16,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर Google Pixel 6a परवडणाऱ्या किंमतीत; Big Billion Days Sale ची जबरदस्त ऑफर

big billion days sale google pixel 6a price offer india

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart वर लवकरच Flipkart Big Billion Days Sale सुरु होणार आहे. कंपनीनं सेलची अचूक तारीख सांगितली नाही परंतु यात मिळणार ऑफर्स आणि बेस्ट डील्सची माहिती वेबसाइटवर दिली जात आहे. परंतु यातील सर्वात जबरदस्त डील Google Pixel 6a स्मार्टफोनवर मिळत आहे. या डिवाइसवर थेट मोठा डिस्काउंट तर दिला जात आहे जोडीला एक्सचेंज ऑफर, बँक ऑफर, ईएमआय आणि नो कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील मिळत आहेत.

गुगलनं जुलैमध्ये हा स्मार्टफोन 43,999 रुपयांमध्ये लाँच केला होता. तेव्हा गुगल प्रेमींकडून देखील या किंमतीची तक्रार करण्यात आली होती. आता फ्लिपकार्ट बिग बिलियन सेलमध्ये Pixel 6a फोनची किंमत डिस्काउंटनंतर 27,699 रुपये होईल. म्हणजे तुम्हाला या फोनवर पूर्ण 16,000 पर्यंतचा डिस्काउंट मिळेल. नेटकऱ्यांनी देखील या ऑफरला उचलून धरलं आहे. हे देखील वाचा: 200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone

Google Pixel 6a Offer

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Flipkart नं ऑफरची माहिती सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. हा फोन 43,999 रुपयांमध्ये लाँच झाला होता, त्यावर सर्वप्रथम बिग बिलियन डे सेल दरम्यान डिस्काउंट दिला जाईल, त्यामुळे हा फोन तुम्हाला 34,199 रुपयांमध्ये मिळेल. प्रीपेड ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना 3,500 रुपयांची सूट मिळेल. तसेच आयसीआयसीआय आणि अ‍ॅक्सिस बँक कार्ड होल्डर्सना 3,000 रुपयांचा डिस्काउंट देण्यात येईल. त्यामुळे Google Pixel 6a ची किंमत फक्त 27,699 रुपये होईल.

Google Pixel 6a चे स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 60Hz आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 3 च्या प्रोटेक्शनसह येतो. गुगलच्या या फोनमध्ये अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर, स्टीरियो स्पिकर, ड्युअल मायक्रोफोन आणि नॉइज इंप्रीसनसह सादर करण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 6E, Bluetooth 5.2 LE, GPS, NFC आणि USB Type C पोर्ट देण्यात आला आहे. यात Titan M2 सिक्योरिटी चिप देखील देण्यात आली आहे.

big billion days sale google pixel 6a price offer india

Google Pixel 6a स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 12.2MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 12MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स देण्यात आली आहे. हा कॅमेरा सेटअप OIS आणि EIS ला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये 4K 60FPS व्हिडीओ रेकॉर्डिंग करता येते. हे देखील वाचा: 200MP Camera असलेला भारतातील पहिला फोन; पाहा बसतोय का तुमच्या बजेटमध्ये हा 5G Phone

हा फोन Android 12 OS सह सादर करण्यात आला आहे. गुगलचा हा फोन कंपनीच्या Tensor प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. तसेच ग्राफिक्ससाठी Mali-G78 GPU देण्यात आला आहे. यात 6GB LPDDR5 RAM, आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. यातील 4306mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here