शाओमी ई6 झाला बेंचमार्किंग साइट वर लिस्ट, 3जीबी रॅम सह चालेल स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर

चीन ची अॅप्पल म्हणून ओळखली जाणारी टेक कंपनी शाओमी येणार्‍या 23 मे ला आपल्या होम मार्केट चीन मध्ये एका ईवेंट चे आयोजन करणार आहे. चर्चा चालू आहे की शाओमी या ईवेंट मध्ये आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन मी 7 सादर करेल. यादिवशी कंपनी मी 7 सह आपल्या इतर लेटेस्ट प्रोडक्ट्स पण सादर करेल. पण या मोठया लॉन्च च्या आधीच शाओमी चा एक नवीन आगामी स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर लिस्ट करण्यात आला आहे, ज्यात फोन चे नाव आणि काही स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळाली आहे.

शाओमी ई6 नावाने बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर शाओमी चा स्मार्टफोन लिस्ट करण्यात आला आहे. लिस्टिंग शाओमी च्या या आगामी स्मार्टफोन चे नाव समोर आले आहे तर फोन च्या प्रोसेसर व रॅम संबंधी पण काही माहिती मिळाली आहे. लिस्टिंग नुसार शाओमी ई6 मध्ये 2.0गीगाहर्ट्ज चा आॅक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल. हा फोन एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित असेल तसेच क्वालकॉम च्या स्नॅपड्रॅगन 625 चिपसेट वर चालेल.

लिस्टिंग नुसार शाओमी ई6 मध्ये 3जीबी रॅम मेमरी दिली जाईल तसेच गीकबेंच वर या फोन मध्ये फेस डिटेक्शन मिळेल याची पण माहिती मिळाली आहे. गीकबेंच वर शाओमी ई6 ला सिंगल-कोर मध्ये 841 प्वाइंट देण्यात आले आहेत तसेच मल्टी-कोर मध्ये या फोन ला 4259 स्कोर मिळाला आहे. गीकबेंच वरची ही लिस्टिंग 16 मे ची आहे. त्यामुळे येणार्‍या महिन्यात शाओमी आपला हा स्मार्टफोन सादर करेल अशी अपेक्षा आहे.

शाओमी द्वारा 23 मे ला आयोजित करण्यात येणार्‍या ईवेंट बद्दल बोलले जात आहे की शाओमी यादिवशी मी 7 सह आपल्या 8व्या वर्धापनदिनानिमित्त एक स्पेशल एनिवर्सरी एडिशन पण सादर करू शकते जो मी 7 प्लस नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. तसेच दोन्ही स्मार्टफोंस सह या ईवेंट मध्ये मी बँड 3 पण अंर्तराष्ट्रीय बाजारात लॉन्च केला जाऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here