स्मार्टफोन कपंनी वीवो टेक बाजारात सतत काही ना काही आणत आहे. कंपनी 29 मे ला भारतात अंडर डिसप्ले फिंगरप्रिंट सेंसर वाला स्मार्टफोन एक्स21 लॉन्च करणार आहे तर कंपनी चा अनोख्या डिजाईन वाला स्मार्टफोन वीवो अॅपेक्स लवकरच लॉन्च होणार आहे. अंर्तराष्ट्रीय मंचावर आपल्या स्मार्टफोन्स ची संख्या वाढवत वीवो ने नवीन डिवाईस वाय83 सादर केला आहे. वीवो वाय83 जगातील पहिला असा स्मार्टफोन आहे जो मीडियाटेक च्या हेलीयो पी22 चिपसेट वर चालतो.
वीवो वाय83 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील लेटेस्ट चिपसेट आहे. मीडियाटेक ने काही काळापूर्वी हेलीयो पी22 चिपसेट सादर केला होता आणि वीवो वाय83 पहिला असा स्मार्टफोन आहे जो या चिपसेट सह लॉन्च झाला आहे. हेलीयो पी22 चिपसेट फास्ट प्रोसेसिंग सह आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्निक वर खास काम करतो. वीवो वाय83 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण अॅप्पल आयफोन प्रमाणे 19:9 आस्पेक्ट रेश्यो वाल्या नॉच डिसप्ले सह सादर करण्यात आला आहे.
वीवो वाय83 मध्ये 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.22-इंचाचा मोठा डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच 4.0 आॅपरेटिंग सिस्टम वर चालतो. तसेच फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज स्पीड वाला आॅक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. कपंनी कडून या फोन मध्ये 4जीबी चा रॅम देण्यात आला आहे. हा फोन 64जीबी च्या इंटरनल स्टोरेज ला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येते.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता वाय83 च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर वाला 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन डुअल सिम सह 4जी एलटीई ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्निक देण्यात आली आहे तर पावर बॅकअप साठी यात 3,260एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
वीवो ने हा स्मार्टफोन चीनी बाजारात 1498 युआन या किंमतीत सादर केला आहे जे भारतीय करंसी नुसार जवळपास 16,000 रुपये आहेत. चीन मध्ये हा फोन आॅर्रा व्हाईट, पोलर ब्लॅक आणि रेड ह्य कलर आॅप्शन्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. भारता सह जगातील इतर राष्ट्रांमध्ये हा फोन कधी सेल साठी उपलब्ध होईल या माहितीची वाट बघितली जात आहे.