च्या ऑप्शनवर क्लिक करा.
  3. आता एक नवीन पेज येईल, तिथे तुमचं चॅनेल कस्टमाइज करण्यासाठी Custmize Channel वर क्लिक करा.
  4. तुमच्या कंप्यूटरवर नवीन पेज ओपन होईल जे तुम्हाला युट्युब स्टुडियोमध्ये घेऊन जाईल. इथून तुम्ही तुमच्या चॅनेलची प्रोफाईल आणि कव्हर इमेज बदलू शकाल. तसेच तुमच्या चॅनेलचं नाव देखील इथून बदलता येईल. ह्यासाठी कंटीन्यूवर क्लिक करा.
  5. फोटो बदलण्यासाठी ब्रँडिंग ऑप्शनमध्ये क्लिक करा. इथे तुम्हाला प्रोफाईल आणि कव्हर इमेज बदलण्याचा ऑप्शन मिळतील. तसेच तुम्हाला व्हिडीओ वॉटरमार्क देखील अपलोड करण्याच्या ऑप्शन दिसेल.
  6. वर तुम्हाला Basic Info ऑप्शन दिसेल, ज्याच्या मदतीनं तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव आणि हँडल चेंज करू शकता. तसेच तुम्हाला तुमच्या चॅनेलचं डिस्क्रिप्शन देखील लिहावं लागेल, त्यामुळे प्रेक्षकांना तुमच्या चॅनेलची माहिती मिळेल. तसे तुम्ही तुमचं चॅनेल इतर सोशल मीडिया साइट जसे की फेसबुक, ट्विटरशी कनेक्ट करू शकाल.

सर्व सेटिंग केल्यांनतर तुमचं युट्युब चॅनेल तयार होईल. आता तुम्ही व्हिडीओ बनवून युट्युबवर अपलोड करू शकता. युट्युबवर व्हिडीओ अपलोड केल्यावर जर उपरोक्त अटी पूर्ण झाल्या की तुमची कमाई सुरु होईल.

युट्युब व्हिडीओ बनवण्यासाठी लागणाऱ्या गोष्टी?

कॅमेरा : व्हिडीओ बनवण्यासाठी तुमच्याकडे कॅमेरा असावा. तुम्ही मोबाइल फोनच्या कॅमेऱ्याचा देखील वापर करू शकता.

माइक : व्हिडीओमध्ये चांगला आवाज असणं देखील आवश्यक आहे. त्यामुळे एक चांगला माइक घ्यावा.

लाइट : लाइटिंगचा व्हिडीओवर खूप परिणाम होतो. जर तुम्हाला आकर्षक व्हिडीओ बनवायचा असेल तर तुम्हाला चांगल्या लाइट्स विकत घ्याव्या लागतील.

कंप्यूटर : व्हिडीओ एडिट करण्यासाठी तुम्हाला कंप्यूटर किंवा लॅपटॉप लागेल.

व्हिडीओ एडिट सॉफ्टवेयर : व्हिडीओ एडिट करण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ एडिटिंग सॉफ्टवेयर घ्यावं लागेल.

इंटरनेट कनेक्शन : व्हिडीओ अपलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेट कनेक्शन लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here