6 सप्टेंबरला भारतात लॉन्च होईल वीवो वी11 प्रो, यात आहे ‘वी’ शेप नॉच डिस्प्ले आणि अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर

आजच आम्ही बातमी दिली होती की टेक कंपनी वीवो भारतीय बाजारात आपली वी स्मार्टफोन सीरीज वाढवण्याची योजना करत आहे आणि कंपनी या सीरीज मध्ये लवकरच वी11 स्मार्टफोन सादर करू शकते. आज वीवो ने स्वतः आपल्या नवीन फोन लॉन्च जगासमोर ठेवत मीडिया इन्वाईट शेयर केला आहे. वीवो ने पाठवलेले मीडिया इन्वाईट वरून आॅफिशियल झाले आहे की कपंनीचा आगामी स्मार्टफोन वीवो वी11 प्रो सप्टेंबर च्या 6 तारखेला भारतात लॉन्च करण्यात येईल.

वीवो इंडिया ने मीडिया इन्वाईट पाठवून सांगितले आहे की कंपनी 6 सप्टेंबरला भारतात एका ईवेंट चे आयोजन करणार आहे आणि या ईवेंट च्या मंचावरून कंपनी आपला नवीन स्मार्टफोन वी11 प्रो देशात लॉन्च करेल. वीवो च्या इन्वाईट ईमेज वरून स्पष्ट झाले आहे की हा फोन ‘वी’ शेप च्या नॉच डिस्प्ले सह सादर होईल तसेच फोन मध्ये अंडर-डिस्प्ले फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात येईल. बोलले जात आहे की वीवो या डिस्प्लेला हॉलो डिस्प्ले चे नाव देईल.

वीवो वी11 प्रो की स्पेसिफिकेशन्स की बात करें तो सामनें आए लीक्स के अनुसार वी11 स्मार्टफोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात येईल ज्यात 6.41-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन देण्यात येईल. फोनचा डिसप्ले सुपर एमोलेड असेल तसेच वीवो नेक्स प्रमाणे या स्मार्टफोन मध्ये पण अंडर-डिसप्ले फिंगर​प्रिंट सेंसर असेल. तसेच फोन मध्ये ओपो एफ9 प्रो सारख छोटीशी ‘V’ आकाराची नॉच देण्यात येईल.

लीक नुसार वीवो वी11 फनटच ओएस सोबत एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात येईल तसेच या फोन मध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट दिला जाऊ शकतो. कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी रॅम देऊ शकते. तर फोन मध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. सोबतच हा फोन डुअल सिम आणि 4जी एलटीई पण सपोर्ट करेल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वीवो वी11 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 12-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर मिळतील. तर सेल्फी साठी फोन च्या फ्रंट पॅनल वर 25-मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर मिळू शकतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोन मध्ये पावर बॅकअप साठी 3,400एमएएच ची बॅटरी मिळू शकते. पण फोनची किंमत किती असेल तसेच हा सेल साठी कधीपासून उपलब्ध होईल या माहितीसाठी 6 सप्टेंबरची वाट बघावी लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here