Xiaomi Mi 9 Pro 5G चा हॅंडसॉन वीडियो झाला लीक, येईल ट्रिपल कॅमेऱ्यासह

Xiaomi या महिन्यात 24 सप्टेंबरला एका स्पेशल इवेंट मध्ये आपले दोन 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने याची माहिती चीनी सोशल मीडिया वेबसाइट Weibo वर एक पोस्ट द्वारे दिली होती. या इवेंट मध्ये कंपनी Xiaomi Mi 9 Pro आणि Mi MIX 4 सादर करेल. आता लॉन्चच्या आधी या दोन्ही फोन पैकी Mi 9 Pro चा हॅंडसॉन वीडियो इंटरनेट वर लीक झाला आहे.

या हॅंडसॉन वीडियो मध्ये फोनचा डिजाइन समोर आला आहे. वीडियो नुसार Mi 9 Pro 5G मध्ये डॉट-नॉच डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा वर्टिकल पोजिशन मध्ये राइट कॉर्नर वर असेल. फोन नेक्सट-जनरेशन 5G सेल्यूलर कनेक्टिविटी आणि MIUI 10 सह Android 9 Pie वर चालेल.

तसेच शाओमीचा हा फोन कंपनीच्या लेटेस्ट 30W Mi Charge Turbo wireless टेक्नोलॉजी सह येईल. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 855 Plus प्रोसेसर आणि 48-मेगापिक्सल प्राइमरी सेंसर दिला जाईल. इतकेच नव्हे तर हँडसेट मध्ये 8 GB रॅम व 256 GB स्टोरेज दिली जाऊ शकते. Mi 9 Pro जगातील पहिला फोन असेल जो मी चार्ज टर्बो 30 वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट सह येईल जी 4,000 एमएएच ची बॅटरी फक्त 25 मिनिटांत 0 पासून 50 टक्के चार्ज करते.

याआधीच्या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले होते कि शाओमीची 100W सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग 4,000 mAh बॅटरी असेलला फोन फक्त 17 मिनिटांत चार्ज करेल. शाओमीचे चेयरमन लिन बिन यांनी Weibo वर एक वीडियो पण शेयर केला होता ज्यात दाखवण्यात आले होते कि शाओमीच्या 100W सुपर चार्ज टर्बो फास्ट चार्जिंग टेक्नॉलजीने 4,000 mAh ची बॅटरी फक्त 7 मिनिटांत 0-50 टक्के चार्ज होते तसेच 50-100 टक्के चार्ज होण्यास या फोनला 17 मिनिटे लागतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here