Xiaomi 13 Lite - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 05:36:31 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; कंपनीनं दिली माहिती https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-price-in-india-offers-and-sale/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-price-in-india-offers-and-sale/#respond Tue, 28 Feb 2023 07:22:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18233 शाओमीनं आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro भारतीय बाजारात आला आहे. MWC 2023 च्या मंचावरून हा फोन ग्लोबली लाँच केल्यानंतर आज कंपनीनं याच्या भारतीय किंमतीचा आणि सेल डेटची घोषणा केली आहे. सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 वर चालणारा हा शाओमी 13 प्रो भारतात किती रुपयांमध्ये विकला जाईल आणि यावर कोणत्या ऑफर्स […]

The post Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Pro भारतीय बाजारात लाँच झाला आहे.
  • या फोनची विक्री 10 मार्चपासून अ‍ॅमेझॉन इंडियावर सुरु होईल.
  • यात सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 देण्यात आला आहे.

शाओमीनं आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन Xiaomi 13 Pro भारतीय बाजारात आला आहे. MWC 2023 च्या मंचावरून हा फोन ग्लोबली लाँच केल्यानंतर आज कंपनीनं याच्या भारतीय किंमतीचा आणि सेल डेटची घोषणा केली आहे. सर्वात शक्तिशाली प्रोसेसर Qualcomm Snapdragon 8 Gen 2 वर चालणारा हा शाओमी 13 प्रो भारतात किती रुपयांमध्ये विकला जाईल आणि यावर कोणत्या ऑफर्स मिळतील, ही माहिती पुढे देण्यात आली आहे.

Xiaomi 13 Pro ची किंमत

शाओमी 12 प्रो भारतात सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच झाला आहे. हा मोबाइल फोन 12 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 79,999 रुपये आहे. Xiaomi 13 Pro ची विक्री 10 मार्च पासून सुरु होईल तसेच हा मोबाइल फोन Ceramic White आणि Ceramic Black कलरमध्ये अ‍ॅमेझॉन व मी स्टोर्सवरून विकत घेता येईल. आयसीआयसीआय बँक कार्डवर कंपनी थेट 10,000 रुपयांचा डिस्काउंट देत आहे. या बँकेच्या ग्राहकांना हा फोन 69,999 रुपयांमध्ये मिळेल. या फोनचा पहिला सेल 6 मार्चला होईल. हे देखील वाचा: Realme C55 भारतात कधी होणार लाँच आणि कसा असेल लुक व स्पेसिफिकेशन्स; इथे पाहा सर्व माहिती

Xiaomi 13 Pro Specification

  • 6.73″ QHD+ 120Hz Display
  • 12GB RAM + 512GB Storage
  • Qualcomm Snapdragon 8 Gen2
  • 32MP Selfie Sensor
  • 50MP+50MP+50MP Rear Camera
  • 120W Fast Charging
  • 50W Wireless Charging

फोटोग्राफीसाठी हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअपमध्ये तीन 50 मेगापिक्सलचे कॅमेरा सेन्सर्स आहेत ज्या लाइका लेन्स आहेत. बॅक पॅनलवर एफ/1.9 अपर्चर असलेला 50MP Sony IMX989 सेन्सर, एफ/2.2 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.0 अपर्चर असलेली 50 मेगापिक्सलची टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी 13 प्रो एफ/2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

शाओमी 13 प्रो अँड्रॉइड 13 आधारित मीयुआय 14 वर लाँच झाला आहे. हा पहिला शाओमी स्मार्टफोन आहे जो भारतात या युजर इंटरफेससह लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी यात 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट देण्यात आला आहे. ग्राफिक्ससाठी हा फोन एड्रेनो 740 जीपीयूला सपोर्ट करतो. हेव्ही युज आणि गेमिंगसाठी यात अल्ट्रा लार्ज लिक्विड कूल व्हीसी टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. हा शाओमी फोन LPPDDR5x RAM आणि UFS 4.0 storage टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतो.

या फोनमध्ये 3200 x 1440 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.73 इंचाचा क्वॉडएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. ही स्क्रीन ई6 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. कंपनीनं हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह सादर केला आहे जो कोर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टसनं प्रोटेक्टेड आहे. डिस्प्लेसह 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 1900निट्स ब्राइटनेस आणि 1920हर्ट्ज पीडब्ल्यूएम डिमिंग सारखे फीचर्स देखील मिळतात. हे देखील वाचा: महागडे फीचर्स परवडणाऱ्या किंमतीत! OnePlus Ace 2V सह कंपनी पुन्हा ठरणार का ‘फ्लॅगशिप कीलर’

शाओमीनं आपला हा नवीन स्मार्टफोन 4,820एमएएचच्या बॅटरीसह बाजारात आणला आहे. बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी शाओमी 13 प्रोमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच यूएसबीविना फोन चार्ज करण्यासाठी यात 50वॉट वायरलेस चार्जिंग आणि 10वॉट रिवर्स वायरलेस चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळते.

The post Xiaomi 13 Pro च्या भारतीय किंमतीचा खुलासा; कंपनीनं दिली माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-pro-price-in-india-offers-and-sale/feed/ 0
तुम्हाला ‘सेल्फी किंग’ बनवेल हा Xiaomi फोन; 5 कॅमेरे आणि आयफोनच्या लूकसह शाओमी 13 लाइट लाँच https://www.91mobiles.com/marathi/32-mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-13-lite-launched-check-price-features-specification/ https://www.91mobiles.com/marathi/32-mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-13-lite-launched-check-price-features-specification/#respond Mon, 27 Feb 2023 07:24:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18169 Xiaomi 13 Lite: शाओमीनं आपली Xiaomi 13 सीरिज MWC 2023 च्या मंचावरून जागतिक बाजारात लाँच केली आहे. या सीरिजमधील Xiaomi 13 आणि 13 Pro हे महागडे स्मार्टफोन आहेत तर त्यापेक्षा स्वस्त शाओमी 13 लाइट स्मार्टफोन देखील याच इव्हेंटमधून ग्राहकांच्या भेटीला आला आहे. याची खासियत म्हणजे यात 5 कॅमेरा सेन्सर मिळतात ज्यातील दोन फ्रंटला म्हणजे Dual […]

The post तुम्हाला ‘सेल्फी किंग’ बनवेल हा Xiaomi फोन; 5 कॅमेरे आणि आयफोनच्या लूकसह शाओमी 13 लाइट लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Lite सह Xiaomi 13 आणि 13 Pro देखील जागतिक बाजारात लाँच झाले आहेत.
  • या शाओमी मोबाइलचाकी फ्रंट लुक iPhone 14 Pro सारखा आहे.
  • हा स्मार्टफोन Snapdragon 7 Gen 1 चिपसेटवर चालतो.

Xiaomi 13 Lite: शाओमीनं आपली Xiaomi 13 सीरिज MWC 2023 च्या मंचावरून जागतिक बाजारात लाँच केली आहे. या सीरिजमधील Xiaomi 13 आणि 13 Pro हे महागडे स्मार्टफोन आहेत तर त्यापेक्षा स्वस्त शाओमी 13 लाइट स्मार्टफोन देखील याच इव्हेंटमधून ग्राहकांच्या भेटीला आला आहे. याची खासियत म्हणजे यात 5 कॅमेरा सेन्सर मिळतात ज्यातील दोन फ्रंटला म्हणजे Dual Selfie Camera सेन्सर्स आहेत. या कॅमेरा फ्रंट कॅमेरासाठी देण्यात आलेल्या पिल शेपमुळे Xiaomi 13 Lite मोठ्या प्रमाणावर Apple iPhone 14 Pro सारखा वाटतो.

Xiaomi 13 Lite Price

शाओमी 13 लाइटचे दोन मेमरी व्हेरिएंट्स सादर करण्यात आले आहेत. याच्या बेस मॉडेलमध्ये 8GB RAM + 128GB Storage देण्यात आली आहे, तर मोठा व्हेरिएंट 8GB RAM + 256GB Storage ला सपोर्ट करतो. या फोनची प्रारंभिक किंमत EUR 499 आहे जी 43,500 रुपयांच्या आसपास आहे. ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन Black, Lite blue आणि Lite pink कलरमध्ये सादर करण्यात आला आहे जो भारतात आणखी स्वस्तात उपलब्ध होऊ शकतो. हे देखील वाचा: जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर आणि मोठा कॅमेरा सेन्सरही; Xiaomi 13 Pro ची भारतात दणक्यात एंट्री

Xiaomi 13 Lite Specification

  • 6.55″ FHD+ AMOLED display
  • 8GB RAM + 256GB Storage
  • Qualcomm Snapdragon 7 Gen1
  • 32MP Dual Selfie Sensor
  • 50MP Triple Rear Camera
  • 67W 4,500mAh battery

शाओमी 13 लाइट 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे जो 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.55 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीसह येतो ज्याला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 नं प्रोटेक्ट करण्यात आलं आहे.

Xiaomi 13 Lite स्मार्टफोन 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसरवर लाँच झाला आहे जो 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या फोनमध्ये एड्रेनो 644 जीपीयू आहे. फोन गरम होऊ नये यासाठी 2360एमएम स्टेनलेस स्टील व्हॅक्युम चेंबर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 14 वर चालतो.

पावर बॅकअपसाठी शाओमी 13 लाइटमध्ये 4,500एमएएचची बॅटरी मिळते जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की हा मोबाइल फोन 40 मिनिटांत 0 ते 100 टक्क्यांपर्यंत चार्ज होतो. यात एनएफसी व अन्य कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत तसेच शाओमी 13 लाइटची जाडी फक्त 7.23एमएम आणि वजन 171 ग्राम आहे.

शाओमी 13 लाइटचा कॅमेरा सेग्मेंट हटके आहे. हा फोन एकूण 5 कॅमेरा सेन्सर्सला सपोर्ट करतो. 3 बॅक पॅनलवर तर 2 फ्रंट पॅनलवर देण्यात आले आहेत. ड्युअल सेल्फी कॅमेरा पाहता, स्क्रीनवर एफ/2.4 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल सेन्सर तसेच एफ/2.28 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आहे.हे देखील वाचा: तुम्ही देखील बदलू शकाल या मोबाइलचा डिस्प्ले, बॅटरीसह बरंच काही; हटके Nokia G22 कमी किंमतीत लाँच

Xiaomi 13 Lite च्या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सल सोनी आयएमएक्स766 प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तसेच बॅक पॅनलवर एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे.

The post तुम्हाला ‘सेल्फी किंग’ बनवेल हा Xiaomi फोन; 5 कॅमेरे आणि आयफोनच्या लूकसह शाओमी 13 लाइट लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/32-mp-dual-selfie-camera-phone-xiaomi-13-lite-launched-check-price-features-specification/feed/ 0
Xiaomi 13 Lite गुगल प्ले कन्सोलवर झाला लिस्ट; स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेटचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-lite-google-play-console-listing-once-again-confirms-xiaomi-civi-2-rebrand/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-lite-google-play-console-listing-once-again-confirms-xiaomi-civi-2-rebrand/#respond Wed, 11 Jan 2023 11:34:35 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16784 Xiaomi नं गेल्या महिन्यात आपली Xiaomi 13 सीरिज चीनमध्ये सादर केली आहे. या सीरिजमध्ये आतापर्यंत Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro हे दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केले आहेत. परंतु आता या सीरिजमध्ये आणखी एक स्मार्टफोन येईल ज्याचे नाव Xiaomi 13 Lite असेल असं दिसतं आहे. जुन्या Xiaomi 12 Lite प्रमाणे हा स्मार्टफोन देखील मिडरेंजमध्ये सादर […]

The post Xiaomi 13 Lite गुगल प्ले कन्सोलवर झाला लिस्ट; स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेटचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi नं गेल्या महिन्यात आपली Xiaomi 13 सीरिज चीनमध्ये सादर केली आहे. या सीरिजमध्ये आतापर्यंत Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro हे दोन फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केले आहेत. परंतु आता या सीरिजमध्ये आणखी एक स्मार्टफोन येईल ज्याचे नाव Xiaomi 13 Lite असेल असं दिसतं आहे. जुन्या Xiaomi 12 Lite प्रमाणे हा स्मार्टफोन देखील मिडरेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. लाँचपूर्वीच शाओमी 13 लाइट आता गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगच्या डेटाबेसमध्ये माय स्मार्ट प्राइसला दिसला आहे.

गुगल प्ले कन्सोल लिस्टिंगमधून शाओमी 13 लाइटचं कोडनेम Ziyi असल्याचं समजलं आहे. या लिस्टिंगमधून स्पष्ट झालं आहे की हा फोन चीनमध्ये लाँच झालेल्या शाओमी सीव्ही 2 चा रीब्रँड व्हर्जन असू शकतो. दोन्ही स्मार्टफोनचे रेंडर एकसारखे आहेत तसेच यात 1080 × 2400 पिक्सल रिजोल्यूशन व 440ppi पिक्सल डेन्सिटी असलेला डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट, 8GB RAM आणि अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टमचा खुलासा लिस्टिंगमधून झाला आहे. हे देखील वाचा: De Dhakka 2 OTT Release: मनोरंजनाचा आणखी एक धक्का; दे धक्का 2 ‘या’ दिवशी येणार ओटीटीवर

चीनमधील Xiaomi Civi 2 चे स्पेसिफिकेशन्स

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता या मोबाइल फोनमध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.55 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले मिळतो, जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट व 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर चालतो. हा मोबाइल फोन 1000निट्स ब्राइटनेस आणि 402पीपीआयला सपोर्ट करतो. फोनच्या स्क्रीनला कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा देण्यात आली आहे.

Xiaomi Civi 2 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनेलला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी हा शाओमी फोन एड्रेनो जीपीयूला सपोर्ट करतो.

32MP Dual Selfie Camera phone Xiaomi Civi 2 launched with Snapdragon 7 Gen 1 check price specifications details

शाओमी सिव्ही 2 ड्युअल सिमला सपोर्टसह बाजारात आला आहे जो 5जी टेक्नॉलॉजीवर चालतो. पावर बॅकअपसाठी इस मोबाइल फोनमध्ये 4,500एमएएच बॅटरी देण्यात आली आहे जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते. विशेष म्हणजे हा शाओमी फोन stainless VC liquid cooling system टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे.

शाओमी सिव्ही 2 स्मार्टफोनची मुख्य खासियत यातील सेल्फी कॅमेरा आहे. हा मोबाइल फोन 32MP + 32MP Dual Selfie Camera ला सपोर्ट करतो जे डिस्प्लेच्या वरच्या बाजूला मध्यभागी ‘पिल शेप’ नॉचमध्ये देण्यात आले आहेत. दोन्ही सेल्फी सेन्सर 32 मेगपिक्सलचे ज्यात एक लेन्स एफ/2.0 अपर्चरवर चालते तर दुसरी 100डिग्री फिल्ड ऑफ व्यूला सपोर्ट करणारी वाइड अँगल लेन्स आहे. विशेष म्हणजे कंपनीनं फ्रंटला देखील दोन फ्लॅश दिले आहेत. हे देखील वाचा: मारुतीची मोठा धमाका! पहिल्याच इलेक्ट्रिक कारमध्ये देणार 550KM ची रेंज

फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी लेन्सचा समावेश आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे.

The post Xiaomi 13 Lite गुगल प्ले कन्सोलवर झाला लिस्ट; स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेटचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-lite-google-play-console-listing-once-again-confirms-xiaomi-civi-2-rebrand/feed/ 0