Vodafone idea चा सर्वात स्वस्त प्लॅन लाँच; 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीत 28 दिवसांची वैधता

Highlights

  • वोडाफोन आयडियाचा नवा स्वस्त प्लॅन लाँच.
  • प्लॅनमध्ये 28 दिवसाची वैधता मिळते.
  • 5GB एक्स्ट्रा इंटरनेट डेटा मिळण्याची ऑफर देखील सादर

Vodafone Idea (Vi) नं आपल्या युजर्ससाठी एका नवा एंट्री लेव्हल प्लॅन सादर केला आहे, ज्याची किंमत 100 रुपयांपेक्षा कलमी आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी एयरटेलनं आपला 99 रुपयांचा प्लॅन बंद केला होता आणि आता Vodafone-idea आपला नवा स्वस्त प्लॅन सादर केला आहे. म्हणजे वोडाफोन आयडिया एयरटेलच्या नाराज ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न करत आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांच्या वॅलिडिटीसह काही प्रमुख बेनिफिट्स देण्यात आले आहेत. जर तुम्ही देखील 100 रुपयांपेक्षा कमी किंमतीतील नवीन रिचार्ज प्लॅन शोधत असाल तर वोडाफोन आयडियाचा हा प्लॅन तुम्हाला नक्की आवडेल. चला जाणून घेऊया Vi 99 plan ची संपूर्ण माहिती.

Vi 99 plan

Vodafone-idea च्या नव्या 99 रुपयांचा प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते. तसेच 99 चा फुल टॉकटाइम आणि 200 एमबी इंटरनेट डेटा देखील दिला जात आहे. परंतु हा प्लॅन कोणत्याही SMS सुविधेविना येतो. म्हणजे जर या प्लॅनचा वापर करणाऱ्या युजर्सना एसएमएस पाठवण्यासाठी चार्ज द्यावा लागेल. तसेच टॉकटाइम संपल्यावर लोकल आणि नॅशनल कॉल्ससाठी 2.5 पैसे प्रति सेकंद शुल्क आकारलं जाईल. तुम्ही हा प्लॅन vodafone-idea च्या वेबसाइट किंवा इतर रिचार्ज अ‍ॅपवरून रिचार्ज करून वापरू शकता. हे देखील वाचा: पुन्हा एकदा बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी वनप्लसची तयारी; किफायतशीर OnePlus Nord 3 चे स्पेसिफिकेशन लीक

फ्री मिळेल 5GB डेटा

Vodafone-idea नं काही दिवसांपूर्वी एक शानदार ऑफरची घोषणा देखील केली होती, या ऑफर अंतर्गत ग्राहकांना एक रुपया देखील खर्च न करता 5GB एक्स्ट्रा इंटरनेट डेटा मिळेल. ही ऑफर 7 फेब्रुवारी पर्यंत वैध ठेवण्यात आली आहे. यासाठी तुम्हाला फक्त कंपनीच्या VI अ‍ॅपचा वापर करून रिचार्ज करावा लागेल, त्यानंतर युजर्सना 5GB एक्स्ट्रा इंटरनेट डेटा मिळेल. हे देखील वाचा: अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा

परंतु या ऑफरमध्ये एक आत देखील आहे, अतिरिक्त मोफत डेटा मिळवण्यासाठी तुम्हाला 299 रुपयांपेक्षा जास्तीचा रिचार्ज करावा लागेल. 299 रुपयांपेक्षा जास्तीचा वोडाफोन आयडियाच्या Vi अ‍ॅपमधून केल्यास ग्राहकांना 5GB एक्स्ट्रा डेटा मिळेल. तसेच कंपनी 199 रुपयांच्या प्लॅनवर 2GB एक्स्ट्रा इंटरनेट डेटा देत आहे. या ऑफर अंतर्गत मोफत मिळणाऱ्या एक्स्ट्रा डेटाची वॅलिडिटी 28 दिवस असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here