91मोबाईल्स ने दोन आठवड्यांपूर्वीच एक्सक्लूसिव बातमी दिली होती कि वीवो इंडिया लवकरच भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन वाय95 घेऊन येणार आहे. आमच्या बातमीत आम्ही दावा केला होता कि हा फोन ‘वी’ शेप वाल्या हेलो नॉच डिस्प्ले वर बनलेला असेल आणि कंपनी वाय95 खासकरून आॅफलाईन मार्केट व रिटेल स्टोर्स वर उपलब्ध करण्याच्या उद्देशाने देशात लॉन्च करत आहे. आज पुन्हा एकदा आम्हाला एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि वीवो वाय95 भारतात 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल.
वीवो वाय95 बद्दल रिटेल विश्वातील सूत्रांकडून बातमी मिळाली आहे कंपनी लवकरच इंडियन मोबाईल मार्केट मध्ये आपला नवीन स्मार्टफोन वाय95 आणणार आहे. वाय95 इंडियन मार्केट मध्ये 14,990 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. हा फोन आॅफलाईन बाजारात येईल जो रिटेल स्टोर्स वर येत्या काही दिवसांत सेल साठी उपलब्ध होईल. वीवो वाय95 ची खासियत असेल या फोनचा हेलो नॉच डिस्प्ले. म्हणजे वाय95 मध्ये बेजल लेस स्क्रीन वर वरच्या बाजूला छोटीशी ‘वी’ शेप नॉच असेल आणि या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा देण्यात येईल.
वीवो वाय95 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.22-इंचाच्या मोठ्या डिस्प्ले सह सादर केला जाईल. वाय95 एंडरॉयड ओरियो आधारित असेल जो मीडियाटेक हेलीयो पी22 चिपसेट वर चालले. वीवो हा फोन 4जीबी रॅम सह लॉन्च करेल. फोन मध्ये 64जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल जी माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येईल.
वाय95 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात येतील. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. वीवो आपला फोन एआई टेक्नॉलॉजी सह बाजारात आणेल. डुअल सिम व 4जी एलटीई सोबतच या फोन मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स असतील. तसेच पावर बॅकअप साठी वीवो वाय95 मध्ये 3,260एमएएच ची बॅटरी मिळेल.















