Realme 5 vs Xiaomi Mi A3, चार पाऊले पुढे तर दोन पाउले मागे

इंडियन स्मार्टफोन मार्केट मधील नंबर वन कंपनी असलेल्या Xiaomi ने आज भारतात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Mi A3 लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन 12,999 रुपयांच्या बेस किंमतीत बाजारात आला आहे जो ट्रिपल रियर कॅमेरा आणि गूगल एंडरॉयड वन सारख्या फीचर्स सह येतो. भारतात यशस्वीरीत्या एक वर्ष पूर्ण करणाऱ्या टेक कंपनी Realme ला Xiaomi चे मोठे स्पर्धक मानले जाते. Realme पण Xiaomi प्रमाणे कमी किंमतीत शानदार स्पेसिफिकेशन्स असलेले स्मार्टफोन घेऊन येते. कालच Realme ने भारतात आपले दोन नवीन डिवाईस Realme 5 आणि Realme 5 Pro लॉन्च केले आहेत. लो बजेट सेग्मेंट मध्ये Realme 5 Xiaomi Mi A3 साठी धोकादायक ठरू शकतो असे बोलले जात आहे. हे दोन्ही फोन या महिन्यात प्लॅटफॉर्म वर सेल साठी उपलब्ध होईल. त्यामुळे जर तुम्ही पण एखादा नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल आणि गोंधळात असाल कि Xiaomi Mi A3 घ्यावा किंवा Realme 5 तर खाली आम्ही दोन्ही स्मार्टफोन्सच्या स्पेसिफिकेशन्सची तुलना केली आहे, ज्यातून कळेल कि Xiaomi Mi A3 बेस्ट आहे कि Realme 5 चांगला आहे.

डिस्प्ले व डिजाईन

Xiaomi Mi A3 कंपनीने 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1560 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.08-इंचाच्या एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्ट केला गेला आहे. Mi A3 7व्या जेनरेशनच्या इन-डिस्प्ले फिंगर प्रिंट सेंसर सह येतो. तर दुसरीकडे Realme 5 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन स्क्रीनच्या सुरक्षेसाठी हा कोर्निंग गोरिल्ला ग्लास 3+ ने प्रोटेक्ट केला गेला आहे. हे दोन्ही ही स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो.

Mi A3 व Realme 5 दोन्हीच्या बॅक पॅनल वर रियर कॅमेरा सेटअप डावीकडे वर्टिकल शेप मध्ये देण्यात आला आहे. Realme 5 मध्ये 4 रियर कॅमेरा सेंसर आहे तर Mi A3 च्या रियर कॅमेरा सेटअप मध्ये 3 सेंसर्स आहे. Realme 5 च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आहे तर Mi A3 तो नाही. Xiaomi Mi A3 मध्ये वाल्यूम रॉकर व पावर बटण उजव्या पॅनल वर देण्यात आले आहेत तर Realme 5 मध्ये डाव्या पॅनल वर वाल्यूम रॉकर आणि उजव्या पॅनल वर पावर बटण देण्यात आला आहे.

ओएस व प्रोसेसर

Xiaomi Mi A3 एंडरॉयड 9 पाई आधारित एंडरॉयड वन ओएस वर सादर केला गेला आहे जो एंडरॉयड 10 भारतात रोलआउट होताच त्यावर उपडेट होईल. तर Realme 5 एंडरॉयड 9.0 पाई वर सादर झाला आहे. हे दोन्ही स्मार्टफोन 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आक्टाकोर प्रोसेसर सह 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 एआईई चिपसेट वर चालतो. त्याचप्रमाणे ग्राफिक्स साठी पण Realme 5 आणि Xiaomi Mi A3 दोन्ही फोन एड्रेनो 610 जीपीयू ला सपोर्ट करतात.

रॅम व स्टोरेज

Xiaomi Mi A3 कंपनी द्वारा दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा बेस वेरिएंट 4जीबी रॅम सह 64जीबी की इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो तथा दूसरे वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम सह 128जीबी की इंटरनल मेमरी देण्यात आली आहे. या दोन्ही ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येते.

Realme 5 भारतात तीन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. फोनचा सर्वात छोटा वेरिएंट 3जीबी रॅम सह 32जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे फोनच्या दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे जो 64जीबी इंटरनल स्टोरेज आणि 128जीबी इंटरनल मेमरी सह लॉन्च झाला आहे. या फोन मध्ये पण 256जीबी पर्यंतचा कार्ड वापरता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट

Xiaomi Mi A3 ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.79 अपर्चर वाला 48-मेगापिक्सल Sony IMX586 प्राइमरी सेंसर + एफ/2.2 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + 2-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तर वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी Mi A3 एफ/2.0 अपर्चर वाल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Realme 5 कंपनीने क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/2.25 अपर्चर वाला 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + 2-मेगापिक्सलचा पोर्टरेट + 2-मेगापिक्सलची मॅक्रो लेंस देण्यात आली आहे. सेल्फी साठी Realme 5 एफ/2.0 अपर्चर वाल्या 13-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

बॅटरी

Xiaomi Mi A3 कंपनीने 4,030mAh बॅटरी वर लॉन्च केला आहे. फोनची बॅटरी क्विक चार्ज 3.0 टेक्नॉलॉजी सह 18वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे Mi A3 बॉक्स सह 10वॉट चा चार्जर पण मिळेल. Realme 5 बद्दल बोलायचे तर हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरीला सपोर्ट करतो जी 10वॉट चार्जिंगला सपोर्ट करते.

किंमत

Xiaomi Mi A3

4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 12,999 रुपये

6जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 15,999 रुपये

Realme 5

3जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज = 9,999 रुपये

4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज = 10,999 रुपये

4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज = 11,999 रुपये

फक्त स्पेसिफिकेशन्सचा सार काढला तर Realme 5 आणि Xiaomi Mi A3 चा चिपसेट एक सारखा आहे. Realme 5 मध्ये रियर कॅमेरा सेंसर्स जास्त आहेत तर Mi A3 मध्ये रियर मेगापिक्सल जास्त आहे. सेल्फी कॅमेरा मध्ये Xiaomi Mi A3 पुढे तर बॅटरी व डिस्प्ले मध्ये Realme 5 वर आहे. दोन्ही फोनच्या 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंट मध्ये Realme 5 Xiaomi Mi A3 पेक्षा 2,000 रुपयांनी स्वस्त आहे.

Mi A3 या 23 ऑगस्ट पासून शॉपिंग साइट अमेजन वर सेल साठी उपलब्ध होईल तर Realme 5 येत्या ऑगस्ट 27 पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here