OnePlus Nord N30 5G चे फोटोज लाँचपूर्वीच लीक; बघा कशी असेल या फोनची डिजाईन

Highlights

  • OnePlus Nord N30 5G मे मध्ये लाँच होऊ शकतो.
  • या स्मार्टफोनच्या रेंडर ईमेजवरून डिजाईनचा खुलासा पण झाला आहे.
  • हा फोन OnePlus Nord CE 3 Lite 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

वनप्लस बद्दल अलीकडेच बातमी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘एन’ सीरीजच्या नवीन 5जी फोनवर काम करत आहे जो OnePlus Nord N30 नावानं मार्केटमध्ये एंट्री करेल. हा स्मार्टफोन गुगल प्ले कंसोलवर याआधीच दिसला आहे तर आता नवीन वनप्लस मोबाइलची रेंडर ईमेज देखील लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.

वनप्लस नॉर्ड एन30 5जीची डिजाईन

OnePlus Nord N30 5G चे फोटोज परदेशी टेक वेबसाइट गिजमोचायनाच्या माध्यमातून समोर आले आहेत. या मोबाइल फोनमध्ये फ्लॅट एज स्क्रीन देण्यात आली आहे. याच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खाली बारीक चिन पार्ट देखील आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला सेल्फी कॅमेरा असलेला पंच-होल देण्यात आला आहे.

OnePlus Nord CE 3 Lite

फोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वरच्या बाजूला डावीकडे आहे. इथे दोन रिंग आहेत ज्यात वरच्या सर्कलमध्ये प्रायमरी लेन्स देण्यात आली आहे तर खालच्या सर्कलमध्ये दोन सेन्सर आहेत. बॅक पॅनलवर OnePlus ब्रँडिंग आहे. फोनचा बॅक पॅनल शायनी आणि ग्लॉसी आहे तर फोटोमध्ये फोनचा ग्रीन कलर समोर आला आहे.

OnePlus Nord N30 5G च्या उजव्या पॅनलवर वॉल्यूम रॉकर देण्यात आला आहे तर डाव्या पॅनलवर पावर बटन आहे. या बटनवर फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळतो. फोनच्या लोवर पॅनलवर यूएसबी टाईप-सी पोर्ट देण्यात आला आहे, ज्याच्या एका बाजूला 3.5एमएम जॅक तर दुसऱ्या बाजूला स्पिकर आहे. हे देखील वाचा: Vivo Y78+ 5G फोन 50MP कॅमेऱ्यासह लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन

वनप्लस नॉर्ड एन30 5जी ची लाँच डिटेल्स

रिपोर्ट्सनुसार, OnePlus Nord N30 5G फोन अलीकडेच भारतात लाँच झालेल्या OnePlus Nord CE 3 Lite 5G चा रीब्रँडेड व्हर्जन असेल. हा मोबाइल अमेरिकन मार्केटमध्ये सादर केला जाईल ज्याचे स्पेसिफिकेशन्स देखील भारतातील नॉर्ड सीई 3 लाइट सारखे असतील. हा फोन Nord N30 5G 2023 Edition नावानं सादर होऊ शकतो तसेच मे महिन्यात हा फोन यूएसमध्ये कंपनी सादर करू शकते.

OnePlus Nord CE 3 Lite

वनप्लस नॉर्ड एन30 5जीचे स्पेसिफिकेशन्स

  • 6.72″ FHD+ 120Hz Display
  • Qualcomm Snapdragon 695
  • 108MP Rear Camera
  • 16MP Selfie Sensor
  • 67W 5,000mAh Battery

लीकनुसार OnePlus Nord N30 5G फोनमध्ये Nord CE 3 Lite 5G सारखे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स मिळतील. त्यामुळे नॉर्ड एन30 5जी मध्ये 6.72 इंचाचा फुलएचडी+ 120हर्ट्ज डिस्प्ले दिला जाऊ शकतो. हा वनप्लस फोन 8जीबी व्हर्च्युअल रॅमला सपोर्ट करतो तसेच प्रोसेसिंगसाठी यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट दिला जाऊ शकतो. हे देखील वाचा: वोडाफोन आयडियानं आणला 549 रुपयांचा प्लॅन; वैधता मिळेल भरपूर

OnePlus Nord CE 3 Lite

फोटोग्राफीसाठी वनप्लस नॉर्ड एन30 5जी मध्ये 108 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा तर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते जोडीला 67वॉट सुपरवूक फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here