6.28-इंचाचा नॉच डिसप्ले, 6जीबी रॅम आणि 24-एमपी सेल्फी कॅमेरा सह लॉन्च झाला वीवो चा दमदार स्मार्टफोन एक्स21आय

वीवो च्या आगामी स्मार्टफोन वीवो एक्स21आय च्या बातम्या अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या. टेना वर झालेल्या लिस्टिंग नंतर अंदाज लावला जात होता कि कंपनी लवकरच हा स्मार्टफोन अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर करेल. त्यानुसार आज वीवो ने हा स्मार्टफोन चीनी बाजारात लॉन्च केला आहे. वीवो एक्स21आय चीनी बाजारात आॅफिशियल झाला आहे तिथे याची किंमत 2698 युआन ठेवण्यात आली आहे. भारतीय करंसी नुसार ही किंमत जवळपास 28,700 रुपये आहे.

वीवो एक्स21आय च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे. फोन मध्ये 2280 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.28-इंचाचा सुपर एमोलेड डिसप्ले देण्यात आला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन फनटच 4.0 आधारित एंडरॉयड 8.1 ओरियो सह सादर करण्यात आला आहे तसेच 2.0गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी60 चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली-जी72 जीपीयू देण्यात येईल.

वीवो एक्स21आय ला कंपनी ने दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केले आहे. एक वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 64जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा वेरिएंट 4जीबी रॅम मेमरी सह 128जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो. दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत एक्सपांड वाढवता येते. वीवो च्या हा फोन कपंनी च्या अार्टिफिशियल इंटेलीजेंस ‘जोवी’ मुळे वापरणे सोप्पे आणि मजेदार होते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहत वीवो एक्स21आय च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोन मध्ये एलईडी फ्लॅश सह 12-मेगापिक्सल चे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे एआई टेक्निक ला सपोर्ट करतात. तसेच सेल्फी साठी फोन मध्ये 24-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. वीवो एक्स21आय स्मार्टफोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे यात फोन फेस अनलॉक टेक्निक पण आहे.

वीवो एक्स21आई डुअल सिम सह 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. तसेच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह या फोन मध्ये 3,425एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. चीनी बाजारात हा फोन रूबी रेड, ओरा व्हाईट आणि पोलर नाईट ब्लॅक कलर वेरिएंट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. किंमत पाहता वीवो ने आपल्या या फोन च्या दोन्ही वेरिएंट्स ची किंमत सारखीच ठेवली आहे. चीन मध्ये हे फोन 19 मे पासून सेल साठी उपलब्ध होतील. पण या फोन च्या इंडिया लॉन्च बद्दल आता काहीच सांगता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here