Vivo Y27 चे 5G आणि 4G मॉडेल एनबीटीसीवर आले समोर, पाहा कसे असतील स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • डिवाइसची एंट्री ह्या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते.
  • Vivo Y27 4G मध्ये Helio G85 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • डिवाइसमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.

मोबाइल निर्माता विवो कंपनी Vivo Y27 4G आणि Vivo Y27 5G डिवाइस लवकरच लाँच करू शकते. हे दोन्ही स्मार्टफोन मिड रेंज सेगमेंटमध्ये बाजारात येऊ शकतात. सध्या दोन्ही मोबाइल एनबीटीसी सर्टिफिकेशनवर दिसले आहेत. त्यामुळे हे लवकरच लाँच होतील हे स्पष्ट झालं आहे. पुढे तुम्हाला सर्टिफिकेशन आणि लीक स्पेसिफिकेशनची माहिती देण्यात आली आहे.

Vivo Y27 4G आणि Vivo Y27 5G एनबीटीसी लिस्टिंग

  • एनबीटीसी सर्टिफिकेशननुसार Y27 सीरीजचा 4G व्हर्जन V2249 मॉडेल नंबरसह दिसला आहे.
  • 5G व्हेरिएंट मॉडेल नंबर V2302 सह समोर आला आहे.
  • मॉडेल नंबर आणि नावाव्यतिरिक्त डिवाइसच्या इतर कोणत्याही स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली नाही.
  • बोलले जात आहे की डिवाइसची एंट्री ह्या महिन्याच्या अखेरीस होऊ शकते.

Vivo Y27 4G चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : स्पेसिफिकेशन पाहता डिवाइसमध्ये 6.64 इंचाचा आयपीएस एलसीडी एफ एचडी प्लस डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 600 निट्स पीक ब्राइटनेस आणि हाय रिजॉल्यूशन दिलं जाईल.
  • प्रोसेसर : फोनचा प्रोसेसर पाहता डिवाइसमध्ये Helio G85 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.
  • स्टोरेज : डिवाइस 6GB रॅम +128GB स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. युजर्सना रॅम वाढवण्यासाठी एक्सपांडेबल रॅम सपोर्ट देखील मिळू शकतो.
  • कॅमेरा : स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. ज्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 2 मेगापिक्सलची सेकंडरी कॅमेरा लेन्स दिली जाऊ शकते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.
  • बॅटरी : बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 44 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. बॅटरी किती एमएएच असेल हे समजलं नाही.
  • अन्य : डिवाइसमध्ये IP54 रेटिंग, वायफाय, ब्लूटूथ, ड्युअल सिमला सपोर्ट सारखे बेसिक फीचर्स दिले जातील.
  • OS : हा मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर चालू शकतो.

फोनचा 5G व्हेरिएंटमधील स्पेसिफिकेशन्स देखील 4G मॉडेल सारखे असू शकतात परंतु प्रोसेसर वेगळा दिसू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here