लाँचपूर्वीच झाला Vivo V29 5G च्या किंमतीची खुलासा; जाणून घ्या माहिती

Highlights

  • Vivo V29 5G ऑगस्ट मध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • हा फोन ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये येऊ शकतो.
  • डिवाइसमध्ये स्नॅपड्रॅगन 778जी प्लस प्रोसेसर मिळू शकतो.

मोबाइल निर्माता विवो लवकरच आपल्या V-सीरीजचा विस्तार करू शकते. ह्यात कंपनीचा प्रीमियम स्मार्टफोन Vivo V29 5G लाँच होऊ शकतो. गेल्या काही दिवसांपासून डिवाइस वेगवेगळ्या सर्टिफिकेशन वेबसाइटवर देखील दिसला आहे. आता ह्या फोनची किंमत देखील समोर आली आहे. पुढील पोस्टमध्ये लीक किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

Vivo V29 5G किंमत (लीक)

  • विवोच्या नवीन Vivo V29 5G ची किंमत टिपस्टर सुधांशु अंभोरेनं लीक केली आहे.
  • टिपस्टरनुसार Vivo V29 5G स्मार्टफोन 256 जीबी स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला जाऊ शकतो.
  • किंमत पाहता हा CZK 11,990 म्हणजे सुमारे 46,000 रुपयांचा असेल.
  • फोनसाठी युजर्सना ब्लू आणि ब्लॅक असे दोन कलर ऑप्शन मिळू शकतात.

Vivo V29 5G कधी येईल बाजारात

Vivo V29 5G स्मार्टफोनच्या लाँच डेट बाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. तसेच कंपनीनं देखील ह्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार हा डिवाइस येत्या ऑगस्ट महिन्यात लाँच होऊ शकतो.

Vivo V29 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले: विवो वी29 5जी मध्ये 6.5 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो. ह्यात 1080 x 2408 पिक्सल रिजॉल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सपोर्ट दिला जाऊ शकतो.
  • प्रोसेसर: 5G परफॉर्मन्ससाठी युजर्सना ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 778जी प्लस ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो.
  • कॅमेरा: Vivo V29 5G मध्ये कंपनी ट्रिपल रियर कॅमेरा देऊ शकते. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची डेप्थ लेन्स असू शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी: हा 4,5000एमएएचच्या बॅटरीसह बाजारात येऊ शकतो.
  • OS: फोन अँड्रॉइड 13 वर आधारित असू शकतो.
  • अन्य: डिवाइसमध्ये वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिम 5G, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे बेसिक फीचर्स मिळू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here