Vodafone Idea - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 05 Jul 2023 07:03:52 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 अनलिमिटेड डेटासह Vi नं सादर केले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 24 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/vi-launched-rs-24-and-rs-49-plan-with-internet-data-benifits/ https://www.91mobiles.com/marathi/vi-launched-rs-24-and-rs-49-plan-with-internet-data-benifits/#respond Wed, 05 Jul 2023 07:03:52 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21899 विआय ग्राहकांना आकर्षित कर्णाचे पुरेपूर प्रयत्न करत आहे. कंपनीनं ह्या प्रयत्नात दोन स्वस्त प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. Vi ने एडिशनल बेनिफिट्ससह 24 रुपये आणि 49 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. ह्या दोन्ही रिचार्जमध्ये अनलिमिटेड नाइट डेटा मिळेल. पुढे आम्ही तुम्हाला ह्या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची संपूर्ण माहिती देत आहोत. […]

The post अनलिमिटेड डेटासह Vi नं सादर केले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 24 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi नं भारतात 24 आणि 49 रुपयांचे दोन नवीन प्रीपेड प्लॅन सादर केले आहेत.
  • दोन्ही प्लॅन युजर्सना डेटा ऑफर केले जात आहेत.
  • 24 रुपयांच्या प्लॅनमध्ये एका तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळेल.

विआय ग्राहकांना आकर्षित कर्णाचे पुरेपूर प्रयत्न करत आहे. कंपनीनं ह्या प्रयत्नात दोन स्वस्त प्लॅन्स सादर केले आहेत. हे प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी आणले आहेत. Vi ने एडिशनल बेनिफिट्ससह 24 रुपये आणि 49 रुपयांचा नवीन प्लॅन आणला आहे. ह्या दोन्ही रिचार्जमध्ये अनलिमिटेड नाइट डेटा मिळेल. पुढे आम्ही तुम्हाला ह्या दोन्ही प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्सची संपूर्ण माहिती देत आहोत.

Vi चा 24 रुपयांचा प्लॅन

Vi च्या 24 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एक तासासाठी अनलिमिटेड डेटा मिळतो. विआयचा हा रिचार्ज प्लॅन सर्व्हिस व्हॅलिडिटी देत नाही. तसेच प्लॅनसह युजर्सना Vi Movies and Tv अ‍ॅप्सचा सपोर्ट देखील नाही. त्यामुळे ह्या प्लॅनचा लाभ घेण्यासाठी तुमचा नंबर अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे.

Vi चा 49 रुपयांचा प्लॅन

वोडाफोन आयडियाच्या 49 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये युजर्सना 6GB डेटा ऑफर केला जात आहे. तसेच, यात 24 तासांची व्हॅलिडिटी दिली जात आहे. ह्यातही प्लॅनच्या लाभ घेण्यासाठी विआय युजर्सचा नंबर अ‍ॅक्टिव्ह असणं आवश्यक आहे. म्हणजे युजर्सना सर्व्हिस व्हॅलिडिटी मिळत नाही.

नोट : विआयनं दोन्ही प्लॅन त्या युजर्ससाठी सादर केले आहेत, ज्यांना तात्कळ डेटाची गरज असते.

839 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल

वोडाफोन आयडियाच्या 839 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 84 ची व्हॅलिडिटी मिळते. तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळतो. त्याचबरोबर 84 दिवस तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता. ह्यात युजर्सना रोज 100 SMS फ्री मिळतील. तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान फ्री स्ट्रीमिंग आणि ब्राउजिंग करू शकाल. वोडाफोन आयडिया युजर्सना 3 महिन्यासाठी Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शन देखील फ्री मिळत आहे.

The post अनलिमिटेड डेटासह Vi नं सादर केले दोन स्वस्त प्लॅन, किंमत 24 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-launched-rs-24-and-rs-49-plan-with-internet-data-benifits/feed/ 0
Vodafone Idea 3 महिन्यासाठी मोफत देत आहे Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शन, प्लॅनमध्ये केला बदल https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-839-recharge-plan-offer-free-3-month-disney-plus-hotstar-subscription/ https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-839-recharge-plan-offer-free-3-month-disney-plus-hotstar-subscription/#respond Tue, 04 Jul 2023 06:43:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21877 जर तुम्ही वोडाफोन आयडियाचे युजर असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कंपनीनं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शानदार ऑफर सादर केली आहे. आता वी आपल्या 839 रुपयांच्या रिचार्जसह मोफत 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar चं सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे. पुढे तुम्हाला ऑफर आणि प्लॅनची माहिती मिळेल. वोडाफोन आयडियाचा 839 रुपयांचा प्लॅन कोणताही नवीन रिचार्ज नाही तर कंपनीनं […]

The post Vodafone Idea 3 महिन्यासाठी मोफत देत आहे Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शन, प्लॅनमध्ये केला बदल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 839 रुपयांच्या प्लॅनमध्ये बदल झाला आहे.
  • प्लॅनमध्ये Vi अ‍ॅपच्या एक्सक्लूसिव्ह बेनेफिट्सचा समावेश करण्यात आला आहे.
  • ह्या रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळतो.

जर तुम्ही वोडाफोन आयडियाचे युजर असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. कंपनीनं आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी शानदार ऑफर सादर केली आहे. आता वी आपल्या 839 रुपयांच्या रिचार्जसह मोफत 3 महिन्यांसाठी Disney Plus Hotstar चं सब्सक्रिप्शन ऑफर करत आहे. पुढे तुम्हाला ऑफर आणि प्लॅनची माहिती मिळेल.

वोडाफोन आयडियाचा 839 रुपयांचा प्लॅन कोणताही नवीन रिचार्ज नाही तर कंपनीनं आपल्या जुन्या अनलिमिटेड रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. त्यानंतर त्याच किंमतीत ग्राहकांना जास्त बेनेफिट्स दिले जात आहेत. ह्या प्लॅनमध्ये कंपनीनं आता 3 महिन्यासाठी Disney Plus Hotstar चं फ्री सब्सक्रिप्शन देखील जोडलं आहे.

असं मिळेल फ्री Disney Plus Hotstar

ह्या प्लॅनचा फायदा तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही VI ऑफिशियल अ‍ॅपवरून 839 रुपयांचा रिचार्ज कराल. हा प्लॅन Vi अ‍ॅप मध्ये मिळणाऱ्या एक्सक्लूसिव्ह बेनेफिट्समध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या बेनिफिट्स बाबत सर्वकाही.

  • वोडाफोन आयडियाच्या 839 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये युजर्सना 84 ची व्हॅलिडिटी मिळते.
  • तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा मिळतो.
  • त्याचबरोबर 84 दिवस तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करू शकता.
  • ह्यात युजर्सना रोज 100 SMS फ्री मिळतील.
  • तसेच रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्ही रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान फ्री स्ट्रीमिंग आणि ब्राउजिंग करू शकाल.
  • वोडाफोन आयडिया युजर्सना 3 महिन्यासाठी Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शन देखील फ्री मिळत आहे.

The post Vodafone Idea 3 महिन्यासाठी मोफत देत आहे Disney Plus Hotstar सब्सक्रिप्शन, प्लॅनमध्ये केला बदल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-839-recharge-plan-offer-free-3-month-disney-plus-hotstar-subscription/feed/ 0
90 दिवस वैधता आणि डेली 2GB डेटा असलेला Vi रिचार्ज लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फायदे https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-new-rs-902-recharge-plan-with-90-days-validity-2gb-daily-data-and-more/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-new-rs-902-recharge-plan-with-90-days-validity-2gb-daily-data-and-more/#respond Fri, 09 Jun 2023 05:36:11 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21497 Vodafone Idea (Vi) गेल्या काही दिवसांपासून अनेक नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच करत आहे. आताही कंपनीनं आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये एक प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन खासकरून त्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे, जे दीर्घ वैधतेसह इंटरनेट डेटा वापरू इच्छित आहेत. हा प्लॅन 902 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण […]

The post 90 दिवस वैधता आणि डेली 2GB डेटा असलेला Vi रिचार्ज लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi च्या ह्या नवीन प्लॅनची किंमत 902 रुपये आहे.
  • प्लॅन कंपनीच्या साइटवर “Unlimited” टॅबमध्ये लिस्ट केला आहे.
  • प्लॅनमधील फायदे युजर्सना 3 महिन्यांसाठी मिळतील.

Vodafone Idea (Vi) गेल्या काही दिवसांपासून अनेक नवीन रिचार्ज प्लॅन्स लाँच करत आहे. आताही कंपनीनं आपल्या प्रीपेड रिचार्ज पोर्टफोलियोमध्ये एक प्लॅन सादर केला आहे. हा प्लॅन खासकरून त्या ग्राहकांसाठी सादर करण्यात आला आहे, जे दीर्घ वैधतेसह इंटरनेट डेटा वापरू इच्छित आहेत. हा प्लॅन 902 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती.

Vi 902 रुपये प्लॅनची संपूर्ण माहिती

  • नवीन Vi अनलिमिटेड रिचार्ज प्लॅनची किंमत 902 रुपये आहे आणि हा 90 दिवसांच्या वैधतेसह येतो.
  • हा कंपनीच्या साइटवर “Unlimited” टॅबमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.
  • ह्यात 90 दिवस अनलिमिटेड फ्री कॉलिंगचा लाभ मिळतो.
  • प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा म्हणजे एकूण 180GB डेटा यूजसाठी मिळेल. डेली डेटा कोटा संपल्यावर इंटरनेट स्पीड कमी होऊन 64Kbps होतो.
  • रिचार्जमध्ये युजर्सना रोज 100 एसएमएस देखील मिळतात, ज्यांचा वापर तुम्ही तेव्हा करू शकता जेव्हा तुमचं आवडीचं इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्यवस्थित चालत नाही किंवा इंटरनेट कनेक्शन चालत नाही.

ओटीटी सब्सक्रिप्शन फ्री

फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस व्यतिरिक्त युजर्सना SunNXT चं फ्री सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. ह्या सब्सक्रिप्शनची व्हॅलिडिटी 90 दिवस आहे. SunNXT एक Sun TV Network ची स्ट्रीमिंग सर्व्हिस आहे. Sun TV Network च्या सब्सक्रिप्शनची किंमत 480 रुपयांपासून सुरु होते. ही किंमत बेसिक सब्सक्रिप्शन प्लॅनची आहे तर प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅन 799 रुपयांमध्ये मिळतो.

Weekend Data Rollover आणि Night data बेनिफिट्स

ह्या रिचार्ज प्लॅनमध्ये Weekend Data Rollover आणि Night data बेनेफिट्स देखील मिळतात. वीकेंड डेटा रोलओव्हरमध्ये सोमवार ते शुक्रवार दरम्यान डेली डेटामधून उरलेल्या इंटरनेटचा वापर ग्राहक शनिवार व रविवारी करू शकतात.

नाइट डेटा बेनेफिट पाहता, हा प्लॅन रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान अनलिमिटिड इंटरनेट अ‍ॅक्सेस देतो. ह्या कालावधीत वापरलेला डेटा तुमच्या डेली डेटा कोटा मधून कट होत नाही.

The post 90 दिवस वैधता आणि डेली 2GB डेटा असलेला Vi रिचार्ज लाँच, जाणून घ्या किंमत आणि सर्व फायदे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-new-rs-902-recharge-plan-with-90-days-validity-2gb-daily-data-and-more/feed/ 0
Vodafone Idea नं आणले चार नवीन प्लॅन, डेटा आणि कॉलिंगसह मिळेल 1 महिन्याची वैधता https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-rs-198-rs-204-rs-224-and-rs-232-prepaid-recharge-plans-check-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-rs-198-rs-204-rs-224-and-rs-232-prepaid-recharge-plans-check-benefits/#respond Fri, 02 Jun 2023 09:02:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21347 टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये वोडाफोन आयडिया 5G लाँच बाबत जियो आणि एयरटेलच्या मागे आहे. परंतु दुसरीकडे कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन प्लॅन्स सादर करत आहे. अलीकडेच तीन नवीन रिचार्ज सादर केल्यानंतर विआयनं 4 नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनी ह्या चारही रिचार्ज प्लॅन्समध्ये ग्राहकांना जबरदस्त ऑफर्स देत आहे. फक्त मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध रिचार्ज कंपनीच्या चार […]

The post Vodafone Idea नं आणले चार नवीन प्लॅन, डेटा आणि कॉलिंगसह मिळेल 1 महिन्याची वैधता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi नं आणले 198 रुपये, 204 रुपये, 224 रुपये आणि 232 रुपयांचे नवीन रिचार्ज.
  • रिचार्जमध्ये 1 महीने पर्यंतच्या वैधतेसह कॉलिंग आणि डेटा चा लाभ मिळेल.
  • चारही रिचार्ज सध्या फक्त मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध आहेत.

टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये वोडाफोन आयडिया 5G लाँच बाबत जियो आणि एयरटेलच्या मागे आहे. परंतु दुसरीकडे कंपनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सतत नवनवीन प्लॅन्स सादर करत आहे. अलीकडेच तीन नवीन रिचार्ज सादर केल्यानंतर विआयनं 4 नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनी ह्या चारही रिचार्ज प्लॅन्समध्ये ग्राहकांना जबरदस्त ऑफर्स देत आहे.

फक्त मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध रिचार्ज

कंपनीच्या चार नवीन रिचार्ज प्लॅन्समध्ये Rs 198 plan, Rs 204 plan, Rs 224 आणि Rs 232 plans चा समावेश आहे. विशेष म्हणजे चारही प्लॅन सध्या फक्त मुंबई सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्समध्ये मिळणार्‍या ऑफर्स बाबत सर्वकाही.

  1. Vi चा 198 रुपयांचा रिचार्ज: 198 रुपयांच्या रिचार्जमध्ये 30 दिवसांच्या वैधतेसह 500MB डेटा मिळतो. इतकेच नव्हे तर ह्यात 198 रुपयांचा टॉकटाइम देखील दिला जात आहे.
  2. Vi चा 204 रुपयांच्या रिचार्ज: 204 रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना 204 रुपयांचा लिमिटेड टॉकटाइम आणि एक महिन्याच्या वैधतेसह 500MB डेटा मिळत आहे. तर प्लॅनसह कॉलसाठी 2.5 पैसे/सेकंद दराने शुल्क आकारले जाईल.
  3. Vi चा 224 रुपयांचा रिचार्ज: या रिचार्जमध्ये युजर्सना 30 दिवसांची वैधता मिळते. तसेच ह्यात अनलिमिटेड फ्री कॉलिंगसह एकूण 4GB डेटा दिला जात आहे. परंतु ह्या प्लॅनमध्ये कोणतेही एसएमएस बेनिफिट मिळत नाहीत.
  4. Vi चा 232 रुपयांचा रिचार्ज: 224 रुपयांच्या प्लॅन प्रमाणेच ह्यात देखील फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि 4जीबी डेटा मिळत आहे. परंतु, प्लॅनची वैधता एक महिना आहे.

विआय 5G ची तयारी सुरू

काही महिन्यांपूर्वी विआय कंपनीच्या कस्टमर सपोर्ट टीमनं ट्विटरवर सांगितलं होतं की, “Vi अनेक शहरांमध्ये 5G सादर करण्यासाठी आपल्या पार्टनर्ससह काम करत आहे” आणि कंपनी लवकरच आपल्या प्लॅनिंगचा खुलासा करेल.

The post Vodafone Idea नं आणले चार नवीन प्लॅन, डेटा आणि कॉलिंगसह मिळेल 1 महिन्याची वैधता first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-launch-rs-198-rs-204-rs-224-and-rs-232-prepaid-recharge-plans-check-benefits/feed/ 0
Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-17-rs-57-and-rs-1999-recharge-plans-launched-know-all-benefits/ https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-17-rs-57-and-rs-1999-recharge-plans-launched-know-all-benefits/#respond Wed, 31 May 2023 11:52:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21286 Vodafone idea (Vi) नं आपल्या ग्राहकांना खुश करत तीन नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीनं 17 रुपये, 57 रुपये आणि 1,999 रुपयांचे प्लॅन्स सादर केले आहेत जे अनलिमिटेड नाइट डेटा, कॉलिंग आणि मोठ्या वैधतेसह आले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं हे आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला केले आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती. Vi चे […]

The post Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi Rs 17 आणि Rs 57 रिचार्ज प्लॅनमध्ये अनलिमिटेड डेटा मिळतो.
  • 1,999 रुपयांच्या प्लॅनमध्ये 250 दिवसांची वैधता मिळते.
  • प्लॅन्स कंपनीच्या वेबसाइटवर लिस्टस करण्यात आले आहेत.

Vodafone idea (Vi) नं आपल्या ग्राहकांना खुश करत तीन नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीनं 17 रुपये, 57 रुपये आणि 1,999 रुपयांचे प्लॅन्स सादर केले आहेत जे अनलिमिटेड नाइट डेटा, कॉलिंग आणि मोठ्या वैधतेसह आले आहेत. त्याचबरोबर कंपनीनं हे आपल्या वेबसाइटवर लिस्ट केला केले आहेत. चला जाणून घेऊया ह्या प्लॅन्सची संपूर्ण माहिती.

Vi चे 17 रुपये आणि 57 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन्स

Vi Rs 17 प्लॅन :

  • ह्या नवीन 17 रुपयांच्या प्लॅनमध्ये एकूण 24 तासांची वैधता मिळते, ज्यात अनलिमिटेड नाइट डेटा (12 AM आणि 6 AM दरम्यान) मिळतो.
  • परंतु ह्या प्लॅनमध्ये कोणतेही आउटगोइंग एसएमएस आणि सर्व्हिस वैधता मिळत नाहीत.

Vi Rs 57 प्लॅन :

  • Rs 57 प्रीपेड प्लॅनची वैधता 7 दिवस आहे.
  • ह्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड नाइट डेटा मिळतो. परंतु ह्यात सर्व्हिस वैधता आणि आउटगोइंग एसएमएसचा फायदा मिळत नाही.

Vi का 1,999 रुपयांचा प्लॅन

  • ह्या नवीन रिचार्ज प्लॅनमध्ये 250 दिवसांची वैधता मिळते.
  • रिचार्जमध्ये अनलिमिटेड कॉल्स, 100 एसएमएस प्रति दिन आणि 1.5जीबी डेली डेटा मिळतो.
  • हाय-स्पीड डेटा संपल्यावर ग्राहकांना 64Kbps स्पीडवर इंटरनेट वापरता येते.
  • तसेच 100 एसएमएस संपल्यावर युजर्सना लोकल मेसेजसाठी 1 रुपये आणि एसटीडी मेसेजसाठी 1.50 पैसे चार्ज केले जातील.

तसेच कंपनीनं अलीकडेच लाँच केलेल्या 549 रुपयांचा प्लॅन आपल्या साइटवरून हटवला आहे. ह्या प्लॅनमध्ये 180 दिवसांची वैधता आणि 1GB डेटाचा लाभ मिळतो. इतकेच नव्हे तर रिचार्जमध्ये 549 रुपयांचा टॉकटाइम देखील मिळत होता. ह्या टॉकटाइमच्या मदतीनं ग्राहक 2.5 पैसे प्रति सेकंदच्या हिशोबाने वर कॉल करू शकतात.

The post Vi नं लाँच केले 3 नवीन रिचार्ज, मिळेल 1.5GB पर्यंत डेली डेटा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-17-rs-57-and-rs-1999-recharge-plans-launched-know-all-benefits/feed/ 0
वोडाफोन आयडियानं आणला 549 रुपयांचा प्लॅन; वैधता मिळेल भरपूर https://www.91mobiles.com/marathi/vi-1gb-per-day-plan-180-days-validity-plan-launched-rs-549/ https://www.91mobiles.com/marathi/vi-1gb-per-day-plan-180-days-validity-plan-launched-rs-549/#respond Mon, 24 Apr 2023 06:51:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20414 Vodafone-Idea ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. कंपनीनं आपला एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा रिचार्ज कॉम्बो/वैधता कॅटेगरीमध्ये आणण्यात आला आहे. हा त्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे ज्यांना वैधतेसह डेटाची आवश्यकता आहे. प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळत नाही. चला जाणून घेऊया या या प्लॅनमध्ये तुम्हाला नेमका कोणता फायदा मिळणार आहे. वोडाफोन आयडिया 549 […]

The post वोडाफोन आयडियानं आणला 549 रुपयांचा प्लॅन; वैधता मिळेल भरपूर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi Plan मध्ये 180 दिवसांची वैधता मिळत आहे.
  • या प्लॅनमध्ये एसएमएसचा फायदा मिळत नाही.
  • कंपनीनं रिचार्ज वेबसाइटवर लिस्ट केला आहे.

Vodafone-Idea ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे. कंपनीनं आपला एक नवीन रिचार्ज प्लॅन सादर केला आहे. हा रिचार्ज कॉम्बो/वैधता कॅटेगरीमध्ये आणण्यात आला आहे. हा त्या ग्राहकांसाठी बेस्ट आहे ज्यांना वैधतेसह डेटाची आवश्यकता आहे. प्लॅनमध्ये फ्री अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ मिळत नाही. चला जाणून घेऊया या या प्लॅनमध्ये तुम्हाला नेमका कोणता फायदा मिळणार आहे.

वोडाफोन आयडिया 549 रुपयांचा प्लॅन

  • 180 Days Validity
  • 1GB Data

वोडाफोन आयडियाच्या 549 रुपयांच्या रिचार्जमध्ये ग्राहकांना 180 दिवसांची वैधता मिळते. यात एकूण 1जीबी डेटा मिळतो. परंतु, यात कॉलिंग आणि एसएमएसचा लाभ देण्यात आला नाही. तसेच ओटीटी, हेलोट्यून, डेटा रोलओव्हर, ऑल नाइट बिंज असे फायदे देखील मिळत नाहीत. रिचार्जमध्ये कॉलिंगसाठी 2.5 प्रति सेकंद इतके शुल्क आकारले जाते. त्यामुळे हा प्लॅन उन ग्राहकांसाठी चांगला आहे ज्यांना फक्त वैधतेसह थोडा डेटा हवा आहे. हे देखील वाचा: लाँचपूर्वीच गुगल प्ले कंसोलवर OnePlus Nord N30 5G झाला लिस्ट, महत्वाच्या माहितीचा खुलासा

कंपनीनं अलीकडेच 368 रुपये आणि 369 रुपयांचे दोन रिचार्ज सादर केले होते. या दोन्ही प्लॅनसह 30 दिवसांच्या वैधतेव्यतिरिक्त फ्री कॉलिंग, 2जीबी डेली डेटा, एसएमएस सह ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन देखील ऑफर केलं जात आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक करून दोन्ही प्लॅनची फुल डिटेल वाचू शकता.

वोडाफोन आयडिया आहे अडचणीत

वोडाफोन-आयडिया 5जी सेवा लाइव्ह न केल्यामुळे आपले ग्राहक गमावू शकते. कारण अन्य दूरसंचार कंपन्यांनी खूप आधीपासून अनेक राज्यांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. वोडाफोन आयडियानं 31 डिसेंबर, 2022 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 7,990 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे. हे देखील वाचा: Vivo Y78+ 5G फोन 50MP कॅमेऱ्यासह लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

कंपनीनं सप्टेंबरच्या तिमाहीत 7,595.5 कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. तसेच डिसेंबर तिमाहीत एकूण महसूल 10,620.6 कोटी रुपये होता, जो सप्टेंबरच्या तिमाहीत 10,614.6 कोटी रुपयांच्या तुलनेत 0.1 टक्के जास्त आहे.

The post वोडाफोन आयडियानं आणला 549 रुपयांचा प्लॅन; वैधता मिळेल भरपूर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-1gb-per-day-plan-180-days-validity-plan-launched-rs-549/feed/ 0
कमी किंमतीत आले Vi चे दोन प्लॅन्स; रोज 2GB डेटासह मिळेल फ्री ओटीटीची मजा https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-368-rs-369-prepaid-plans-launched-with-2gb-daily-data-30-days-validity/ https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-368-rs-369-prepaid-plans-launched-with-2gb-daily-data-30-days-validity/#respond Thu, 20 Apr 2023 06:07:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20380 Vodafone Idea आपला युजर बेस टिकवून ठेवण्यासाठी वारंवार नवीन प्लॅन्स सादर करत आहे. आता कंपनीनं दोन स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅनची किंमत 368 रुपये आणि 369 रुपये आहे, ज्यात फ्री कॉलिंग, डेटा, एसएमएस सोबतच काही ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. चला या दोन्ही प्रीपेड प्लॅनची माहिती पाहूया. वोडाफोन आयडियाचा […]

The post कमी किंमतीत आले Vi चे दोन प्लॅन्स; रोज 2GB डेटासह मिळेल फ्री ओटीटीची मजा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi Rs 368 आणि Rs 369 प्रीपेड कस्टमर्ससाठी सादर करण्यात आले आहेत.
  • या दोन्ही प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचा लाभ घेता येईल.
  • रिचार्ज प्लॅन युजर्ससाठी उपलब्ध झाले आहेत.

Vodafone Idea आपला युजर बेस टिकवून ठेवण्यासाठी वारंवार नवीन प्लॅन्स सादर करत आहे. आता कंपनीनं दोन स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. या प्लॅनची किंमत 368 रुपये आणि 369 रुपये आहे, ज्यात फ्री कॉलिंग, डेटा, एसएमएस सोबतच काही ओटीटी प्लॅटफॉर्मचं सब्सक्रिप्शन देखील दिलं जात आहे. चला या दोन्ही प्रीपेड प्लॅनची माहिती पाहूया.

वोडाफोन आयडियाचा 368 रुपयांचा प्लॅन

Vi Rs 368 प्रीपेड प्लॅनसह 30 दिवसांची वैधता दिली जात आहे. या प्लॅनमध्ये डेली 2GB म्हणजे एकूण 60जीबी डेटा (2GB डेटा बॅकअपसह) युजर्सना मिळेल. ग्राहकांना अनलिमिटेड कॉल आणि रोज 100 एसएमएस पण मिळतील. युजर्सना SunNxt अ‍ॅप, ऑल नाइट बिंज, वीकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा, Vi मुव्हीज आणि टीव्ही सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. ग्राहक बिंज ऑल नाइट ऑफर अंतर्गत रात्री 12 ते सकाळी 6 दरम्यान रेग्युलर स्पीडवर अनलिमिटेड डेटा वापरू शकतील. हे लाभ मिळवण्यासाठी ग्राहकांना 121249 नंबर डायल करावा लागेल.

वोडाफोन आयडियाचा 369 रुपयांचा प्रीपेड प्लॅन

वोडाफोन आयडिया रिचार्ज प्लॅनमध्ये 30 दिवसांची वैधता मिळते. प्लॅनमध्ये रोज 2GB डेटा म्हणजे एकूण 60जीबी डेटा (2GB बॅकअप डेटासह) दिला जात आहे. यात अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस मिळतील. प्लॅनमध्ये ऑल नाइट बिंज, वीकेंड डेटा रोलओव्हर, SonyLiv, Vi मुव्हीज आणि टीव्हीचा लाभ घेता येईल.

विशेष म्हणजे SonyLiv आणि SunNxt सब्सक्रिप्शन वगळता 368 रुपये आणि 369 रुपयांच्या प्रीपेड पॅकमध्ये कोणताही मोठा फरक नाही. जर ग्राहकांना डेटा आणि कॉलिंग बेनिफिट असलेला मंथली प्लॅन हवा असेल तर या प्लॅन्सचा विचार करता येईल.

एयरटेलच्या 319 रुपये आणि 359 रुपयांचा प्लॅनकडून मिळेल आव्हान

वोडाफोन-आयडियाच्या 368 रुपये आणि 369 रुपयांच्या प्लॅन्सना एयरटेलच्या 319 रुपये आणि 359 रुपयांच्या प्लॅन्सकडून टक्कर मिळू शकते. एयरटेलचे या दोन्ही रिचार्जमध्ये एका महिन्याची वैधता मिळते.

एयरटेलचा 319 रुपयांचा प्लॅन: या मंथली रिचार्जमध्ये डेली 2GB डेटा, 100 SMS, अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळेल. तसेच याची वैधता संपूर्ण एक महिन्याची आहे, मग महिन्यात 30 दिवस असो की 31 दिवस.

एयरटेलचा 359 रुपयांचा प्लॅन: या मंथली रिचार्ज प्लॅनमध्ये देखील 2 जीबी डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, डेली 100 एसएमएस मिळतात. तसेच, Airtel Xstream अ‍ॅप, SonyLiv, LionsgatePlay, ErosNow चं सब्सक्रिप्शन देण्यात आलं आहे.

The post कमी किंमतीत आले Vi चे दोन प्लॅन्स; रोज 2GB डेटासह मिळेल फ्री ओटीटीची मजा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-368-rs-369-prepaid-plans-launched-with-2gb-daily-data-30-days-validity/feed/ 0
लवकरच सुरु होऊ शकते Vodafone Idea ची 5G सर्व्हिसेस; खुद्द कंपनीनं दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-will-roll-out-5g-in-india-soon-says-kumar-mangalam-birla/ https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-will-roll-out-5g-in-india-soon-says-kumar-mangalam-birla/#respond Thu, 13 Apr 2023 07:42:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20251 Vodafone idea 5G च्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आदित्य बिर्ला समूहचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटलं आहे की वोडाफोन आयडिया लवकरच भारतात 5जी सेवा सुरु करेल. परंतु त्यांनी लाँच टाइमलाइनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. बिर्ला यांनी AIMA अवार्ड्सच्या प्रसंगी सांगितलं की, “5G रोलआउट लवकरच सुरु होईल.” तर दुसरीकडे भारतात Airtel आणि Jio वेगानं […]

The post लवकरच सुरु होऊ शकते Vodafone Idea ची 5G सर्व्हिसेस; खुद्द कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटलं की Vi लवकरच भारतात 5G लाँच करेल.
  • कंपनीनं सध्या 5जी रोलआउटसाठी कोणतीही टाइमलाइन दिली नाही.
  • दुसरीकडे जियो आणि एयरटेल देशात वेगानं 5जी नेटवर्कचा विस्तार करत आहेत.

Vodafone idea 5G च्या प्रतीक्षेत असणाऱ्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे. आदित्य बिर्ला समूहचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी म्हटलं आहे की वोडाफोन आयडिया लवकरच भारतात 5जी सेवा सुरु करेल. परंतु त्यांनी लाँच टाइमलाइनबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. बिर्ला यांनी AIMA अवार्ड्सच्या प्रसंगी सांगितलं की, “5G रोलआउट लवकरच सुरु होईल.” तर दुसरीकडे भारतात Airtel आणि Jio वेगानं 5जी नेटवर्कचा विस्तार करत आहेत.

विआय 5G लाइव्ह करण्यासाठी सुरु आहे तयारी

काही महिन्यांपूर्वी विआय कंपनीच्या कस्टमर सपोर्ट टीमनं ट्विटरवर सांगितलं होतं की, “Vi अनेक शहरांमध्ये 5G आणण्यासाठी सक्रिय पद्धतीनं भागीदारांसह काम करत आहे” आणि लवकरच आपल्या प्लॅनिंगचा खुलासा करेल.

Vi करत आहे संघर्ष

वोडाफोन-आयडिया 5जी सेवा लाइव्ह न केल्यामुळे आपले ग्राहक गमावू शकते. कारण अन्य दूरसंचार कंपन्यांनी खूप आधीपासून अनेक राज्यांमध्ये आपली 5G सेवा सुरु केली आहे. वोडाफोन आयडियानं 31 डिसेंबर, 2022 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत 7,990 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला आहे.

कंपनीनं सप्टेंबरच्या तिमाहीत 7,595.5 कोटी रुपयांचा तोटा सहन केला आहे. तसेच डिसेंबर तिमाहीत एकूण महसूल 10,620.6 कोटी रुपये होता, जो सप्टेंबरच्या तिमाहीत 10,614.6 कोटी रुपयांच्या तुलनेत 0.1 टक्के जास्त आहे.

एयरटेल आणि जियोला होतोय फायदा

दुसरीकडे एका रिपोर्टनुसार एयरटेलनं डिसेंबर 2022 मध्ये हरियाणा आणि ओरिसा सर्कलमध्ये 0.1 मिलियन आणि 0.2 मिलियन सक्रिय युजर्सना जोडले आहेत. यामुळे एयरटेलच्या ग्राहकांची संख्या वाढत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. तसेच रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की डिसेंबर ध्ये रिलायन्स जियोच्या सक्रिय युजर बेसमध्ये 3 मिलियनची वाढ झाली आहे, तर याच कालावधीत एयरटेलला 6 मिलियन ग्राहक जोडण्यात यश मिळालं आहे. यावरून स्पष्ट होत आहे की वोडाफोन आयडियाची 5जी सर्व्हिस नसण्याचा थेट फायदा दुसऱ्या दोन टेलिकॉम कंपन्यांना होत आहे.

The post लवकरच सुरु होऊ शकते Vodafone Idea ची 5G सर्व्हिसेस; खुद्द कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vodafone-idea-will-roll-out-5g-in-india-soon-says-kumar-mangalam-birla/feed/ 0
Vi नं 129 आणि 298 रुपयांच्या दोन स्वस्त प्लॅनमध्ये केले बदल; पूर्वीपेक्षा जास्त मिळतील बेनिफिट्स https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-129-rs-298-recharge-plans-revised/ https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-129-rs-298-recharge-plans-revised/#respond Thu, 13 Apr 2023 06:23:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20249 Vi नं आपल्या ग्राहकांना खुश करत दोन रिचार्ज प्लॅन जास्त बेनिफिट्ससह रिवाइज केले आहेत. कंपनीनं अनुक्रमे 129 रुपये आणि 298 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. हा अपडेट कंपनीनं 181 रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केल्यानंतर काही दिवसांनी केला आहे. पुढे आम्ही तुम्हाला माहिती या प्लॅनमधील बदलांची सविस्तर माहिती दिली आहे. Vi च्या 129 […]

The post Vi नं 129 आणि 298 रुपयांच्या दोन स्वस्त प्लॅनमध्ये केले बदल; पूर्वीपेक्षा जास्त मिळतील बेनिफिट्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vi ने आपले दोन प्रीपेड रिचार्ज प्लॅन्स रिवाइज केले आहेत.
  • रिवाइज केलेल्या प्लॅन्समध्ये Rs 129 आणि Rs 298 चा समावेश आहे.
  • रिवाइज केल्यानंतर आता विआय युजर्सना आधीपेक्षा जास्त बेनिफिट्स मिळत आहेत.

Vi नं आपल्या ग्राहकांना खुश करत दोन रिचार्ज प्लॅन जास्त बेनिफिट्ससह रिवाइज केले आहेत. कंपनीनं अनुक्रमे 129 रुपये आणि 298 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये बदल केले आहेत. हा अपडेट कंपनीनं 181 रुपयांचा एक नवीन प्रीपेड प्लॅन लाँच केल्यानंतर काही दिवसांनी केला आहे. पुढे आम्ही तुम्हाला माहिती या प्लॅनमधील बदलांची सविस्तर माहिती दिली आहे.

Vi च्या 129 रुपयांच्या प्लॅनची माहिती

  • 4 दिवस जास्त वैधता
  • आधी 14 दिवसांचा होता प्लॅन

इंटरनेट वापरण्यासाठी या विआय प्लॅनमध्ये आता जास्त डेटा मिळतो. तसेच, 129 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये 18 दिवसांच्या वैधतेसह अनलिमिटेड कॉलिंग आणि 200MB डेटा दिला जात आहे. याआधी प्लॅनमध्ये फक्त 14 दिवसांची वैधता दिली जात होती. परंतु यात फ्री एसएमएसचा फायदा मिळत नाही. ग्राहकांना लोकल SMS साठी 1 रुपये, एसटीडी एसएमएससाठी 1.5 रुपये आणि आयएसडी मेसेजसाठी 5 रुपये मोजावे लागतील. हा रिचार्ज प्लॅन त्या लोकांसाठी बेस्ट आहे जे कॉलिंगसाठी फोनचा जास्त वापर करतात.

Vi च्या 298 रुपयांच्या प्लॅनची माहिती

  • अ‍ॅप्सचा मिळेल अ‍ॅक्सेस

Vi नं 298 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत, ज्यामुळे आता तुम्हाला विआय मुव्हीज आणि टीव्ही, प्रीमियम मुव्हीज, ओरिजिनल, न्यूज आणि लाइव्ह टीव्हीच्या मोफत अ‍ॅक्सेससह 50GB 4G डेटा मिळतो. Vi Rs 298 प्रीपेड प्लॅन 28 दिवसांची वैधता देखील देतो. प्लॅनमध्ये आधी या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस मिळत नव्हता.

तसेच कंपनीनं अलीकडेच नवीन 181 रुपयांचा प्रीपेड प्लॅन देखील लाँच केला होता जो 30 दिवसांच्या वैधतेसह 30GB डेटा देतो. हा प्रीपेड प्लॅन प्रति दिन 1GB डेटा ऑफर करतो. यात फ्री कॉलिंगचा लाभ मिळत नाही कारण हा एक बूस्टर पॅक आहे, त्यामुळे तुम्ही जुन्या प्रीपेड प्लॅनसह याचा वापर करू शकता.

The post Vi नं 129 आणि 298 रुपयांच्या दोन स्वस्त प्लॅनमध्ये केले बदल; पूर्वीपेक्षा जास्त मिळतील बेनिफिट्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-rs-129-rs-298-recharge-plans-revised/feed/ 0
Vi ने लाँच केला 599 रुपयांचा प्लॅन! 110GB डेटासह अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस https://www.91mobiles.com/marathi/vi-launches-rs-599-postpaid-plan-with-110gb-data-unlimited-calls-and-ott-apps-access/ https://www.91mobiles.com/marathi/vi-launches-rs-599-postpaid-plan-with-110gb-data-unlimited-calls-and-ott-apps-access/#respond Fri, 07 Apr 2023 07:35:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20107 टेलीकॉम कंपनी वोडाफोन आयडियानं आपल्या प्रीपेड व पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन प्लॅन सादर केला आहे. अलीकडेच विआयचा 181 रुपयांच्या डेटा रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला होता. तर आता पोस्टपेड ग्राहकांना खुश करत कंपनीन 599 रुपयांचा प्लॅन मार्केटमध्ये गुपचुप सादर केला आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग, भरपूर डेटा आणि अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस दिला जातो. पुढे आम्ही या […]

The post Vi ने लाँच केला 599 रुपयांचा प्लॅन! 110GB डेटासह अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Vodafone idea ने 599 रुपयांचा पोस्टपेड फॅमली प्लॅन सादर केला आहे.
  • प्लॅनमध्ये ओटीटी अ‍ॅप्स, डेटा आणि फ्री कॉलिंगचा फायदा मिळेल.
  • ग्राहकांना प्लॅनमध्ये 200जीबी डेटा रोल ओव्हर देखील वापरता येईल.

टेलीकॉम कंपनी वोडाफोन आयडियानं आपल्या प्रीपेड व पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन प्लॅन सादर केला आहे. अलीकडेच विआयचा 181 रुपयांच्या डेटा रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला होता. तर आता पोस्टपेड ग्राहकांना खुश करत कंपनीन 599 रुपयांचा प्लॅन मार्केटमध्ये गुपचुप सादर केला आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग, भरपूर डेटा आणि अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस दिला जातो. पुढे आम्ही या नवीन पोस्टपेड प्लॅनची सविस्तर माहिती दिली आहे.

पोस्टपेड प्लॅनमध्ये मिळतील हे फायदे

कंपनीनं सादर केलेला हा पोस्टपेड प्लॅन दोन कनेक्शनसाठी वापरता येऊ शकतो. यात एकूण 110GB डेटा सह 200GB डेटा रोलओव्हर, अनलिमिटेड कॉल्स आणि फ्री एसएमएसचा फायदा मिळेल. पुढे आम्ही प्रायमरी आणि सेकंडरी मेंबर्सना मिळणाऱ्या बेनीफिट्सची माहिती दिली आहे.

प्रायमरी मेंबर्सना मिळतील हे फायदे

  • अनलिमिटेड कॉल्स
  • 40+30जीबी डेटा
  • 200जीबी डेटा रोल ओव्हर

सेकंडरी मेंबर्सना मिळणार फायदे

  • अनलिमिटेड कॉल्स
  • 40जीबी डेटा
  • 200जीबी डेटा रोल ओव्हर
  • 3000 SMS/मंथली

अतिरिक्त बेनिफिट्स

फक्त प्रायमरी ग्राहक प्लॅनमध्ये 6 महिन्यांचे अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. तसेक 499 रुपयांचे एक वर्षाचे Disney+ Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शन देखील या प्लॅनसह मिळत आहे, जे फक्त प्रायमरी मेंबरसाठी असेल. प्लॅनमध्ये दोन्ही मेंबर्ससाठी Vi Movies & TV VIP अ‍ॅक्सेस, प्रीमियम मूव्ही फुल अ‍ॅक्सेस, ओरिजनल, लाइव्ह टीव्ही आणि अनेक अ‍ॅपचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. सर्व मेंबर्स Vi Movies & TV App च्या माध्यमातून ZEE5 प्रीमियम मूव्ही आणि शो कंटेंट बघू शकतील. विआय अ‍ॅप मध्ये सर्व मेंबर्ससाठी 6 महीने अ‍ॅड-फ्री हंगामा म्यूजिकचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. दोन्ही मेंबर्स वी अ‍ॅप वर 1000 पेक्षा जास्त गेम्स खेळू शकतील आणि दर महिन्याला 5 गोल्ड गेम्स मोफत पण मिळतील.

599 रुपयांमध्ये एयरटेलचा पोस्टपेड प्लॅन

एयरटेलचा 599 रुपयांचा प्लॅन देखील अलीकडेच आला होता. या प्लॅनमध्ये 100 फ्री SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा रोलओव्हर बेनिफिटसह एकूण 75GB डेटा दरमाह मिळतो. तसेक युजर्सना 6 महिन्यासाठी Amazon Prime सब्सक्रिप्शन, 1 वर्षाचे Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शन, फ्री हँडसेट प्रोटेक्शन प्लॅन दिला जात आहे. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये नियमित कनेक्शनसह अनलिमिटेड कॉलिंगसह एक फ्री अ‍ॅड-ऑन कनेक्शन देखील घेता येईल.

The post Vi ने लाँच केला 599 रुपयांचा प्लॅन! 110GB डेटासह अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vi-launches-rs-599-postpaid-plan-with-110gb-data-unlimited-calls-and-ott-apps-access/feed/ 0