12 जून ला लॉन्च होईल वीवो अॅपेक्स स्मार्टफोन, यात आहे अदृश्य कॅमेरा आणि स्क्रीन खालील फिंगरप्रिंट स्कॅनर

फेब्रुवारी मध्ये झालेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2018 मध्ये चीनी मोबाईल फोन निर्माता कंपनी वीवो ने एक अनोख्या फोन चे प्रदर्शन केले होते. कंपनी ने ‘अॅपेक्स’ नावाने असा कान्सेप्ट फोन सादर केला होता ज्यात फ्रंट पॅनल वर कोणताही कॅमेरा नव्हता तरी तो फोन सेल्फी घेण्यास सक्षम होता. हो तुम्ही बरोबर ऐकलत, फोन च्या बॉडी मध्ये एक अदृश्य कॅमेरा सेट करण्यात आला होता जो सेल्फी घेताना बाहेर येत असे.

वीवो चा हा फोन कॅमेरा ऐवजी अनेक खास डिजाइन मुळे चर्चे चा विषय झाला होता. विशेष म्हणजे कंपनी ने याला आता लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. वीवो ने फेब्रुवारी मध्ये या कॉन्सेप्ट फोन चे फक्त प्रदर्शन केले होते पण 12 जून ला हा लॉन्च होईल. पण असे होऊ शकते की सेल साठी थोडा अजून वेळ लागेल.

वीवो अॅपेक्स बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. हा कॅमेरा फोनच्या फ्रंट पॅनल वर नाही. पण तुम्ही सेल्फी किंवा वीडियो कॉल कमांड देताच हा स्वतःहून बाहेर पडेल. फोन च्या प्रदर्शनाच्या वेळी कंपनी ने माहिती दिली होती कि कॅमेरा ओपन होण्यासाठी आणि बाहेर येण्यासाठी फक्त 0.8 सेकेंड्स चा वेळ लागतो.

आधी सांगितल्याप्रमाणे या फोनची डिजाईन पण नवीन आहे. कंपनी ने वीवो अॅपेक्स बेजल फ्री डिजाइन सह सादर केला आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 98 टक्के आहे. फोनचे तिन्ही किनार्‍यांवर बेजल नाहीच आहेत. वरच्या बाजूला बेजल नाहीच. दोन्ही बाजूला फक्त 1.8एमएम चे बारीक बेजल आहेत. फक्त खालच्या बाजूला 4.3एमएम चा जाड बेजल देण्यात आला आहे. तसेच वीवो एक्स21 प्रमाणे या फोन मध्ये पण अंडर-डिसप्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे.

वीवो एक्स21 मध्ये स्क्रीन वर एका खास जागी टच करताच फोन अनलॉक होतो. त्याचप्रमाणे यात स्क्रीन च्या खालच्या भागता कुठेही टच करून फोन अनलॉक करता येईल. अजूनपर्यंत अशी टेकनोलॉजी अॅप्पल आणि सॅमसंग सारख्या कंपन्यांकडे पण नाही.

वीवो अॅपेक्स बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या फोन मध्ये तुम्हाला 5.99 इंचाची स्क्रीन मिळेल. कंपनी यात फुल एचडी+ ओएलईडी डिस्प्ले देऊ शकते. कंपनी याला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 845 चिपसेट वर सादर करू शकते आणि यात तुम्हाला 4जीबी रॅम मेमरी मिळेल. फोटोग्राफी साठी यात 12एमपी+12एमपी चा डुअल रियर कॅमेरा आणि 8—एमपी चा फ्रंट कॅमेरा मिळेल. पण भारतातील या फोन च्या लॉन्च बद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here