ऑक्टोबरमध्ये येऊ शकतात दमदार नवीन मोबाइल; दिवाळीच्या आधी बाजारात येणाऱ्या स्मार्टफोनची यादी पाहा

Upcoming Smartphones October 2022: भारतात फेस्टिवल सीजन सुरु झाला आहे आणि त्यामुळे जुन्या स्मार्टफोन्सवर सेल, डिस्काउंट ऑफरची भरमार आहे. परंतु जर तुम्हाला हटके आणि जबरदस्त स्मार्टफोन्स हवे असतील तर खरी मजा आता सुरु होणार आहे. दिवाळीच्या आधी भारतात मोबाइल फोन कंपन्या नवीन स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहेत. यात 200MP चा कॅमेरा असलेला शाओमीचा दणकट स्मार्टफोन तर आहे सोबत स्वस्त वनप्लस देखील असू शकतो. पुढे आम्ही तुम्हाला ऑक्टोबर महिन्यात लाँच होणाऱ्या स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे.

Upcoming Smartphones October 2022

Oneplus Nord 3

Oneplus चा अफोर्डेबल प्रीमियम स्मार्टफोन OnePlus Nord 3 ऑक्टोबरमध्ये लाँच होऊ शकतो. OnePlus Nord 3 स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7 इंचाचा Full Hd Plus AMOLED डिस्प्ले मिळेल. हा वनप्लस फोन MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर आणि 50 मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअपसह सादर केला जाऊ शकतो. जोडीला 16MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाईल. आगामी OnePlus Nord 3 स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 150W फास्ट चार्जिंगसह देण्यात येईल. हे देखील वाचा: New 5G Smartphone Guide: 5G नेटवर्क दारात आलं म्हणून घाई नको; नवीन 5G स्मार्टफोन घेताना या 7 गोष्टींची काळजी घ्या

POCO M5s

POCO M5 launched in india with 50MP Camera MediaTek Helio G99 check price specifications sale discount offer details

शाओमीच्या सब-ब्रँड पोको अंतर्गत काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारात POCO M5s स्मार्टफोन लाँच झाला आहे. पोकोचा हा फोन ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारात दाखल होऊ शकतो. आगामी पोको स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED पॅनल दिला जाईल. हा MediaTek Helio G95 प्रोसेसरसह येणारा फोन Android 12 आधारित MIUI 13 वर चालेल. M5s मध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा, 8MP अल्ट्रा वाइड कॅमेरा, 2MP डेप्थ कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 13MP चा सेल्फी कॅमेरा आहे. यातील 5,000mAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Vivo V25e

Vivo V25 आणि Vivo V25 Pro स्मार्टफोननंतर चिनी स्मार्टफोन कंपनी विवो भारतात Vivo V25e स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. Vivo V25e स्मार्टफोन ऑक्टोबरमध्ये लाँच होणार आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये 6.44-इंचाचा Full HD+ 90Hz AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. Vivo V25e स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio G99 प्रोसेसर असेल. हा विवो फोन Android 12 आधारित FunTouchOS 12 वर चालेल. फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. यात 4,500mAh ची बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग व USB Type-C चार्जिंग पोर्ट दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: मिस करू नका ही संधी! 8,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 6GB रॅम असलेला Realme चा दमदार 5G स्मार्टफोन

Xiaomi 12T Pro

Xiaomi 12T Pro launched with 200mp camera and 120W fast charging low price specifications details

Xiaomi 12T Pro स्मार्टफोन भारतात ऑक्टोबर 2022 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. शाओमीच्या या फोनमध्ये Qualcomm चा दमदार Snapdragon 8+ Gen 1 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. या फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज दिली जाऊ शकते. Xiaomi 12T Pro स्मार्टफोन Android 12 आधारित MIUI 13 स्किनवर चालते. Xiaomi च्या आगामी प्रीमियम स्मार्टफोनची खासियत म्हणजे यातील 200MP चा प्रायमरी कॅमेरा.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here