एक लाख पाच हजार 360 कोटी रुपयांमध्ये विकली गेली फ्लिपकार्ट, आता बदलेल आॅनलाईन शॉपिंग ची दुनिया

भारतीय आॅनलाईन शॉपिंग बाजारात अग्रस्थानी असलेली ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्ट ने काल जगातील मोठी आणि ऐतिहासिक डील केली आहे. फ्लिपकार्ट ने आपले 77 टक्क्यांपेक्षा जास्त शेयर अमेरिकेतील प्रसिद्ध आणि दिग्गज कंपनी वालमार्ट ला विकले आहेत. हा ई-कॉमर्स मधील जगातील सर्वात मोठा सौदा आहे. वालमार्ट ने फ्लिपकार्ट ला 1,600 कोटी डॉलर म्हणजे जवळपास 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमत देऊन कंपनी शेयर विकत घेतले आहेत.

वालमार्ट ने फ्लिपकार्ट चे 77 टक्क्यांपेक्षा जास्त शेयर विकत घेतले आहेत. फ्लिपकार्ट चा हा 77 टक्के हिस्सा जापानी टेक कंपनी सॉफ्टबँक ने ​वालमार्ट ला विकला ज्याची किंमत 16 अरब डॉलर ठरवण्यात आली. या डील नंतर फ्लिपकार्ट च्या दोन फाउंडर्स मधील एक सह-संस्थापक सचिन बंसल आपले शेयर विकून कंपनी पासून वेगळे होतील.

विशेष म्हणजे भारतातील 40 टक्के ऑनलाइन बाजारावर फ्लिपकार्ट चे नियंत्रण आहे. साल 2007 मध्ये सचिन बंसल आणि बिन्नी बंसल ने एकत्र येऊन फ्लिपकार्ट ची सुरवात केली होती. हे दोघेही आधी अमेजॉन डॉट कॉम इंक मध्ये काम करत होते. या लोकांनी आॅनलाईन पुस्तके विकून कंपनी ची सुरवात केली होती. काल झालेल्या व्यवहारावरून समजले की अंर्तराष्ट्रीय बाजारात फ्लिपकार्ट चे मुल्य 20.8 अरब डॉलर आहे म्हणजे 1 लाख 400 कोटी पेक्षा जास्त.

असा अंदाज लावला जात आहे की वॉलमार्ट ची भारतातील ही एंट्री इंडियन रिटेल मार्केट मध्ये कमी किंमतीत सामान आणि जास्त वरायटी वाले प्रोडक्ट्स घेऊन येऊ शकते, ज्यामुळे क्रांतिकारी बदल होतील. दुसरीकडे वॉलमार्ट व फ्लिपकार्ट च्या या डील नंतर अमेजॉन इंडियाला बाजारात चांगलीच प्रतिस्पर्धा मिळेल. पण एवढे मात्र नक्की की ई-कॉमर्स मध्ये झालेल्या या उलथापालथी मुळे देशातील व्यापाराचा वेग वाढेल तसेच भारतात रोजगार पण उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here