व्हॉट्सअॅप व्हिडीओ डाउनलोड : जगभरात WhatsApp सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. ह्या अॅपच्या माध्यमातून युजर्स फक्त एकमेकांना टेक्स्ट मेसेज करत नाहीत तर फोटो, व्हिडीओ, ऑडियो आणि व्हॉइस कॉल देखील करू शकतात. त्याचबरोबर व्हॉट्सअॅपवर युजर्स स्टेटसवर फोटो, व्हिडीओ आणि टेक्स्ट शेयर देखील करू शकतात. मेसेजवर मिळालेला व्हिडीओ सहज डाउनलोड करता येतो. इथे आम्ही तुम्हाला व्हॉट्सअॅपवर व्हिडीओ डाउनलोड करण्याची पद्धत सांगणार आहोत.
व्हॉट्सअॅप व्हिडीओ डाउनलोड
स्टेप 1 : सर्वप्रथम व्हट्सअॅप चॅटवर जा, जिथून तुम्हाला व्हिडीओ डाउनलोड करायचा.
स्टेप 2 : इथे तुम्हाला व्हिडीओवर खालच्या बाजूला तीन चिन्ह दिसतील. जिथे तुम्हाला व्हिडीओची साइज दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ डाउनलोड करू शकता.
जर तुम्ही व्हिडीओ आधी डाउनलोड केला असेल आणि पुन्हा डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला व्हिडीओ ओपन करावा लागेल आणि उजवीकडे असलेल्या थ्री डॉट मेन्यूवर क्लिक करा. इथे तुम्ही सेव्ह बटनवर क्लिक करून व्हिडीओ डाउनलोड करू शकता.
व्हॉट्सअॅप स्टेटस व्हिडीओ कसा डाउनलोड करायचा
व्हॉट्सअॅपवर स्टेटस फीचर साल 2017 मध्ये आलं आहे. स्टेटसच्या माध्यमातून युजर्स व्हिडीओ, फोटो आणि टेक्स्ट शेयर करू शकतात. तुमच्या कॉन्टेक्ट लिस्टमधील युजर्सनी शेयर केलेला स्टेटस व्हिडीओ किंवा फोटो डाउनलोड करणे कठीण काम आहे. परंतु आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही स्टेटस व्हिडीओ आणि फोटो काही सेकंदात डाउनलोड करू शकता.
Files by Google अॅप के जरिए
स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये Google Play Store मधून Files By Google अॅप डाउनलोड करा.
स्टेप 2 : हे अॅप ओपन करा. इथे तुम्हाला डावीकडे दिसणाऱ्या मेन्यू आयकॉनवर टॅप करून सेटिंग्समध्ये जा.
स्टेप 3 : सेटिंग्समध्ये ‘Show Hidden Files’ च्या समोर असलेला टॉगल ऑन करा.
स्टेप 4 : आता अॅप मधून इंटरनल स्टोरेजमध्ये जा. त्यानंतर व्हॉट्सअॅप फोल्डर ओपन करा. व्हॉट्सअॅप फोल्डरमध्ये मीडिया नावाचं फोल्डर ओपन करा.
त्यानंतर स्टेटस फोल्डर ओपन करा. इथे व्हॉट्सअॅपच्या स्टेटसवरील व्हिडीओ आणि फोटो दिसतील. हे इथून कॉपी करून दुसऱ्या फोल्डरमध्ये पेस्ट करता येतात किंवा शेयर देखील करता येतात.
स्टेटस सेव्हर अॅप
स्टेप 1 : स्टेटसवरील व्हिडीओ किंवा फोटो सेव्ह करण्यासाठी तुम्ही थर्ड पार्टी अॅप्स Status Saver देखील फोनमध्ये इंस्टॉल करू शकता.
स्टेप 2 : त्यानंतर अॅप फोनमध्ये ओपन करा आणि काही परमिशन द्या, म्हणजे व्हॉट्सअॅपवरील स्टेटस ह्या अॅपमध्ये दिसू लागतील.
स्टेप 3 : ह्यातील जो व्हिडीओ किंवा फोटो तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तो निवडा आणि डाउनलोड करा.